बृहन्महाराष्ट्र आणि महाराष्ट मंडळे यांबद्दल व्यापक माहिती हवी

महाराष्ट्राबाहेरच्या मराठी लोकांचा उल्लेख सहसा बृहनमहाराष्ट्र असा केला जातो. यात जसा भारतातील इतर राज्यातील मराठी लोकांचा समावेश होतो तसा भारता बाहेर स्थायिक मराठी एन आर आय आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्यांचा समावेश होतो. बृहनमहाराष्ट्रातील बरीच मंडळी लिहिती असतात भारतात असताना मराठी माणूस अ‍ॅक्टीव्ह नसतो तेवढी मराठी माणस परदेशात गेली की सांस्कृतीक दृष्ट्या अ‍ॅक्टीव्ह होतात, बृहनमहाराष्ट्रातील बरीच मंडळी लिहिती असलीतरी महाराष्ट्रमंडळातून होणार्‍या बहुतांश अ‍ॅक्टीव्हीटीजचे पुरेसे वार्तांकन आणि नोंदी होत नाहीत.

परिणामी इफेक्टीव्हली इंग्रजी आणि मराठी विकिपीडिया दोन्ही ठिकाणी Maharashtra Mandal आणि महाराष्ट्र मंडळ हे लेख केवळ महाराष्ट्र मंडळांच्या नावांच्या जंत्री प्रमाणे दिसतात. माहितीच्या अभावी काही महाराष्ट्र मंडळांबद्दलचे इंग्रजी विकिपीडियावरील लेख वगळले जाण्यासाठी अधून मधून नामांकीत होत रहातात. मुख्यत्वे या दोन लेखांमधील ज्ञानकोशीय माहितीत भर पडावी म्हणून शक्य तेवढी व्यपक माहिती हवी आहे. माहितीचे स्वरूप निव्वळ दुवे अथवा नावांची यादी मिळवणे असा या धाग्याचा उद्देश नाही तर किमान दोन एक परिच्छेद तरी लेखन प्रत्येक अनुषंगीक विषयावर होऊन हवे आहे. काही विषय प्रश्नांच्या स्वरूपात सुचवतो आहे. तुम्ही ही काही प्रश्न सुचवू शकता.

१) मराठी लोकांची (बृहनमहाराष्ट्रातील/महाराष्ट्रातील शहरांच्या बाहेरील) लोकसंख्या किती ?

२) मुख्य व्यवसाय क्षेत्रे कोणती ?

३) जिथे महाराष्ट्र मंडळे आहेत तेथील महाराष्ट्र मंडळाची स्थापना केव्हा झाली कोणी केली ? त्यांच्या इतिहासाची स्थापना ते आता पर्यंतची वाटचाल,

४) महाराष्ट्र मंडळांचे त्यांच्या समूहासाठी नेमके सांस्कृतीक आणि इतर क्षेत्रातील योगदान कोणते ? त्यांचे महाराष्ट्राशी जुळलेल्या नात्यांचे (भावनिक सांस्कृतिक आर्थीक इत्यादी) स्वरूप कसे आहे ?

५) बृहनमहाराष्ट्रातील दुसरी आणि त्यापुढील पिढ्या, त्यांचे तेथील उर्वरीत भारतीय, ते देश भाषा तसेच भारताशी असलेल्या नात्यांचे स्वरूप. त्यांच्यापुढील आव्हाने

६) महाराष्ट्रापेक्षा बृहनमहाराष्ट्रात आंतर-जातीय/धर्मीय/प्रांतीय/देशीय/ विवाहांचे बर्‍या पैकी प्रमाण ओघाने असतेच अशा विवाहीतांचा बृहनमहाराष्ट्रीय समाजातील सहभागाचे अनुभव आणि स्वरूप

७) महाराष्ट्र मंडळांच्या वेबसाईट्स आणि ऑनलाईन ग्रूप्सचे स्वरूप आणि योगदान (इथे पुन्हा दुवे नकोत परिच्छेद लेखन हवे आहे)

आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील. विषयांतरे टाळण्यासाठी धन्यवाद

field_vote: 
0
No votes yet