जर्मनी - स्वित्झर्लँड : तयारी

१.तयारी | २.अन्न | ३.लोक | ४.वास्तव्य | ५.प्रवास व घटना | (६.समारोप)
=====================

जगात बरेच देश आहेत, पण त्यापैकी दोन देशांचे मला खूप जुने आकर्षण आहे. जर्मनी आणि जपान! युद्धात बेचिराख झालेले हे देश ज्या कष्टाने, मेहनतीने, हुशारीने व चातुर्याने पुन्हा दिमाखात उभे राहिले त्याला तोड नाही. दुसरे असे की मला फिरायला प्रचंड आवडते. दुसरे कोणी परिचित फिरायला निघालेले समजले तरी आनंदित होतो तर स्वतः निघायचे ठरवल्यावर बघायलाच नको. मात्र मला 'टूरिझम' फारसा आवडत नाही. गाजलेल्या टूरिस्ट जागी टुरिस्टांच्या रेट्यात स्वत:ला झोकून देणे नी इतर अनेकांनी ज्या ठिकाणी उभे राहून काढलेले फोटो बघितले आहे, बरोबर त्याच ठिकाणी साधारण तसेच फोटो (तुलनात्मक शरीरयष्टीप्रमाणे कमी/अधिक पार्श्वभूमी झाकून नी फक्त माझा चेहरा ठेवून) काढण्यासाठी बर्‍याच जास्त पैशाचा व वेळेचा खर्च हा मला अपव्यय वाटतो. शिवाय सध्या वय, ताकद वगैरे गोष्टी साथीला आहेत तोवरच एकट्याने बेटोक भटकंती शक्य आहे हेही लक्षात येत होते. पण परदेशात स्वतःहून सहल प्लान करायचा धीर म्हणा, प्रयत्न म्हणा घडत नव्हता.

मायदेशी अनेक ठिकाणी स्वतःच ट्रिपा केल्या आहेत त्यामुळे एकूणच ट्रीप प्लॅन करणं - किमान भारतात - मला जमत होतं, पण तरी नवख्या देशात हे किती जमेल खात्री नव्हती. तरी शेवटी हो - नाही करत मी व बायकोने १४ दिवसांच्या जर्मनी-स्वित्झर्लँड ट्रीपला जायचं ठरवलं आणि नुकतेच जाऊन यशस्वीरीत्या परतलोही. "कोणत्याही एजंट/गाइडशिवाय अथपासून इतिपर्यंत ट्रीप प्लॅन केली व ती बर्‍यापैकी ठरवल्याप्रमाणे पार पाडली याचा तुला आता गर्व झाला आहे" हे अर्थात बायकोचं मत चिंत्य आहे :P. इथे एकेक दिवसाच पत्रक न देता, वेगवेगळे 'ग्रुप बाय' क्लॉजेस लावून सध्या या लेखमालिकेचे पाच भाग प्लान केले आहेत व (आम्हाला) गरज भासल्यास समारोपाचा सहावा समारोपाचा स्वतंत्र भागही लिहेन.

प्रवासाचे वर्णन वा प्रवासातील आमचे वर्णन सुरू करण्याआधी या ट्रीपपुरती पूर्वतयारी देणे मला गरजेचे वाटते. येथील अनेकांनी अशा सहली स्वतःहून आखून त्या यशस्वीरीत्या पारही पाडल्या असतील त्यांना या भागात काहीच नवे मिळणार नाही. खरंतर त्यांना "ह्यॅ यात काय एवढं" किंवा "काय स्वतःचीच टिमकी वाजवतोय" असं वाटू शकेल - नी ते काही प्रमाणात खरंही असेल. पण असेही काही मित्र-मैत्रिणी डोळ्यापुढे आहेत ज्यांना या प्रक्रियेतही रस आहे व उत्सुकता आहे त्यांच्यासाठी आखणी-प्रकीयेवर हा लेख लिहितो आहे. आशा आहे तुमच्या पुढील आंतरराष्ट्रीय ट्रिप्स प्लान करताना याचा उपयोग होईल. शिवाय ट्रीप इतकेच मला त्याचे प्लानिंग करणे अतिशय आवडते आणि ट्रीप काही दिवसांत संपते पण हे प्लॅनिंग त्याआधी कित्येक महिने चालू असते.

दुसर्‍या भागापासून लेखातील काही भाग गौरी (माझी बायको) लिहिणार आहे, तो भाग वेगळ्या रंगात प्रकाशित करेन.

