विकिस्रोत:ऑनलाईन मराठी युनिकोड टायपिंग स्पर्धा
मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून बहूपयोगी "ऑनलाईन मराठी टायपिंग स्पर्धा" घेतली जात आहे. इंटरनेटवर मराठी भाषेतील टाईपींगला प्रोत्साहन मिळावे हा ह्या मागील प्रमुख उद्देश आहे.


==चाचणी स्पर्धेचे उद्देश==
* ऑनलाईन मराठी टंकनास (टायपिंगला) प्रोत्साहन देणे
* स्वयंचाचणी (एका मिनिटात तुमची अधिकतम मराठी टंकन क्षमता किती आहे ते पहाणे) आणि स्पर्धा
**''प्रतिमिनीट ३०,४०,५० शब्द असा वेग वाढवणे''
* मराठी टंकनाचा (टायपिंगचा) सध्याचा वेग टिकवून ठेवणे आणि वाढवणे
* वेग वाढवण्याच्या युक्त्या शोधणे आणि चर्चा करणे

* अंतर्भूत प्रगत उद्दिष्टे:
** विविध टकंन पद्धतीत अधिकतम वेग किती साधता येतो ते पहाणे. आणि तुलनात्मक अभ्यास संशोधन आणि संवाद साधणे
** साने गुरूजीं, अथवा लोकमान्य टिळक, जोतिबा फुले अशा लेखकांची जुनी पुस्तके युनिकोडात आणणे. म्हणजे स्पर्धाही होते आणि युनिकोडात आणण्याचे कामही आपसूक होते.

==चाचणी स्पर्धेचे स्वरूप==
* विकिस्रोतावरील स्पर्धेत कॉपीराईट फ्री झालेल्या व विकिस्रोतास पात्र जुन्या पुस्तकांच्या स्कॅनकॉपी / छायाचित्रे/ पीडीएफ मधील मजकुर टंकावा लागेल.
* विकिस्रोताकरिता "जो उतारा टंकनचाचणीसाठी दिलेला असतो तो तसाच्या तसा टंकणे महत्त्वाचे असते. फक्त वेग नव्हे तर अचूकतादेखील महत्त्वाची मानली जाते."
* टंकन (टायपिंग) केलेले उतारे दर ७ मिनिटांनी सेव्ह करावे.
**'''स्तर पहिला : एक उतारा जेवढा होईल तेवढा टंकून ७ मिनिटात जतन करावा'''
**''स्तर दुसरा : सलग दर ७ मिनिटांनी असे तीनदा जेवढे होईल तेवढे टंकून जतन करावे.''
* टंकन झालेले बाईट्स/शब्द आणि मिनिटे नंतर कॅलक्युलेट करावी लागतील.

===पूर्व संकेत/अटी ===
* विकिस्रोतवर सदस्य खाते असावे/उघडावे '''किंवा''' {{*}} [[विशेष:सदस्य_प्रवेश]]
** आपण आपले मराठी/इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषिक विकिपीडिया/विक्शनरी/विकिबुक्स/विकिक्वोट येथील सध्याचे/आधीचे सदस्य खाते सुद्धा वापरता येईल.
* यापानावर खाली चाचणीत सहभागी होत असल्याची नोंद करावी म्हणजे आपल्या स्पर्धेतील सहभागाची नोंद घेऊन तसे ऑनलाईन प्रमाणपत्र देता येईल.
* आपण जो उतारा टंकन करू इच्छिता तो कॉपीराईट फ्री आणि शक्यतोवर आंतरजालावर यापूर्वी टंकन न झालेला असण्याची खात्री होण्याच्या दृष्टीने स्पर्धेकरता खाली दिलेल्या पर्यायांपैकी स्कॅनकॉपी / छायाचित्रे/ पीडीएफ उतारा निवडावा.
* आपण आपल्या आवडीच्या उताऱ्याची नोंद करून कॉपीराईट फ्री आणि शक्यतोवर आंतरजालावर यापूर्वी टंकन न झाल्याची इतर जाणत्या सदस्यांकडून समीक्षा करून करू शकता.
* सहभागी होण्यापुर्वी विकिस्रोत प्रकल्पाची अधिक ओळख आपण .... येथे आणि ... येथे करून घेऊ शकता.
* '''दर ७ मिनिटांनी सलग ३ दा जतन (द्वितीय स्तर) चाचणी''' आपण पुन्हा पुन्हा आणि केव्हाही देऊ शकता मात्र प्रत्येकवेळी सहभागाची नोंद पुन्हा करावी
* वेग नैसर्गिक मानवी क्षमतेच्या पलीकडचा सर्व साधारण रेकॉर्ड्‌सच्या अतिपलीकडचा असल्यास (कॉपीपेस्ट नाही हे पडताळण्याकरता ) वेगळ्या उताऱ्यावर पुन्हा चाचणी द्यावी हे अभिप्रेत आहे.

