ते दोन दिवस

ते दोन दिवस, खरेच मनाच्या या काळ्याशार डोहात फुललेल्या कमळासारखे
होते… शरीरातून उठणाऱ्या असंख्य वेदना…. जणू त्या वेदना अजगरासारख्या त्या काळ्याशार
डोहात शरीराला, मनाला विळखा टाकत आहेत….
…अशातच तो मोडलेला पाय अन त्याहूनही तुटून पडलेले मन… सारे कसे सुन्न करणारे होते…
हे खरे आहे , वास्तव आहे ह्यावर विश्वास बसत नव्हता क्षणोक्षण वाटत होते हे एक
भयानक स्वप्न असावे पण नशीब विचित्र होत… त्याला ते हि अमान्य होत
पण अशात हि ह्या जखमी मनावर हळुवार फुंकर घालणारा क्षण वाट्याला होता त्या वेदनेत एक
हसरा क्षण नशिबात होता जो या मनाच्या गाभाऱ्यात कायमचा कोरला गेला जो
कधीही न विसरण्यासाठी…. !!!!
आजही तिची आठवण बुजून गेलेल्या त्या जखमावर एक हसू उमटवते खरेच आजही तिच्या
आठवणीत लुब्ध होऊन जातो मी, ते दोन दिवस जणू ती माझ्यासाठीच होती असेच भासत होत
जणू माझ्या ह्या दुखात ती सोबत बनून आली होती काही क्षणासाठी, अशी ती… , तिचे नावही ठाऊक नाही
आमची एक भाषा हि नाही तरीही आमच्यातला तो मुका सवांद किती बोलका वाटत होता
फक्त ती माझ्या विव्हळणाऱ्या शरीराच्या अवस्थेवरून समजायची. ती फक्त मला 'दुखी ' एवढेच बोलायची
अन मी तसाच विव्हळत मान हलवत हो बोलायचो
ती तशीच माझा हात हातात धरून बसायची किती वेळ अन ते हि कुठे हॉस्पिटल मध्ये एका आय सी यु मध्ये
खरेतर ती तिचे कर्तव्य करत होती, नाही तर कर्तव्य हून जास्त का… ???
ते कधी उमगले नाही तिचा तो प्रेमाने केसातून
फिरणारा हात किती दिलासा देत होता, जणू तिचा त्या हाताने ओल्या जखमावरुन फुलाचे पांघरून घातल्याचा भास होत होता
उधवस्त झालेल्या मनाला एका अनोळखी, नाते नसलेल्या व्यक्तीकडून सावरू पाहत होता.
जशी प्रत्येक वेदना ती घेऊ पाहत होती, काय पहिले होते तिने माझ्यात एक आजारी शरीर कि
हवे असलेले स्वप्नातील एक घर …. !!!!…. छे असे कशावरून असेल… !!!!
……खरे सांगू तिच्या पापण्याच्या उघडझापेवरून तिची बोलायची भाषा किती निराळी होती तसेच शांत पडून राहा
त्रास करून घेऊ नको असे किती सहज ती बोलक्या डोळ्यातून बोलून जायची…. ??? अन मग तिच्या त्या एका खुणे सरशी
तसेच तिचा चेहरा आठवत पडून राहायचे
त्या रात्री तर जास्तच वेदना वाढत होत्या आणि ती मात्र माझ्या प्रत्येक हाकेला उभी राहिली तिची दुसरी मैत्रीण ओरडली पण
ती मात्र पुढच्याच क्षणी पुढच्या हाकेला धावून आली … सांगा कसे विसरू त्या रात्रीचे दुखणे… नाही दुखणे नाही…। त्या रात्रीचे तिचे ते असणे
म्हणून आज मला तिच्याविषयी लिहावे वाटले, तिचा तो भावलेला मूकपणा आज मी शब्दातून बोलका करणार आहे, तिला
प्रत्येक शब्दात मांडणार आहे. खरेतर इतके मांडून हि पण माझ्यासाठी ती मात्र एक अनामिकाच….
एक ओढ… एक सोबत… एक त्या रात्रीची मनोनभी दिसलेली एक चांदणी… जिचे चमकणे अजून हि हृदय उजळून टाकत आहे
कधी हि अंधार न होण्यासाठी…

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)