=========

तर ट्रीप प्लान करण्याच्याआधी कुठे? किती दिवस वगैरेवर बराच काळ चर्चा झाली. गौरीला (माझी पत्नी) जपानी भाषा येते त्यामुळे खरंतर जपान सोयीचा ठरला असता. परंतु जपानमधील सहलीच्या खर्चाचा ढोबळ अंदाज काढायला सुरवातीचेच आकडे जमवल्यावर हे सध्यातरी जमणे कठीण आहे हे जाणवले. मग माझा रोख जर्मनीकडे वळला. काही युरोपात विविध टूर्सबरोबर जाऊन आलेल्यांशी बोललो
"जर्मनीला का जातोयस? १४ दिवस आहेत तर त्यापेक्षा लंडन, पॅरिस, स्विस कर!"
"जर्मनीत बघायला असं काही नाहीये खास, त्यापेक्षा पॅरिस कर"
"जर्मनी करायचंच असेल तर कर, पण युरोपात स्विस, पॅरिस मस्ट आहे"
एकुणात पॅरिसवर एकमत होतं, लंडनला जाणंही मंडळी समजू शकत होती पण हे 'इतके' पैसे खर्चून फक्त जर्मनीला जाणं काही लोकांना रुचेना. मात्र जर्मनी बघायचेच अशी इच्छा प्रबळ होती. पण न जाणो लोक म्हणतात तसं तिथे इतके दिवस खर्च करून खरंच बघण्यासारखं फार काही नसेल तर काय घ्या म्हणून स्विसचं शेपूटही जोडायचं ठरलं.

मग पुढचा प्रश्न होता किती दिवस? आम्हाला सुट्ट्या किती दिवस मिळू शकतील? आमची २ वर्षांची मुलगी आमच्याशिवाय किती दिवस आजी-आजोबांसोबत आनंदाने राहू शकेल? किती दिवसांचा खर्च परवडेल? वगैरे बाबींचा लसावि कधी एक आठवडा निघे तर कधी ३ आठवडे तरी मस्ट आहेत असे मत बने. शेवटी उपलब्ध सुट्ट्यांचा जय झाला आणि आम्ही १४ दिवसांची सहल करायचे नक्की केले. घरगुती सोहळे, आईवडीलांना उपलब्ध वेळ वगैरेंचा अंदाज घेऊन तारखाही ठरल्या.

आतापर्यंत तसे ठीक होते. मुख्य गमतीला सुरुवात झाली ती पासपोर्ट प्रकरणाने. बायकोच्या पासपोर्टावर माझे नाव व माझ्या पासपोर्टावर बायकोचे नाव स्पाउस म्हणून घालायला अर्ज केला होता, शिवाय पत्त्यातही बदल होता. केंद्रावर प्रोसेसही सुरळीत झाली होती. तात्काळ पासपोर्ट्समुळे नवे पासपोर्ट हातातही होते. पण बायकोला पोलिस व्हेरीफिकेशनसाठी काही बोलावणे येईना (माझे होऊन गेले होते). शेवटी कळले की तो अर्ज कमिशनर हाफिसात अडकला आहे. मग त्याच्या मागे आठवडाभर पळापळ करून ते पूर्ण करून घेतले.

दरम्यानच्या काळात शेंगेन विजासाठी काय काय लागते याचा शोध सुरू झाला होता.
"हे बघ बाकी तुला काय हवं ते कर, हे मात्र एजंटला दे. उगाच एखाद्या लहानशा गोष्टीसाठी अर्ज रिजेक्ट नको व्हायला" हा अत्यंत योग्य सल्ला इतक्यावेळा ऐकूनही खाज म्हणा, उत्सुकता म्हणा किंवा बाणा म्हणा मी दरवेळी नकार देत होतो. "मी सगळं करीन माझं माझं" हे टुमणं मी लावलं होतं. मग सगळ्यांनी सांगणंही सोडून दिलं. या विजासाठी तुमची आर्थिक आघाडी भक्कम असल्याचे दाखवावे लागतेच, त्यासोबत तुमच्या सहलीचा 'आराखडा' सादर करावा लागतो, तारखेसकट! आधी कुठे जायचं हे शॉर्टलिस्ट करायचं होतं. नुसतं कुठे बघायला चांगलं आहे इतकंच क्रायटेरिया असून उपयोगाचं नव्हतं. ते ठिकाण इतर ठिकाणांपेक्षा वेगळं तरीही रोचक असं काय देणार आहे? हा माझा मुख्य क्रायटेरिया होता. शिवाय अंतर्गत प्रवास हे (खरंतर २-३ पण प्रसंगी) ४-५ तासांच्या वर होणार नाही अश्या नियोजनाच्या अटी स्वतःवरच लादलेल्या होत्या. शिवाय आजन्म मुंबईसारख्या शहरांत वाढल्याने चकचकीत शहरे, टोलेजंग इमारती वगैरेंचे अ‍ॅट्रॅक्शनही नव्हते.

याव्यतिरिक्त त्या ठिकाणी पोचायची सोय, राहायची सोय बघणेही आवश्यक होते. टूरिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही शेंजेन विजाला अप्लाय करता तेव्हा तुम्हाला वास्तव्याच्या काळातील राहण्याच्या सोयीचा पुरावा द्यावा लागतो. तेव्हा जितके दिवस त्या भागात आहोत त्या दिवसांच्या हॉटेल बुकिंगचे कन्फर्मेशन जोडणे गरजेचे होते. आता हॉटेल्सच्या किंवा इतर सहली आखणार्‍यांच्या (जसे मेक माय ट्रीप किंवा यात्रा किंवा इतर परदेशी कंपन्या) वेबसाईटवर हॉटेल बुकिंग करताना काही डिपॉझिट रक्कम किमान भरणे आवश्यक होते, तर काही ठिकाणी अख्खे पैसे भरणे गरजेचे होते. बुकिंग क्यान्सल केल्यास डिपॉसिट व/वा हॉटेलभाड्याचा काही हिस्सा वाया जाणार होता. आता उद्या विजा मिळालाच नाही तर काय करा? शेवटी अजून शोधाशोध केल्यावर बुकिंग.कॉमचा शोध लागला. इथे बर्‍याच हॉटेल्समध्ये बुकिंग करताना कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत, शिवाय क्यान्सलेशन फी वगैरेही प्रकार नाहीत. तेव्हा किमान विजापुरते तरी बुकिंग याच साईटवरून करायचे ठरले.

