राष्ट्रवाद - एक उन्माद !

राष्ट्रवाद Nationalism ही माणसांच्या मनात एक पराकोटीचा उन्माद निर्माण करणारी संकल्पना मात्र आहे. निरनीराळ्या राष्ट्रांची निर्मीती , भौगोलिक विभाजन हे संपुर्णपणे मानवनिर्मीत आहे. ते काही कुठल्या दैवी वा नैसर्गिक शक्तीने बनविलेले नाही. हे भौगोलिक भुभाग यांची वाटणी ही पुर्णपणे निरनिराळ्या मानवसमुहांच्या स्वार्थ-अहंकाराच्या-सत्ताकांक्षेच्या नकारात्मक हिंसक अशा संघर्षाचा परीपाक आहे. राष्ट्रांच्या सीमा या मानवनिर्मीत आणि कालपरत्वे सातत्याने बदलणारया आहेत. या भौगोलिक सीमा माणसांनी च बनविलेल्या आहेत. काही वर्षांपुर्वी पाकीस्तान हा भारत या राष्ट्राचा भाग होता आज नाही व संपुर्ण पाकीस्तान चा हा भुभाग एक स्वतंत्र राष्ट्र बनविण्यात आलेला आहे. क्रीमीया आता यापुढील काळात रशिया या राष्ट्राचा भाग झालेला आहे. इस्त्रायल या राष्ट्राची संपुर्ण निर्मीती ही तर अगदी अलीकडच्या काळाचीच आहे. व कोण जाणे पॅलेस्टाइन हे आज अस्तित्वात असलेले राष्ट्र उद्या असेल कींवा नसेल. रशिया या एका मोठ्या राष्ट्राचे अनेक तुकडे होउन डझनभर स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली ही देखील अलीकडच्या काळातीलच घटना आहे. So Nationalism is an absolutely man-made-phenomena and nothing sacred about it ! आणि आता ही राष्ट्र व्यवस्था अवघ्या मानवजातीच्याच मुळावरच उठली असेल तर तीला नष्ट करणे हे आपले एक मानव म्हणुन आद्य कर्तव्य च आहे.

राष्ट्रवादाच्या मुळाशी असलेल्या प्रेरणाच अतिशय नकारात्मक आहेत. प्रामुख्याने धर्मश्रेष्ठत्व वा वंश-वर्ण श्रेष्ठत्व वा संस्कृतीश्रेष्ठत्व या मुलत: अहंकाराधिष्ठीत सत्ताकांक्षी महत्वाकांक्षी नकारात्मक प्रेरणांतुनच निरनिराळ्या राष्ट्रांची निर्मीती होत असते. Xenophobia म्हणजे आपल्याहुन परक्या वा अनोळखी व्यक्तींविषयी वाटणारी भीती आणि द्वेष ही ही एक आणखी नकारात्मक प्रेरणा राष्ट्र निर्मीतीस उत्तेजन देते. माणुस मग आपल्या सारख्या वर्ण संस्कृती असलेल्यां बरोबर राहण पसंत करतो. एकदा राष्ट्र निर्मीती झाल्यानंतर मग इतर अनेक आनुषंगिक एव्हील्स ची निर्मीती होणे ओघानेच आले. उदा. आपल्या राष्ट्राचा विस्तार करणे , त्यासाठी युद्ध/ शस्त्रास्त्रस्पर्धा सुरु करणे या अखेरीस संपुर्ण मानवजातीच्या च विनाशास कारणीभुत होणारया गोष्टींची सुरुवात होते. विवीध राष्ट्रे जो सैन्य निर्मीती व सांभाळ तसेच शस्त्र निर्मीती यासाठी जी अब्जावधी रुपयांची व त्याहुन मोलाच्या अशा ह्युमन अवर्स ची एनर्जी ची गुंतवणुक करतात ती थांबवली तर ही अनमोल अतिप्रचंड गुंतवणुक माणसाचे जीवन सुंदर समृद्ध बनविणारया अनेक महत्वाच्या मुलभुत गोष्टींमध्ये करता येइल. शिक्षण/ आरोग्य/ विकास अशा अनेक क्षेत्रांकडे हे मानवी बळ सकारात्मकरीत्या वळविता येउ शकते. चायना/अमेरीका यांच डीफ़ेन्स बजेट आणि भारत पाकीस्तान सारख्या ज्यांना विकासाची अत्यंत आवश्यकता आहे ते आपल्या एकुण बजेटच्या कीती टक्की रक्कम डीफ़ेन्स वर खर्च करतात हे आकडे बघितले तरी वास्तुस्थीतीची कल्पना येउ शकते.

राष्ट्रवाद मग राष्ट्रभक्ती नावाच्या अत्यंत उन्माद आणणारया वेडाला जन्म देतो. प्रत्येक नागरीका कडुन मग त्याने राष्ट्रासाठी प्रसंगी जीवनाचा ही त्याग करण्याची अपेक्षा केली जाते. सैन्याचा जन्म होतो. माणस मारणारी सैनिक घडवली जातात. त्यांच्या मरण्या मारण्याचे सोहळे घडविले जातात. ग्रेलिंग अत्यंत समर्पक शब्दात हा वेडेपणा मांडतो तो म्हणतो
“Disguised as patriotism and love of one's country, it trades on the unreason of mass psychology to make a variety of horrors seem acceptable, even honorable. For example: if someone said to you, "I am going to send your son to kill the boy next door" you would hotly protest. But only let him seduce you with "Queen and Country!" "The Fatherland!" "My country right or wrong!" and you would find yourself permitting him to send all our sons to kill not just the sons of other people, but other people indiscriminately – which is what bombs and bullets do.” सैनिकाला स्व-विवेक वापरण्यापासुन कायम परावृत्त केले जाते सैनिंकांकडुन एकच अपेक्षा असते आदेशाचे पालन! सैनिक एरवी मुंगी मारणार नाही पण राष्ट्रभक्तीची अफ़ु खाल्यावर तो अनेक अनोळखी माणसांना कुठल्याही अपराधगंड न बाळगता आपण राष्ट्रासाठी अत्यंत सात्वीक कार्य करत आहोत अशा भावनेतुन मारु शकतो. बर्टान्ड्र रसेल यांचा हा अप्रतिम लेख जरुर वाचावा
http://fair-use.org/international-journal-of-ethics/1915/01/the-ethics-o...

सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.( तु प्यार का सागर है !) व्हरायटी ऑफ़ हॉरर्स सीम्स अक्सेप्टेबल मग यात मांडी फ़ोडुन रक्त प्राशन करणे , उभा चिरुन काढणे, झोपलेल्यांना मारणे सर्व काही अक्सेप्टेबल होते.

विवीध संस्कृती अस्तीत्वात असणे ही साहजीक नैसर्गिक बाब आहे. व एकसमान संस्कृतीच्या लोकांना एकमेकासोबत रहावेसे वाटणे हे तर अत्यंत नैसर्गिकच आहे परंतु राष्ट्र या संकल्पनेत आपल्यापेक्षा भिन्न असलेल्या संस्कृती जोपासणारयांना एक शत्रु म्हणुन बघणे त्यावर वर्चस्व असणे आवश्यक आहे असे मानणे आपलीच संस्कृती व पर्यायाने मग राष्ट्र हेही श्रेष्ठ व म्हणुन पर्यायाने ठराविक भुभागावर व नैसर्गिक संसाधनांवर केवळ आमचाच हक्क असावा या सर्व वेड्या अट्टाहासी मागण्या या राष्ट्रवादातुन च निर्माण होतात ( वसुधैव कुटुंबकम ) त्यासाठी मग साम दाम दंड भेद आदि सर्व नीतींचा अवलंब राष्ट्रवादाच्या व विस्तारवादाच्या संदर्भात केला जातो. हा अतिशय चुकीचा आहे.