===नेहमीचे प्रश्न आणि शंका===
* मी नेहमी टायपिंग माझ्या सरावाच्या इतरत्र करतो आणि नंतर कॉपी पेस्ट करतो तरी सुद्धा मी या चाचणी स्पर्धेत सहभागी होऊ शकेन काय ?
:उत्त र: होय आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी टायपिंग करून मग ते येथे कॉपी पेस्ट करू शकता पण तसे स्पेसिफिक नमूद केल्यास बरे पडेल. पण वर नमूद केलेल्या इतर सर्व संकेतांचे आवर्जून पालन करावे.

* मजकूर आधीच टाईप करून ठेऊन कॉपीस्ट केल्याने फसवणूक केली जाऊ शकणार नाही का ?
:उत्तर : चाचणीचे स्वरूप प्रथम स्तरांचे स्वयं चाचणीचे आहे. अंतिमत: प्रत्येकजण स्वतःस उत्तरदायी आहे. जोपर्यंत मजक्जूर कॉपी राईट फ्री आणि विकिस्रोताच्या इतर संकेतास धरून आहे, तो र्यंत विकिस्रोत प्रकल्पाचे कोणतेही नुकसान होणे संभवत नाही. एखादे प्रमाणपत्र अधिकचे घेतल्याने विकिस्रोतास कोणताही आर्थिक लाभ अथवा हानीचा प्रश्न नाही. प्रमाणपत्र इतरत्र दाखवल्यास टायपिंग शिकू इच्छित असलेली मंडळी मागे लागल्याने त्यांना शिकवण्यास वेळ दिल्यास मराठी भाषेस फायदाच आहे.

==टंकन चाचणी स्पर्धेकरता पाने ==

* [[विशेष:IndexPages]] इथे ज्यांचे युनिकोड टायपिंग करून हवे आहे अशा djvu आणि .pdf फॉरमॅट मधील पुस्तकांची यादी असते. ही पुस्तके अनुक्रमणिका नामविश्वात उघडतात. प्रत्येक djvu अथवा pdf चे एक वेगळे पान असते ज्यात उजवीकडे djvu अथवा pdf मजकुर दिसतो डावी कडे युनिकोड टायपिंग करण्याकरता जागा असते. ज्या पानांचे अद्याप काहीच टायपिंग जतन झाले नाही अशा पानांचे दुवे लाल रंगात दिसतात ज्या पानांचे टायपिंग काम अंशत: अथवा पूर्ण झाले अशा पानांचे दुवे निळ्या रंगात दिसतात. या स्पर्धेकरता अद्याप युनिकोडात न आलेले कोणतेही पान आपण निवडू शकता. अनुक्रमणिका नाम विश्वातील पुस्तकांची खाली यादी दिली आहे.
* वर नमुद केल्याप्रमाणे आपण आपल्या आवडीच्या इतरत्रच्या युनिकोड टायपिंग पद्धती वापरून सुद्धा टंकन करून येथे कॉपी पेस्ट करू शकता. वर नमूद केलेल्या संकेतांचे शक्य तेवढे पालन करावे.
* जुन्या काळातील पुस्तकात पुस्तकातील प्रकरणे अथवा विभाग स्वतंत्र ओळखू यावेत म्हणून बऱ्याचदा दोन प्रकरणे अथवा विभागातील पान रिकामे असे. विकिस्रोत प्रकल्पात असे रिकामे पान दिसल्यास पान रिकामे आहे अथवा गहाळ झालेले याचा दुजोरा हवा असा साचा लावावा.

