ऐसीचा ठाणे कट्टा

ठाणेकर ’एडे’ नाहीत हे सिद्ध करायचं मनावर घेउन बरेचसे ठाणेकर, एक डोंबिवलीकर एकत्र जमले आणि कट्टा,कट्टा काय तो ’संपन्न’ झाला एकदाचा. ठाण्याच्या पुढे जाणार्‍या गाड्यातून ठाण्याला उतरताना जी कसरत करावी लागते ती रोज बघत असल्याने मी थोडी लवकर निघून ठाणा लोकल पकडली. त्याआधी आदितीशी फोनवर बोलून ती तरी नक्की येणारे याची खात्री करून घेतली होती.
"देशात मोदी, ठाण्यात आदिती " असं यमक जुळत असल्याने घाबरुन म.रे. ने मला सहालाच ठाण्याला सोडलं. माझं ठाण्यातलं फिरणं क्यासलमिलच्या पलीकडे गेलं नसल्याने, रिक्षाच्या लांबलचक रांगेत उभं राहील्यावर पुढच्या दोघाचौघांकडे "घाणेकरला जायला इथून रिक्षा मिळेल ना? " असं विचारलं. खरं तर विचारलं एकालाच होतं पण पुढच्या चौघांनी मला मार्गदर्शन करणं हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याच्या तत्परतेने वेगवेगळे सल्ले दिले. त्यातून मला कळलं ते एवढंच की संध्याकाळी तिथे रिक्षाने जाणं मुर्खपणाचं आहे. लोकांनी रिक्षाभाडे १०० ते ५०० पर्यंत कितीही येईल असं सांगून घाबरवलं. तरीही मी रांगेत उभीच आहे हे बघून मागच्या एकाने "अहो, इथं बसपेक्षा जास्त वेळ जाईल त्यापेक्षा ती पवारनगरची बस आता येतेय बघा." असं मागे कुठेतरी बघत सांगितलं. मी अक्खा जिना चढून ष्ट्यांडावर जाईस्तोवर स्टॅंडावरल्यांना कोंबून घेउन बस गेलेली. फायदा एवढाच झाला रांगेत पहिली राहिल्याने पुढच्या बसने आरामात बसून मी घाणेकरला ७ च्या दरम्यान पोचले.
गेटसमोर एक त्रिकुट उभं होत. संघकार्यालयाच्या गेटसमोरचा आदितीचा फोटो बघितला असल्याने मी तिला "आदिती का?" असं विचारलं. बाकीचे दोघं म्हणजे घासकडवी आणि सुनील होते. थोड्या गप्पाटप्पा झाल्या. संध्याकाळ असल्याने "परवचा" फेम दवणे मास्तरांवर चर्चा करून आम्ही आमच्या कट्टेरी संध्याकाळला पवित्रतेचा टिळा लावला. ( अहा काय वाक्य आहे! नामाचे महात्म्य, महात्म्य म्हणतात ते हेच. )
मग आदितीचा "गविशोध" सुरू झाला. "तुम्ही गवि का?" असं तिने एवढ्यांना (डायरेक आणि ईन्डायरेक) विचारलं की तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं कळतं. दुसर्‍या टोकाला काही काडीपैलवान या विचारणेच्या निषेधार्थ कट्ट्यावर मोर्चा आणायचं ठरवत होते पण हा प्रश्न म्हणजे आपला अपमान आहे की सन्मान याबद्द्ल त्यांच्यात वाद झाल्याने आम्ही तिथे असेपर्यंत मोर्चा आला नाही. ईव्हीनिंग वॉक घेत पुढे गेलेले लोकं हा प्रश्न आपल्याला आणखी एकदा हाच प्रश्न विचारला जाणार या भितीने परत येतच नव्ह्ते त्यामुळे मेघना वैगेरेना ट्रॅफिकजाम चा त्रास न होता साडेसात पर्यंत पोहोचता आलं.
मेघना, मस्त कलंदर आणि थत्ते आले तेव्हा आम्ही थोडावेळासाठी सुनील यांच्या गाडीत बसलो होतो. ते गेट जवळ आले तेव्हा आम्ही गाडीतूनच "आम्ही इथेच आहोत की गेटपाशी. " असं सांगून त्यांना थोडा चकवा दिला. तोपर्यंत ८ वाजत आलेच होते म्हणून सुनील यांच्या मार्गदर्शनाखाली हाटीलाची शोधाशोध केली आणि वेज ( अमुक ढमुक) अश्या काही तरी नावाच्या हॉटेलात शिरलो.