परत ग्रेलींग च्या च शब्दात
Nationalists take certain unexceptionable desires and muddle them with unacceptable ones. We individually wish to run our own affairs; that is unexceptionable. Most of us value the culture which shaped our development and gave us our sense of personal and group identity; that too is unexceptionable. But the nationalist persuades us that the existence of other groups and cultures somehow puts these things at risk, and that the only way to protect them is to see ourselves as members of a distinct collective, defined by ethnicity, geography, or sameness of language or religion, and to build a wall around ourselves to keep out "foreigners". It is not enough that the others are other; we have to see them as a threat at very least to "our way of life", perhaps to our jobs, even to our daughters.

राष्ट्रवादाने आजपर्यंत अनेक माणसांचा बळी घेतलेला आहे. अनेक मौल्यवान मानवी क्षमता युद्धाच्या नावाखाली वाया घालविलेल्या आहेत. राष्ट्रवाद माणसाला मी एक माणुस आहे या पुरेशा न्याय्य योग्य अशा ओळखीवर थांबु देत नाही. तो त्याला कुठल्यातरी राष्ट्राचा नागरीक बनवुन इतर राष्ट्रांतील माणसांशी तोडतो वेगळा पाडतो आयसोलेट करतो. मग अशी परस्परांपासुन वेगळी पाडलेली माणसं एकमेकांच्या विरोधात उभी राहुन परस्पर संघर्षातच आपली बहुमुल्य मानवी क्षमता वाया घालवितात. राष्ट्रवादाने काही राष्ट्रे इतर राष्ट्रावंर अनेक प्रकारे वर्चस्व गाजवितांना दिसतात श्रीमंत राष्ट्रे गरीब राष्ट्रांची अनेक प्रकारे पिळवणुक करतांना दिसतात.

काही महान तत्वज्ञ राष्ट्र्वादा संदर्भात काय म्हणतात हे बघण अतिशय इंटरेस्टींग आहे खालील प्रत्येक कोट वैशिष्ट्यपुर्ण अशी टीप्पणी राष्ट्रवादा संदर्भात करते.

The feeling of patriotism - It is an immoral feeling because, instead of confessing himself a son of God . . . or even a free man guided by his own reason, each man under the influence of patriotism confesses himself the son of his fatherland and the slave of his government, and commits actions contrary to his reason and conscience.”
Leo Tolstoy, Patriotism and Government

“One of the great attractions of patriotism—it fulfills our worst wishes. In the person of our nation we are able, vicariously, to bully and cheat. Bully and cheat, what’s more, with a feeling that we are profoundly virtuous.”
Aldous Huxley

“To abolish war it is necessary to abolish patriotism, and to abolish patriotism it is necessary first to understand that it is an evil. Tell people that patriotism is bad and most will reply, ‘Yes, bad patriotism is bad, but mine is good patriotism.’”
Leo Tolstoy

“Patriots always talk of dying for their country and never of killing for their country.”
Bertrand Russell

I do not believe in nations. I believe that humanity is suffering because of nations. Nations should be destroyed. Too many national anthems have been sung, too many flags have been flown, too many idiocies have happened on this earth. Accept the unity of mankind now. Now, one world and and one mankind... These national governments must go. And until they go man's problems cannot be solved, because man's problems are bigger than nations.

Osho

To love anything beautiful in a country is normal and natural, but when that love is used by exploiters in their own interest it is called nationalism. Nationalism is fanned into imperialism, and then the stronger people divide and exploit the weaker, with the Bible in one hand and a bayonet in the other. The world is dominated by the spirit of cunning, ruthless exploitation, from which war must ensue. This spirit of nationalism is the greatest stupidity. Every individual should be free to live fully, completely. As long as one tries to liberate one's own particular country and not man, there must be racial hatreds, the divisions of people and classes. The problems of man must be solved as a whole, not as confined to countries or peoples.

जे.कृष्णमुर्ती

राष्ट्रवादातुन निर्माण होणारया युद्धाच्या निरर्थकतेवर हिप्पी चळवळीने ही फ़ार जोरदार आक्षेप घेतला होता. हिप्पी हे राष्ट्र्वाद आणि युद्धाच्या विरोधात होते. अमेरीका आक्रमक राष्ट्रवादाचे उत्तम प्रतीक च आहे. तर १९६५ नंतर अमेरीकेचे व्हीएतनाम विरोधात सुरु केलेले युद्ध अधिकाअधिक उग्र होत गेले यामध्ये व्हीएतनामींनी गनिमी काव्याने लढुन अमेरीकी सैनिकांना चांगलेच जेरीस आणले होते.मग यात अमेरीकेला अधिकाधिक सैनिकांची गरज भासु लागली व त्यासाठी आक्रमक भरती मोहीम राबवली जाउ लागली. अमेरीकेने व्हीएतनामवर नापाम व एजंट ऑरेंज सारख्या महाभयानक रासायनिक अस्त्रांचा मारा केला ज्याचा अप्रत्यक्ष आर्थिक फ़ायदा डाउ केमीकल्स सारख्या केमीकल कंपन्यांना होत होता. या व अनेक कारणांसाठी अमेरीकन तरुण वर्गाचा युद्धविरोध प्रचंड वाढला अमेरीकन तरुणांनी युद्धासाठीच्या ड्राफ़्ट कार्ड्स ची जाहीर होळी करण्याचा कार्यक्रम सुरु केला. या तरुणांना अनोळखी व्हीएतनामींशी ज्यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता लढण्यात काहीही रस नव्हता. याच्याच विरोधात खालील एक सुंदर उपहासात्मक गीत जे सॅन फ़्रॆन्सीस्को च्या संगीतकार कंट्री ज्यो मॅक्डोनाल्ड ने लिहिले आहे ते फ़ार च सुंदर आहे ते अमरीकन स्वार्थी व निरर्थक राष्ट्रवाद व युद्धाची खील्ली उडविते.

Yeah, come on all of you, big strong men,
Uncle Sam needs your help again.
He's got himself in a terrible jam
Way down yonder in Vietnam
So put down your books and pick up a gun,
We're gonna have a whole lotta fun

And it's one, two, three,
What are we fighting for ?
Don't ask me, I don't give a damn,
Next stop is Vietnam;
And it's five, six, seven,
Open up the pearly gates,
Well there ain't no time to wonder why,
Whoopee! we're all gonna die.
Well, come on Wall Street, don't move
slow,
Why man, this is war au-go-go.
There's plenty good money to be made
By supplying the Army with the tools of
the trade,
Just hope and pray that if they drop
the bomb,

They drop it on the Viet Cong.
Well, come on generals, let's move
fast;
Your big chance has come at last.
Gotta go out and get those reds —
The only good commie is the one who's
dead
And you know that peace can only be won
When we've blown 'em all to kingdom
come.

Well, come on mothers throughout the land,
Pack your boys off to Vietnam.
Come on fathers, don't hesitate,
Send 'em off before it's too late.
Be the first one on your block
To have your boy come home in a box.

अखेरीस मानवजात राष्ट्रांशिवाय सुखात शांतीत अस्तित्वात राहुच शकत नाही असे मानणारया व राष्ट्रांच्या भिंती नसलेले जग हा एक युटोपिया मानणारयांसाठी मी जॉन लेनन यांच हे गाण देउन समारोप करतो.

"Imagine"

Imagine there's no heaven
It's easy if you try
No hell below us
Above us only sky
Imagine all the people
Living for today...

Imagine there's no countries
It isn't hard to do
Nothing to kill or die for
And no religion too
Imagine all the people
Living life in peace...

You may say I'm a dreamer
But I'm not the only one
I hope someday you'll join us
And the world will be as one

Imagine no possessions
I wonder if you can
No need for greed or hunger
A brotherhood of man
Imagine all the people
Sharing all the world...

