मराठी बाणा/ मोडेल पण वाकणार नाही ???

(तीन पूर्वी ब्लॉग वर लिहलेला लेख, त्या वेळच्या संदर्भात,कुणाची ही भावना दुःखविण्याचा हेतु नाही)

ते देवतेचे दर्शनास दिल्ली दरबारात आले. सहज विषय निघाला. दरबारात मुजरा करावा लागतो ही रीत. पण मुजरा करण्या साठी पाठीचा कणा मोडावा लागतो व मान ही झुकवावी लागते, हे आलंच.

शिवाजी महाराज मुग़ल दरबारात आले होते. त्यानी बादशाहास मुजरा केला नाही. बादशाह समोर ही त्यांची मान ताठ होती व पाठीचा कणा सरळ होता. मान झुकवण्या एवजी त्यानी कारावास पत्करला. ते म्हणाले, आम्ही ही मराठा, एका अर्थी त्यांचेच वंशज! स्वाभिमानी! खरे मराठा! मोडेन पण वाकणार नाही हाच आमचा बाणा??? आम्ही ही मुजरा करत नाही.

त्यांचे विचार ऐकून मला आश्चर्य वाटले व आनंद ही झाला आपले नेते आज ही स्वाभिमानी व मोडेन पण वाकणार नाही या बाण्याचे आहेत पाहून. पण एक प्रश्न मनात उभा राहिला, बिना मुजरा करता हे देवतास कसे प्रसन्न करणार, हे बघण्याची उत्सुकता मनात जागृत झाली.

तेवढ्यात देवतेचे पदार्पण झाले. आश्चर्य म्हणजे, आपल्या मराठी नेत्याने साक्षात् दंडवत प्रणाम करत देवतेचे पायांना स्पर्श केला. त्यांची नाक जमिनीला घासल्या जात होती. पण एक गोष्ट नक्की खरी होती. त्या ही अवस्थेत त्यांचा पाठीचा कणा सरळ होता व मान ही ताठ होती. मी आ! वासून बघतच राहिलो. "खरा मराठी बाणा म्हणतात तो हाच का????"

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)