आज दिवाळी आहे....

आज दिवाळी आहे....

आजकाल फक्त वेगाला मह्त्त्व ;
एका क्लिकसरशी
इकडून तिकडे जाते
हवी तेवढी माहिती

मीही बरच काही पाठवते
मनात जपलेल..सातासमुद्रापलिकडे
लाईट नसतील
मोबाईलची बॅटरी चार्जड नसेल
वेळ मिळाला नसेल..
हे सर्व गृहित धरूनच

त्रास या गोष्टींचा होत नाही..
खर दु:ख होत ते मनाच दार
कितीही वेगान आणि
अनेक धडका मारल्या तरी
उघडता आल नाही याच!

आज दिवाळी आहे..
म्हणून फोन करायला हवा
कारण म्हणून किमान
फटाक्यामुळे ऐकू आल नाही
अस खर तर कुणी बोलेल!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

कविता वाचली. काहीतरी लिहावं असं ठरवूनच क्लिक केलं होतं, पण जमेल तेव्हाच लिहेन.

आत्ता कविता आवडली एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झगझगाटामागे दडलेला अंधार, आवाजाने दडपलेला अबोला दाखवण्याचा प्रयत्न करणारी कविता. जग लहान झालं तरी काही अंतरं कमी होत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुवर्णमयी आणि मुक्तछंद म्हटल्यावर थोडं घाबरतच वाचली. पण सुखद अपेक्षाभंग झाला.
(सुवर्णमयीच्या मुक्तछंदातली कविता अनेकदा माझी विकेट घेतात. अर्थात, ती माझी कमकुवती आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली.

चुकून मी

आजकाल फक्त वेगासला मह्त्त्व; असं वाचलं. Wink

दिवाळीला जुगार वगैरे खेळतात ना.

आजकाल फक्त वेगासला मह्त्त्व;
एका स्पिनसरशी
खळखळून वाहते
जुगाराची महती

दिवाळी आहे. जिथे आहे तिथे, जमेल तशी एंजॉय करावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली. शेवट छान, नेमका, परिणामकारक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चक्रपाणि

राजेश यांच्या मताशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडासा गद्यपणा सोडल्यास छान कविता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुक्तछंदाचा सशक्त वापर केला आहे.
'आपल्यांशी' बोलायला निमित्त लागावं अशी वेळ येत आहे हेही खरंच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अजून समजून घेतो आहे.

शेवटच्या कडव्याबाबत : संवाद ऐकू येत नाही त्याच्या कायम दु:खापेक्षा कधी नव्हे तो फटाक्यांची खरी सबब उपलब्ध असल्याचे "किमान" (=स्वतःला उगाच चुचकारण्यापुरते) सुख आहे. असे म्हणायचे आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0