अनुत्तरीत प्रश्न

गुदमरल्यासारखं झालं आहे. आपलं नातं ना चंद्रकलेप्रमाणे वाढतंय ना घाटतंय. मी कितीही बरसले तरी तू घुमा रहातो आहेस. मी कधी तुला कॉर्नर केलं? मी थोडीच तुला प्रेमाची, एकरूपतेची, समर्पणाची मागणी केली?

अन केली ती मनात केली, तुला कशी कळली - हे एक कोडच आहे. कोडं कसलं म्हणा, तुला ती मागणी कळली हे मला कळलं हाच आपल्यातील telepathy चा पुरावा. Uncanny, frightening isn't it?

मला देखील आपल्या मिलनाची, एकरूपतेची भीती वाटते. मी कशाला तुला ती मागेन? एकरूप झाल्यानंतर जर नात्याला हेतू अन महत्त्वाकांक्षाच उरली नाही तर? नातं नीरस झालं तर? ही भीती मलादेखील वाटते. त्यापेक्षा आहे ते चालू देत. बदल हा जास्त करुन भयावहच असतो.

पण आपण दोघे तरी इतके निराशावादी का? आपल्या मीलनातून कदाचित नवीन अर्थ गवसेल, नवीन सौंदर्य आकळेल. आपली मैत्री घट्ट होईल. मैत्री या शब्दावर हसलास ना? आपल्यातल्या वेड्यासारख्या fierce आकर्षणाला "मैत्री" म्हणाणं हा मैत्रीला कमीपणा आहे की त्या आकर्षणाला थिटेपणा आणणं आहे कोणास ठाऊक. असो नाही आपल्यात मैत्री नाही हे मलाही मान्य आहे जे आहे ते palpable आकर्षण.

मग भीती कशाची? भीती आहे ती आपल्या वेगवेगळे पणाची, भिन्नत्त्वाची. We are different as chalk & cheese. आपण वेगळ्या भाषा बोलतो. आपली बोली एक नाही. मला जो lightheartedness अपेक्षित आहे , जो तू इतका बेमालूम नक्कल करतोस, वरवर दाखवतोस तो तू खरच मीलनात देउ शकतोस का - नक्कीच नाही कारण तेव्हा तू सगळे मुखवटे गळून "तू" असशील अन तू lighthearted नाहीस, आत आत तू गहिरा अन डार्क आहेस. मला त्या खोलीचा अंदाज येत नाही अन मलाही थिटे पडण्याची भीती वाटते, अपुरेपणाची लाज वाटते. तुझ्या खोलीचा तळ गाठता न आल्याने, बुडण्याची भीती वाटते. तुला अतिशय ज्याची गरज आहे तेच माझ्याकडे नसण्याची , तुला सतावणार्‍या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं नसण्याची भीती वाटते. तू माझ्याकडे पाठ फिरवून , विवस्त्रावस्थेत मला टाकून निर्दयीपणे निघून जाशील ही असं मलाही वाटते, जितकं ते तुला वाटतं.

मग त्यावर उपाय काय? घुमेपणा? नात्याला नाकारणं? एकदा एकमेकांना संधी नाही देउ शकत आपण? जी काही वेळ, भावनिक उर्जा invest केली आहे ती देखील वाया जाइल असं वाटतं बरोबर?

पण थांब ... कधीतरी आपल्यालाच उमगेल, हे जे भिन्नत्व आहे ते अत्यंत परस्परपूरक आहे. कदाचित तुला जो गर्भाशयातील वेढून टाकणारा, मिट्ट अंधार हवा आहे तो मी देऊ शकेन, अन असं देता येणं हीच कदाचित माझी गरज असेल.

ज्या दिवशी हे कळेल, पूर्ण पटेल त्या दिवसापर्यंत तरी हे अनुत्तरीत प्रश्न असेच मोहोळ उठवणार, अडथळे आणणार अन नात्याला एक velocity ही देणार.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)