त्यानंतर प्रश्न होता विमान तिकिटांचा. विजा अप्लाय करण्याआधी विमानाचे तिकीट वा तिकीट ब्लॉक केल्याचा पुरावा आवश्यक होता. तिकीट ब्लॉक करायची सुविधा अजूनही कोणाकडे असते कल्पना नाही, पूर्वी ही पद्धत होती. अजूनही काही ट्रॅव्हल एजंट हे करून देऊ शकले असते कदाचित पण पुन्हा 'बाणा' आडवा आला नी पार्शली रिफंडेबल तिकीट जालावरून बुक केले - नी विजासाठी पहिली मोठी गुंतवणूक केली Wink आंतरराष्ट्रीय विमानतळे अर्थातच मोठ्या शहरांत असल्याने आम्ही ती पूर्णपणे टाळू शकणार नव्हतोच तेव्हा जाताना फ्रॅकफुर्ट व येताना म्युनिक ही शहरे निवडली व मुंबई-फ्राफ्रु व म्युनिक-मुंबई अशी थेट विमाने बुक केली

आता पहिल्या दिवशी फ्रँकफुर्ट आणि चौदाव्या दिवशी म्युनिक हे दोन विदाबिंदु नक्की होते. मग सुरू झाला जर्मनी आणि स्वित्झर्लँडमधील आम्हाला आवडू शकतील ठिकाणांचा शोध. विकीट्रॅव्हल, ट्रिपअ‍ॅडवायझर, लोनली प्लॅनेट आदी नेहमीच्या यशस्वी कलाकारांसोबतच, काही बॅगपॅकर्सचे ब्लॉग्ज, नियतकालिकांतील लेख वगैरेच्या साहाय्याने ढोबळ रूपरेखा तयार करेपर्यंत आणखी १५-२० दिवस गेले. व आमचा ठरलेला प्लान असा होता:
फ्रँकफुर्ट (१ रात्र) --> हेडलबर्ग (१ रात्र) --> स्टुटगार्ट व परिसर(४ रात्री)--> झुरिक (२-३ तास)--> ग्रॅफनोर्ट (स्वित्झर्लँडमधील एंगलबर्गच्या अलीकडील एक खेडेगाव) १ रात्र --> इंटरलाकेन (१ रात्र) --> बासेल (२ रात्री) --> म्युनिक व परिसर (३ रात्री). त्यानंतर पाळी होती इंटर्नल ट्रान्सपोर्टेशनची. बहुतांश ट्रान्स्पोर्ट ट्रेनने करायचे ठरले. पैकी स्टुटगार्ट ते झुरिक व बासेल ते म्युनिक या प्रवासाची (इंटरनॅशनल) तिकिटे विजा अ‍ॅप्लिकेशनच्या आधीच काढणे गरजेचे होते. त्या रूपात दुसरी सायझेबल इन्व्हेस्टमेंट केली.

त्यानंतर ऑफिसात रजा अप्लाय करणे व ऑफिसकडून रजा मंजूर असल्याचे लेटर मिळवणे, सॅलरी स्लिप्स, आयटी रिटर्न्सची कॉपी, बँक स्टेटमेंट्स वगैरे गोष्टी (दोघांच्याही) जमा करून जर्मन कॉन्सुलेटच्या पुण्यातील VFS हाफिसात जाऊन एकदाचा विजा अप्लाय केला! पहिल्या फटक्यात कोणत्याही त्रासाशिवाय चार दिवसांत तो मंजूर झाला व आम्हाला स्टॅम्प्ड विजा हाती पडला.

आता आधी बुक केलेल्या हॉटेल्सपैकी काहींत बदल करणे, बहुतांश जागी हॉटेलाऐवजी हॉस्टेलमध्ये डॉर्मेट्री बेड्स बुक करणे ही कामे सुरू झाली. विविध रेल्वे स्टेशन्सचे नकाशे मिळवणे, त्या त्या शहरातील लोकल ट्रान्स्पोर्टचा अभ्यास करून ठेवणे, कोणती गाडी कुठे येते, ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवरून सुटेल, स्टेशनपासून हॉटेल/हॉस्टेलपर्यंत पोचायचे मार्ग - सर्वोत्तम पब्लिक ट्रान्स्पोर्ट रूट, डे पासेस, स्विस पासेस आदींचा अभ्यास करणे ही कामेही चालू होती. प्रत्येक शहरात फिरण्याचा सोपा, सहज आणि स्वस्त मार्ग कुठला हे विविध अनुभवांवरून ठरवणे यात बर्‍यापैकी वेळ लागला. शक्य तितका विविध प्रकारचा अनुभव मिळवण्याची इच्छा होती. त्यात एअरबीएनबीचा शोध लागला आणि आम्ही म्युनिक मध्ये एका जर्मन कुटुंबासोबत राहायचे ठरवले. हा अगदी वेगळा अनुभव होता, त्यासंबंधी त्या भागात लिहेनच. त्याव्यतिरिक्त इन्शुरन्स, फॉरेन करंसी, इंटरनॅशनल सिम कार्ड वगैरेची जमवाजमव सुरू होती.

