पर्यायी शाळांविषयी प्रश्न

काल योगायोगाने एका "अपारंपारिक " म्हणवणार्‍या शाळेची भेट घडली. बागडणारी मुले, प्रयोगातून शिक्षण, अनौपचारिक शिक्षण वगैरे केवळ (सं)कल्पना असतात अशी माझी समजूत होती. या शाळांचे प्रथम दर्शन तरी सुखावणारे होते.
अपारंपारिक/परर्यायी याची व्याख्या ढोबळ असली तरी पुण्यातल्या अक्षरनंदन / स्टैनर स्कूल/स्वधा अशा शाळा अपारंपारिक म्हणून गणता याव्यात.

अर्थात काही प्रश्न पडले आहेत
जसे
- या शाळा पारंपारिक शिक्षणव्यवस्थेला खरेच समर्थ पर्याय आहेत का ? वा शिक्षण क्षेत्रात दर काही वर्षांनी नवीन फ्याड येत असते हे तसे तर नव्हे ??
- दहावी नंतर या शाळेतील मुलांना पुन्हा पारंपारिक कॉलेजमध्येच प्रवेश घ्यायचा असतो, तेव्हा मुलांना अपारंपारिक ते पारंपारिक हा बदल झेपणारा असेल का ?
- या मुलांचे व्यवहारज्ञान /EQ / प्रयोगशीलता पारंपारिक शाळकरी मुलांपेक्षा खरेच जास्त असते का ?
- पारंपारिक शालेय व्यवस्थेच्या /शिक्षण पद्धतीच्या कोणत्या बाबी अशा शाळांपेक्षा चांगल्या असतात ?
- तुम्ही तुमच्या पाल्याला अशा शाळांत टाकाल का ? (मला स्वतःला Fear of the unknown असे काहीसे वाटते)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

माझा चुलत आत्तेभाउ आणी बहीण आपण म्हणता त्यातील एका शाळेतले आहेत. भाउ १०वीत आहे पण विशेष लक्ष भारतातील अतिशय लोकप्रिय क्रिडाप्रकारात करीअर करणे हेच आहे. बहीणीनेही १० नंतर दोन वर्षे कॉमर्स केले परंतु त्यात मन अजिबात रमले नसल्याने १२वी नंतर व्यावसयीक अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. मुळात घरातील वातावरण अतिशय मुक्त आहे, मुलांवर कोणतीही जबरदस्ती कधीही केली गेली नाही... भाउ तर फक्त रोज संध्याकाळीच घरी आल्यावर (दिवसातुन एकदाच) अंघोळ करतो. दोघाही भावंडाना आपल्या शाळेबद्दल जाज्वल्य अभिमान आहे. एक चकार शब्दही शाळेवीरुध्द ऐकुन घेत नाहीत. आम्हाला त्यांच्या बालपणाचा हेवा वाटतो. त्यांचे शाळेतील शैक्षणीक उपक्रम मनोरंजक आहेत, एका होमवर्कला करटे किड चित्रपटावर एस्से लिहायला भावाला मी मदत केली होती त्यावरुन मला अंदाज येतो की तेथे शिक्षण कशा पध्दतीने दिले जातेय. दोघांनाही पारंपारीक स्केलवर शैक्षणीक स्कॉलर टॅग दुरुनही लागु शकत नाहीये त्यांचे आइवडील प्रचंड बुध्दीमान असा नातेवाइकात नावलौकीक असलेले व डीस्टींगशन कधीही न सोडलेले द्विपदवीधर असुन दोघेही (अर्थातच अतिशय) कमावते आहेत. अरे ? कुठे चाललाय प्रतिसाद माझा ? अशा घरात जे अनुभवाला आलेले आहे ते लिहलयं...

आपले प्रश्न बघुया कितपत हाताळता येतात ते.

- या शाळा पारंपारिक शिक्षणव्यवस्थेला खरेच समर्थ पर्याय आहेत का वा शिक्षण क्षेत्रात काही वर्षांनी नवीन फ्याड येत असते हे निव्वळ तसे तर नव्हे ??

- हा एक प्रयोग आहे. ट्रायल एरर बेसीस असे मला वाटते.

- दहावी नंतर या शाळेतील मुलांना पुन्हा पारंपारिक कॉलेज्मध्येच प्रवेश घ्यायचा असतो, तेव्हा मुलांना तो बदल झेपणारा असेल का ?

त्यांना बदल झेपत नाही हे माझे वैयक्तीक मत आहे.(अन्यथा भारतातल्या सर्वच शाळा अशा करा. मग कदाचीत...)

- या मुलांचा व्यवहारज्ञान /EQ / प्रयोगशीलता पारंपारिक शाळकरी मुलांपेक्षा खरेच जास्त असते का ?

मला वाटत नाही. त्यांच्या पिढीतील इतर मुलांपेक्षा ही मुले विशेष वेगळी जाणवली नाहीत.

- पारंपारिक शालेय व्यवस्थेचे /शिक्षण पद्धतीच्या कोणत्या बाबी अशा शाळांपेक्षा चांगल्या असतात ?

मला ए.आर. रेहमानचे कोणतेही गाणे दोनदा ऐकले की तोंडपाठ होते... लहानपणी सुध्दा... पण कवीता इतक्या घोकल्या तरी पेपरात चुकायचो. लहानपणी वाटायचे मला अक्कल कमी आहे म्हणून असे घडत असावे. मोठीपणी लक्षात आले आपली अक्कल सॉलीड आहे... स्किल तर शाळेतील शिक्षकांचे कमी होते जे कवीतेला अशी रोचक चाल लावु शकले नाहीत जी ऐकल्या ऐकल्या मनात बसेल Smile मान्य आहे रेहमान इतके पैसे त्यांना चाल लावायल मिळत नाहीत but thats not my fault... ? पण *त्यासारखे मार्क मात्र माझे कमी व्हायचे ? वाय्झेड्पणाच म्हटले पाहीजे नाही का ? अर्थात असल्यामुर्ख लोकांकडुन शिकुनही कवीता तोंडपाठ असणारे महाभाग त्यावेळीही होतेच... तात्पर्य आपल्या पाल्याला काय (प्रोसेस) झेपतय हे महत्वाचे आहे इतर तुलना फाट्यावर मारणे योग्य. Unless you want to say their apples are oranges Smile

- तुम्ही तुमच्या पाल्याला अशा शाळांत टाकाल का ? (मला स्वतःला Fear of unknown असे काहीसे वाटते)

वरील पॅरा वाचावा. पण सल्ला म्हणून ऩको असे उत्तर देइन (जर हातावर पोट असेल तर) हा प्रयोग अजुन निष्कर्शाप्रती आलेला नाही. साधी टकाटक(cbse/icse) शाळा बघा त्यात पाल्याची प्रगती अपेक्षीत नसेल तर मग तिकडुन इकडे या Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

माहितीपूर्ण. प्रश्न उरकले आहेत, जरा सविस्तर उत्तरे दिली असती तर बरे झाले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हम्म्म...! साधारण काय मिसींग आहे याची कल्पना दिलीत तर प्रयत्न करेन. माझा अनुभव हा फक्त एकाच कुटुंबातील अनुभवाशी निगडीत आहे त्यामुळे राघा गुर्जींप्रमाणे विदा प्रकाशीत करणे अशक्य आहे.

ता.क. - आपल्याला मी दिलेल्या उत्तरातील निष्कर्शापर्यंत का पोचलो याचा परामर्श हवा आहे काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

साधीसुधी आणि घरा जवळ असलेली ( तसेच अव्वाच्या सव्वा फी नसलेली ), जहीरातबाजी न करणारी शाळा बघा.

शाळा कोणती/कशी वगैरे प्रकाराला फार महत्व देऊ नका. पुढे माणुस आपल्या जन्मजात गुणां/अवगुणांकडे वळतोच. हो, पुढे एस्कुज म्हणुन ठीक आहे. जसे की "मला माझ्या पालकांनी, अबक शाळेत घातले असते तर मी फार मोठी डइफ झाले असते"

ट्वेन का चर्चिल साहेबांनी म्हणलय ना
I've never let my school interfere with my education.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साध्यासुध्या आणि घराजवळ (अव्वाच्या सव्वा फी नसलेल्या) व जाहिरातबाजी न करणाऱ्या शाळेत साधारणतः मध्यम आणि निम्न मध्यम वर्गाचे लोक आपल्या पाल्याला घालतात. अश्या शाळामध्ये जरी त्या इंग्रजी माध्यमातील असल्यातरी मुले, शिक्षक , इतर लोक ( मावशी वगैरे) मराठीच बोलतात. मुले सर्र्रास शिव्या वगैर देतात.
म्हणायचं उद्देश हाच आहे अशा शाळात crowd बरा नसतो. आपल्या मुलावर अश्या संगतीचा परिणाम फारसा सुखद होईल असे वाटत नाही किंवा अशी भीती वाटत राहते.
भविष्यात आपल्याला शक्य असून (काटकसर करून) सुद्धा आपण मुलांना चांगल्या ( टकाटक , जास्त फी असलेल्या ) शाळेत घातले नाही असा अपराधी भाव न येऊ देण्यासाठी काय करावे. मुलाने सुद्धा आपल्याला असे म्हणू नये कि मला चांगल्या शाळेत का नाही घातलेत तेव्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>मुलाने सुद्धा आपल्याला असे म्हणू नये कि मला चांगल्या शाळेत का नाही घातलेत तेव्हा.

मुलाच्या कानाखाली (लाक्षणिक/शाब्दिक) जाळ काढावा आणि सांगावे की आम्हाला जे शक्य होते ते आम्ही केले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ही प्रतिक्रिया वाचल्यावर माझा स्वतःचा अनुभव लिहिणे आवश्यक वाटले.

माझे बालपण लहान गावात गेले. मी शाळेत जायची वेळ आली (1970च्या दशकात), तेव्हाच गावात एक कॉन्वेंट शाळा सुरू झाली, आणि गावातील सर्व उच्च मध्यमवर्गीय (म्हणजे माझ्या शेजारपाजारची) मुले या शाळेत घातली गेली. जनमताच्या रेट्याला न जुमानता माझ्या आईवडिलांनी मला गावातल्या जुन्या, साध्या, मराठी शाळेतच घातले. यातल्या मराठी व इंग्रजी माध्यमाचा विषय बाजूला ठेऊ (त्याबाबतही लिहिण्यासारखे बरेच आहे). पण मला स्वतःला असे वाटते की अठरापगड जमातीची मुलेमुली ज्या शाळेत शिकत होती, त्यांच्याबरोबर शिकल्यामुळे मला माझ्या शेजारपाजाऱ्यांच्या मुलांपेक्षा जास्त समाजभान आले. कदाचित मी सामाजिक क्षेत्रात जे काही थोडेफार काम करते आहे, त्याच्यामागे हेही कारण असावे.

मी स्वतः संसार, मुले, इ. भानगडीत पडले नसले, तरी माझ्या मित्रमंडळींची पालकत्वाची कसरत आणि त्यांची मुले पहाते आहे. हल्ली शाळांमधली मुले आणि पालक विज्ञान प्रकल्प वगैरे करण्यासाठी म्हणूनही कधीकधी संपर्कात येतात. मला हल्लीचे चित्र भयावह वाटते. एका विशिष्ट समाजातली किंवा आर्थिक स्तरातली मुले एका विशिष्ट शाळेत जातात. विशेषतः उच्चभ्रू समाजातील पालक तर आपल्या मुलांचा इतर समाजांशी संपर्क कमीत कमी यावा म्हणून धडपडतात. यातून एक अत्यंत आत्मकेंद्री, आणि आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्यांबद्दल असंवेदनशील, आणि आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ असून आपल्याला इतरांचे शोषण करण्याचा हक्कच आहे असे समजणारी अशी नवी पिढी समाजाच्या वरच्या स्तरात उभी रहाते आहे, असे मला जाणवते आहे. आणखी कोणाचा असा अनुभव आहे का, की मलाच काहीतरी भ्रम होतो आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

पण मला स्वतःला असे वाटते की अठरापगड जमातीची मुलेमुली ज्या शाळेत शिकत होती, त्यांच्याबरोबर शिकल्यामुळे मला माझ्या शेजारपाजाऱ्यांच्या मुलांपेक्षा जास्त समाजभान आले.