You may say I'm a dreamer
But I'm not the only one
I hope someday you'll join us
And the world will live as one.
वरील विचार सुत्ररुपात खालीलप्रमाणे मांडता येतो. ( टु मेक पॉइंट क्रीस्टल क्लीअर )


राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे. त्यात नैसर्गिक वा दैवी असा कुठलाही भाग नाही. हीच्या मुळाशी माणसाच्या स्व=(वंश-वर्ण-जमात-धर्म-संस्कृती इ.) च श्रेष्ठ आहेत व त्यासाठी हा असलेल्या माणसांच्या समुहाचे (टोळीचेच) स्वतंत्र राष्ट्र असण्याचा आग्रह आहे. व त्याच बरोबर त्या वैशिष्ट्याच्या वर्चस्वासाठी चा ही आग्रह आहे. झेनोफ़ोबीया म्हणजे च जे वरील प्रमाणे स्व=(वंश-वर्ण इ.) नसलेले “इतर” आहेत त्यांच्याप्रति असलेली भीती व द्वेष ही अजुन एक नकारात्मक प्रेरणा या मागे आहेत.

राष्ट्रवाद मुळात माणसांना माणसांपासुन तोडण्याचे काम करतो. स्व-वर्चस्व वा स्व-संरक्षण या दोन्ही प्रेरणांनी प्रत्येक राष्ट्र सैन्य निर्मीती व युद्ध सज्जतेवर अमुल्य प्रचंड अशी मानवी व इतर संसाधनांची गुंतवणुक करतात. जी बहुतांश शिक्षण/आरोग्य/विकास या अत्यंत निकडीच्या क्षेत्रांना डावलुन च होते.

व्यक्तीगत स्तरावर माणुस जो विवेक सर्वसाधारणपणे बाळगतो तो राष्ट्र या संकल्पने च्या नावाखाली पायदळी तुडवला जातो. माणुस माणसाला मारायला एका पायावर तयार होतो. मारण्या मरण्यासाठी एक आग्रही प्रोत्साहन व बधिरतेने आदेशाचे पालन करण्याचा आग्रह सैनिका ला केला जातो. राष्ट्रवाद एक असे लायसन्स टु कील सैनिकाला देते की जे पुर्णपणे अनैतिक असे असते.

राष्ट्रवादा ची चौकट एकदा मिळाली की वंश-वर्ण-धर्म-संस्कृती हा केवळ एक स्वाभाविक वेगळेपणा न राहता वा जीवनशैली न राहता ही एक इतरांवर वर्चस्व गाजविण्याची वा इतरांपासुन संरक्षण करण्याची बाब बनते. या साठी मग हिंसाचार हा नैतिक व कायदे संमत होतो. व “इतर” जे आहेत ते शत्रु बनतात.

राष्ट्रवाद हा मुळात मानवनिर्मीत व कृत्रीम असल्यानेच त्याला राष्ट्रीय( झेंडा-चलन-पशु-पक्षी-सील-भाषा) आदिंची निर्मीती/जोपासना व महत्वाचं म्हणजे प्रचार करणे ही एक अत्यंत गरजेची अशी बाब बनते. या सर्व प्रतिकांना पावित्र्य बहाल करणं हा आवश्यक असा उपचार बनतो. वरील सर्व घटकांचा एकत्रीत परीणाम मनावर ( गारुड) झाल्यावर एक राष्ट्रवादा चा मनावर खोलवर परीणाम करणारा उन्माद निर्माण होतो.

दुहेरी नकली नीतीमुल्ये राष्ट्रवाद निर्माण करतो. एखादी गोष्ट तथ्यात्मक पातळीवर योग्य की अयोग्य हे विवेक बुद्धीप्रामाण्य नैतिकता आदि कसोटींवर घासुन न पाहता ते प्रथम विशीष्ट राष्ट्राच्या संदर्भात कशी आहे यावर निर्णय घेतला जातो. हा नैतिक निर्णयांचा क्रायटेरीया जाणीवपुर्वक संकुचीत केला जातो जे पुर्णपणे चुकीचे व अ-मानवीय असे आहे. गुलामगीरी संदर्भातील वसाहतवाद्यांची भुमिका बघावी. यात अनेक विरोधाभास जे दिसतात त्याच्या मुळाशी राष्ट्रवादा ने निर्माण केलेली दुहेरी नीतीमुल्ये च आहेत.

मुलत: अहंकाराधिष्ठीत असलेला राष्ट्रवाद (टोळीवाद) हा कॉम्पीटीशन स्पर्धे वर आधारीत असलेल्या मानवतेचे खुरटे रुप दाखवितो. मात्र सर्वात वाईट बाब म्हणजे प्रेमाधिष्ठीत को-ऑपरेशन सहकार यावर आधारीत असलेल्या मानवी सर्जनशीलतेच्या कळ्यांना तो पुर्णपणे फ़ुलु देत नाही. परस्पर मानवी सहकार, सिनर्जी यांची अगदी छोटी झलक आपल्याला सर्न ने अनेक राष्ट्रांच्या सहकार्याने केलेल्या विश्वनिर्मीतीचे गुढ उकलु पाहणारया असामान्य प्रयोगात, संयुक्त राष्ट्र संघाने वर्ल्ड हेरीटेज च्या संदर्भात अवघ्या विश्वाचा वारसा असणारया गोष्टींना जपण्याच्या प्रयत्नात दिसुन येते.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

अमेरिका, भारत इ देशांच्या मागे कोणती नकारात्मक प्रेरणा आहे? दुसरे म्हणजे राष्ट्रवादाचा साईड इफेक्ट हा उन्माद व वरती उल्लेख केलेल्या काही वाईट गोष्टी जरूर आहेत पण त्या गोष्टी म्हणजेच राष्ट्रवाद नव्हे. जगातील सगळा मानव सारखाच आहे, सर्वांनी एक ग्रूप करून राहू, एक सर्वसंम्त घटना लिहून तिचे पालन करू असे जगायचे ठरवले तर सगळे जग म्हणजेच एक राष्ट्र असल्यासारखे होईल. तसे झाले तर चांगलेच आहे. पूर्वीच्या दळणवळणाच्या साधनांच्या द्वारे हे शक्य नव्हते. अशा कायद्याची अंमलबजावणी होणे कठीण होते. आता तो मोठा प्रश्न नाही. पण तरीही मानवसमूहांच्या (बापरे! मी असे शब्द वाचायलाही घाबरतो, पण आता दुसरा सुचत नसल्याने लिहावे लागत आहे Smile ) एकत्रित राहू शकण्याचे एक "थ्रेशोल्ड" असावे असे जाणवते. एका मोठ्या देशातील अंतर्गत गटांमधे सुद्धा वाद असतात पण देशाचे सरकार ते घटनात्मक पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करते व ते गट ते मान्य करतात. हे असे जागतिक स्तरावर घडू शकेल असे मला वाटत नाही. जेव्हा त्या त्या गटांना हे मान्य होत नाही तेव्हा देश फुटतात.

दुसरे म्हणजे सगळी माणसे सारखी नाहीत. किमान त्यांचे सध्याचे वागणे, जीवनात कशाला प्राधान्य आहे याबद्दलचे मत. त्यात विविध खंडातील लोक दिसतातही वेगळे. अशावेळेस काहीतरी गट निर्माण होणे अपरिहार्य आहे. जेथे वंश आड येत नाही तेथे धर्म (कॅथॉलिक्स वि इतर), जेथे धर्म आड येत नाही तेथे वंश (अमेरिकेतील गोरे विरूध काळे, किंवा मेक्सिकन्स), जेथे दोन्ही आड येत नाही तेथे तिसरेच काहीतरी (जर्मन्स वि फ्रेन्च, किंवा ब्रिटिश कॉलनीज वि ब्रिटन) - कायम असेच दिसते की एका कोणत्यातरी "क्रिटिकल मास" नंतर कोणताही गट "विश्वची माझे घर" पर्यंत पोहोचत नाही.

मग हे सगळे प्रॅक्टिकली शक्य वाटत नाही. अहिंसेप्रमाणेच यात दुसर्‍याचे वागणे एका स्तरावर गृहीत धरलेले आहे. जी गोष्ट सर्वांनी एकदम मान्य केल्याशिवाय प्रत्यक्षात येउ शकत नाही ती अशी वैचारिक लेवल च्या पुढे जाऊ शकत नाही.