शेवटी प्रत्येक दिवसाचा प्रोग्राम, बुकिंग्ज, तिकिटे, मॅप्स, त्या दिवशी लागू शकणारे जर्मन शब्द असे सगळ्याचे मिळून एक पाकीट अशी चौदा दिवसांची चौदा एन्व्हलप्स तयार केली. सोबत केवळ पाठीवरच्या सॅक्स घेतल्या होत्या. कमीत कमी वजन, भरपूर उत्साह आणि एक अनामिक भितीयुक्त हुरहुर-एक्साइटमेंट याने आम्हा पात्रांची सिद्धता झाली होती. आता वेध लागले होते ते उड्डाणाचे!

=====
काही (रुक्ष पण उपयुक्त) माहिती:
१. विजा अ‍ॅप्लिकेशन फी: रु. ५१०० पर पर्सन अधिक माहिती इथे
२. विजा अ‍ॅप्लिकेशच्या वेळी मान्यताप्राप्त इन्श्युरन्स कंपन्यांची यादी इथे मिळेल. ही यादी सतत बदलते तेव्हा अप्लाय करायच्या आधी एकदा व्हेरीफाय करणे
३. हॉटेल बुकिंग करतेवेळी प्रत्येक ट्रॅवलरचे नाव बुकिंगवर असणे मँडेटरी आहे
४. जर तुम्ही जर्मनीसाठी अप्लाय करताय तर जरी प्रवास शेंगेन एरीयात असेल तरी जर्मनी सोडण्याचे व जर्मनीत परतण्याचे (परतणार असाल तर) प्रुफ देणे गरजेचे आहे. (जसे आम्ही जर्मनी टु स्विस व वापस अशी ट्रेन तिकिटे जोडली होती
५. अधिक स्वस्तात ट्रीप करता येऊ शकेल, त्यासाठी तुमची काउचसर्फिंगची तयारी हवी. मग निवासाचा खर्च जवळजवळ फुकट! मी अजून या प्रकाराचा अनुभव घेतलेला नाही, पुढिल ट्रिपला घ्यायचा मानस आहे. बहुया कसे होते ते.
६. स्वित्झर्लँडला तुम्ही काय बघणार आहात त्यानुसार स्वीस पास घ्यायचा की स्वीस फ्लेक्सी पास की स्वीस ५०% रिडक्शन पास ते ठरवा. मात्र ३-४ दिवस रहाणार असाल तर स्वीस पास सारखा दुसरा पास नाही!
७. युथ हॉस्टेलचे हॉस्टेल बुक करणार असाल तर युथ हॉस्टेलची मेंबरशीप भारतात असतानाच घ्या. जालावरील दर तुम्ही युथ हॉस्टेलचे मेंबर आहात हे समजून दिलेले असतात. तसे नसल्यास तुम्हाला तिथे मेंबरशीप घेता येते जी भरपूर महाग पडते.
८. साधारण कल्पना यावी म्हणून, आम्हाला सगळे सगळे खर्च पकडून (तेथील शॉपिंग (चॉकलेटे वगैरे), इन्श्युरन्स, सिमकार्ड वगैरेच नाही तर घरापासूनची भारतातील टॅक्सीसकट) एकूण खर्च अडिच लाख आला (इन्क्लुडिंग एअरफेअर आणि इतर प्रत्येक खर्च, हा दोघांचा १४ दिवसांचा एकूण खर्च) आहे.

(क्रमशः)
---
१.तयारी | २.अन्न | ३.लोक | ४.वास्तव्य | ५.प्रवास व घटना | (६.समारोप)

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

वा मस्तं! होस्टेलस वर रहाण्याची मजा औरच... सगळं कॉलेजियन पब्लिक असतं. जबरदस्त धिंगाणा! पुढचे भाग येउदे पटापट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मराठीतल्या प्रवासवर्णनांच्या रूढ आणि कंटाळवाण्या-प्रेडिक्टेबल झालेल्या संकल्पनेला फाट्यावर मारून लिहिल्याबद्दल अभिनंदन! वेगळ्याच गोष्टींबद्दल वाचायला मिळणार आहे. सवडीनं आणि तब्बेतीत पुढचे भाग येऊ द्यात. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सहमत. छान सुरुवात. फोटू कमी आणि लेखन जास्त असावे ही अपेक्षा. आजकाल फोटू टाकून त्यालाच प्रवासवर्णन म्हणण्याची संतापजनक पद्धत रूढ झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख येणार याची खात्री होतीच, पण माहितीपूर्ण, रोचक लेखमाला येते आहे हे भारीच. पुढील भागांची उत्सुकता!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजाय बुवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मजा येनारे...
पुभाप्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्वा, आतुरतेने वाट पहात होतो - धन्यवाद Smile