सुरुवातीलाच मागवलेलं स्वीट अँड सोअर सुप बेचव अँड बेचव आणि पकोडे थंड तेलातून निथळून काढल्यासारखे तेलकट निघाल्याने मेघनाने हाटील बाद ठरवलं आणि आपण दुसरीकडे कुठेतरी जाउया असं पिल्लु सोडलं. तोपर्यंत "मराठी वेब-जगताचे साहित्यसम्राट" रामदासकाका, ऐसीच्या निवडक प्रतिसादापुरता आणि कट्ट्यांवरच असणारा ’र्‍ह्स्व’ (आला एकदाचा हा शब्द लिहीता. पहिल्यांदा लिहीतेय हा शब्द) लि, म्हणजे सलिल आणि निखिल आले होते. त्यापैकी निखिलने इकडलं चिली च्यावम्याव चांगलं असतं अशी हमी दिली . मग काहीजणांसाठी ते आणि बटर आणि इतर रोट्या मागवण्यात आल्या. काहींनी सिझलर, सॅंडविच आणि टोस्ट सॅंडविच मागवलं. तेवढ्यात आदितीने फोटो काढून घेतले. त्याआधी तिला आपण मेमरी कार्ड विसरल्याचा संशय आला होता पण मी "अगं मघाशी ईस्त्रीवाल्याचे फोटो काढले असं म्हणालीस ना. मग त्यातच असणार कार्ड " असं सांगून मी शास्त्रज्ञ नसल्याने माझी मेमरी कशी "शार्प" आहे आणि ती कशी ’बाव्लत’ आहे हे दाखवून दिलं. (मेघना, निखिल आणि इतर, चिली च्यावम्याव हे पदार्थाचं नाव चुकलं असेल तर सॉरी. सुरुवातीला चिली होतं एवढच आठवतय. माझी मेमरी काही मल्टीटास्किंग नाही. )
त्याचवेळी आदितीने मिसाईलच्या गंजलेल्या पृष्ठभागाचे काढलेल्या फोटोच्या प्रिंटस, कलाकृती म्हणून कट्टेकर्‍याना वाटण्यासाठी दिले. ( म्हणजे डिस्ट्रिब्युट करण्यासाठी हं; वाटणासाठी आम्ही मिक्सर वापरतो. ;;) ) त्यावर लोकांनी बरेच शोध लावले. पर्जनवनांपासून चंद्रावरील ठश्यांपर्यंत सर्वांना कवेत घेणार्‍या त्या कलाकृती आहे असं (कट्ट्याला कुणी पुणेकर नसल्यामुळे एकमताने) मान्य करण्यात आलं. गंजक्या पृष्ठभागावरची मॉडर्न आर्ट यावर आदितीची आणि रामदास यांची विद्वत्तापुर्ण चर्चा झाली. (मी अ-विद्वान असल्याने त्याचे तपशील देउ शकत नाही.) तोपर्यंत आलेल्या प्रथमेश नामजोशीने ते फोटो मी टेबलमॅट म्हणून वापरू शकेन असं सांगून मॉर्डन आर्ट मध्ये आपल्यालाही "रुची" असल्याचे दाखवून दिले. या सर्वं विद्द्वानांच्या मांदियाळीत आपण कमी पडू नये म्हणून घासकडवीगुर्जीना ऐसीवरलं पुण्य काय असतं असं विचारलं. उत्तर मिळाल्यावर ईहलोकीसारखं ऐसीवरलं पुण्यही ‘अपने बसकी बात नही’ हे लक्षात आलं
तेवढ्यात एक भारदस्त व्यक्तीमत्व हाटीलात दाखल झाल्याने कट्ट्याचे वजन एकदम वाढले. हाटीलातले सगळॆ वेटर गोळा होउन कट्ट्याच्या टेबलापाशी आले. दस्तुरखुद्द गवि आल्याने आदितीला तिचा तो "तुम्ही का गवि?" प्रश्न साक्षात गविंना विचारता आला. तेसुद्धा फक्त त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच आले असावेत कारण तोपर्यंत नउ वाजत आले होते मग त्यांनी आणि थत्तेचाचांनी (त्यांचाचसाठी) मागवलेल्या कोल्ड्रिंकने त्या हॉटेलापुरती कट्ट्याची सांगता झाली. गविंचा फोन नं. एवढा गुप्त का आहे? यावरही थोडा उहापोह झाला पण आदितीने कितीही उचकवलं तरी गविंना त्याचं तिरसट उत्तर न देता आल्यानं तो प्रश्न लवकर निकाली निघाला. मग गुर्जींनी दिलेल्या चिली आणि डार्क चॉकलेटने तोंड गोड करुन आम्ही हॉटेलला बाय बाय केलं. घासकडवींय वृतींनी दिलेलं चिली चॉकलेटही काहीच तिखट नव्ह्तं. Biggrin
मग मला मुंबईतल्या मध्यवर्ती ठिकाणी (म्हणजे डोंबिवलीला) जायचं असल्याने मेघना आणि निखीलच्या मदतीने रिक्षा शोधून कट्टा आणि कट्टेकर्‍यांचा निरोप घेतला. बाकीच्यांनी रात्री बारा साडेबारापर्यंत कट्टा चालू ठेवून ठाणेकरांची लाज राखल्याचं विश्वसनीय सुत्रांकडून समजले आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