नेमके.
मी काही सामाजिक क्षेत्रात नाही पण आपल्या जातीची, धर्माची, वर्गाची किंवा भाषेची "अस्मिता" निर्माण न होण्यात लहानपण अशा शाळेत गेल्याचाही हातभार असावा असे वाटते. विशेषतः हल्ली ठराविक वर्गाची मुले एका शाळेत जातात त्यांच्यात आलेला अहंगंड/न्यूनगंड बघितला की तर हल्लीची शाळेच्या सिलेक्शनची जीवघेणी धावाधाव अधिकच बोचते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्या जातीची, धर्माची, वर्गाची किंवा भाषेची "अस्मिता" निर्माण न होण्यात लहानपण अशा शाळेत गेल्याचाही हातभार असावा असे वाटते

"भाषिक" वगळता अन्य आशयाशी सहमत.

भाषिक अस्मिता निर्माण न होऊ देण्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळा आघाडीवर असाव्यात.

माझे शिक्षण एका कारखान्याच्या वसाहतीतील शाळेत झाले. त्या कारखान्यातील मॅनेजरपासून ते कामगारापर्यंत सर्वांची मुले एकाच शाळेत/वर्गात असत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी काही सामाजिक क्षेत्रात नाही पण आपल्या जातीची, धर्माची, वर्गाची किंवा भाषेची "अस्मिता" निर्माण न होण्यात लहानपण अशा शाळेत गेल्याचाही हातभार असावा असे वाटते. विशेषतः हल्ली ठराविक वर्गाची मुले एका शाळेत जातात त्यांच्यात आलेला अहंगंड/न्यूनगंड बघितला की तर हल्लीची शाळेच्या सिलेक्शनची जीवघेणी धावाधाव अधिकच बोचते.

१) आपल्याला आपल्या जातीची, धर्माची, वर्गाची अस्मिता नाही - ये अपनेआप मे एक अस्मिता है या नही ?
२) ज्यांना त्यांच्या धर्माची अस्मिता आहे त्यांची ती अस्मिता अनिष्ट आहे की इष्ट ? जर इष्ट असेल तर ते समाजभानास पूरक आहे की मारक ? अनिष्ट असल्यास का ? ( ते ज्याचे त्याने ठरवावे हे अतिबेसिक उत्तर झाले. )
३) अस्मिता ही भावना अस्तित्वात असावी का ? अस्मिता हा शब्दच शब्दावलीतून वगळावा का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण मला स्वतःला असे वाटते की अठरापगड जमातीची मुलेमुली ज्या शाळेत शिकत होती, त्यांच्याबरोबर शिकल्यामुळे मला माझ्या शेजारपाजाऱ्यांच्या मुलांपेक्षा जास्त समाजभान आले.

तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त समाजभान आले. ही चांगली गोष्ट आहे असं तुम्हाला ध्वनित्/सूचित करायचं आहे असं दिसतं. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त प्रागतिक जागी पोहोचलात. "तो उच्च्भ्रू" समाज इतरांच्यात मिसळत नाही हे तुम्हास तुमच्या प्रागतिक जागेवर उभे राहून दिसत आहे. त्यांच्यात एक विशिष्ठ प्रवृत्ती (उदा. इतर समाजांशी संपर्क राखणे) जी तुम्हास इष्ट वाटते ती नाही व जी तुम्हास अनिष्ट वाटते (आत्मकेंद्रीपणा) ती आहे. ह्याचा मतितार्थ - तुम्हास स्वतःबद्दल श्रेष्ठ्त्व वाटते असं म्हणण्यासमान आहे का ? Are you not judging them to be (in this way or other) inferior to you ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> तुम्हास स्वतःबद्दल श्रेष्ठ्त्व वाटते असं म्हणण्यासमान आहे का ? Are you not judging them to be (in this way or other) inferior to you ?

प्रत्येक गोष्ट श्रेष्ठ/कनिष्ठच्या उतरंडीवर मांडता येतेच असं नाही. अगदी मॅनेजमेंट / जाहिरातक्षेत्रासारख्या धंद्यात पडायचं असलं तरीही तुम्हाला मार्केट सेगमेंट समजून घ्यायला लागतं. आत्मकेंद्रीपणा तिथे पुरा पडणार नाही. त्यामुळे असले न्यायनिवाडे (स्वतःबद्दल श्रेष्ठत्व वाटणं वगैरे) आणि त्यावरून समोरच्याला कोपच्यात घेणं ज्यात त्यात करणं फायद्याचं नाही. (तुम्हाला कळावं म्हणून फायद्यातोट्याची भाषा करतो आहे. ती करणं मला हीनत्वाचं वगैरे वाटतं म्हणून नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुमच्या प्रतिसादास उत्तर म्हणून प्रतिवाद अपेक्षित आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> तुमच्या प्रतिसादास उत्तर म्हणून प्रतिवाद अपेक्षित आहे का ?

म्हणजे? तुम्हाला तुमच्या ह्या असल्या प्रश्नांविषयी काही गहन चर्चा वगैरे अपेक्षित होती की काय?

>> तुम्हास स्वतःबद्दल श्रेष्ठ्त्व वाटते असं म्हणण्यासमान आहे का ? Are you not judging them to be (in this way or other) inferior to you ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे? तुम्हाला तुमच्या ह्या असल्या प्रश्नांविषयी काही गहन चर्चा वगैरे अपेक्षित होती की काय?

म्हंजे काय ?

विचारपूर्वक केलेल्या अविचारी विधानांवर चर्चा/प्रतिवाद नको का व्हायला ? (उदा. माझ्या मूळ मुद्द्यावर तुम्ही केलेला हा कॉमेंट - प्रत्येक गोष्ट श्रेष्ठ/कनिष्ठच्या उतरंडीवर मांडता येतेच असं नाही. ). तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचं तर - ऐसीअक्षरे म्हंजे काय सिनेमा आहे का की जिथे फक्त एका बाजूने अभिव्यक्ती होते व दुसर्‍या बाजूने अंधार्‍या खोलीत जाऊन गपचुप राहून मुख्यत्वे पहायचे/ऐकायचे ??

आता तुम्हाला करायचीच नसेल चर्चा तर गब्बरीय भाषेतच सांगतो - आपको छोड दिया जाय !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला जे म्हणायचे होते, ते ऋषिकेशनी जास्त चांगल्या पध्दतीने मांडले आहे. पण तुम्ही म्हणता ते खरे आहे. या सगळ्या लोकांपेक्षा मी जास्त जबाबदार नागरिक आहे, असे वाटते मला! समाजाच्या सर्व स्तरांमधल्या भल्याबुऱ्या प्रवृत्ती शालेय जीवनापासून संपर्कात असण्यामुळे मी या अंगाने बिघडले आहे, कदाचित!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

मी पाचवी ते दहावी ठाण्यातल्या, मराठी माध्यमाच्या उच्चभ्रू शाळेत शिकल्यामुळेही असेल कदाचित, श्रेष्ठत्वाची भावना झटकून टाकण्यासाठी, जबाबदार नागरिक बनण्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागले. एकेकाळी लोकांना जाती, भाषा यांवरून कमी लेखलं आहे, याबद्दल आता पश्चाताप होतो. मागे वळून पाहता, चौथीपर्यंत ज्या शाळेत शिकले त्या शाळेबद्दल अधिक ममत्व वाटतं. आणि या अठरापगड प्राथमिक शाळेचं नाव मात्र ब्राह्मण विद्यालय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१) आपल्याला आपल्या जातीची, धर्माची, वर्गाची अस्मिता नाही - ये अपनेआप मे एक अस्मिता है या नही ?
२) ज्यांना त्यांच्या धर्माची अस्मिता आहे त्यांची ती अस्मिता अनिष्ट आहे की इष्ट ?

अस्मिता स्वतःमध्ये चांगली किंवा वाईट अशी नसावी. उदा देशाबद्दलची अस्मिता ही स्वसंरक्षणाप्रीत्यर्थ चांगलीच समजली जावी.
याउलट जातपातीसंबंधीची अस्मिता ही माणसामाणसात फूट पाडण्याव्यतिरिक्त काहीही उपयोगी नसल्याने त्याज्य समजली जावी. जर जातीपातीच्या अस्मितेची काही अन्य उपयुक्तता असेल तर प्लीज सांगावे. आणि म्हणून प्रियदर्शिनी यांचा मुद्दा अधिक सुसंगत वाटतो मला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Are you not judging them to be (in this way or other) inferior to you ?

या मुद्द्यात वरकरणी दम वाटतो. पण जर २ अस्मितांच्या मध्ये भरडले जात असू तर It's better to err on "इतर समाजांशी संपर्क राखणे"
rather than आत्मकेंद्रीपणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांच्याबरोबर शिकल्यामुळे मला माझ्या शेजारपाजाऱ्यांच्या मुलांपेक्षा जास्त समाजभान आले

हे समाजभान येणे गरजेचे आहे का? समाजभान म्हणजेच नक्की काय? ते नाही आले तर काही कमतरता असते असे म्हणायचे आहे का?
माझ्या बाबतीत तर असे झाले की, लहानपणी अठरापगड लोकांशी संबंध आल्यामुळे , अक्कल आल्यावर हे आपोआपच ठरले की आपण त्यांच्यातले होयचे नाही. ( ह्यात पैश्याचा काही संबंध नाही ). जसे दारुडा बाप बघुन, मुलगा दारुपासुन लांब जातो तसे.

ऊलट माझे तर फार नुकसान झाले, आपल्या पेक्षा सर्वच बाबतीत बरोबरीच्या किंवा वरच्या लोकांच्या संगतीत असावे. माबोवर असण्यापेक्षा ऐसीवर असावे म्हणजे झालीच तर काही सुधारणा होईल.b>

माबोवर असणे बरोबर आहे आणि ऐसी चालु करणेच चूक आहे - असा अर्थ काढावा का? - हे कर्वेताई तुम्हाला नाही. ऋला आहे प्रश्न.

एका विशिष्ट समाजातली किंवा आर्थिक स्तरातली मुले एका विशिष्ट शाळेत जातात. विशेषतः उच्चभ्रू समाजातील पालक तर आपल्या मुलांचा इतर समाजांशी संपर्क कमीत कमी यावा म्हणून धडपडतात.

हे असे लहानपणी होत असावे, पण मुलं कॉलेज वगैरे मधे जायला लागल्यावर सर्वांशी संपर्क साधतात.

इतरांपेक्षा श्रेष्ठ असून आपल्याला इतरांचे शोषण करण्याचा हक्कच आहे

इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटण्यापेक्षा "वेगळे" वाटते, ज्यात काही चुक नाही. आणि अगदी श्रेष्ठ वाटले म्हणुन कोणाला शोषण वगैरे करावे असे वाटते हे कोरीलेशन चुकीचे आहे. उलट नीच वाटले म्हणुन वरच्यांना लुटायला पाहिईजे आणि त्यांना आप्ल्या पातळी वर आणण्याची इच्छा खुप दिसुन येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकअक्षरकळेलतरशपथ!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उलट नीच वाटले म्हणुन वरच्यांना लुटायला पाहिईजे आणि त्यांना आप्ल्या पातळी वर आणण्याची इच्छा खुप दिसुन येते.

हेच्च वेगवेगळ्या शब्दात गब्बर बोलत असतो. अनु तू खरच गब्बर आहेस का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हन्जे???? तुम्हाला गब्बर्भौ काय बोलतात (/लिहितात) ते समजतं??????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु तू खरच गब्बर आहेस का?

तो मी नव्हेच !!!

---

@घाटावरचे भट, तुम्हास बघून घेईन. SmileSmile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>@घाटावरचे भट, तुम्हास बघून घेईन. (स्माईल) (स्माईल)

मला वाटलं 'याद रख्खूंगा... तुझे याद रख्खूंगा' वगैरे नावाला शोभेलसं काहीतरी लिहाल... तुम्ही तर इस्मायली टाकून मोकळे झालात... Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे समाजभान येणे गरजेचे आहे का? समाजभान म्हणजेच नक्की काय? ते नाही आले तर काही कमतरता असते असे म्हणायचे आहे का?
माझ्या बाबतीत तर असे झाले की, लहानपणी अठरापगड लोकांशी संबंध आल्यामुळे , अक्कल आल्यावर हे आपोआपच ठरले की आपण त्यांच्यातले होयचे नाही. ( ह्यात पैश्याचा काही संबंध नाही ). जसे दारुडा बाप बघुन, मुलगा दारुपासुन लांब जातो तसे.