https://www.airbnb.com/ ही एक मस्त साईट सांगितलीस मित्रा - अनेक आभार त्यासाठी. भारतीय शहरांमधील निवासाचे देखील सुरेख आणि स्वस्त पर्याय आहेत ह्या संस्थळावर, त्याचा भारतीय यात्रेसाठी नक्कीच खूप फायदा होईल Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतात अजून ही पद्धत किती 'सेफ' आहे माहिती नाही (सुरक्षाच नव्हे आर्थिकदृष्ट्यादेखील) माझ्या परिचयातील एका मित्राने ही पद्धत भारतात वापरली होती, त्याचा अनुभव सुरक्षेच्या दृष्टिने चांगला आहे, पण भारतीय माइंडसेटमध्ये ही पद्धत नसल्याने तो ज्या सोसायटित गेला होता तिथे सतत चौकशांना (शेजारी/वॉचमन) सामोरे जावे लागले. सांगायची गोष्ट, भारतापुरते बोलायचे तर, नुसते रिव्ह्युज वाचुन न ठरवता मालकाशी प्रत्यक्ष फोनवर बोलून मग ठरवा.

शिवाय Airbnb वरील भारतातील काहि ठिकाणी ही लहानशी हॉटेलेच आहे. ज्याला खास 'Airbnb' स्टाईल एक्सपिरीयन्स म्हणावा तो तशा हॉटेलांत मिळणार नाही.

तरी जर मोठा ग्रुप असेल तर एखादा अख्खा फ्लॅट/बंगलो वगैरे घेणे अधिक स्वस्त पडावे. नी त्या प्रकारची इंडिपेंडन्ट होम्स या साईटवर मिळतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अति उपयुक्त माहितीपूर्ण. मोदी निवडून आणि जर्मनी ट्रीप यात काही लिंक ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

आभार!
बाकी, नाही- त्या दोन गोष्टिंत काही लिंक नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सबकुछ खुद केलेली ट्रिप ही सर्वथैव जास्त आनंददायी असते यात शंकाच नाही. म्याटर अन शैली दोन्ही आवडली. पुढील भागाची अतिअतिआतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. लौकर लौकर येऊद्या! सोबत लै महत्त्वाची माहिती दिलीय ती नि:सौंशय उपयुक्त आहे.

(सध्याच्या गॉथममधून बाहेर पडण्याची इच्छा बाळगणारा) बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहल जशी वेगळ्या प्रकारची दिसते आहे तसेच फोटो असतील अशी आशा आहे. फोटोबद्दल असणारं कुतूहल शमत नाही बुवा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजच मी ब्रुसेल्सहून ५ दिवसांच्या ट्रिपवरून परतलो. ह्या पाच दिवसात मी पत्नीसकट ब्रुसेल्स, घेंट Ghent आणि ब्रूज Bruges ही इतिहास आणि शिल्पकलेसाठी ओळखली जाणारी फ्लेमिश शहरे, अँटवर्प, पॅरिस आणि अ‍ॅम्स्टरडॅम इतकी शहरे धावतधावत पाहिली. ह्यापैकी प्रत्येक शहर नीट पाहण्यास ८-१० दिवस प्रत्येकी पाहिजेत हे खरे पण इतकी सवड मिळणे कठिण म्हणून दुधाची तहान ताकावर भागवावी लागली तरीहि प्रत्येक गावाची तोंडओळख झालीच. रूबेन्सची चित्रे, मायकेलअँजेलोची मॅडोना अशा विख्यात कलाकृति पाहिल्याचे समाधान मिळाले.

हा सर्व प्रवास मी इंटरनेटवरून स्थानिक टूर ऑपरेटर्सची बुकिंग्ज, हॉटेल आणि विमानांची बुकिंग्ज करून आखला होता आणि तो ठरल्याप्रमाणे पार पडला. लागली तेथे स्थानिक वाहतूकयंत्रणा वापरली. सर्वसाधारणतः हॉटेल आणि विमानांची बुकिंग्ज मी expedia.com, bookings.com, cheapoair.com आणि तत्सम संस्थळांचा वापर करून करतो.

दोनच महिन्यांपूर्वी मी रोम, फ्लॉरेन्स आणि वेनिसच्या ट्रिपवरून जाऊन आलो होतो त्यांचीहि योजना मी अशीच केली होती.

सवडीप्रमाणे ह्या जागांची आणि मी तेथे काय पाहिले त्याची वर्णने छायाचित्रांसह देण्याचा विचार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम! माहिती द्याच! पाच दिवसांत बरीच फिराफिरी केलेली दिसत्येय - मै सुनकेही खुश हो गया Smile पैकी घेंट व ब्रूजबद्दल उत्सुकता आहे - कधी फारसे वाचलेले नाही. नक्की लिहा. वाट पाहतोय.