सैन्याच्या बाबतीत जे लिहीले आहे नुसते पटत नाही, एवढेच नव्हे तर आवडले ही नाही. एका अत्यंत चुकीच्या युद्धाचे उदाहरण देऊन जनरलायझेशन झाले आहे. आपण एक देश म्हणून एक घटना मान्य करू, आपले सर्वाचेच एकमेकांतील फरक असूनही एकत्र राहू, त्या व्यवस्थेच्या संरक्षणासाठी वेळ पडली तर युद्धही लढू असे करण्याशिवाय दुसरा पर्याय काय आहे? वरचे वर्णन राज्यविस्ताराकरता केलेल्या युद्धांना कदाचित लागू होईल, पण ज्यांना प्रतिकाराकरता युद्ध करावे लागते ते ही यातच आले का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारएन्ड शी सहमत.
अहो, साधे उदाहरण म्हणजे दोन कुटुंबे एकत्र राहू शकत नाहीत. त्यांच्यात कुरबुरी सुरु होतात. तिथे सगळे जग एकत्र कसे रहाणार ? 'वसुधैव कुटुंब' ही कल्पना म्हणूनच फक्त गोंडस वाटते. कारण स्वार्थ कुणालाही चुकलेला नाही. एकच विचारांचे ढोल बडवणार्‍या दोन पक्षांचे सध्या काय चालले आहे ते बघतो आहोतच ना आपण ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

च्यवनप्राश यांनी हा लेख किमान १०० वर्षं आधी लिहायला हवा होता असे माझे मत आहे. राष्ट्रभक्तीने वेड्या (उन्मत्त) झालेल्या कित्येक स्वातंत्र्यसैनिकांचे (उन्मत्त तरुणांचे) आयुष्य सन्मार्गी लागू शकले असते. पण तसे झाले नाही. अरेरे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राष्ट्रभक्तीने वेड्या (उन्मत्त) झालेल्या कित्येक स्वातंत्र्यसैनिकांचे (उन्मत्त तरुणांचे) आयुष्य सन्मार्गी लागू शकले असते.

सहमत आहे. राष्ट्रभक्तीने वेडेबिडे होऊन चारदोन ठिकाणी आयसोलेशनमध्ये पिस्तुलांनी ठीस ठीस करून नि चारदोन गोर्‍या हापिसरांचे नि गौरनरांचे मुडदे पाडून (संबंधित व्यक्ती फासावर चढण्यापलीकडे) काहीही झाले नसते / होण्यातले नव्हते. असंतुष्ट जनतेची ग्रासरूट्स पातळीवरची चळवळ होऊन संघटितपणे आणि नेटाने मागण्या करीत आणि त्याचबरोबर लढा देत राहिल्याशिवाय काहीही पदरी पडण्यातले नसते.

कोण जाणे, त्या (वेल-इण्टेन्शण्ड) तरुणांचे आयुष्य सन्मार्गी लागते, तर हिंदुस्थानचा कदाचित खरोखरच काही फायदा होता. ('बचेंगे तो और भी लढेंगे' असे कोण बरे म्हणून गेला तो? पण 'बचल्याने लढत आहे रे, आधी बचलेचि पाहिजे', नाही का? तेथे उगाच मरायची घाई कशासाठी?)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नाही म्हणायला, हुतात्म्यांवर नेमेचि प्रासंगिक लेख(मालिका) वगैरे लिहिणार्‍यांची, झालेच तर 'आजचे दिनवैशिष्ट्य'सारखे रकाने भरणार्‍यांची मात्र कायमची नि चांगली सोय झाली.

आगाऊ स्पष्टीकरण: म्हणजे ब्रिटिशांची पित्तेगिरी नव्हे. बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पु.झा.प्र.का.टा.आ.
सं.पु.प्र.का.त.चा.उ.ड.ड.न.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

अहो / अगं कॅडबरी,

संपूर्ण कॅडबरी सारखे संपूर्ण शब्द वापरले असते तर तुमचा हा प्रतिसाद मला समजला असता. असे chocolate च्या वड्या प्लास्टिक च्या कागदात गुंडाळल्यासारखे पूर्णविरामाने गुंडाळलेले एक एक अक्षर काही समजत नाही बुवा…

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कम्युनिझम चा विरोधक असलेला जॉर्ज ऑरवेल राष्ट्रवादि व्यक्तीच्या मानसिकतेचे दिग्दर्शन खालील उतार्यात अत्यंत मार्मिकपणे नोंदवतो व योगायोग बघा उदाहरण देतांना त्याने इंडिया च ही नाव घेतल. हा उतारा इतका अचुक आहे की तो अनेक लोकांच्या राष्ट्रवादि मानसिकतेशी कमालीचा जुळतो.
मला मनापासुन वाटते की हा उतारा तुम्ही मुळापासुन वाचावा असा आहे.
As nearly as possible, no nationalist ever thinks, talks, or
writes about anything except the superiority of his own power unit. It is
difficult if not impossible for any nationalist to conceal his
allegiance. The smallest slur upon his own unit, or any implied praise of
a rival organization, fills him with uneasiness which he can relieve only
by making some sharp retort. If the chosen unit is an actual country,
such as Ireland or India, he will generally claim superiority for it not
only in military power and political virtue, but in art, literature,
sport, structure of the language, the physical beauty of the inhabitants,
and perhaps even in climate, scenery and cooking.
He will show great sensitiveness about such things as the correct display of flags, relative size of headlines and the order in which different countries are
named. All nationalists consider it a duty to spread their own language to the
detriment of rival languages,

दुसर म्हणजे तुम्ही जे मुळात म्हणताय की १०० वर्षे अगोदर लिहायला हवा होता तेव्हा रविंद्रनाथ टागोरांनी ( थोडी वर्ष इकड तिकड मुळ मुद्दा महत्वाचा आहे.) राष्ट्रवादा संदर्भात असे विचार मांडलेले होते. ते इथे मुळापासुन वाचावे अशी विनंती करतो म्हणजे प्रश्नाचे मुळ लक्षात येइल. व या समस्येचा समुळ नाश करण्यासाठी काहीतरी मुलभुत स्वरुपाच्या योजना राबविता येतील. आपली मुळ आपणच नको का तपासुन बघायला ?
रविंद्रनाथ ठाकुरांचे विचार अंश
I am not against one nation in particular, but against the general idea of all nations. What is the Nation?

It is the aspect of a whole people as an organized power. This organization incessantly keeps up the insistence of the population on becoming strong and efficient. But this strenuous effort after strength and efficiency drains man's energy from his higher nature where he is self-sacrificing and creative.

For thereby man's power of sacrifice is diverted from his ultimate object, which is moral, to the maintenance of this organization, which is mechanical. Yet in this he feels all the satisfaction of moral exaltation and therefore becomes supremely dangerous to humanity. He feels relieved of the urging of his conscience when he can transfer his responsibility to this machine which is the creation of his intellect and not of his complete moral personality. By this device the people which loves freedom perpetuates slavery in a large portion of the world with the comfortable feeling of pride of having done its duty; men who are naturally just can be cruelly unjust both in their act and their thought, accompanied by a feeling that they are helping the world in receiving its deserts; men who are honest can blindly go on robbing others of their human rights for self-aggrandizement, all the while abusing the deprived for not deserving better treatment. We have seen in our everyday life even small organizations of business and profession produce callousness of feeling in men who are not naturally bad, and we can well imagine what a moral havoc it is causing in a world where whole peoples are furiously organizing themselves for gaining wealth and power.