वृत्तांत आवडला.

त्याचवेळी आदितीने मिसाईलच्या गंजलेल्या पृष्ठभागाचे काढलेले फोटोच्या प्रिंटस कट्टेकर्‍याना वाटण्यासाठी दिले...गंजक्या पृष्ठभागावरची मॉडर्न आर्ट यावर आदितीची आणि रामदास यांची विद्वत्तापुर्ण चर्चा झाली.

मुंबैसारख्या मोठ्या शहराजवळ असूनही ठाण्याचं 'रस्टिक' वैशिष्ट्य टिकून आहे, असं काही ठाणेकर म्हणतात - ते बहुधा हेच असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त रस्ट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक नंबर कोटी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा वा वा .... क्या बात है. मस्तच.

ऐष केलीत म्हणा की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फटू?

_______

भेटले भेटले. वेगळ्या धाग्यात आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

काल भेटलेल्या अंतरा आनंद यांनीच हा वृत्तांत लिहिला आहे काय अशी शंका आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असं का बरं? :~

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखनात ओतप्रोत भरलेला टार्गटपणा प्रत्यक्ष भेटीत लपवून ठेवला होता, म्हणून डु.आयडीची शंका आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डार्क चॉकोलेटने तोंड गोड कसे होऊ शकते?

(कोठलेतरी रन-ऑफ-द-मिल ३५ ते ५० टक्केवाले होते काय?)

- (८५ टक्केवाला, ९० टक्क्यांची मजल गाठण्याइतका अद्याप न पोचलेला) 'न'वी बाजू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो घासूगुर्जींनी आणले होते ना, अंतरीच्या प्रेमाचा गोडवा, दुसरे काय? मिर्चीदेखील गोड लागली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वृत्तांत प्रचंड आवडला आहे. अगदी खुसखुशीत!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वृत्तान्त थोर आहे! लगे रहो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दस्तुरखुद्द गवि आल्याने आदितीला तिचा तो "तुम्ही का गवि?" प्रश्न साक्षात गविंना विचारता आला. तेसुद्धा फक्त त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच आले असावेत.
.............अदितीला अगदी गविहरून आले असेल नै ?
(पण मागच्या ठाणे-कट्टावृत्तांताच्या फोटोंत गवि होते की... कट्टावृत्तांतांचा अभ्यास कमी पडतोय बर्का !)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मधल्या काळात गविंनी प्लास्टिक सर्जरी करून घेतली असेल तर? तुम्ही म्हणजे अगदीच कल्पनादरिद्री.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'गविंचे थोबाड कसे दिसते ते मधल्या काळात विसरले' इतके साधे सोपे एक्स्प्लनेशन सोडून हा द्राविडी प्राणायाम कशासाठी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोपं लिहिलं तर ऐसीवर शोभणार नाही ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवडला वृत्तांत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>बाकीच्यांनी रात्री बारा साडेबारापर्यंत कट्टा चालू ठेवून ठाणेकरांची लाज राखल्याचं विश्वसनीय सुत्रांकडून समजले आहे.