अठरापगड लोकांशी संबंध आला नसता तर त्यांच्यातले व्हायचे नाही ही अक्कल आपोआप आली असती का? यालाच समाजभान म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अठरापगड लोकांशी संबंध आला नसता तर त्यांच्यातले व्हायचे नाही ही अक्कल आपोआप आली असती का? यालाच समाजभान म्हणतात.

तेंव्हा ते कळलेच नाही ना. अक्कल आल्यावर कळले, बरीच वर्ष वाया गेली.

समाजभान प्रत्येकालाच असते, फक्त प्रत्येकाचे समाजभान वेगळे असते. बरोबर्/चुक जज करायचा अधिकार कोणालाच नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेंव्हा ते कळलेच नाही ना. अक्कल आल्यावर कळले, बरीच वर्ष वाया गेली.
समाजभान प्रत्येकालाच असते, फक्त प्रत्येकाचे समाजभान वेगळे असते. बरोबर्/चुक जज करायचा अधिकार कोणालाच नाही.

म्हणूनच म्हणतो की जे पालक आपल्या मुलांना त्या अठरापगड लोकांपासून दूर रहायला सांगतात्/शिकवतात ते पालक स्वतः त्या समाजभान येण्याचा प्रक्रियेतून गेलेले असतात व म्हणून आपल्या मुलांचा त्या अठरापगड लोकांशी असलेला संपर्क कमी करायचा सल्ला देतात की जेणेकरून त्यांच्या मुलांची बरीच वर्षं वाया जाणार नाहीत. आत्मकेंद्री म्हणा वा सुजाण म्हणा - ते पालक ग्रेट्ट असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे उपरोधिकपणे लिहिले आहे का खरच तुम्हाला अस म्हणायचंय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे ये गब्बरको नहीं जानता!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे उपरोधिकपणे लिहिले आहे का खरच तुम्हाला अस म्हणायचंय?

मला खरंच तसं म्हणायचंय. सिरियसली.

खरंतर मला असं सुद्धा म्हणायचंय (जे लिहायचं राहून गेलं) की त्या अठरापगड लोकांच्या मुलांना उच्चभ्रूंमधे मिसळायचं असेल तर उच्चभ्रूंनी त्या मिसळण्याच्या कालावधीची किंमत त्या अठरापगड लोकांकडून वसूल केली पाहीजे. त्या अठरापगड लोकांना उच्चभ्रूंमधे मिसळायचं नसेल तर ठीक आहे.

(मी सर्वसामान्यपणे उच्चभ्रूंचा समर्थक व समानतेच्या संकल्पनेचा प्रखर विरोधक आहे. सिरियसली.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अठरापगड लोकांच्या मुलांना उच्चभ्रूंमधे मिसळायचं असेल तर उच्चभ्रूंनी त्या मिसळण्याच्या कालावधीची किंमत त्या अठरापगड लोकांकडून वसूल केली पाहीजे.

तसेच काही उच्चभ्रू लोकांच्या मुलांना अठरापगड लोकांच्या मुलांमधे मिसळुन परतावा म्हणुन "समाजभान" पाहिजे असेल तर त्यांनी सुद्धा त्याची फी अठरापगड लोकांच्या मुलांना द्यायला पाहिजे.

आणि

ज्या उच्चभ्रू लोकांना त्यांच्या मुलांनी अठरापगड लोकांच्या मुलांमधे मिसळावे वाटत असेल त्यांनी, ज्या उच्चभ्रू लोकांना असे वाटत नसेल त्यांना पण "समाजभान" मिरवण्याची संधी दिल्याबद्दल फी द्यावी.

आपल्या मुलांना समाजभान मिळावे म्हणुन अठरापगड लोकांच्या मुलांचा उपयोग करुन घेणे, हे तर फारच वाईट.
त्यापेक्षा खरी आस असेल तर आपल्या मुलांची लग्ने अठरापगड लोकांच्या मुलांशी लावून द्यावीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अठरापगड आणि गरीब यांच्यात गल्लत होते आहे का?

जी मिसळू न देण्याची कन्सेप्ट आहे त्यात गरीबातल्या गरीब उच्चवर्णीयाला आपल्या मुलांनी अठरापगडपैकी मध्यमवर्गीयाच्या मुलांमध्ये मिसळू नये असे वाटत असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अठरापगड आणि गरीब यांच्यात गल्लत होते आहे का?

नाय नाय. उच्चभ्रू कोणत्याही निकषावर असो (सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्टेटस, शैक्षणिक पातळी वगैरे).

(अवांतर रँबलिंग मोड ऑन)

आत्मकेंद्रीपणा हा दुर्गुण/अनिष्ट आहे या गृहितकावरच माझा हल्ला आहे. दुसरा मुद्दा हा की प्रत्येकाने आपली ओळख विसरून जगायचं ठरवलं तर विविधता टिकुन राहिलच कशी ? Diversity will sustain only if individual sub-groups maintain steadfast commitment to their own identity. अर्थातच स्वतःची ओळख मेंटेन करायची कोणावरही सक्ती नसावी. पण दुसर्‍या बाजूला व्यक्तीगत ओळख विसरून आपण सारे एक आहोत व समान आहोत असल्या भंकसपणाला माझा विरोध आहे.

(अवांतर रँबलिंग मोड ऑफ्फ)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रँबलिंगबद्द्ल टाळ्या! पटलेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आत्मकेंद्रीपणा हा दुर्गुण/अनिष्ट आहे या गृहितकावरच माझा हल्ला आहे.

सहमत आहे.
सरकारने आत्मकेंद्रीपण दाखवून (आपल्या मतांकडे डोळा ठेऊन) सबसिडी दिली की मग का कावता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सरकारने आत्मकेंद्रीपण दाखवून (आपल्या मतांकडे डोळा ठेऊन) सबसिडी दिली की मग का कावता?

उत्तर दोन स्टेप मधे देतो -

१) आम्ही मुख्य पॉवर आहोत. तुम्ही आणि सरकार हे काऊंटरव्हीलिंग पॉवर आहात.
२) तुम्ही काऊंटरव्हीलिंग पॉवर बनवलीत म्हणून आम्ही बॅकलॅश म्हणून काऊंटर-काऊंटरव्हीलिंग पॉवर रुजवत आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही आत्मकेंद्री आहोत आम्ही तुमची पॉवर गुल करणार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

समाजभान या मी वापरलेल्या शब्दारून बराच गहजब उडालेला दिसतो आहे.
आपल्या आजुबाजूला आपल्यापेक्षा वेगळ्या परिस्थितीत जगणारा, वेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागणारा, आणि वेगळी मूल्ये बाळगणाराही काही वर्ग आहे. आपल्याइतकाच या समाजाचा तोही घटक आहे, याचे भान लहानपणापासून असेल, तर त्याचा फायदाच होणार आहे. अठरापगड जाती-धर्म-व्यवसाय-आर्थिक परिस्थिती-इ.इ. असलेले लोक जर आपल्या मित्रपरिवारात असतील, संपर्कात असतील, त्यांचे जगणे आपण जवळून पहात असू, तर आपल्यापेक्षा वेगळे म्हणजे वाईटच नाही, आणि जे काही वेगळे किंवा सकृतदर्शनी वाईटही दिसते किंवा वाटते आहे, त्यामागेही काही सयुक्तिक कारणे असू शकतात, हे निश्चित लक्षात येते.
याउलट तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेल्या, आणि केवळ एकाच सामाजिक - आर्थिक स्तराची ओळख असलेल्या, आपले तेच सारे खरे किेंवा चांगले, इतरांची संगत आपल्याला वाममार्गाला लावण्याचीच शक्यता जास्त, इ. विचारांच्या छायेत लहानेच्या मोठे झालेल्यांना जेव्हा जगात वावरायची वेळ येते, तेव्हा त्यांची काय अवस्था होते, हेही मी पाहिले आहे. या ठिकाणी गौतम बुध्दाच्या गोष्टीची आठवण झाल्यावाचून रहात नाही. दुर्दैवाने जगाचे खरे स्वरूप पाहिल्यावर बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे सर्वजण बुध्दाप्रमाणे ज्ञानप्राप्तीकडे जात नाहीत, वैफल्यग्रस्त होण्याचे किंवा कट्टरतावादी बनण्याचे प्रमाण जास्त आहे.
या अशा आपल्याच कोशात रहाण्यातूनच साऱ्या देशाची सांस्कृतिक मूल्ये सारखीच असली पाहिजेत, आणि ती आमच्या मूल्यांप्रमाणेच असली पाहिजेत, किंवा आमच्या परंपरा कितीही अघोरी असल्या तरी त्या आमच्या आहेत, म्हणून चांगल्याच आहेत, यासारखे अट्टाहास जन्म घेतात. आमची मूल्ये श्रेष्ठ माना, नाहीतर येथून चालते व्हा, किंवा प्राण गमवायला तयार रहा, अशा टोकाच्या भूमिकेलाही मग अशा आत्मकेंद्री समाजात मोठा आवाज मिळतो. आणि दुसरीकडे तुम्हाला हे अयोग्य वाटते काय, मग तुमच्या नाकावर टिच्चून आम्ही हे असे करणारच, ही वृत्तीही उफाळून येते. असे आत्मकेंद्रीपण फक्त सामाजिक-आर्थिक उच्च स्तरातच दिसते असे नाही, तर सर्वच स्तरात ते गेल्या काही वर्षांत अधिकाधिक टोकदार होत गेले आहे.
तेव्हा ही सारी परिस्थिती ज्या आत्मकेंद्रित वृत्तीतून निर्माण होते, तिच्यात मला तरी विधायक काही दिसत नाही. या वृत्तीचा मी प्रतिवाद करत रहाते, पण म्हणून ही वृत्ती बाळगणाऱ्यांना हाकलून दिले पाहिजे, किंवा संपवून टाकले पाहिजे, किंवा याबाबत कोणताही युक्तिवाद ऐकून घेतला जाणार नाही, यासारख्या भूमिका मी कधी घेत नाही. हेच माझे आत्मकेंदी लोकांपेक्षा वरचढ असलेले समाजभान आहे, असे मी समजते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रियदर्शिनी कर्वे
संचालक, समुचित एन्व्हायरो टेक
सहसंपादक, शैक्षणिक संदर्भ

अठरापगड आणि गरीब यांच्यात गल्लत होते आहे का?

जी मिसळू न देण्याची कन्सेप्ट आहे त्यात गरीबातल्या गरीब उच्चवर्णीयाला आपल्या मुलांनी अठरापगडपैकी मध्यमवर्गीयाच्या मुलांमध्ये मिसळू नये असे वाटत असते.

नाय ओ, अजिबात नाय. तुमचे सगळे लक्ष पैश्यावरच.

श्रीमंत गुंठामंत्र्याच्या मुलांमधे तुमच्या मुलीनी मिसळावे असे तुम्हाला वाटते का? जस्ट फॉर सेक ऑफ "समाजभान" मिळवणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>श्रीमंत गुंठामंत्र्याच्या मुलांमधे तुमच्या मुलीनी मिसळावे असे तुम्हाला वाटते का?

मी माझ्याबद्दल बोलत नव्हतो. श्रीमंत गुंठामंत्र्याच्या मुलाला गरीब शिक्षकाच्या मुलाबरोबर मिसळण्यास "गब्बर सिंग" यांचा आक्षेप असावा. म्हणजे त्या गुंठामंत्र्याच्या मुलाला गरीब शिक्षकाच्या मुलाबरोबर न मिसळण्याचे स्वातंत्र्य हवे असे ते म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी माझ्याबद्दल बोलत नव्हतो.

अहो थत्ते चाचा - ते तुमच्या बद्दल वैयक्तीक नव्हते. तुमच्या सारख्या पापभिरु उच्चवर्णीय मध्यमवर्गीय लोकांबद्दल होते.

माझ्या खालील दो वाक्यांबद्दल तुमचे काय मत आहे?