Nationalism is a great menace. It is the particular thing which for years has been at the bottom of India's troubles. And inasmuch as we have been ruled and dominated by a nation that is strictly political in its attitude, we have tried to develop within ourselves, despite our inheritance from the past, a belief in our eventual political destiny.
वरील विचार ज्या मुळ निबंधातील आहेत तो रवींद्रनाथ ठाकुर यांचा मुळ निबंध वाचण्यासाठी व रवींद्रनाथ ठाकुर यांच्या इतरही अनेक विषयांवरील सुंदर लेखासाठी ही वेबसाइट अतिशय सुंदर आहे. कविता गाणी तर फार च सुंदर आहेत बरेच मटेरीयल बंगालीत असले तरी इंग्रजी त ही आहे. एकवेळ अवश्य भेट द्या.
http://tagoreweb.in/Render/ShowContent.aspx?ct=Essays&bi=72EE92F5-BE50-4...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

माझी पाळंमुळं खणून काढल्याबद्दल धन्यवाद… माझ्या विनोदी प्रतिक्रियेला चक्क विद्वानांची वाक्यं उद्धृत करणारी प्रतिक्रिया द्याल असं वाटलं नव्हतं. एकूणच अत्यंत एकांगी शीर्षक असल्यामुळे मी या लेखाला विनोदी प्रतिक्रिया दिली. आणि दुसरं म्हणजे, विद्वानांची मतं त्यांच्या जागी बरोबर असतील, पण राष्ट्रवादाला जर तुम्ही उन्माद म्हणू लागलात तर अवघड आहे.
माझ्या मते, "Energy can neither be created nor destroyed. It can only be converted from one form to another." हा न्याय अशा अनेक वादांना पण लागू होतो. टागोरांच्या "organizations" कुटुंब, समाज, धर्म, शाळा, कॉलेज, दुकान अशा सर्व ठिकाणी हा "स्व" वाद असू शकतो. एक वाद नसला तर दुसरा वाद त्याची जागा घेतो. जिथे "स्व" कुटुंबाचा अभिमान नसेल तिथे कदाचित समाज किंवा धर्माचा अभिमान असू शकेल. हा अभिमान किंवा "वाद" हा कुठल्या न कुठल्या स्वरुपात असतोच. हा मानवी स्वभाव आहे. आता यात कुठला वाद धोकादायक आणि कुठला नाही यावर फारफारतर चर्चा होऊ शकते. पण प्रत्येक मानवाच्या परिस्थिती / समज यामुळे त्या चर्चेतही चांगल्या वाईटाचा संदर्भ बदलू शकतो.
अशा वेळी फक्त राष्ट्रवादाला कोपऱ्यात उभे करून त्याला उन्माद उन्माद म्हणून टोचणी देणे याला काय अर्थ आहे? भारतासाठी, भारताच्या एकंदर जडणघडणीसाठी राष्ट्रवाद गरजेचा कसा आहे हे सिद्ध करता येऊ शकते (ते सिद्ध करायला माझी कुवत कमी पडेल म्हणून मी प्रयत्न करत नाहीये.). समजा असे सिद्ध झाले, तरी पण तुम्ही याला उन्माद म्हणाल काय? राहता राहिली माझी प्रतिक्रिया… इंग्रजांनी भारतात पाय ठेवला तेव्हा अखंड भारत असं काही अस्तित्वात नव्हतं. पण त्यांच्या विळख्यातून सुटण्यासाठी राष्ट्रवाद आवश्यक होता. आणि स्वातंत्र्यसैनिकांनी तेच केलं. टागोरांनी जे लिहिलंय ते स्वातंत्र्यलढ्याला उन्माद म्हणत नाही.

मला सगळा लेख कळला नाही असं तुम्ही म्हणता म्हणून मी पुन्हा सगळं वाचलं. मला एकंदरच सूर हा राष्ट्रवाद म्हणजे उन्माद, असा वाटला आणि आक्षेप घेण्याजोगा वाटला. मला लेख कळला नाही हे तुमचं म्हणणं मला मान्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लैच नेमकं.

एक वाद नसला तर दुसरा वाद त्याची जागा घेतो. जिथे "स्व" कुटुंबाचा अभिमान नसेल तिथे कदाचित समाज किंवा धर्माचा अभिमान असू शकेल. हा अभिमान किंवा "वाद" हा कुठल्या न कुठल्या स्वरुपात असतोच. हा मानवी स्वभाव आहे. आता यात कुठला वाद धोकादायक आणि कुठला नाही यावर फारफारतर चर्चा होऊ शकते. पण प्रत्येक मानवाच्या परिस्थिती / समज यामुळे त्या चर्चेतही चांगल्या वाईटाचा संदर्भ बदलू शकतो.अशा वेळी फक्त राष्ट्रवादाला कोपऱ्यात उभे करून त्याला उन्माद उन्माद म्हणून टोचणी देणे याला काय अर्थ आहे?

हे तर लै मार्मिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

So Nationalism is an absolutely man-made-phenomena and nothing sacred about it !

Nationalism is an absolutely man-made-phenomenon and there is nothing sacred about it, इथवर ठीकच आहे.

On the other hand, if one is persecuted as a group - as a "nation", so to say, isn't nationalism automatically thrust upon such a group, in a way? And does it not make sense to adhere to that imposed nationalism, against a common persecutor, a common usurper?

साधा 'वयं पञ्चाधिकं शतम्'वाला फण्डा नाही का हा? म्या मराठ्याचे शेजारच्या गुजरातदेशीयाशी / म्या हिंदूचे शेजारच्या मुसलमानाशी वाकडे असेलही. पण बाहेरचा इंग्रज जर आम्हा दोघांनाही 'इण्डियन' या एकाच क्याटेगरीत घालून पिळत असेल, तर मग आम्हीही त्यास 'तथास्तु' म्हणून त्याविरुद्ध एक का होऊ नये? (अवांतर: मुसलमानांत 'तथास्तु'च्या जागी काय म्हणण्याची पद्धत आहे? अरे हो, 'आमीन', नाही का? अंमळ विसरलोच होतो.)

त्याउपर, बाहेरचा पिळणारा असो वा नसो, परंतु common interestsपायी गट करून एकत्र येण्यात नेमके काय गैर आहे?

(भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश हे भूभाग उद्या यदाकदाचित common interestsपायी आपसूक एकत्र आले, तर त्यात गैर काहीच नाही. परंतु, कधीकाळी हे भूभाग एकत्र होते, केवळ या कारणासाठी कोणाचीही तशी इच्छा नसताना केवळ मूठभरांच्या भावनिक गरजेसाठी पुन्हा त्यांना विनाकारण एकत्र आणण्याचे प्रयत्न करायचे, यात अर्थ दिसत नाही. शिवाय, common interestsपायीच एकत्र यायचे, तर भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशच का? भारत, बांग्लादेश, म्यानमार आणि थायलंड (पाकिस्तानास अंतर्भूत न करता) का नाही? किंवा, असेच दुसरे काही म्युच्युअली बेनेफिशियल कॉम्बिनेशन?

'समाईक संस्कृती' म्हणाल, तर पंजाब्यांस नि उत्तरप्रदेशीयांस त्या कारणास्तव पाकिस्तान(च्या विलीनीकरणा)चे आकर्षण असूही शकेल. मराठ्यांस नि मद्राश्यांस का असावे? आमच्यात नि पाकिस्तान्यांत नेमके काय समाईक आहे? सलोख्याचे संबंध (जमल्यास) इतपत ठीक आहे; विलीनीकरण कशासाठी?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो हा पाच खंड आम्ही ऑलिम्पीक च्या स्पर्धेच्या वेळेस जे पाच खंडाचे वर्तुळ एकमेकांत गुंफलेले सहकार भावनेने तो हा ऑलिम्पीयन फॉर्म्युला आहे.
तुम्ही म्हणता तो तर तोच टोळीवादि फॉर्मुला आहे
बाहेरची मोठी टोळी युरोपियन युनियन ताप देत असेल समजा तर वयं सप्तम सार्कम
किंवा वयं ब्रिकंम चातुष्ट्यम
अहो ते टोळीवादि फॉर्मुले आहेत
मी दुसरी बाजु दाखवत होतो पण खेदाने म्हणावेसे वाटते तुम्ही जुनी च बाजु बघत आहात
न्.वि.बां. ने. ब. जु. च बा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