* [[अनुक्रमणिका:मनू बाबा.djvu]] ले. साने गुरूजी

* [[अनुक्रमणिका:चित्रा नि चारू.djvu]] ‎ ले. साने गुरूजी

* [[अनुक्रमणिका:फुलाचा प्रयोग.djvu]]‎ ‎ ले. साने गुरूजी

* [[अनुक्रमणिका:करुणादेवी.djvu]]‎ ले. साने गुरूजी

* [[अनुक्रमणिका:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf]] ले. लोकमान्य टिळक

* [[अनुक्रमणिका:गीतारहस्य प्रकरण सहावे ते प्रकरण नववे.pdf]] ले. लोकमान्य टिळक

* [[अनुक्रमणिका:गीतारहस्य प्रकरण सहावे ते प्रकरण नववे.pdf]] ले. लोकमान्य टिळक

* [[अनुक्रमणिका:गीतारहस्य प्रकरण दहावे ते प्रकरण तेरावे.pdf]] ले. लोकमान्य टिळक

* [[अनुक्रमणिका:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf]] ले. लोकमान्य टिळक

* [[अनुक्रमणिका:श्रीमद्भवद्गीतारहस्य-शेवटील भाग.pdf]] ले. लोकमान्य टिळक

* [[अनुक्रमणिका:भाषाशास्त्र.pdf]] ‎ ले. नारायण पावगी

* [[अनुक्रमणिका:छन्दोरचना.djvu]] ले. डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन

* [[अनुक्रमणिका:संगीत सौभद्र नाटक.pdf ‎]] ले. बळवंत पांडुरंग उर्फ अण्णा किर्लोस्कर

* [[अनुक्रमणिका:उत्तररामचरित्र नाटक.pdf]] ले. परशुरामपंत गोडबोले

* [[अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf ‎]] ले.स्वामी विवेकानंद प्रकाशक न म कुल्कर्णी

* [[अनुक्रमणिका:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf]] अनुवादक जोसेफ राजपुरकर

*स्पर्धेनोंदणी पानाचा दुवा : "ऑनलाईन मराठी टायपिंग स्पर्धा"

* विकिवर आधीच खाते असल्यास [[विशेष:सदस्य_प्रवेश]] या दुव्यावरून प्रवेश करू शकता.
* विकिवर खाते नसल्यास अथवा या कारणासाठी वेगळे नवे सदस्य खाते उघडावयाचे असल्यास

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कल्पना आवडली. आणि उपक्रमासाठी शुभेच्छा.

सध्या वेळेची कमतरता असल्यामुळे कितपत वेळ देता येणं शक्य आहे याबद्दल शंका आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आमचे पैसे, अरूण जोशी, न'वी बाजू, राजेश घासकडवी आणि मन यांच्यावरती.

अर्थात, जोशींनी नक्की काय लिहलंय हे कळलं नाही म्हणून ते बाद झाले नाहीत तर, न'वी बाजूंच्या किचकटपणाला वैतागून परिक्षकाने त्यांना बाद केले नाही तर, घासू गूर्जींच्या अश्लीलपणाला नजरेआड केले गेले तर आणि मन यांच्या कुठूनही परिच्छेद सुरू अन शेवट करायच्या सवयीकडे दुर्लक्ष केले तरच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

छप्परतोड प्रतिसाद आहे राव!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कधी न्हवे ते सर्वद्वेष्ट्याशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१
सेम हियर
पण शुभेच्छा आहेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कल्पना आवडली. शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुभेच्छांसाठी सर्वांना धन्यवाद. या निमीत्ताने जुने दुर्मिळ ग्रंथ वाचण्यास मिळण्याची संधी पण मिळते. माझ्या माहिती नुसार मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी युनिकोड टायपिंग अभ्यासक्रमाचा भाग होणार आहे. त्यांनी सरावा साठी या उपक्रमाचा अथवा ऑनलाईन मराठी शब्द कोशात शब्द भरल्यास त्यांनाही उपयोग होऊ शकेल असे वाटते. इतर मराठी संकेतस्थळे फेसबुक ग्रूप्स इत्यादीवरही या उपक्रमास प्रसिद्धी मिळण्यात आपणा सर्वांचे सहकार्य मिळाल्यास हवे आहे.

प्रतिसादांसाठी पुन्हा एकदा धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.