१ आपल्या मुलांना समाजभान मिळावे म्हणुन अठरापगड लोकांच्या मुलांचा उपयोग करुन घेणे, हे तर फारच वाईट.
२. त्यापेक्षा खरी आस असेल तर आपल्या मुलांची लग्ने अठरापगड लोकांच्या मुलांशी लावून द्यावीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणजे त्या गुंठामंत्र्याच्या मुलाला गरीब शिक्षकाच्या मुलाबरोबर न मिसळण्याचे स्वातंत्र्य हवे असे ते म्हणतात.

ओह येस.

पालकांनी आपल्या मुलांना स्वच्छ व खुशाल सांगावे की बाळ तू अमक्याअमक्या प्रकारच्या मुलांशी मिसळू नको. अमक्याअमक्या या शब्दाच्या ठिकाणी तुम्ही काहीही घाला - धर्म, जात, भाषा, सामाजिक स्टेटस, आर्थिक स्तर, वंश, पंथ, विचारसरणीशी असलेली निष्ठा (उदा. ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज), कौटुंबिक पार्श्वभूमी, उंची, जाडी, रंग, एखाद्या विषयात असलेला/नसलेला रस वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>"मला माझ्या पालकांनी, अबक शाळेत घातले असते तर मी फार मोठी डइफ झाले असते"

हे अगदी साहजिक आहे.
गोब्राप्रपा क्षकु छशिम यांनाही असे म्हणण्याचा मोह झाल्याचे हरितात्या* (आणि बाबासाहेब पुरंदरे)** यांच्याकडून ऐकले आहे.

*कारण शेवटी आम्ही...
**याबद्दल खात्री नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रोचक विषय आहे. होम स्कुलींगचे अनुभव आहेत का कोणाचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"अपारंपारिक " म्हणवणार्‍या किंवा खरोखर "अपारंपारिक " असणार्‍या शाळांचा काही प्रत्य़क्ष अथवा अप्रत्य़क्ष अनुभव नाही पण सध्या चांगल्या शाळांमधे असणार्‍या मासिक / वार्षिक फिया, अ‍ॅड्मिशनच्या वेळेस घेतले जाणारे अफाट पैसे आणि आई-वडिलांच्या मुलाखती वगैरे बघता माझ्या मुली शाळेत जायची वेळ येईपर्यंत होम स्कुलींगचा पर्याय विचारात घ्यावा लागेल अशी चिन्ह आहेत. तरीपण आपल्या प्रश्नांवर काही उत्तरे द्यायचा प्रयत्न करतोय ...

या शाळा पारंपारिक शिक्षणव्यवस्थेला खरेच समर्थ पर्याय आहेत का ? वा शिक्षण क्षेत्रात दर काही वर्षांनी नवीन फ्याड येत असते हे तसे तर नव्हे ??

शि़क्षण क्षेत्रात दर काही वर्षांनी येणार्‍या फ्याडमधे काही एक आर्थिक गणित असते (नवी कल्पना घेऊन येणार्‍या कंपनीचा काही फायदा / काही प्रॉडक्ट्ची किंवा सर्विसेसची विक्री / जुन्या काही गोष्टी, पध्द्ती मोडीत काढणे ई.) किंवा नवीन पद्धतीद्वारे जुन्या पध्द्तीला रिप्लेस केले जाणे वगैरे प्रकार असू शकतात. अपारंपारिक शाळांच्याबाबतीत असे काही होताना दिसत नाही. अपारंपारिक शाळा मोठ्या प्रमाणावर पारंपारिक शिक्षणपध्द्तीला रिप्लेस करताना दिसत नाहीत. तस्मात नव्या येणार्‍या फ्याडप्रमाणे हे वाटत नाही. तरीपण या शाळा पारंपारिक शिक्षणव्यवस्थेला पर्याय म्हणून उभ्या राहणे हे मोठ्याप्रमाणात इतर घटकांवर अवलंबून आहे. सध्याच्या शिक्षणपध्द्तीत शिक्षण घेण्याचा मूळ हेतू ज्ञानार्जनाऐवजी रोजीरोटीची सोय करणे हा आहे. शाळेत आणि शाळेतून कॉलेजात अ‍ॅडमिशन घेताना नोकरी किंवा धंदा काय करायचाआहे याचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्यामुळे नोकरी मिळवताना पारंपारिक शिक्षणव्यवस्थेमधून दिली जाणारी कोणती पदवी / पदविका आहे याला फार महत्व असते. सुरुवात अपारंपारिक शाळेत करूनही नंतर टिपीकल कला / वाणिज्य शाखेतील पदवी किंवा इंजिनियरींग किंवा मेडिकलला अ‍ॅड्मिशन मिळवायची धडपड करावी लागतेच. अपारंपारिक शिक्षणव्यवस्थेद्वारे दिले जाणारे शिक्षण जोपर्यंत पारंपारिक शिक्षणव्यवस्थेच्या समकक्ष समजली जात नाही तोपर्यंत या शाळा पारंपारिक शिक्षणव्यवस्थेला समर्थ पर्याय म्हणून उभ्या राहणे कठीण आहे.

दहावी नंतर या शाळेतील मुलांना पुन्हा पारंपारिक कॉलेजमध्येच प्रवेश घ्यायचा असतो, तेव्हा मुलांना अपारंपारिक ते पारंपारिक हा बदल झेपणारा असेल का ?

त्यांना शिक्षणपद्धतीतील बदल झेपायला काहीच हरकत नसावी कारण शाळेतून कॉलेजात जाताना अभ्यास करवून घेतला जाणे ते स्वतः अभ्यास करणे हा मोठा बदल असतो. त्यामानाने अपारंपारिक शाळा ते पारंपारिक कॉलेज यात शिक्षण देण्याच्या पध्दतीत फार मोठा बदल संभवत नाही. तरीही सर्वंकष मूल्यांकनातून फक्त गुणात्मक मूल्यांकनाकडे जाताना काही एक त्रास व्हावा. (मार्क्सवाद समजायला / पचायला तसा कठीणच की Wink )

या मुलांचे व्यवहारज्ञान /EQ / प्रयोगशीलता पारंपारिक शाळकरी मुलांपेक्षा खरेच जास्त असते का ?

व्यवहारज्ञान /EQ / प्रयोगशीलता सर्व मुलांच्यात जन्मतः सर्वसाधारणपणे सारखीच असते. (Intelligence / EQ at birth should be somewhat equal in all children except those children who are born exceptionally brilliant or exceptionally challenged). मात्र अपारंपारिक शाळांमधे असलेल्या वेगळ्या शिक्षणपद्धतीमुळे व्यवहारज्ञान /EQ / प्रयोगशीलतेचं cultivation वेगळ्या (काही अंशी चांगल्या) प्रकारे झाल्यामुळे या मुलांचे व्यवहारज्ञान /EQ / प्रयोगशीलता पारंपारिक शाळकरी मुलांपेक्षा जास्त (अथवा जास्त जलद) विकसित होत असावी.

पारंपारिक शालेय व्यवस्थेच्या /शिक्षण पद्धतीच्या कोणत्या बाबी अशा शाळांपेक्षा चांगल्या असतात ?

दोन्ही शिक्षण पद्धतीत मूलभूत फरक असल्यामुळे अशी तुलना कराविशी वाटत नाही. दोन्ही व्यवस्थेत काही चांगल्या बाबी आहेत तसेच काही कच्चे दुवेपण आहेत तरीदेखील दोन्ही पद्धतींचा सर्वंकष विचार करायला हवा. Both the systems should be evaluated as a whole. One cannot compare apples with oranges.

तुम्ही तुमच्या पाल्याला अशा शाळांत टाकाल का ? (मला स्वतःला Fear of the unknown असे काहीसे वाटते)

हो आणि नाही. पाल्याला अशा शाळेत टाकायला तत्वतः काही हरकत नाही. पण मी स्वतः असा निर्णय घ्यायच्या आधी अशा शाळेतून दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्राची स्वीकारार्हता विचारात घेईन.

पारंपारिक शाळेत जिथे काही प्रमाणात अपारंपारिक पध्द्तींचा वापर केला जातो अशा शाळेत शिकणार्‍या काही मुलांच्या बरोबर आलेल्या संपर्कातून बनलेले मत. अपारंपारिक शाळांचा काही अनुभव अथवा याविषयातील काही विदा माझ्याकडे उपलब्ध नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

तस्मात नव्या येणार्‍या फ्याडप्रमाणे हे वाटत नाही. तरीपण या शाळा पारंपारिक शिक्षणव्यवस्थेला पर्याय म्हणून उभ्या राहणे हे मोठ्याप्रमाणात इतर घटकांवर अवलंबून आहे. सध्याच्या शिक्षणपध्द्तीत शिक्षण घेण्याचा मूळ हेतू ज्ञानार्जनाऐवजी रोजीरोटीची सोय करणे हा आहे.

बर्वे साहेब, तुमच्या म्हणण्यानुसार शिक्षणाचे दोन हेतू असू शकतात - अ) ज्ञानार्जन, ब) रोजीरोटी.

शाळेत हजारो विद्यार्थी जातात. या सगळ्या विद्यार्थ्यांनी असे कोणते ज्ञान मिळवणे गरजेचे आहे की जे यातील एकाही विद्यार्थ्यास रोजीरोटीसाठी उपयोगी पडणार नाही पण त्या ज्ञानार्जनातून दुसरा कुठलातरी वेगळा/उदात्त हेतू साध्य होईल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी ६० व्या वर्षी केवळ ज्ञानार्जन या स्वच्छ हेतूने शिकू शकते. मध्यवयात मला गणित इतके आवडू शकते की मी डॉक्टर असले तरी गणितात एम एस सी करु शकते.
अर्थात लहानपणी शक्यतो शिक्षण हे रोजीरोटी करताच घेतले जाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

तुम्हाला पाल्याकडून काय हवंय त्यावर योग्य ती शिक्षणपद्धती निवडावी.
मुख्यतः नोकरी किंवा गणित/विज्ञानाधारीत शाखांमध्ये जाणे महत्त्वाचे वाटत असेल तर भारतातील पारंपारिक शिक्षण महत्त्वाचे ठरावे.
मात्र कला, क्रिडा, छंद याला अधिक महत्त्व देत असाल किंवा नोकरीपेक्षा मुलाने स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे व त्याला आवडणारेही कसब मिळावावे असे वाटत असेल किंवा मुलाला काय आवडते याचा अंदाज नसल्याने त्याला ते शोधण्यासाअठी वेळ द्यायचा असेल तर अपारंपारिक/समांतर/पर्यायी शिक्षण व्यवस्था छान आहे.

===

माझी शंका: होम लर्निंग RTE नंतर किती वैध आहे? जालावर याबद्दल मतमतांतरे दिसतात.

==

माझे मतः प्राथमिक शिक्षण( साधारणतः ४थी पर्यंत) मुलांना मुक्तशिक्षण घेऊ द्यावे. चाकोरीत अडकवू नये. नंतर मुलांच्या आवड व कल असेल त्यानुसार पारंपारिक किंवा आवडिच्या क्षेत्रातील शिक्षण द्यावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश - तुम्ही काय केलेत हे सांगा ना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी पारंपारिक शाळेत शिकलो आहे.

--

अर्थात मी काय केलेय यावरून योग्यायोग्यता ठरते आहे असा विचार करून मला अगदी भरूनच आले! Smile

बाकी, यापुढिल वैयक्तिक गप्पांसाठी खरडवहीचा वापर करावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश - माझा प्रश्न गंडलाय वाटते. तुम्ही काय केले आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या प्रकाराच्या शाळेत घातले आहे असा विचारायचा होता. तुम्हाला शाळेत घालायच्या वेळी तुमची आवड विचारात नक्कीच घेतली नसावी. तुमचे उत्तर कंसल्टंट सारखे होते म्हणुन विचारले की तुम्ही काय केलेत.

तुमच्या मता प्रमाणे मुलांना ४थी पर्यंत मुक्त शिक्षण घेऊ दिले जावे म्हणजे नक्की काय? शाळेत घालू नये, अपारंपारीक शाळेत घालावे, पुन्हा अपारंपारीक म्हणजे नक्की काय?