भविष्यात संधी/वेळ मिळताच इटली-रोम-ग्रीस करायचा विचार आहे. वेनिस अगदीच गचाळ नी गलिच्छ आहे, नौकानयन करताना गटारासारखा वास येतो वगैरे माहिती मला या ट्रीपला भेटलेल्या एक नाहि तर २-३ हॉस्टेल-परिचितांकडून समजली ते कितपत खरे आहे?

-----
expedia चे नाव बवर डिल्स महाग असतात असे अनेकदा दिसले आहे - तरी तुमचा अनुभव काय?
cheapoair वरून फक्त विमाने बुक करता की हॉटेल्सही?

मला युरोपातील नाटकांचे, ऑपेरांचे वगैरे रिव्ह्युज लिहिणारी साईट असल्यास हवी आहे. आताच्या ट्रीपला जवळजवळ प्रत्येक शहरात मी ऑपेरा/नाटक बघायचा प्रयत्न केला. सगळीकडे तिकीटे फुल होती (आधीच जालावरून बुकिंग करायला हवे होते). दुसरा प्रश्न आला की इतके युरो घालून नाटक/ऑपेरा बघायचा तर तो 'किमान' चांगला तरी हवा. त्याचे रिव्ह्युज वगैरे कुठे मिळतात? सबटायटल्स नसल्याने कथानकाचा इंग्रजीत गोषवाराही देणारे संस्थळ असल्यास ते ही सुचवावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऑपेरांबद्दल चिंजं/अमुक/रुची यांच्याकडून बहुधा अधिक माहिती मिळेल.

तोवरः
१. गार्डियन किंवा टाईम्समध्ये क्लासिक ऑपेरांची माहिती मिळून जावी. ('सत्याग्रह'सारख्या ऑपेरांमध्ये सबटायटल्सच्या धर्तीवर कथानकाशी संबंधित वाक्यं पडद्यावर प्रोजेक्ट केली जाताना पाहिली आहेत.)

२. Rick Steve ची पुस्तकं युरोप (आणि तुर्कस्थान) भेटीसाठी अतिशय उपयोगी आहेत. विशेषतः तिकीटांच्या रांगात जाणारा वेळ कसा वाचवावा (उदा. कलोसियम) किंवा त्या त्या ठिकानाची 'नॉन-पटेल' वैशिष्ट्यं यासाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार.

योगायोगाने गार्डियनमध्येच वाचून बासेल येथील प्रसिद्ध थिएटरमध्ये "The Indian Queen" ला जायचा प्लान केला होता. तिकिटाला रांग नव्हती ते बघुनच शंकेची पाल चुकचुकली. प्रत्यक्षा काही अतिमहाग तिकीटे सोडल्यास दोन्हि दिवसांची तिकिटे इल्ले Sad

मला क्लासिक्स बरोबर नव्या प्रयोगांविषयी माहिती देणारी स्थळेही हवी आहेत. म्युनिकला जिथे रहात होतो तिथून चार गल्ल्या पलिकडे एक कम्युनिटी थिएटर होतं. स्थानिक हौशी कलाकारांनी (म्हणे) एक गाजलेलं नाटक सादर करायचा प्रयत्न केला होता. अपरिचित व स्थानिक नट असुनही तिकिटे मिळाली नाहीत (अर्थात मोठं थिएटर नव्हतं २५-३० लोकांचीच सोय होती). तेथील स्थानिक वृत्तपत्रात त्याची अ‍ॅड बघितली होती, मात्र जालावर काहीच मिळालं नाही Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घेंट आणि ब्रूज बद्दल वाचण्यास उत्सुक आहे.

अवांतर - हा पिक्चर आठवला: http://en.wikipedia.org/wiki/In_Bruges

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तोच पिच्चर पाहून ब्रुजच्या प्रेमात पडलो होतो. ब्रुजला एकदातरी जावेच जावे. सुंदर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चित्रपट पहायला पाहिजे. ब्रूज सुंदर आहे याबाबतीत अगदी सहमत. शक्यतो वेळ काढून जावं, आतल्या गल्ल्यांमध्ये भटकावं. स्थानिक जे काही खायला-प्यायला मिळतंय ते चाखावं. होडग्यातून बारीकशा नदीतून फिरावं. मज्जा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पहिला भाग मस्त जमलाय. पुढील भागांची वाट पाहतो.

शिवाय ट्रीप इतकेच मला त्याचे प्लानिंग करणे अतिशय आवडते आणि ट्रीप काही दिवसांत संपते पण हे प्लॅनिंग त्याआधी कित्येक महिने चालू असते.

तंतोतंत! सप्ताहांतापेक्षाही शुक्रवारी संध्याकाळी अधिक मजा येते तसंच काहीसं.

