भेट

अनेक वर्षांनी आज अखेर ती दोघं भेटणार होती. अन ती starbucksमध्ये त्याची वाट पहात होती. खरं तर मुलीनी/बाईनॆ ७-८ मिनिटे उशीरा जायचं असतं अन वाट पहायला लावायची असते, या तिच्या मते भंकस रिवाजाला छेद देउन, तिच्या outright धनु-मंगळाशॆ प्रामाणिक, ती जाउन वाट पहात होती.

कसा दिसेल तो, काय बोलेल, त्याचे डोळे काय बोलतील, तिचा श्वास थांबणार तर नाही, चक्कर तर येणार नाही, कोणाचा आवाज कापेल, कपडे-कपड्यांशी बोलतील का आतली व्यक्ती , व्यक्तीशी ? - सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त १० मिनिटात मिळणार होती. खरं तर कॉफी फार झाली की तिची एन्क्झायटी वाढते. पण तरी तिनी स्मॉल Decaf घेतली होती. हात ऊबदार ठेवण्यासाठी, त्याच्याशी shake Hand करताना त्याच्या हातात उबदार हात देण्यासाठी. copper लिप्स्टिक फार भडक तर दिसत नाही की mauve किंवा naked बरं दिसलं असतं? ही चिंता ती पहील्यांदा का करत होती? गेल्या २ दिवसात म्हणजे भेट ठरल्यापासून सगळ्या शेडस ट्राय करुन झालेल्या होत्या अन शिवाय आता काय उपयोग त्या गोष्टीचा विचार करून?

काय बोलतील ते दोघं? खरं तर "मिथुन" लग्नाचे दोघही असल्याने कोण काय बोलणार हा प्रश्न नव्हता तर समोरच्याला बोलायची संधी कोण देणार हा प्रश्न होता. फोनवरही तेच व्हायचं. तिला नीट माहीत होतं, पण काळजी करण्याचा स्वभाव एकेकाचा.

अन ५ मिनिटात बरोबर वेळेवर तिला तो दिसला. फेसबुकवर फ़ोटो आहे तस्साच. थोडा अधिक vulnerable , exposed ..ती सामोरी गेली.अन तो हसला. खलास!! हसला की मस्त दिसतो, खाउन टाकतो. ४ सेकंद कोणीच बोलेना. नंतर तोच हसत म्हणाला, काय करायचंय? हे त्याचं नेहमीचं, feedback घेणं, तदनुसार strategy आखणं. असं दाखवणं की जणू तुम्ही drive करताय. तिला ते खूप आवडतं. अन तिचा मेंदू नेहमी लगेच हिंटही देतो-मीनेचा शुक्र. सूत्रधार अन उच्चीचा. पहाता पहाता व्यक्तीला खिशात टाकणारा.इतकच नाही तर surreal, कोमल अन स्वप्नाळू सुद्धा. पण तिची काहीच तक्रार नाही त्याबद्दल.

ते दोघं starbucks मध्ये शिरले अन त्यानेही हवी ती coffee घेतली. मग मात्र दोघांना कंठ फुटला. तो म्हणाला "facebook वर फ़ोटो आहे त्यापेक्षा जास्त जाडी आहेस. पण नो complain." म्हणजे काय ते तिला माहीत तर होताच पण तिच्याइतकाच त्याचा स्पष्टवक्तेपणाही माहीत होता. she knew him inside out .

तिनी काय बोलायचं त्याची यादी केलेली होती जी ती पूर्ण विसरली. निदान त्याने काहीतरी जडव्यागळ संकल्पनेवर बोलावं अशी ती आशा करता असतानाच तो म्हणाला "सुंदर दिसते आहेस.". असाच करतो तो, बेसावध असताना हल्ला करतो. गरज होती का हे उघड बोलण्याची? आता ती भावविवश होणार. ते सर्व लपवण्याकरता ती म्हणाली, "तुझ्याकरता हाफिज च्या कवितांच्या अनुवादाचं हे पुस्तक आणलय. मात्र टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. हे लेखकाचं interpretation आहे कदाचित तंन्तोतन्त अनुवाद नाही." तो म्हणाला 'मस्त! खूप आवडेल."

वेळ खूप छान गेला, त्याने तिला हसतच ठेवले होते. त्याची किस्से सांगण्याची लकब खूप लोभस होती. जे फोनवर १० मुलाखतीत कळलं नाही ते प्रत्यक्ष एका भेटीत कळत होतं. तिला तो १/८ माहीत होता आता जास्त कळत होता. जवळजवळ त्याच्या व्यक्तीत्वाच्या जोखलेल्या प्रत्येक मुद्द्याचं समर्थन अन विस्तार तिला दिसत होता - तिला त्याचे convictions माहीत होते पण त्यामागचा विश्वास अन चमकणारे डोळे ती आत्ता पहात होती. एखादा विनोद केल्यानंतर तिने दाद द्यावी म्हणून त्याचं आतुरतेने लक्षपूर्वक पहाणं, तिला तो विनोद कळतोय का हे जोखणं हे फोनवर कसं शक्य होतं? तो हुशार आहे, sharp आहे हे ती जाणून होती पण socially इतका apt अन graceful आहे, समोरच्याला इतका खुलवू शकतो हे तिला पहिल्यांदा कळत होतं.

खरं तर वेळ फुलपाखरासारखा उडून गेला, अगदी चुटकीसारखा.

पुनरेकवार प्रेमात पडून तिनी निरोप तर घेतला पण परत भेटीच्या बोलीवर. कधी भेटणार ते परमेश्वरालाच माहीत होतं पण ते भेटणार होते .... नक्की!!

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)