मात्र कला, क्रिडा, छंद याला अधिक महत्त्व देत असाल किंवा नोकरीपेक्षा मुलाने स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे व त्याला आवडणारेही कसब मिळावावे असे वाटत असेल किंवा मुलाला काय आवडते याचा अंदाज नसल्याने त्याला ते शोधण्यासाअठी वेळ द्यायचा असेल तर अपारंपारिक/समांतर/पर्यायी शिक्षण व्यवस्था छान आहे.

हाच प्रश्न मला सर्वसाधारण मुलांबाबत विचारायचा आहे. म्हणजे ज्यांच्यात क्रिकेट ची आवड आहे पण रणजी मधे पण सिलेक्ट होण्याचा दर्जा नाही, चांगला आवाज नाही, १-२ तास रीयाज वगैरे करायची तयारी नाही. चित्रकला, पेंटींग वगैरे सामान्य आहे. मार्क ८०-९० टक्के मिळतात तेही जबरदस्ती अभ्यास करुन घेतल्यावर. अश्यांसाठी काय करावे?

जी मुले मुळताच खरी हुशार किंवा काहीतरी जन्मजात भारी गुण घेउन आली आहेत त्यांच्या साठी शाळा/कॉलेज कुठले होते हे मॅटर करते असे वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी कल्सल्टन्ट नाही. गैरसमज होऊ नये म्हणून खुलासा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण उत्तर मात्र कंसल्टंट सारखे दिले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी अशा कन्सल्टन्टकडे गेलो नसल्याने या विधानाची सत्यासत्यता सांगू शकत नाही नी ही स्तुती आहे की निंदा हे ही कळणार नाही!
तेव्हा जे काही आहे त्याबद्दल आभार मानून अवांतर आवरा अशी विनंती करतो.

या विषयावर माझा हा तुम्हाला दिलेला शेवटला उपप्रतिसाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्राथमिक शिक्षण( साधारणतः ४थी पर्यंत) मुलांना मुक्तशिक्षण घेऊ द्यावे. चाकोरीत अडकवू नये.

हे बरोबर आहे. पण मुलाचा कल आणि दिशा तुम्हाला लहानपणीचं जोखता येणं जमतंच असं नाही. आणि पाल्याकडून काय हवयं त्यापेक्षा त्याला काय हवयं आणि जमेल हे महत्वाचं ते १४/१५ वर्षांपर्यंत तरी स्पष्ट कळत नाही.
माझ्या मुलीला अपारंपारिक शाळेत घातलं होतं. त्याचे तोटे लक्षात आल्यावर आणि पारंपारिक मार्क-सिस्टीमचं गांभीर्य कळणं आवश्यक असल्याने सातवीत आम्ही ८, १० पालकांनी ठरवून शाळा सोडली. बरेचसे जण सीबीएस्सी वा आय्सीएस्सी कडे गेले मी पारंपारिक पद्धतीच्या स्टेट बोर्डच्याच शाळेत घातलं. यामुळे दोन्ही पद्धेतीचे फायदे तोटे लक्शात आलेत. ती आता नववीत आहे ईथेही रुळलीय.

याचा फायदा असा झाला की परिक्षेचा ताण असा तिला येत नाही. पूर्वीच्य शाळेमुळे विचार करून, विषय समजून घेऊन मग आपल्या भाषेत लिहीता येतं. इतर मुलं समजत नसेल तर सरळ पाठ करतात याचा तिला अचंबा वाटतो.
त्याच वेळी आताच्या शाळेमुळे मार्कांचं महत्व तिला न सांगता कळलं.

अपारंपारिक शाळा बघणार असाल तर संचालक मंडळ, शाळेचे आधीचे विद्यार्थी यांची नीट चौकशी करा. बरेचदा अश्या शाळांमध्ये शिक्षकांना पगार अगदी कमी असतात पण राबवणूक जास्त असते. त्यामुळे शिक्षक सतत बदलतात.

होमलर्निंगच्या वाटेला मात्र जाउ नये . आपण मुलांना जे शिकवतो त्यापेक्षा वेगळं बरं-वाईट ते आजूबाजूच्या वातावरणातून शिकत असतात त्यामुळे .
माझ्या मुलीचा अनुभव सविस्तर लिहीणं आवडलं असतं पण वेळ नाही. तुम्हाला स्वत्:च्या पाल्यासाठी अगदी असल्यास व्यनि करेन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही प्लीझ लिहा. लिहिणे शक्य नसल्यास आपण बोलुया . तुमचे मुद्दे मला सांगा. मी नोट्स काढतो. मी लिहितो.
इथे प्रकाशित केल्यावर तुम्ही वाचालच. किंवा त्यापूर्वीही review तुम्ही करु शकता; लिहिण्यामध्ये नेमके तुम्हाला हवे असलेले मुद्दे आले आहेत का ते.
दहा पंधरा मिनिटं बोलणं झालं तरी पानभराचा मजकूर मिळेल. न जाणो कुणाच्या कामाला येउ शकतो इथे.
हा विषय उग्गीच इंटलेक्चुअल चर्चा किंवा "वादाचा आनंद" असा नाहिये. प्रत्यक्ष आयुष्यात काही लोकांना थेट मदत होउ शकते तुमच्या इनपुट्समुळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

+१
अंतराआनंद कृपया तुमच्या मुलीचा अनुभव सविस्तर लिहा, ह्याचा खूप फायदा होईल, नक्कीच.

आम्ही देखील पाल्याची शाळा सुरु करण्याच्या वयाच्या आधी खूप कन्फ्यूज होतो, आपल्या पाल्यासाठी नेमकी कुठली शाळा निवडायची. अपारंपारिक की पारंपारिक, खूप चौकशी करून- प्रत्यक्ष शाळा बघून मग अपारंपारिक वर काट मारला मग पुन्हा पारंपारिक मधे प्रश्न होता इंग्रजी माध्यम की मराठी त्यात इंग्रजी ला प्राधान्य दिलं, त्यानंतर एस.एस.सी बोर्ड फायनल असतांनाही पुन्हा एकदा सि.बि.एस.ई. किंवा आय.सी.एस.ई चा विचार करावा का? हे प्रश्न. एस.एस.सी च्या मतावरच ठाम राहिलो. मग प्रश्न कोणती शाळा चांगली, घरापासून च्या अंतराला प्राधान्य द्यावे की शाळा चांगली असेल तर अंतर ह्या कारणाला थोडी मुरड घालावी. पण त्यातही अंतराला प्राधान्य दिलं आणि शेवटी एकदाची त्यातल्या त्यात जवळची इंग्रजी माध्यमाची एस.एस.सी बोर्डाची शाळा फायनल केली आणि सुदैवाने तिथे नंबर लागला (लॉटरी सिस्टीम मधून). पाल्याच्या शाळा अ‍ॅडमिशनचं फार टेन्शन घ्यायचं नाही आणि फार उठाठेव करत बसायची नाही असं ठरवलं होतं पण जेव्हा ह्या संपूर्ण प्रोसेस मधे खरोखर भाग घेतला तेव्हा लक्षात आलं की स्पर्धा आणि गर्दी सगळी कडेच आहे. मराठी माध्यमाच्या शाळा असो नाही तर इंग्रजी, पारंपारिक असो वा नसो आणि बोर्ड कुठलही असो. अ‍ॅडमिशन मिळत नाही तोपर्यंत टांगती तलवार असतेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१ असेच म्हणते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी मुलगी व मुलगा तुंम्ही म्हणता तशा अपारंपारिक शाळेत अाहेत. मुलीची शाळा रेग्युलरच पण काहीशी अपारंपारिक पध्दती वापरणारी अाहे, पण व्यवस्थित पाठ्यपुस्तके वापरूनच शिकवले जाते. त्या अनुभवावर अाधारित उत्तरे:
- या शाळा पारंपारिक शिक्षणव्यवस्थेला खरेच समर्थ पर्याय आहेत का ? वा शिक्षण क्षेत्रात दर काही वर्षांनी नवीन फ्याड येत असते हे तसे तर नव्हे ??
>> हे फॅड अाहे, असे वाटत नाही. मुलीला अाधी पारंपारिक इंग्रजी माध्यमाच्या शाऴेत घातले होते, पण तिथे मिनी केजीचे ‘अनुभव’ बघून पुढे हे अापल्याला पटणार नाही असे वाटले, व अपारंपारिक मराठी शाळेचा विचार केला. अाता अशा अनेक शाळा पुण्यासारख्या ठिकाणी निघाल्या अाहेत, व लवकरच अशा शाळांमध्ये शिकलेल्या मुलांबाबत इतरांचा अॅक्सेप्टन्स वाढेल, असे वाटते.
- दहावी नंतर या शाळेतील मुलांना पुन्हा पारंपारिक कॉलेजमध्येच प्रवेश घ्यायचा असतो, तेव्हा मुलांना अपारंपारिक ते पारंपारिक हा बदल झेपणारा असेल का ?
>> नक्की झेपेल, असे मत अाहे. 
- या मुलांचे व्यवहारज्ञान /EQ / प्रयोगशीलता पारंपारिक शाळकरी मुलांपेक्षा खरेच जास्त असते का ?
>> असे वाटत नाही. व्यक्त करण्याची क्षमता मात्र बरीच चांगली असते, असा अनुभव अाहे.
- पारंपारिक शालेय व्यवस्थेच्या /शिक्षण पद्धतीच्या कोणत्या बाबी अशा शाळांपेक्षा चांगल्या असतात ?
>> मुलांना ताण कमी. वेगळे काही करण्याची शक्यता अाधिक. मुख्य चांगली गोष्ट ही की मुलांना ‘मला काय अावडतं’ हे लवकर कळण्याची शक्यता.
- तुम्ही तुमच्या पाल्याला अशा शाळांत टाकाल का ? (मला स्वतःला Fear of the unknown असे काहीसे वाटते)
>> वर दिलेच अाहे.

- स्वधर्म

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलांना शाळेत पाठवून पुढे जर नोकरदारच करायचे असेल तर पारंपारिक शाळा ठीक आहेत. नंतर तुमचा बिजनेस ,प्रचंड प्रॉपर्टीच सांभाळायची असेल तर वर्षाला पाच लाखापेक्षा जास्त फी घेणाऱ्या शाळा योग्य ठरतील.आयुष्यात बेधडक पुढे जायचं असेल तर जिप आणि नगरपालिकांची शाळा उत्तम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रचंड प्रॉपर्टीच सांभाळायची असेल

तर कशाला शाळावगैरे पाहीजे. लिहीतावाचता आले तरी बास. तेव्हड्यावळावर मुख्यंमंत्री पण होता येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजचीच ह्या विषयासंबधातली म्.टा.ची बातमी. कोणीतरी केलेल्या अभ्यासानुसार शाळेमुळे फारसा फरक पडत नाही.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/students-school-...

डॉ. करोपाडी यांनी आंध्र प्रदेशाच्या पाच जिल्ह्यांमधील चार हजार ६३ विद्यार्थ्यांविषयी केलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. अभ्यासासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७६७ विद्यार्थ्यांना खासगी शाळेची फी भरण्यासाठी आणि इतर खर्चासाठी दरवर्षी तीन हजार रुपये मदत देऊन, त्यांना खासगी शाळांमध्ये दाखल करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचा २००७-०८ ते २०१२-१३ या कालावधीमध्ये अभ्यास करण्यात आला. सरकारी शाळांमधून निवडलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी आणि सरकारी शाळांमधून खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांची कामगिरी तपासून पाहताना, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये फारसा फरक पडत नसल्याचे या संशोधनाने दाखवून दिले आहे. सरकारी शाळांमध्ये आणि खासगी शाळांमध्ये असताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी जवळपास समानच राहते, इंग्रजी विषयाच्या कामगिरीमध्येही फारसा फरक दिसून येत नाही हेही या संशोधनाने सिद्ध केले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डॉ. करोपाडी यांनी केलेल्या या संशोधनाविषयी अजून काही विदा उपलब्ध आहे का? प्रथमदर्शनी तरी हे संशोधन अपूर्ण आणि एकांगी वाटतयं ..