अवांतर -
Airbnb प्रमाणेच सुटवंग प्रवाशांसाठी हॉस्टेलिंग इंटरनॅशनल हाही एक उत्तम पर्याय आहे. (मॅनहॅटनमध्ये सेन्ट्रल पार्कहून हाकेच्या अंतरावर केवळ दिवसाला $१५ या माफक दरात काही वर्षांपूर्वी राहिलो होतो.) काऊचसर्फिंगमध्ये राहण्याचा अनुभव नसला तरी सहा वेगवेगळ्या देशांतले लोक माझ्या घरी राहून गेलेत. त्यांच्याशी होणार्‍या गप्पा, त्यांचे वेगवेगळ्या देशांतले अनुभव या गोष्टी ऐकताना मजा येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॉस्टेलिंग इंटरनॅशल अंतर्गत येणार्‍या दोन हॉस्टेलात या ट्रीपला राहिलो होतो. एक इंटरलाकेनला युथ हॉस्टेल व दुसरे बासेलला YMCAचे हॉस्टेल. दोन्ही अनुभव झकास. ते येतीलच त्या भागात.

बाकी आता अस्मादिकांनीही ट्रीपवरून परतताच काऊचसर्फिंगवर घर नोंदवले आहे. बघु कसा रिस्पॉन्स मिळतो, कोण येते रहायला ते Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उत्सुकता वाढली आहे. युरोपसारख्या प्रगत प्रदेशात सगळं कसं वेळच्या-वेळी आणि टापटीप असल्याने अडचण येत नसेलच पण तरीही इतकी तयारी करून गेलात ते बरे झाले.
वेगळे अनुभव वाचायला मिळतील अशीच इतरांप्रमाणे आशा आहे. युंग फ्राऊला गुजराथी जेवण मिळते वगैरे असले "अनुभव" टाळले तरी चालतील.
शिवाय जर्मनी "केलं", स्वित्झर्लंड "केलं" असे वर्णन नसेल अशी खात्री बाळगायला हरकत नाही असे वाटतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार. सगळं वेळच्यावेळी असतंच असं नाही नी टापटिप सापेक्ष. सध्याचे नवे मुंबई एअरपोर्ट आजवर बघितलेल्या सगळ्या एअरपोर्टपेक्षा कितीतरी उजवे आहे. त्याच्याशी तुलना केली तर फ्राफ्रुचे एअरपोर्ट म्हंजे एखाद्या बुद्रूकवाडीच्या यस्टिस्ट्यांड झाला Wink
ते असो.

इतकी तयारी यासाठी की सगळा प्रवास पब्लिक ट्रान्सपोर्टने होता. शहरात जरा तरी विंग्रजी येते लोकांना गावात/लहान शहरांट अगदीच बोंब असते. आयत्यावेळी मदत नाहि मिळाली तर काय घ्या! (शिवाय हे ही जाता जाता सांगतो की युरोपात आम्ही टॅक्सी-फ्री होतो. त्यामुळे पत्ते विचारत फिरणे भाग होते)

प्रोत्साहनाबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुंबै च्या एयरपोर्टास भारी म्हणताय; दिल्लीच्या एयरपोर्टास काय म्हणाल?
तोही लैच झकपक केलाय.
झकास मेट्रो, टकाटक एयरपोर्ट राजधानीच्या ठिकाणी पाहून चकित झालो होतो; जरा बरंही वाटलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुंबैचे सांताक्रूझवाले एरपोर्ट नै, नवी मुंबैवाले म्हणतोय ऋ. सांताक्रूझवाले ठीकठाक आहे. नवी मुंबैवाल्याचे फटू पाहूनच गार पडलो होतो. दिल्लीचा टर्मिनल क्र. ३ झक मारला असलं प्रकर्ण आहे ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नवी मुंबईला एअरपोर्ट झाला पण?

नै म्हंजे अच्छे दिन आले वाले हयच. पण इतक्या लौकर? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी प्रत्यक्ष पाहिला नै पण नेटवर फटू पाहिलेत खरे.

अन त्याचे अच्छे दिन जरा लौकरच आले होते. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते फक्त टर्मिनल २ चे फोटो असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करेक्षनसाठी धन्यवाद. गफलत झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

करेक्ट मुंबईचाच नवा एअरपोर्ट
टर्मिनल २!

मुंबईचा नवा एअरपोर्ट नुसता चकचकीत नसून 'सुंदर' आहे. भपका नाही, नुसतं भारतीय म्हणून केलेली रंगांची वेडीवाकडी उधळण नाही. एक थीम (मोरपीस) घेतली आहे. नी त्याच बरोबर भारतीय चिन्हांचा, प्रतिमांचा अतिशय खूबीने वापर केला आहे. अतिशय डिसेंट तरीही प्रभावी रंगसंगती, प्रकाशयोजना, आराम करायच्या विभागात मंद नी मोहक संगीत, बसायला व्यवस्थित व भरपूर रचना नी सोय! अतिशय रेखीव विमानतळ आहे.