हेच मार्क्सवाद, साम्यवाद, समाजवाद, इ.इ. वादांबद्दलही म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकुणच राष्ट्रीयत्व (नी त्यातून जन्मणारा राष्ट्रवाद) ही सुद्धा जात, धर्म, वंश, मातृभाषा वगैरेसारखी जन्माने चिकटणारी आणखी एक ओळख.
तेव्हा त्यासाठीही किती अस्मिता बाळगायची नी त्या अस्मितेला कितपत महत्त्व देऊन तिचे कुठे व किती अंगार फुलवायचे हे ज्याने त्याने आपापले ठरवावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फारएन्ड
सैनिक हा प्रकार थोडा मायक्रो पाताळीवरुन बघा.
म्हणजे असं की बिहार मध्ये काही जातींच्या ही सेना आहेत यादव सेना रणवीर सेना अशा. त्या एका विशिष्ट जाती च्या समाजाच्या सेना आहेत. त्यात तरुण शारीरीक बाबतीत उजवे अशा तरुणांची भरती केली जाते.त्या सैनिकांच्या आर्थिक व इतर गरजा समाजाकडुन पुर्ण केल्या जातात. का ? तर त्या त्या जाती/समाजाचे विशिष्ट हितसंबंध जपण्यासाठी त्यांचे रक्षण करण्यासाठी ( मग ते जमिन मालमत्ता, उतरंडीतील श्रेष्ठत्व , अधिकारांची जपणुक, संसाधनावंर अग्रहक्क आदि अनेक संदर्भातील हितसंबध असु शकतात) त्यासाठी व त्याविरोधात अडचण अडथळा ठरत असलेल्या इतर समाजाच्या हक्कांना चिरडुन काढण्यासाठी या सैनिकांचा वापर केला जातो.
मध्यपुर्वे चा इतिहास हा अनेक छोट्या छोट्या टोळ्यांच्या संघर्षाचा रक्तरंजित इतिहास आहे. त्या टोळ्यांचे ही सैनिक होते एकमेकांच्या उरावर उठणारे आदि, सैनिक एक तर आर्थिक वा ( कंडिशनींग केलेला असेल तर अधिक खोट्या उद्दात्त संकल्पनांसाठी ) मग मरामारायला तयार होतो.
या मागे त्या त्या टोळीचा स्वार्थ त्या टोळीचे इतरांपासुन झालेले विलगीकरण असते. त्या टोळीवादाचे च उत्क्रांत रुप अधिक व्यापक रुप राष्ट्रवाद हा असतो. राष्ट्राच्या काही कॉमन फॅक्टर्स ना जोडुन तो बनतो. एक मोठी टोळी वेगळया मसावि च्या आधारावर बनवलेली. वेगळा झेंडा वेगळी चलन जोपासणारी वेगळी प्रतिक जोपणारी पण टोळी च.
आता त्यात ग्लोरीफिकेशन करणे अत्यावश्यक च बाब नाही का ? आता एका लार्ज स्केल वर सैनिका ला आपण कोणाला मारतोय म्हणजे चुकीच करतोय अस वाटण्याची शक्यता विवेक कमीच. पॅलेस्टाइन मध्ये तर १३ व १४ वर्ष वयाचे सैनिक घडवले जातात. युद्ध का होतात तेलासाठी संसाधनांवरील हक्कासाठी, जमिनीसाठी, त्या त्या टोळीच्या हक्कांसाठी जॅपनीज टोळी एका बेटा साठी चायनीज टोळी शी लढणार. सैनिक त्यात बलिदान करणार नकार दिला तर देशद्रोही मानले जाणार
देशद्रोही का आपल्या टोळीच्या हितसंबंधात लढला नाही म्हणुन लढाइची कारणे पुर्णपणे स्वार्थी एहिक असतात
मुलामा मोठ्या शब्दांचा शहीद आदि द्यावा लागतो त्या शिवाय लढणार कसा ?
जस बघा अ ने ब चा खुन केला
अ ने ब चा मर्डर गेम केला
अ ने ब ची हत्या केली
व अ ने ब चा वध केला
यात वध केला या मागची भावना या मागच उद्दात्तीकरण हे त्या त्या खुनी व्यक्तीला त्याच्या विवेकाला झोपवण्याच काम करत की नाही ?
टोळी ला सैनिक व शहादत च उद्दात्तीकरण करण आवश्यकच नाही का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

यात वध केला या मागची भावना या मागच उद्दात्तीकरण हे त्या त्या खुनी व्यक्तीला त्याच्या विवेकाला झोपवण्याच काम करत की नाही ?

तुम्ही फाशीच्या शिक्षेच्या विरोधात इ इ आहात का? म्हणजे एक परजीवन संपवणे, बाकी काँटेक्स्ट काही का असेना, हेच मूळात चूक आहे, अशी वैगेरे विचारधारा आहे का? असे नसेल तर, कोणत्या परिस्थितीत इतर मनुष्याचा जीव घेणे समर्थिता येते असे आपणांस वाटते? असा संदर्भ, वेगवेगळ्या सैनिकांस, लागू पडतो का हे नंतर पाहता येईल.
मोस्टली अमानवी, अन्याय्य कारणांसाठी प्राण घेणे (किंवा काहीही अपायकारक करणे)चूक असावे. (तत्त्वतः हत्याच करू नये म्हटले तर प्रश्नच मिटला.) पण जर काही परिस्थितींत हत्या आवश्यक आहे असे म्हटल्यास काय अमानवी आणि अन्याय्य आहे हे कसे ठरवावे? कोणी ठरवावे? असे ठरवणारांस राष्ट्र म्हटले तर काय बिघडते? काय अन्याय्य आहे याच्यबद्दल दोन भिन्न भूमिका नसू शकत नाहीत का? मग दोन राष्ट्रांत मतभेद असले तर काय बिघडले? यातल्या एका भूमिकेशी माझी माझ्या विवेकाने अलाईनमेंट असेल तर नक्की काय झोपवले गेले आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

फाशीच्या शिक्षेच्या विरोधात काही नाही बोललो. एखादा त्या पातळीचा गुन्हा असेल त्यासाठी अशी शिक्षा देणे आवश्यक भासत असेल तर द्यायलाच पाहीजे.
अहो धार्मिक वा हिंसा- अहिंसा धर्माधिष्ठीत तशा त्या चौकटीत हा विषय मी मांडला नाही
हा विषय अ-धार्मिक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

एखादा त्या पातळीचा गुन्हा असेल त्यासाठी अशी शिक्षा देणे आवश्यक भासत असेल तर द्यायलाच पाहीजे.

मग गुन्हा खूप मोठ्या समूहाने (एका राष्ट्राने) दुसर्‍या खूप मोठ्या समूहाशी (दुसर्‍या राष्ट्राशी) गुन्हा केला असेल तर शिक्षा द्यायलाच पाहिजे. यात विवेक झोपण्याचा प्रश्न कोठून आला?
--------------------------------------
आपल्यावर झालेल्या अन्यायाचा कडता काढण्यासाठी, किंवा देशाचे आर्थिक/भौगोलिक सामर्थ्य वाढवण्यासाठी किंवा देशाचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी सैनिक हत्या/वध (जे काय ते) करतो किंवा नागरीकांना त्याने तसे करावे असे वाटते तेव्हा कोणाचाही विवेक झोपलेला नसतो.
--------------------------------------
गुन्हा घडला आहे कि नाही, शिक्षा कमी आहे कि जास्त, ती देण्याची राष्ट्राची क्षमता आहे कि नाही, इ इ यांचं वर्णन प्रत्येक केसमधे वेगळं असू शकेल. राष्ट्रांची भूमिका चूक किंवा बरोबर असू शकते. पण राष्ट्रवाद ही संकल्पनाच उन्माददायी आहे असे म्हणणे चूक असावे.
--------------------------------------
मलाही धर्माचा कोणता संबंध अभिप्रेत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गुन्हा घडला आहे कि नाही, शिक्षा कमी आहे कि जास्त, ती देण्याची राष्ट्राची क्षमता आहे कि नाही, इ इ यांचं वर्णन प्रत्येक केसमधे वेगळं असू शकेल. राष्ट्रांची भूमिका चूक किंवा बरोबर असू शकते. पण राष्ट्रवाद ही संकल्पनाच उन्माददायी आहे असे म्हणणे चूक असावे.