याला कसलाही पुरावा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रथमेश आणि गवि उशीरा आल्यामुळे ते आल्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत. इतरांनी मदत करावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

टेबल वर फक्त पाण्याचे गिलास दिसत आहे, मनात किती तरी प्रश्न येत आहेत.... मुंबईचा पाहुणचार.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त वृत्तान्त! बाकी 'आ'दितीला कोणाला तरी उद्देशून 'तू अजिबात बोलत नाहीस' असं टुमणं लावायची संधी मिळाली का? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त लिहीलाय वृतांत Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्य अथवा कर्म गुणांकन २ अथवा Moderation points माझ्यासारख्या एकही लेख न पाडणाऱ्या अचरटास कसे काय मिळते हे मलाही कळले नाहीये. याचा 'टेढी उंगली किए बिना मख्खन नही निकलता' या हिंदी मुहावरेशी काही दुरान्वये संबंध आहे का?'श्रेणी द्या' सारखे ते बटणही नाही पुणेरी पाट्यांसह स्वत:च्याच प्रतिसादास --,एका दिवसात २५पेक्षा--

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो घासकडवी अल्गोरिदम आहे असे कळले. पण त्यांना कै तो एक्स्प्लेन करता आला नै.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पुण्याचा संबंध लेखांशी नाही; प्रतिसादांशी आहे. तुमच्या प्रतिसादांना जर धन श्रेणी सतत मिळत राहील्या तर तुमचे पुण्य वाढते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात पुण्याचा काय संबंध?

कट्टा ठाण्याला झाला होता ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुण्ण्याचा......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कट्टा जर ठाण्ण्याला झाला, तर मग पुण्ण्याला त्यात का ओढायचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रेल्वे रेजर्वेशनचा प्रोग्राम असा लिहिला आहे की मागेल त्याला विंडोसिट मिळत नाही न मागणाऱ्यास मिळते आणि चुकून अपग्रेड विदाउट इक्सट्रा चार्ज च्या बॉक्सात टिक केले तर एसीत अपग्रेड होतात.आलिया भोगासी असावे सादर दुसरं काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपलं लेखन किती आहे आणि त्याला चांगल्या श्रेण्या किती मिळाल्या आहेत यावर ते पुण्य अवलंबून आहे.
उदा. लेखन (लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही मिळून ) खूप जास्त आहे परंतु त्यास तितक्याशा श्रेण्या मिळाल्या नाहीत तरी पुण्य कमी असतं, ऋणभारात जाणार्‍या श्रेण्या मिळाल्या तरी पुण्य कमी होतं. परंतु खूप कमी लेखन असूनही जर प्रत्येक लेख आणि प्रतिसादास चांगल्या श्रेण्या मिळाल्यास पुण्य वाढतं.

थत्तेचिचा ’आता गप्प बसायचे ठरवले आह’ आणि ’शक्यत नाकारता येत नाही’ या व्यतिरिक्त मी आणखी काय काय लिहिलं होतं की ज्यावरून मला लोक आत्ता पिडू शकतील या विचारात गढलेले असल्यानं त्यांच्यापर्यंत अल्गोरिदम पोचला नसावा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

प्रतिसादांबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
श्रेणी वैगेरे मी देतही नाही आणि बघतंही नाही. पुण्य काय असेल हा प्रश्न बरेच दिवसांपासून होता म्हणून विचारला एवढंच. बाकी ते फार काही मनावर घेत नाही मी. (मिळालेले मार्क ही मनावर घ्यायची 'वाईट' सवय नव्हती ना मला. Biggrin )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेच्च्या हा वृत्तांत वाचलाच नव्हता. काय कोट्या (कोटी? ईकारान्त असल्याने अनेकवचन तेच?) केल्यात अंतराने. मस्तच. खुसखुशीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

अरे फटू मध्ये कोण कोण आलंय ते कळतंय पण वळखत कुणी बी न्हाई तेव्हा आता नावं सांगा की पटकनसरशी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0