मी दिल्लीचा विमानतळ पाहिलेला नाहि त्यामुळे तुलना करू शकत नाही, मात्र आतापर्यंत न्युयॉर्क (चे दोन्ही), नुवर्क, अटलांटा, फ्राफ्रु, पॅरिस, हिथ्रो, शिकागो, म्युनिक, व्हिएन्ना, बंगळूर (जुना नवीन दोन्ही), पुणे, चेनै, गोवा, पोर्ट ब्लेअर, कोलकाता (जुना), बागडोगरा, पुणे, अहमदाबाद (जुना) यासगळ्यांत मला मुंबईचा नवा एअरपोर्ट सर्वाधिक आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत... मी आजवर पाहिलेले सिंगापूर आणि हॉन्गकॉन्ग एअरपोर्ट मला सर्वात जास्त आवडले होते. पण नवीन मुंबई चा एअरर्पोर्ट पाहिला आणि.... "वाह....." जे मनापसून निघालं त्याला तोड नाही. सध्यातरी मी पाहिलेला सर्वात प्रशस्त, सुंदर, स्वच्छ, भव्य एअरर्पोर्ट नवी मुंबई आहे.

अरायव्हल ला जी मोठी लॉबी आहे तिथे ऋ म्हणतो त्या प्रमाणे भारतीय चिन्हांचा, प्रतिमांचा जो काही वापर केलाय तो अप्रतिम आहे.

परवाच आई-वडिलांना सोडायल गेले होते तेव्हा बाहेर थोडा वेळ थांबले होते. अगदी बाहेरच्या काचा पुसणारा माणूस सुद्धा "सर्कारी" पद्धतीने स्वच्छता न करता मन लावून सगळे पुसत होता ते बघून फक्त नव्या नवलाईचे नऊ दिवस न राहता एअरपोर्ट तसाच सुंदर दिसत राहील अशी आशा वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

दिल्लीला काही बीट करू शकत नाही. त्यानंतर ग्रेटर नोईडा येईल. अजून भन्नाट असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ग्रेटर नोयडा येईल तेव्हा बघू. तूर्तास नवी मुंबै एअरपोर्टचा नाद करायचा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तू किंवा इतर कुणी इथे दोन्ही एअयरपोर्ट पाहिलेत का ?
मी अलिकडच्या काळात दिल्लीवाला पाहिला आहे; तुम्ही लोक म्हणताय तो मुंबैवाला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी दिल्लीवाला पाहिला आहे. अतिशय ग्रँड आहे. (टर्मिनल क्र. ३)

बाकी कोलकात्याचाही नवा विमानतळ प्रचंड मोठा झालेला आहे-जानेवारीत पाहिला तेव्हा दिसला होता. अगोदरचा इतका खास आजिबात नव्हता. एकंदरीतच सगळीकडे अपग्रेडेशन सुरू आहेसे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ग्रेटर नोयडा येईल तेव्हा बघू. तूर्तास नवी मुंबै एअरपोर्टचा नाद करायचा नाही.

जर्मनी - स्वित्झर्लँड धागा.
मुंबई-दिल्ली वरनं भांडण
मराठी संस्थळावर आल्याचं सार्थक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

तरी नशीब, मुंबै-पुण्यावर घसरला नै धागा ते. मराठी पाऊल पडते पुढे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते काय, बैल चारा खाऊ लागले कि ते चाराच खात राहतात. मग रवंथ करू लागतात तेव्हाही ते पूर्णतः चार्‍यात केंद्रित झालेले असतात. मांणसे, त्यातही भारतीय, हजार मसाले, चटण्या, लोणची, सॅलॅड्स बाळगून असतात. इतकं असूनही त्यांना आज काय बनवायचं हा प्रश्न पडतो.

पण

माणसांत बैल दिसल्याचं सार्थक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ममईचा एअरपोर्ट १०००० कोटीचा आहे. दिल्लीचा २००३ मधे ५००० कोटीचा होता. तेव्हा समजून घ्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सिरीयसली?

धाग्याचा विषय काय, चर्चा कशाबद्दल चालल्ये!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अवांतर झालेच तर संपादक वेगळा धागा करतात पाहून अवांतर (न?) करायची भीड चेपते. म्हणून मी तर जो संवाद चालला आहे त्याला पुढचे उत्तर देतो. तो कूठून चालू झाला नि कोठे आला हे जास्त पाहत नाही. म्हणजे मीमराठीवर असा प्रकार होता, पण भाषेचे दौर्बल्य धाग्यावर जितके अवांतर झाले, नि पुढेही, ते पाहता तसे करू नये असा संकोच मनात येत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवांतर झालेच तर संपादक वेगळा धागा करतात

नाही. काही चर्चा करण्यासारखं, इतरांनी वाचावं असं वाटतं असं अवांतर असेल तर धागा वेगळा करतात. नाहीतर सगळ्याच श्रेणीदात्यांनी हातभार लावावा अशी अपेक्षा असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याचा अर्थ इतकाच की मुंबैवाले जास्ती एफिशियंट आहेत Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नवी मुंबईचे अजून जमीन अधिग्रहणदेखिल पूर्ण झालेले नाही. जेव्हा होईल तेव्हा होईल. पण तेव्हा मात्र तो अगदी अद्ययावत असेल हे खरे.

ऋ म्हणतोय ते मुंबईचाच (नवी मुंबै नय) नवीन एअरपोर्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0