 • विद्यार्थ्यांना खासगी शाळेची फी भरण्यासाठी आणि इतर खर्चासाठी दरवर्षी तीन हजार रुपये मदत देऊन, त्यांना खाजगी शाळांमध्ये दाखल करण्यात आले पण या विद्यार्थ्यांची एकंदर आर्थिक परिस्थिती आणि त्यांची तुलना खाजगी शाळेतील ज्या विद्यार्थ्यांशी करण्यात आली त्या विद्यार्थ्यांची एकंदर आर्थिक परिस्थिती यात काही फरक होता का? असल्यास त्याचा कसा विचार केला गेला आहे?
 • समजा "क्ष" विद्यार्थ्याला तीन हजार रुपये मदत देऊन खाजगी शाळेत दाखल करण्यात आले पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला शाळेनंतर पालकांच्या धंद्यात मदत करावी लागते आणि "य" ह्या खाजगी शाळेतील विद्यार्थ्याला अशी काही गरज पडत नाही. अशा स्थितीत क्ष आणि य यांच्या शैक्षणिक कामगिरीची तुलना करता येईल का? माझ्या वर्गातील एक मुलगा शाळेनंतर आईला भाजी विकायला मदत करत असे. त्याची शैक्षणिक कामगिरी आणि शाळेनंतर असं काही काम न कराव्या लागणार्‍या माझी किंवा इतर कुठल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी तुलनायोग्य असणार नाही.
 • आंध्र प्रदेशाच्या सरकारी शाळांमधील शिक्षकांचा दर्जा आणि खाजगी शाळांमधील शिक्षकांचा दर्जा एकच आहे का?
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

माझ्या कडे तरी विदा वगैरे काही नाही.

माझ्या वैयक्तीक मतानुसार प्रार्थमिक आणी माध्यमिक शाळांची निवड आणि त्याचा मुलांवर होणारा चांगला वाईट परीणाम ही फार्फार ओव्हर्-हाइप्ड गोष्ट आहे. आणि अचानक गरजेपेक्षा जास्त पैसा हाताशी आल्यामुळे मनात येणारे विचार आहेत. माझ्या ह्या मताला थोडे बळ देणारी बातमी वाचली म्हणुन लगेच इथे लिंक देवून टाकली.

मला पारंपारीक आणि मुलांना शिक्षा वगैरे देणार्‍या शाळा आवडतात. पण हल्ली शिक्षा पण द्यायची नसते ना Sad PTA वगैरे असले प्रकार अजिबात पसंत नाहीत. कधी फिरकत नाही असल्या ठीकाणी.

ह्या धाग्याच्या बरोबरच ऐसी वर एटी-केटी वर धागा चालू आहे. बारावीला फ्रीसीट मधे प्रवेश मिळावा इतकी बुद्धीमत्ता असणारी लोक मला कश्या केट्या लागल्या हे कौतुकाने, अभिमानाने सांगत आहेत. कोणी असे म्हणत नाहीये की थोडा अभ्यास केला असता तर मेकॅनिक्स किंवा m1,m2 पास होणे अवघड नव्ह्ते. त्याच धाग्यावर इंजीनीयरींगला आल्यावर पण क्लास लावणे वगैरे आहे. म्हणजे इन्जीनीयरींगला येउन सुद्धा स्वताचा स्वता अभ्यास करण्याची इच्छा,क्षमता आधीच्या १२ इयत्तांनी दिली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे इन्जीनीयरींगला येउन सुद्धा स्वताचा स्वता अभ्यास करण्याची इच्छा,क्षमता आधीच्या १२ इयत्तांनी दिली नाही.

spot on. बारावी काय, इंजिनेरींगातही तेच घोका आणि ओका प्रकार चालू असतात. तेव्हा तिथेही कुणी अगदी उच्च मार्क मिळवले, तरी त्यावरून काहीच निष्कर्ष काढता येत नाहीत हो.
"अभ्यास करून पास होणं/मार्क मिळवणं म्हणजे विषय समजणं" हे तर अजिबातच फजूल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"अभ्यास करून पास होणं/मार्क मिळवणं म्हणजे विषय समजणं" हे तर अजिबातच फजूल आहे.

क्या बात है!! अगदी अगदी.

घोका आणि ओका

हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

>>बारावीला फ्रीसीट मधे प्रवेश मिळावा इतकी बुद्धीमत्ता असणारी लोक मला कश्या केट्या लागल्या हे कौतुकाने, अभिमानाने सांगत आहेत. कोणी असे म्हणत नाहीये की थोडा अभ्यास केला असता तर मेकॅनिक्स किंवा m1,m2 पास होणे अवघड नव्ह्ते.

कौतुकाने अभिमानाने सांगतात असं नसतं. एक गंमत* म्हणून सांगतात. बारावीत भरपूर मार्क मिळवून स्वतःला 'क्रीम ऑफ सोसायटी' समजणार्‍या मुलांची काय हालत होते हे सांगण्याची एक गंमत असते.

बहुतांश मुले बारावीपर्यंत आपापल्या शहरात राहून शिकतात. त्यामुळे घरी राहणे, पालकांचा धाक वगैरे असते. शिवाय कॉलेजातील वातावरणसुद्धा (बारावी/सीईटी च्या बागुलबुव्यामुळे) नो बडी केअर्स असे नसते. पुढे इंजिनिअरिंगला अनेकांना घरातून बाहेर पडून दुसर्‍या शहरात** रहावे लागते. तिथे हॉस्टेलात राहिल्याने कसलीच बंधने नाहीत, बारावीचा टप्पा पार करून झाल्याने आलेले रिलॅक्सेशन आणि कॉलेजातही कोणी फार लक्ष ठेवून नसते त्यामुळे उधळायला होते. त्यामुळे हे केटी लागणे वगैरे प्रकार होतात.

या अनुभवांतून धडा घेऊन हीच मुले (आता मोठी माणसे असलेली) सुधारली आहेत आणि त्यातून बाहेर आली आहेत. तीच मुले या गोष्टी गंमत म्हणून सांगू शकतील. जी त्यात वाहवतच जातात ती बहुधा इथे अनुभव लिहायला येऊ शकणार नाहीत.

*मी एकावेळी चार पेग पिऊ शकतो टाइप चुरस सुद्धा यात असू शकेल.
**पुण्यतली जी लोकल मुले (सिटीलाइट्स) सीओईपीला शिकतात ती सुद्धा केट्या घेतातच पण त्यांचं वहावणं हॉस्टेलाइट्सपेक्षा कमी असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्वतःच्या केळीच्या सालावरून घसरुन पडणं हे पुरेसा काळ गेल्यानंतर स्वतःलाच जोक म्हणून घेता येतं.
जेव्हा ते प्रत्यक्षात घडत असतं तेव्हा तो विनोद नव्हे; फजिती असते.
संकोच्,लज्जा असते; क्वचित वेदना असतात.
काही काळानं तो ज्योक होउन जातो.
.
.
धाडसानं प्रेमविवाह केलेल्यांचे अनेक किस्सेही अशाच क्याटेगरित यावेत.
.
.
माझे काही किस्से/पराक्रम मी http://www.aisiakshare.com/node/3239 ह्या धाग्यात लिहिलेत.
ते घडले त्यावेळी आजच्या इतके विनोदीच वाटत होते; असे नव्हे.
.
.
विनोदनिर्मिती ह्या प्रकारात काळ हे एक महत्वाचं प्यारामीटर(घटक ?) आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अंतराआनंद ह्यांच्या वतीने प्रतिसाद प्रकाशित करत आहे.
शाळेबद्दल काही मुद्दे हे त्या स्पेसिफिक/ठराविक शाळेबद्दल म्हणता यावेत;
काही मुद्दे हे एकूणात त्या ' चाकोरिबाहेरच्या ' प्याटर्नचे वैशिष्ट्य म्हणता यावेत.
काही मुद्दे असेही असू शकतील की चाकोरीबाहेरचे म्हणून करु गेले; पण मूळ उद्दिष्टापेक्षा वेगळाच परिणाम देउन गेले.
.
.
**********************अंतराआनंद ह्यांचे मुद्दे सुरु*****************************
डोंबिवलीस्थित शाळा. २००३ला नर्सरीत घातले. सहावी पूर्ण होइपर्यंत त्याच शाळेत.
इंग्लिश मिडियम. मराठी वातावरण.(आजूबाजूला गावठाण, शहरी दगदगीपासून थोडाsssसा वेगळा भूभाग.)
मुलांना अपूर्णांक ही संज्ञा पुरेशी समजली नाही हे चौथीच्या स्कॉलरशिपला जाणवले.
हा फीडब्याक एकट्या अंतराआनंद ह्यांचाच नसून इतर बहुतेक पालकांचाही होता.
एकीचा मुलगा (की मुलगी) स्कॉलरशिपला नववी आली; पण तिचा/त्याचा तो अभ्यास पालकांनी करुन घेतला होता.
अन्यथा, त्यांचेही मत ह्याबाबतीत असेच होते.
क्रिडा आणि शारिरीक शिक्षण ह्या प्रकारात सुधारणा हवी. ह्या क्षेत्रातली कोणीतरी चांगली/कॉम्पिटण्ट/तज्ञ/योग्य व्यक्ती
आता लवकरच शाळा जॉइन करणार, लवकरच येणार अशी दरवेळी घोषणा होइ. पण प्रत्यक्षात येत नसे.
बर्‍याच मुलांचे पालक या कटेगिरीत बसणारे होते . काहींची यायची तयारीही होती पण त्यांना बोलवायचे शाळेची तयारी नव्हती.
माझ्या वर्गातल्या जुडोवाल्या मुलाची आई वडील ज्युडोचे कोच होते आई तर शिक्षीका ( दुसर्या शाळेत) होती त्यांनी तयारी दाखवूनही
शाळेत जयुडो इंट्रोडुसही केला गेला नाही.
प्लीझ नोट "ह्याच पालकांना बोलवायला हवे" हा असा आणि इतकाच मुद्दा नाही;
कोणीही तज्ञ व्यक्ती किमान काही काळ स्थिर त्या ठिकाणी असणं आवश्यक होतं.
मग ते पालकांपैकी असोत वा पालकांव्यतिरिक्त. पालकांतच असे लोक उपलब्ध आहेत;
बाहेरुन शिक्षक मिळत नसल्यास ह्या गोष्टीचा त्यांना फायदा करुन घेता आला असता इतकच म्हण्णं आहे.
.
.
आलीच तर फार कमी काळ टिके. (तुलनेने बाहेरपेक्षा कमी पगार, हे कारण असावे)
मुले जवळपास आठ तास ह्या शाळेत असतात. ह्या दरम्यान एखादा तास तरी पूर्ण खेळाचा हवा.
.
.
शिक्षकांच्या नजरेबाहेरचा, थोडासा मोकळा असा वेळ मुलांना मिळावा. त्यामुळे त्यांची स्वतःची उत्स्फूर्त केमिस्ट्री जमू शकते.
बहुतांश मुले अत्यंत उद्धट्,अरोगंट झाल्याचे निरिक्षण आहे. कदाचित त्यांना हेलिकॉप्टार पॅरेण्टिंग स्टाइल सतत शिक्षकाच्या नजरेसमोर राहिल्याने
ती ऊर्जा अशी बाहेर पडत असावी.
मोकळेपणा असल्याने मुले स्वतः व्यक्त होतात. अन्यथा कित्येक भावना दबल्या स्थितीत मनातच राहतात.
मुळातच, २० विद्यार्थी आणि तीन शिक्षक असतील असे सांगण्यात आले, प्रत्यक्षात तीस पस्तीस विद्यार्थी होते.
तिनातले एकच शिक्षक कायम स्थिर असत. बाकी दोन जागा नेहमी बदलत्या रहात.
(अर्थात त्याबद्दल विशेष आक्षेप नाही.) शाळेतील मुले मुख्यतः राजकारण्यांची किंवा अधिक धनसंपत्ती असलेल्यांची होती.
पण हे नंतर झालं पहिली दोन चार वर्षं राजकारणी-धनसंपत्तीवाल्यांचे अस्तित्व इतके लक्षणीय नव्हते .
मुलांना टक्क्यांचे महत्व न पटणे हा मुद्दा महत्वाचा.
टक्क्यांचं आणि परीक्षेचं टेन्शन नाही ; ही चांगलिच गोष्ट.
पण त्यांनी कमी टक्के मिळणे, हा मुद्दा लाइअटली घेणे मध्यमवर्गीयांना परवडेल का ?
सिलॅबस स्टेट बोर्डाचाच होता प्रमुख्याने.
पहिली दुसरीत मॅकमिलनची वगैरे पुस्तके काहीकाळ होती; पण विशेषत्वाने स्टेट बोर्डच.
.
.
प्रयोग्-मेगाप्रोजेक्ट करण्यास साम्गितला; स्वतः कश्ट घेउन साधासा, पण कल्पक प्रयोग केला.
मिठाच्या खड्याची माळ बनवण्याचा. पण कदाचित साधेपणा आवडला नसावा.
त्याची दखल घेतली गेली नाही. साधे कौतुकही नाही.
काही मुले (बहुतेक मुले धनिक वर्ग व राजकारण्यांचीच होती) भारी भारी प्रोजेक्ट बनवून आणत.
ते त्यांनी स्वतः केलेले नसत; हे सहज जाणवे.
त्यावर पालकांची उघड चर्चा होई. त्यामुळे आठ तासांची शाळा आहे तर मुलांना प्रोजेक्ट शाळेतच करू द्या असं सुचवलं होते जे नाकारलं गेलं.
"तुम्हाला घरी काहीच नाही का कराय्च?" असं विचारलं गेलं.