नव्याचे नऊ दिवस आहेत हो. राष्ट्रवाद ही संकल्पना चूक, धर्म हा मूर्खपणा, आस्तिकवाद हा त्याहून मूर्खपणा, इ.इ. विचार मांडल्याशिवाय सध्याच्या हुच्चभ्रू वर्तुळात कुणी भाव देत नाही त्यामुळे चाललेल्या गमजा आहेत सगळ्या. शेवटी सगळा फॅशनचा परिणाम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राष्ट्रवाद ही संकल्पना चूक, धर्म हा मूर्खपणा, आस्तिकवाद हा त्याहून मूर्खपणा, इ.इ. विचार मांडल्याशिवाय सध्याच्या हुच्चभ्रू वर्तुळात कुणी भाव देत नाही त्यामुळे चाललेल्या गमजा आहेत सगळ्या. शेवटी सगळा फॅशनचा परिणाम आहे.

मग कोणी याविषयी मतच व्यक्त करु नये का? हुच्चभ्रू वर्तुळात भाव मिळवण्यासाठी बोलताहेत असं समजतील म्हणून सर्वांनी हे विषय गुंडाळूनच ठेवायचे का?

राष्ट्रवाद मूर्खपणाचा आहे की नाही हा भाग वेगळा. इन जनरल विचार मांडण्याबद्दल जजमेंटल होण्याविषयी म्हणतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग कोणी याविषयी मतच व्यक्त करु नये का? हुच्चभ्रू वर्तुळात भाव मिळवण्यासाठी बोलताहेत असं समजतील म्हणून सर्वांनी हे विषय गुंडाळूनच ठेवायचे का?

राष्ट्रवाद मूर्खपणाचा आहे की नाही हा भाग वेगळा. इन जनरल विचार मांडण्याबद्दल जजमेंटल होण्याविषयी म्हणतोय.

जसे इतर लोक काही विचारांबद्दल जजमेंटल होतात, तसा मीही काही विचारांबद्दल जजमेंटल होतो. मी माझं जजमेंट कायम गुंडाळूनच ठेवायचं का मग?

विशिष्ट प्रकारचे जजमेंट हराम अन विशिष्ट प्रकारचे जजमेंट कोशर/हलाल हे माझ्या प्रतिसादाला मिळालेल्या श्रेण्यांमुळे पुनरेकवार अधोरेखित जाहलेले आहे. हे अनाम श्रेणीदात्या/दात्री, बहुत धन्यवाद फॉर प्रूव्हिंग माय पॉइंट.

अपडेटः काही श्रेणीदाते विवेक जागृत ठेवून आहेत हेही सिद्ध झालेले आहे. तेव्हा त्यांनाही धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

@च्यवनप्राश - पुरोगामीत्व हे सर्वतम उन्मादक आहे. इतर सर्व "वादांतील" उन्माद त्यामानाने अतिशय सौम्य आहे.
---------------
स्पष्टीकरण - आदिम मानवांमधील पुरोगाम्यांनी सिविलायझेन्स स्थापन केली. आता असले एक सिविलायझेशन म्हणजे काय? एक राष्ट्र !!! एकेक नवनवा कंसेप्ट पुढे आणून हे सिविलायझेशन वा पर्यायाने राष्ट्र अधिकाधिक किचकट करायचे काम त्यांनीच पुढे चालू ठेवले. आपल्या सिविलायझेशन संबंधित किंवा मानवते संबंधित नवनविन संकल्पना निर्माण करून सामान्य जनतेच्या अस्मिता त्या संकल्पनांशी जोडण्याचे कामही त्या त्या काळच्या पुरोगाम्यांनी केले.

मानवी जीवनात भौतिक, तांत्रिक, आर्थिक प्रगती करत राहून सामाजिक समस्या निर्माण करायच्याच नाहीत हे जगात कोठेही पुरोगाम्यांना जमले नाही. परंतु ज्या उन्मादाने दरवेळी ते जगाला नेहमी आपल्या पाठी घेऊन जाऊ पाहतात, घेऊन जातात ते विचित्र आणि व्यथित करणारे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुण भाउ तुम्हाला नेमकं काय म्हणायच आहे माझ्या लक्षात नाही आल.
सिवीलायझेशन म्हणजे राष्ट्र कसे ?
सिविलाझेशन म्हणजे संस्कृती असा सर्वसाधारण अर्थ मानला जातो ना ?
एका सिवीलायझेशन अंतर्गत अनेक राष्ट्रे असु शकतात. पण सिवीलायझेशन म्हणजे राष्ट्र कसे हे कळले नाही
आणि पुरोगाम्यांनी सिव्हीलायझेशन स्थापित केली ??
हे फार च कठीण आहे समजायला कारण माझ्या अल्प माहीतीनुसार सिव्हीलायझेशन हि अनेक घटकांनी योगदान करुन अनेक शतंकाचा कालखंड पचवुन एका
मोठ्या मानवीसमुहाने निर्माण केलेली /झालेली एक वैशिष्ट्यपुर्ण जीवनशैली वे ऑफ लाइफ असते.
कृपया थोड उदाहरण देऊन सांगा मला समजल नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

उन्माद म्हटले कि पुरोगामीत्व आठवते. म्हणून हा अवांतर प्रतिसाद लिहिला होता. त्याचा मूळ लेखाशी संबंध नाही. ज्या राष्ट्रात राष्ट्रवाद अभावानेच आढळतो तिथे त्याचा उन्माद दिसायला लागला म्हणून जो खरोखरीचा उन्माद जगभर माजला आहे त्याची आठवण करून द्यावीशी वाटली.
----------------------
संस्कृती, सिविलायझेशन आणि राष्ट्र यांच्या व्याख्या काय आहेत या तांत्रिक विषयात मला पडायचे नाही. पण नेहमी एक नविन टूम काढायची, जगाला तिच्याकडे ओढायचे, नव्या अस्मिता बनवायच्या, त्याचा भोळ्या भाबड्या जनतेचा प्रचंड भक्तमळा बनवायचा आणि त्या टूमेच्या अनुषंगाने येणारे असोडवणीय प्रश्न जगासमोर उभे करून लगेच दुसरी टूम काढायची नि पुन्हा तेच.
----------------------
इथे अवांतर होऊ नये म्हणून मी हेच उदाहरण देतो. राष्ट्रवाद हा उन्माद आहे म्हणताना नक्की म्हणायचे आहे? उन्माद राष्ट्राचा इनहेरंट पार्ट असतो? राष्ट्र असावे पण उन्माद नसावा? कि राष्ट्रच नसावे? मग काय असावे? राजकिय सत्तांची जागतिक, केंद्रीय, मध्यम आणि स्थानिक मॉड्यूल्स लागतीलच ना? या मॉड्यूल्सच्या किती पातळ्या असायला हव्या? त्यांची हायरार्की कशी हवी? ते चालवणारांचे सिलेक्शन कसे व्हावे? त्यांत उन्माद येणार नाही याची काळजी कशी घ्यावी? राष्ट्रीय उन्मादांत काय काय मोडते? आज काय वेगळे आहे?
"उन्मादी राष्ट्रवाद नको" म्हणणारे पुरोगामी पुन्हा जनसंग्रह करणार. हा विचारप्रवाह बळावला तर "उन्माद नसलेली राष्ट्रे" किंवा "राष्ट्रे नसलेले जग" करण्याचा न सुटणारा पेच जगाला देऊन तोपर्यंत दुसरी राजकीय टूम काढणार.
------------------------
पुरोगामी असण्यात काही वाईट नाही पण त्या उन्मादात जगाला दिशाहिन केल्यानं जगाचं होणारं नुकसान इतर कोणत्याही "वादापेक्षा" जास्त असतं. आजचा एक नकोसा वाद हे कालचं एक पुरोगामित्व असतं. म्हणून तेथे उन्माद कमित कमी असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उन्माद म्हटले कि पुरोगामीत्व आठवते.

आणि

आजचा एक नकोसा वाद हे कालचं एक पुरोगामित्व असतं. म्हणून तेथे उन्माद कमित कमी असावा.

