बद्धकोष्ठ / मलावरोध

नमस्कार
एक शंका आहे . माझ्या एका मित्राचे वय सध्या ३७ आहे . त्याला वयाच्या १२/१३ व्या वर्षापासून बद्धकोष्ठ / मलावरोधाचा त्रास आहे . वयाच्या १८ व्या वर्षी sigmoidoscopy / colonoscopy / barium enema इत्यादी सर्व टेस्ट करून झाल्या , त्यात सुरुवातीला मोठ्या आतड्याला stricture असल्याचे निदान झाले व operation करण्याचा सल्ला मिळाला ,पण प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यापूर्वी पुन्हा एकदा colonoscopy केल्यानंतर stricture नसल्याचे डॉक्टरचे मत पडले . नंतर काही पोट साफ करण्याची औषधे देऊन बोळवण करण्यात आलि. परंतु मित्राचा प्रश्न तसाच राहिला राहिला . नंतर निसर्गोपचार /आयुर्वेदिक /पंचकर्म इत्यादी अनेक उपचार करून झाले ग़ेल्या २० वर्षात सुमारे ५ लाखावर खर्च करून झाला ,पण म्हणावा तसा गुण नाही .

सध्या त्याला depression / anxiety तसेच अन्य psycho -somatic समस्या जाणवतात .सतत चिडचिड ,कामात लक्ष न लागणे ,मानसिक तणाव ,भीती ,अपुरी व सतत disturbed झोप अशी लक्षने आहेत . या सर्व गोष्टीमागे कुठेतरी बद्धकोष्ठ / मलावरोध व बिघडलेले metabolism हेच मूळ कारण असू शकते का? असल्यास या समस्येचे निराकरण नक्की कोणत्या प्रकारे शक्य आहे ?कृपया मार्गदर्शन करावे

धन्यवाद

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)