जो प्रयोग स्वतः मुलांनी केलेला नाही; असे सहज जाणवे त्यासही भारी ठरल्याने बक्षीस मिळे.
जेव्हा अंतरातैंच्या कन्येने शाळा सोडली तेव्हाच पहिली दहावीची ब्याच त्या शाळेतून पास झाली.
त्यात सर्वोच्च टक्के होते ८०!
.
.
मुलीला सहावीनंतर स्टेट बोर्डाच्या शाळेत घातले.
तिथे कामगिरी चांगली दिसते.
पण पहिल्यांनं तिला complex आला तो अभ्यास आणि मार्क प्रकाराला ईतकं महत्व आहे हे बघून.
"एवढं काय त्यात. कळलं ते लिहीता आलं की झालं ना काम" या वृत्तीला धक्का बसला सातवीतच असल्याने
तिने तो पचवला आणि त्या पद्धतीत स्वतःला सेट केलं. ते दहावीनंतर झालं असतं तर तिला आणि आम्हालाही त्रास झाला असता.
.
.
जुन्या शाळेच्या वातावरणात ईर्ष्या, स्टेटस दाखवणे फार असावे. कदाचित इतर मुले हे स्वतःच्याही नकळतपणे करत असतील; पण ते होते हे नक्की.
नवीन शाळेत आल्यावर परवाच मुलीला एक मोबाइल घेउन दिला. मी माझ्यासाठी स्मार्ट्फोन घेतला. तेव्हा माझा साधा हॅण्डसेट तिला दिला.
मोबाइलबद्दल तिच्या नव्या शाळामित्रांची कमेंट "अरे वा. मस्तय की" अशा सुरातली.
मुलीचे म्हण्णे :- ह्याऐवजी जुने शाळामित्र असते तर त्यांनी लागलिच "हॅ. ह्यात काय. माझ्याकडे तर अमुक अमुक ( तुमच्याहून भारी?)असा मोबाइल आहे."
.
.
वाढदिवसाला अनाथाश्रमात वैगेरे जाणं आणि सोसायटीत खेळताना अमक्या-ढमक्याशी खेळू नकोस अशी तंबी देणारे पालक तिथे पाहिले.
(जो दांभिकपणा उच्च्मध्यमवर्गीयांचं लक्षण. )

.
.
चांगले मुद्देही आहेत; पण थोडेच. तेही प्रामुख्यानं अशा शाळांच्या वर्णनात कव्हर होतातच.
बर्^याच मुलांचे पालक या कटेगिरीत बसणाअरे होते . काहींची यायची तयारीही होती पण त्यांना बोलवायचे शाळॅची तयारी नव्हती. माझ्या वर्गातल्या जुडोवाल्या मुलाची आई वडील ज्युडोचे कोच होते आई तर शिक्षीका ( दुसर्या शाळेत) होती त्यांनी तयारी दाखवूनही शाळेत जयुडो इंट्रोडुसही केला गेला नाही.
थोडययात "हम करे सो कायदा " ही वृत्ती .

**********************अंतराआनंद ह्यांचे मुद्दे समाप्त*****************************

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अंतराआनंद यांच्याबरोबरच मनोबाचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही मुद्दे हे एकूणात त्या ' चाकोरिबाहेरच्या ' प्याटर्नचे वैशिष्ट्य म्हणता यावेत.

मला तर ह्या शाळेच्या प्रॉब्लेम्स पैकी एकही मुद्दा ती शाळा "चाकोरी बाहेरची" होती ह्या मुळे आहे असे वाटले नाही.

एकुणच ती शाळा चांगली नाही आहे हे कळतय. ती नॉर्मल पॅटर्न ची असती तरी हेच प्रॉब्लेम असते.

मला स्वताला ह्या "चाकोरीबाहेरच्या" शाळा वगैरे प्रकार अजिबात पसंत नाहीत आणि मान्य पण नाहीत. तरी पण ह्या एका शाळेच्या माहीती मुळे एकुणात अश्या शाळांबद्दल मत होऊ नये असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला चाकोरीबाहेरच्या शाळा का पसंत नाहीत? ते सांगाल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंतराचा सविस्तर अन इन्साईटफुल प्रतिसाद आवडला. मन ने इथे दिल्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

चाकोरीबाहेरच्या शाळा म्हणजे नक्की कोणत्या ते कळले तर बरे होईल. आजकाल एसएससी प्याटर्नलाही परीक्षा वगैरे नसल्याने त्या चाकोरीबाहेरच्या झाल्यात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आज 'सकाळ 'च्या सप्तरंग पुरवणीमध्ये "जे कृष्णमूर्ती " ह्यांच्या शिक्षणविचारांबद्दल वाचायला मिळालं.
वृत्तपत्रांच्या लिंका काही काळाने गंडातात. म्हणून आख्खा लेख इथे चिटकवत आहे.
कृष्णमूर्तींनी काही शाळा सुरु केल्या होत्या म्हणे.
गांधींच्या "नयी तालिम " , रवींद्रनाथ टागोर ह्यांच्या " शांतिनिकेतन " आणि अलिकडच्या काळातल्या ज्ञान प्रबोधिनी सारखे काहीतरी वेगळे असावे असा अम्दाज.
लेख अजून पूर्ण वाचला नाही; फक्त वरवर चाळला आहे.
अवांतर :-
एका ऐसीकराने अक्षरनंदन शाळेत आपल्या पाल्याला घातले आहे असे ऐकले.
.
.
कृष्णमूर्ती शाळांकडून काय शिकावं?
मुलांना शिक्षा न करता शिकवणाऱ्या शाळा जे. कृष्णमूर्ती यांनी काढल्या. देशात या पद्धतीच्या पाच शाळा आहेत. आज जे उपक्रम विविध शाळांमध्ये राबविले जातात, ते त्यांनी ७५ वर्षांपूर्वी सुरू केले होते. या शाळांमध्ये व्यक्तिपूजा नाही. कृष्णमूर्तींचा कुठंही फोटो नाही, त्यांचं निधन झालं तेव्हाही शाळेला सुटी दिली नव्हती.

शिक्षकांना प्रेरणा देतील अशा देशातल्या शाळा कोणत्या? यादी करताना सर्वप्रथम नाव समोर येतं ते कृष्णमूर्ती शाळांचं. गेल्या ७५ वर्षांपासून देशात पाच शाळा आणि देशाबाहेर २ शाळा सुरू आहेत. या शाळा संख्येनं खूप कमी असल्यानं त्या व्यवस्थेवर परिणाम करत नाहीत; पण मी त्याकडं एक प्रयोगशाळा म्हणून बघतो. आपल्या प्रचलित शाळा या शाळांकडून एक दृष्टिकोन घेऊ शकतात, ते मला महत्त्वाचं वाटतं.

जे. कृष्णमूर्तींनी शिक्षणाविषयी इतकं चिंतन करूनसुद्धा आपल्या शिक्षण क्षेत्राला ते माहीत नाहीत. याचं कारण त्यांच्याविषयी एकही धडा पुस्तकात नाही की डीएड - बीएडसाठींच्या शिक्षणतज्ज्ञांच्या यादीत ते नाहीत. परीक्षेऐवजी आज आलेली नवी मूल्यमापन पद्धती, मुलांना शिक्षा न करणं यांसारख्या आज स्वीकारलेल्या गोष्टी या शाळा गेली ७५ वर्षे अमलात आणत आहेत, यावरून या शाळांचा द्रष्टेपणा लक्षात यावा.

कुठं आहेत या शाळा?
आंध्र प्रदेशातली ‘ऋषी व्हॅली’ ही शाळा बहुचर्चित आहे. या शाळेला जगभरतल्या अनेक लोकांनी भेट दिली आहे. कृष्णमूर्तींचे जन्मगाव मदनपल्लीजवळच ही वसविण्यात आली आहे. साधनसामग्रीअभावी बाहुलीनाट्य व कार्डसद्वारे मुलांना शिकविण्याची पद्धती विकसित करण्यात आली. या शाळेत इयत्ता नाही. मुलं स्वयंअध्ययनातून शिकतात. बाहुलीनाट्य हे खास वैशिष्ट्य. या प्रयोगाचा युनिसेफनं खास अभ्यास केला. देशात अनेक ठिकाणी हा प्रयोग गेली ३० वर्षे राबविला जात आहे. महाराष्ट्रात मुंबई महापालिकेसह अनेक ठिकाणी तो सध्या राबविला जात आहे.

वाराणसीची राजघाट बेझंट स्कूल. सारनाथच्या रस्त्यावर आहे. वर्गाच्या खिडक्‍यांमधून गंगा नदीचा प्रवाह दिसतो. या शाळेच्या उभारणीत महाराष्ट्रातले स्वातंत्र्यसेनानी अच्युतराव पटवर्धन यांचा सर्वांत मोठा वाटा होता. चेन्नईची ‘द स्कूल’ ही शाळा प्रसिद्ध आहे. इयत्ताविरहित शिक्षण देण्याचा इथला प्रयोग महत्त्वाचा आहे. कृष्णमूर्तींची बंगळुरूमधली ‘व्हॅली स्कूल’ शेकडो एकरांच्या जंगलात वसली आहे. कलाविषयक खूप चांगलं काम इथं झालं आहे. महाराष्ट्रात राजगुरूनगरजवळ भीमाशंकरच्या रस्यावर ‘वाडा’ या गावाजवळ सह्याद्री स्कूल आहे. उंचच उंच टेकडीजवळ ही सुंदर शाळा व खाली चासकमान धरणाचं अथांग पाणी, कडेला सह्याद्रीच्या रांगा अशा अत्यंत मनोहर वातावरणात ही शाळा आहे. भारताबाहेर ओहायो व बाकवूड पार्क इथंही दोन शाळा आहेत, मुंबईत एक बालशाळा आहे. कृष्णमूर्ती शाळांपासून प्रेरणा घेऊन देशात अनेक ठिकाणी अशा शाळा सुरू झाल्या आहेत. प्रत्येक शाळेत मला जाता आले. काही दिवस थांबून अभ्यास करता आला. माझ्यासाठी आयुष्याला वळण देणारे व रोमांचित करणारे दिवस होते ते.

आंध्र प्रदेशातल्या ‘ऋषी व्हॅली’मधला सूर्यास्त. इथलीं मुलं सूर्यास्त पाहण्यासाठी खास वेळ काढतात. सूर्यास्त पाहून मुलं कोमल आणि संवेदनशील होतात असा कृष्णमूर्ती पद्धतीच्या शाळांचा दावा आहे.