ही दोन वाक्ये प्रचंड आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्यव्वनप्राश आणि कॅडबरी ही नावं एकत्र पाहून डोळे पाणावले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राष्ट्रीयएकतेच्या मारेकर्‍यांना नेमकं काय झोंबत ? जमीनीच्या वरच बहरलेल झाड का त्याची खोलवर गेलेली मूळे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

जॉन लेनन कोणत्या देशाचा हो? च्च च्च ... मानवच का हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

( रविंद्रनाथ टागोर शाळेत नाटक सादर करण्यासाठी तयार झालेल्या मुलींसमवेत )

We try to realize the essential unity of the world
with the conscious soul of man;
we learn to perceive the unity held together
by the one Eternal Spirit,
whose power creates the earth, the sky, and the stars,
and at the same time irradiates our mind.

- Rabindranath Tagore

Kahlil Gibran on Love

When love beckons to you, follow him,
Though his ways are hard and steep.
And when his wings enfold you yield to him,
Though the sword hidden among his pinions may wound you.
And when he speaks to you believe in him,
Though his voice may shatter your dreams
as the north wind lays waste the garden.

For even as love crowns you so shall he crucify you. Even as he is for your growth so is he for your pruning.
Even as he ascends to your height and caresses your tenderest branches that quiver in the
So shall he descend to your roots and shake them in their clinging to the earth.

Like sheaves of corn he gathers you unto himself.
He threshes you to make you naked.
He sifts you to free you from your husks.
He grinds you to whiteness.
He kneads you until you are pliant;
And then he assigns you to his sacred fire, that you may become sacred bread for God's sacred feast.

All these things shall love do unto you that you may know the secrets of your heart, and in that knowledge become a fragment of Life's heart.

But if in your fear you would seek only love's peace and love's pleasure,
Then it is better for you that you cover your nakedness and pass out of love's threshing-floor,
Into the seasonless world where you shall laugh, but not all of your laughter, and weep, but not all of your tears.
Love gives naught but itself and takes naught but from itself.
Love possesses not nor would it be possessed;
For love is sufficient unto love.

When you love you should not say, "God is in my heart," but rather, "I am in the heart of God."
And think not you can direct the course of love, for love, if it finds you worthy, directs your course.

Love has no other desire but to fulfill itself.
But if you love and must needs have desires, let these be your desires:
To melt and be like a running brook that sings its melody to the night.
To know the pain of too much tenderness.
To be wounded by your own understanding of love;
And to bleed willingly and joyfully.
To wake at dawn with a winged heart and give thanks for another day of loving;
To rest at the noon hour and meditate love's ecstasy;
To return home at eventide with gratitude;
And then to sleep with a prayer for the beloved in your heart and a song of praise upon your lips.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

राष्ट्रवाद हा उन्माद आहे म्हणताना नक्की म्हणायचे आहे? उन्माद राष्ट्राचा इनहेरंट पार्ट असतो? राष्ट्र असावे पण उन्माद नसावा? कि राष्ट्रच नसावे? मग काय असावे? राजकिय सत्तांची जागतिक, केंद्रीय, मध्यम आणि स्थानिक मॉड्यूल्स लागतीलच ना? या मॉड्यूल्सच्या किती पातळ्या असायला हव्या? त्यांची हायरार्की कशी हवी? ते चालवणारांचे सिलेक्शन कसे व्हावे? त्यांत उन्माद येणार नाही याची काळजी कशी घ्यावी? राष्ट्रीय उन्मादांत काय काय मोडते? आज काय वेगळे आहे?
"उन्मादी राष्ट्रवाद नको" म्हणणारे पुरोगामी पुन्हा जनसंग्रह करणार. हा विचारप्रवाह बळावला तर "उन्माद नसलेली राष्ट्रे" किंवा "राष्ट्रे नसलेले जग" करण्याचा न सुटणारा पेच जगाला देऊन ...

वर मी हे जे काय लिहिले आहे त्याच्या उत्तरादाखल काही बोलाल का?
हे जे मोठे लोक बोलतात ना, त्यांना फक्त राष्ट्रांनी भांडू नये इतकेच म्हणायचे असावे. त्याचा तुम्ही लै भलताच अर्थ काढताय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवांतरः दुसर्‍या फटूमधला कोणीतरी तोतया आहे म्हणे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कोठल्याही र्‍याण्डम लांबदाढीवाल्याचा फटू हा रवींद्रनाथ टागोर, दादाभाई नौरोजी, येशू ख्रिस्त, बहादुरशहा ज़फर, जर्नैलसिंग भिंदरानवाले, झरथुष्ट्र, जॉर्ज बर्नार्ड शॉ, भीष्माचार्य किंवा ओसामा बिन लादेन यांच्यापैकी कोणाचाही म्हणून खपवता यावा, नाही? (गरजूंनी यथाशक्ती लिष्ट वाढवावी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गँडाल्फ, किंवा झालंच तर डम्बलडोर. घ्या!! वाढली लिष्ट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डब्ल्यू जी ग्रेस, अनंत भावे, आसाराम बापू

यादीच्या कामात आमचा खारीचा वाटा समाप्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोज आयडी बदलण्याचा उन्माद कधी संपेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पुढचा आयडी ओळखा १००० रु मिळवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तो मटका लावण्यासारखा प्रकार होईल.

बाय द वे "मोहित्यांची मंजुळा" का काय प्रकार आहे? मंजुळा मोहिते असे लिहितात ना? "मोहित्यांची मंजुळा" म्हटल्यावर ती त्यांची नक्की कोण/काय असे अनंत प्रश्न मनात उभे राहिले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

थोरातांची कमळा सांगू शकेल...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अहो मोहित्यांची मंजुळा हा एकेकाळी गाजलेला हिट मराठी चित्रपट होता.
त्याच बरोबर दुसरा गाजलेला चित्रपट होता थोरातांची कमळा
त्यावर आधारीत एक नविन आय डी सादर करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

"मराठी माणसा काय हे" मधे उपराष्ट्रवादाची एक झलक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्या या ऑफरला रिस्क साईड दिसत नाहीय. तेव्हा थोरातांची कमळा ही आमची बेट.

@ भावी थोरातांची कमळा - नितिनजींकडून पैसे घेऊन अर्धे तुम्हाला हवेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कमळा थोरातांची कशी काय? सध्या तरी ती गुजराती आहे असे ऐकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कमळा थोरातांचीच. गुजरात्यांना दिली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या बदल्यात तुम्हांला एक रोचक दिली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

The Revival of Nationalism - लेखक San Pablo University, माद्रिद मधे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बर सिंग
तुम्ही दिलेली लिंक वाचली काबिल-ए-तारीफ आर्ग्युमेंट

The paradox of nationalism

The presumption that nations have a natural right to form their own state deserves criticism. Nationalism is a case of abuse of the principle of majoritarian democracy. Nationalists usually claim to be democratic or at least claim to be answering the wish of the sovereign people. Nationalism is not freedom-loving by nature. At birth, nations are created out of disparate elements. In the course of their lives, they must be maintained against centrifugal forces, since the principle of nationhood can be claimed by other regions in the nation. However, political self-government, which ideally is the corollary of individual self-government, can normally only be organized within a nation-state. Liberal democracy and nationalism are antithetical but citizenship needs a nation-state to function politically. Here is a contradiction that modern democracies do not seem to be solving neatly.
मात्र जाड ठश्याशी अजिबात सहमत नाही.
अशी कोरोलरी होत नाही कारण माणुस हा सेल्फ रेग्युलेटरीच बिइंग आहे असा अतिरेकी ग्रुहितक यात धरलेल आहे.
दोन त्याचा संबंध सरळ राष्ट्रवादाशी असा हि जोडता येत नाही
मग कम्युनिस्ट पण म्हणतील आमची हि गव्हर्मेंट कोरोलरी टु सेल्फ गव्हर्मेंट आहे
अस शक्य नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

शीर्षकातून 'राष्ट्रवादी माजले आहेत' हे किती खुबीने सुचविले आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मल्लिनाथीस संदर्भ वेगळे असण्याची शक्यता, असली तरीही जराशी अस्थानी नाही ना अशी शंका येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

हा लेख पृष्ठभागी यावा म्हणून ही प्रतिक्रिया इथे देतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.