या शाळांचं वेगळेपण नेमकं काय आहे? शिक्षक व पालकांना या शाळांकडून काय शिकता येईल, याच उत्सुकतेनं मी या शाळा बघितल्या. सर्वांत मोठा वेगळेपणा मला वाटला तो म्हणजे, इथं कृष्णमूर्ती शाळा असूनही व्यक्तिपूजा नाही. कृष्णमूर्तीचा कुठंही फोटो नाही, इतकंच नाही तर त्यांचं निधन झालं, तेव्हा शाळेला सुटीसुद्धा दिली नव्हती. दुसरी गोष्ट भावली ती म्हणजे शिक्षक व विद्यार्थी संबंध. ते खूप समान पातळीवर आहेत. शिक्षक व विद्यार्थी एकत्र राहतात, एकत्र जेवतात आणि एकत्र खेळतात. ही समान पातळीवरची वागणूक मला खूप महत्त्वाची वाटली. वर्गात बसून मी शिक्षकांचे तास बघितले, तिथंही मुलांवर शिक्षकांचं अजिबात दडपण येत नाही. शिक्षक शिकवत असताना मुलं टोकतात, काहीही विचारतात. विद्यार्थ्यांच्या मनातली भीती जाणं, हे मला महत्त्वाचं वाटलं. प्रभातकुमार हा शिक्षक मला म्हणाला, ‘‘रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्यानं पत्ता विचारावा त्या सहजतेनं मी शिकवताना माहिती सांगतो. ही अहंकारविहीनता मला मोलाची वाटते.’’

या शाळेत अभ्यासासोबत कला या विषयाला खूप महत्त्व आहे. शनिवार-रविवार हे दोन दिवस तर गायन-वादन-नृत्य-चित्रकला-मातीकाम यालाच वाहिलेले असतात. अनेक नामवंत कलाकार इथं येतात. त्यामुळं करिअर म्हणून कलावंत होणं अनेक विद्यार्थी पसंत करतात. नसिरुद्दीन शाह यांचा मुलगा या शाळेचा विद्यार्थी होता. स्पर्धाविरहित शिक्षण हा इथला गाभा आहे. संगीतानंच दिवसाची सुरवात होते. सर्व शिक्षक-विद्यार्थी एकत्र बसून वाद्यांच्या साथीनं गाणी - भजनं गातात. त्या निसर्गरम्य वातावरणात सकाळी ते आपली भावावस्थाच बदलून टाकतात... कुठलीच स्पर्धा इथं होत नाही. पण तरीही दहावी-बारावीचे निकाल खूप चांगले असतात. मुले महत्त्वाकांक्षाविरहित शांत, विकसित होतात. इथला निसर्गही त्यांना मदत करतो. या सर्वच शाळा निसर्गरम्य ठिकाणी आहेत... सर्वांत अप्रतिम उपक्रम हा रोज संध्याकाळी सूर्यास्त पाहण्याचा असतो. मीही मुलांसोबत रोज जायचो. तेव्हा आपण रोजच्या जगण्यात काय गमावतो हे लक्षात येतं... सूर्यास्तावेळचा निसर्ग आणि अथांग शांतीत नकळत डोळ्यांत पाणी यायला लागतं आणि हळूहळू मुलं आपल्या खोल्यात जातात. इतके साधे उपक्रम कुणीही करू शकतो. यातून मुलं कोमल आणि संवेदनशील होतात. प्रत्येक शाळेत नेचर क्‍लब आहेत. रविवारी सकाळी मुले पक्षिनिरीक्षण करतात. त्या परिसरातील सर्व पक्ष्यांची माहिती आहे. पर्यावरण विषयात राष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प मुलांनी केले आहेत.

प्रकल्प पद्धतीनं शिकणं हे एक वैशिष्ट्य. रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मशताब्दीत ८ दिवस मुलांनी विविध कार्यक्रम केले. अनेक नवे प्रयोग सुरू असतात. चेन्नई आणि बंगळुरूच्या शाळेत सध्या इयत्ताविहीन शिक्षणाचा प्रयोग सुरू आहे. यात पहिली ते चौथीच्या मुलांना एकत्र शिकविलं जातं. लहान मुलं खेळताना जर एकत्र खेळतात, तर मग एकत्र शिकू का शकणार नाहीत? मोठ्या मुलांनी लहानांना मदत करण्याची ही कल्पना अभ्यास करावी अशीच आहे.
शिक्षक सक्षमीकरणाचे उपक्रम महत्त्वाचे आहेत. शिक्षकांना विकसित करणारा अभ्यासक्रम तयार केला आहे. सर्व शाळांतल्या शिक्षकांच्या विषयनिहाय परिषदा होतात. शिक्षकांच्या उपक्रमाचं जर्नल नियमितपणानं प्रकाशित केलं जातं. दर आठवड्याला विषयनिहाय शिक्षक एकमेकांना भेटतात. शिक्षक होण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी देशातून विविध ठिकाणचे कलावंत, प्रतिभावान लोक इथं शिक्षक व्हायला येतात. कृष्णमूर्ती म्हणायचे की, प्रेमाचा प्रारंभ शिक्षकांपासून झाला पाहिजे. तुम्हाला गणित, भूगोल किंवा इतिहास यांची माहिती देण्याबरोबरच शिक्षकांच्या हृदयातही प्रेमभावना असावी ! त्यांच्या संभाषणात, कामात, खेळात, संगतीत किंवा एकटे असताना ही विलक्षण भावना सतत जाणवावी. शिक्षकात सौम्यता वसत असली, तर विद्यार्थ्यांमध्येही स्नेहभावना व इतरांबद्दलही आदर निर्माण होईल.

शिक्षकानं कोणत्या पद्धतीनं शिकवावं, प्रेमातूनच कसं शिकवायचं हे शिक्षकाला कळू शकेल. यासाठी ते लहान मुलाचं उदाहरण देतात की, मुलाला चित्र काढावंसं वाटलं, तर ते कोणत्या पद्धतीनं काढावं असा प्रश्‍न त्याला पडत नाही. तसं शिक्षकाचं मुलांवर प्रेम असेल तर आपोआप पद्धती निर्माण होतील. निसर्ग, संगीत, प्रेम ही इथल्या शिक्षणाची भाषा आहे आणि त्यातून मुलांना स्वतःचं अवलोकन करायला मदत केली जाते. याचं कारण ही सारी धडपड आपलं स्वतःचं ‘निवडरहित अवधान’ करून आपल्याला बदलणं असतं. त्यांच्या विचारांचा मुख्य गाभा हा होता. मान्य आहे की या उंचीवर या शाळा पोहोचत नाहीत किंवा सर्वच शिक्षक कृष्णमूर्तींच्या विचारानुसार नाहीत. इतर निवासी शाळांसारख्याच हळूहळू होत आहेत; पण या शाळेतले शिक्षणाविषयीचे हे दृष्टिकोन मोलाचे आणि इतर शिक्षकांना मार्गदर्शक असे आहेत. कृष्णमूर्तींच्या शाळांकडून आपल्या शाळा पुढील बाबी अगदी सहजपणे घेऊ शकतील...

१. खेळ व कला-नृत्य-संगीताला वेळापत्रकातच वेळ दिला आहे.
२. दर आठवड्याला चाचणी होऊन मागे पडणाऱ्या विद्यार्थ्याला पूरक मार्गदर्शन केलं जातं.
३. शिक्षक व मुलं एकत्र खेळतात, एकत्र जेवतात. शिक्षकांची मुलांना भीती वाटत नाही.
४. रोज संध्याकाळी मुले सूर्यास्त बघतात व नंतर तसेच काही वेळ स्वतःचं निरीक्षण करतात.
५. मुलं रविवारी सकाळी निसर्गाच्या सान्निध्यात जातात.
६. मुलांना विविध वाद्ये वाजवायला शाळा शिकवते.
७. पाठांच्या नाट्य रूपांतरावर जास्त भर असतो. चित्रकलेला विशेष महत्त्व दिलं जातं.
८. मुलांना उपदेश करण्यापेक्षा स्वतःचं अवलोकन करण्याचे वातावरण तयार करण्यावर भर आहे.

शिक्षकांना मार्गदर्शक ठरणारी कृष्णमूर्ती शाळांची माहिती (पुस्तकं व वेबसाईट्‌स) साकेत व चंद्रकला प्रकाशनानं प्रसिद्ध केली आहेत. इंग्लिशमधली बहुतेक सर्व पुस्तके कृष्णमूर्ती फाउंडेशननं प्रसिद्ध केली आहेत. इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी यासाठी खुशखबर ही आहे की, त्यांचे सर्व विचार नेटवर उपलब्ध आहेत. ‘ऑनलाइन कृष्णमूर्ती’ या साइटवर ते आहेत. त्यात कोणताही शब्द टाकला की कृष्णमूर्ती यांनी त्या विषयावर काय म्हटलंय याची शेकडो पाने समोर येतात.
त्याची लिंक www.jkrishnamurti.org
सर्व कृष्णमूर्ती शाळांच्या विषयीची एकत्रित माहिती याच वेबसाईटच्या
http://www.kfionline.org/education/ education-centres
या लिंकवर वाचायला मिळेल. भारतात त्यांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचे वेबसाईट खालीलप्रमाणे आहेत.
http://www.rishivalley.org/
http://www.kfirural.org/Apschool.html
http://www.j-krishnamurti.org/
http://www.thevalleyschool.info/
http://www.theschoolkfi.org/
http://www.sahyadrischool.org/
कृष्णमूर्ती पद्धतीच्या शाळांची माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे.
http : // brockwood.org.uk
http: // www.oakgroveschool.com
.
.
मूळ लेखाचा दुवा :-
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5575286094514852513&Se...?(%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AC%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80)
.
.

ऐसीवरील संबंधित चर्चा :-
http://aisiakshare.com/node/2032
.
.
http://aisiakshare.com/taxonomy/term/20/0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> एका ऐसीकराने अक्षरनंदन शाळेत आपल्या पाल्याला घातले आहे असे ऐकले.
माझी दोन्ही मुलेही या शाळेत आाहेत. अात्तापर्यंत अनुभव चांगला अाहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पर्यायी शाळा म्हणजे वास्तवाला पर्यायी छद्मवास्तव पुरवणाऱया शाळा असतात की काय असे वाटते.
मुलांना "घडवणे" हा अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे आणि आपल्या आयुष्याला काहीतरी उदात्त प्रयोजन चिकटवण्याची धडपड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुलांना "घडवणे" हा अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे आणि आपल्या आयुष्याला काहीतरी उदात्त प्रयोजन चिकटवण्याची धडपड

माझ्या दृष्टीने पर्यायी शाळा याच्या उलट करतात. त्या मुलांना "घडवत" बसत नाहीत तर मुलांना विविध पर्याय उपलब्ध करून देतात, विविध वेळी आवश्यक तो सपोर्ट देतात. मुलं त्यांना हवी तशी आपोआप घडत जातात.

उलट पारंपारीक शाळा आम्ही "मुलांना यंव पैलू पाडतो, त्यंव पैलू पाडतो" वगैरे सतत ऐकवत तरी असतात. आणि त्या (पारंपरीक शाळा) एका ठोस अभ्यासक्रम व साचेबद्द्ध प्रकारे शिकवून मुलांना त्या साच्यासारखे 'घडवत' असतात.

बाकी आयुष्याला उद्दात्त प्रयोजन चिकटवायला अनेक मार्ग असतात, त्यात काहिंसाठी हा मार्गही असु शकतो हे मान्यच.. पण ते कोणत्याही 'प्रागतिक' म्हणवल्या जाणार्‍या कृतीबद्दल लागू आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ननिंशी सहमत. यासाठी मी वर प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर कोणी पर्यायीवादी देऊ शकेल काय? शाळेत न जाणे हे चाकोरीबाहेरचे असू शकते इतपत पटते. पण शाळेत जायचे ठरवलेच आहे तर एखादी शाळा चाकोरीबाहेरची असल्याची तपासणी करण्याची किमान एखादी चेकलिस्ट तरी पुरवावी.

चाकोरीबाहेरच्या शाळा म्हणजे नक्की कोणत्या ते कळले तर बरे होईल. आजकाल एसएससी प्याटर्नलाही परीक्षा वगैरे नसल्याने त्या चाकोरीबाहेरच्या झाल्यात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाळेची निवड खुप विचार करून करावी लागते. एकदा प्रवेश घेतल्यावर पुन्हा शाळा बदलने अवघड असते.( स्वानुभवावरुन).
आपल्याला आपल्या पाल्याला नेमके कशा शाळेत घालायचे आहे हे आधी ठरवावे. मग त्या शांळा जवळ आहेत की लाम्ब आहेत ते बघावे. तुम्हाला पड्लेल्या प्रश्नाचची उत्तरे शोधा मग नेमकी कुठली शाळा हवी , अपारंपारिक की पारंपारिक ते ठरवावे. मग शाळाची निवड करावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0