महाराष्ट्रातल्या शहरांमधले तुकडे

दोन महिन्यांच्या भारतवारीत ठाणे, मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये काढलेले काही फोटो. या फोटोंवर सकारण, अकारण, रास्त, बिनबुडाची, छायाचित्रणाचं कौशल्य किंवा त्याचा अभाव अशा प्रकारची टीकाटिप्पणीसुद्धा अपेक्षित आहे. फक्त 'चान चान' म्हणायलाही ना नाही. (मोठ्या फोटोंसाठी फोटोंवर क्लिक करावे.)

१. पहिला फोटो गुर्जीचरणी अर्पण. ठाण्याच्या घरातून बरेच दिवस सूर्योदय बघत होते. (सकाळी लवकर उठण्याची जाहिरात.) त्याचं काय करायचं, हे समजत नव्हतं. आणि मग एक दिवस काढला एकदाचा फोटो.

२. भारतात जाण्याआधी काही दिवस लॅक्मामध्ये गेले होते. तिथल्या ह्या चित्राचा थोडा प्रभाव पडला. त्यातून घरबसल्या अशी गंमत दिसल्यावर राहवलं नाही -

३. मला पहा ... ('स्पॅम'चा प्रभाव)

४. खाज जिरत नाही. ('स्पॅम'चा प्रभाव आहेच.)

५. चौकोनी आयुष्य (पुन्हा एकदा 'स्पॅम')

६. लोकल ट्रेन आणि लोकल स्त्रिया

७. We serve peace. कुर्ला भागात एसी बसमधून प्रवास करताना हे दिसलं.

८. भुलेश्वरमधला बाजार -

९. प्रतिमांची उलटापालट

१०. (काळाघोडा समारोहाच्या भागातली) सुंदरी

११. मॉर्निंगवॉकच्या वेळेस

१२. व्यापारी

"वाचकां"ना रस असल्यास क्रमशः

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"वाचकां"ना रस असल्यास क्रमशः

आहे.
_______
दुसर्‍या चित्रात तो मनुष्य किती उंचावर क्रेन वगैरे शिवाय अन चिंचोळ्या जागेत काम करतोय Sad
____
मॉर्निंग वॉक च्या चित्रातील तो मनुष्य Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

अजुन आले तरी हरकत नाही... फोटो जबराट असतिलच असे नाही, पण आपण कोणत्या विचारात हे काढले असतिल ते (मनोमन)जाणुन रोचक वाटतयं. त्यामुळे साधा दुकानदाराचा फोटो ही छान म्हणावासा वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

तीन टैम फोड दूंगा ..क्या है ये मिया? हौला हो गया बाप.

पयला फोटू झोपेत काढल्यासारखा वाट्टोय.
सहावा फोटू क्लिशे क्याटेगरीतला वाट्टोय.
सतरावा फोटो मात्र बेश्ट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो क्र.१ खरचं झोपेतुन उठुन काढल्यासारखा दिसतोय.
फोटो क्र.५ वरुन आठवलं.. आपण अजुनही पत्ता /पूर्ण पत्ता लिहायचा झाल्यास CHS -Co-op Housing Soc, अमका रोड, तमका चौक, लांबलचक रजिस्ट्रेशन नं. ब्रिटिशांच्या काळातले लँड्मार्कस असं लिहितात. हल्ली हल्ली पर्यंत ठाण्यातली ह्युम पाइप कं. जमिनदोस्त होउन २५ वर्षे उलटुन गेली तरी तेच लिहित होते. मिठबंदर रोड- आता कुणी मिठागरं, मिठबंदर शोधायला गेले तर तिथे घरं बांधुन राहणार्‍यालाही सांगता यायचं नाही.
जांभळी नाका, टेंभी नाका हे नाके तर पूर्वी म्हणजे ५० वर्षांपुर्वी तेथे मोठ्या प्रमाणात जांभ़ळीची, टेंभीची झाडे होती म्ह्णुन नावे पडलीत. आता तरी बदला असं वाटतं.
फोटो क्र. १० मधली सुंदरी च्या मागचा एक चेहरा धुरकर्ट आला आहे पण आजके जमाने का तरुण है.. स्माइल, से चिज्ज्ज्ज्ज्ज..दिली लगेच एक पोज,खटॅक्क.

--मयुरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जांभळी नाका, टेंभी नाका हे नाके तर पूर्वी म्हणजे ५० वर्षांपुर्वी तेथे मोठ्या प्रमाणात जांभ़ळीची, टेंभीची झाडे होती म्ह्णुन नावे पडलीत

जांभळी एकवेळ ठीक. पण टेंभीचे झाड म्हणजे कसले झाड?

मला वाटतं, त्याचा संबंध टेंभा मिरवणे, ह्या वाक्प्रचारातील टेंभ्याशी जास्त असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टेंभीचे झाड म्हणजे बहुधा टेंभुर्णी/ टेंबुर्णीचे झाड. (तेंदु - ज्याची पाने विडीसाठी वापरतात ते.)

'टेंभा मिरवणे' मधला टेंभा म्हणजे मशाल, पलिता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो आवडले. फोटो पाहून भारत कसा आहे हे कळते. विभिन्न धर्मातले लोक इथे मिळून मिसळून राहतात. इथे ही टोलेगंज ईमारती आहे, पण त्या बनविणाऱ्या श्रमिकांच्या सुरक्षेची चिंता कुणाला ही नाही. लोकांना जमिनीवर बसायला आवडते (गाडीत सीट रिकाम्या होत्या), बहुतेक लोक प्रसन्न राहतात इत्यादी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

लोकांना जमिनीवर बसायला आवडते (गाडीत सीट रिकाम्या होत्या), ...

याची थोडी गंमतच झाली.

दुपारच्या वेळी आम्ही (मी आणि मैत्रीण) कुर्ला स्टेशनवर दादरकडे नेणाऱ्या गाडीची वाट बघत उभ्या होतो. कुर्ल्याहून दादरच्या दिशेला जाण्याची ही माझी पहिलीच वेळ. त्यातून पंधरा डब्यांच्या गाड्यांचे दुसऱ्या वर्गाचे बायकांचे डबे बारा डब्यांच्या गाड्यांपेक्षा निराळ्या ठिकाणी येतात आणि गाडी किती डब्यांची असेल याची नोंद इंडिकेटरवर आता असते हे तेव्हा माझ्या लक्षातच आलं नाही. बऱ्याच वेळानंतर गाडी आली, त्यातल्यात्यात पळापळ करून पहिल्या वर्गाचा डबाच सापडला. गाडी सोडायची नव्हती म्हणून आम्ही जशा तिथेच चढलो तशीच ही सुंदरीसुद्धा चढली. तिला थोडी धाकधूकच वाटत होती, आता टीसी आली तर काय! तिला मी हिंदीत सांगायचा प्रयत्न केला, टीसी आली तर तू एकटी नाही, आम्हीपण पकडल्या जाऊ. पुढचं स्टेशन आहे (फास्ट ट्रेन होती) तिथे उतर, बहुतेक काही होणार नाही. तिला कितपत कळलं हे माहीत नाही.

पण सीट रिकाम्या होत्या तरीही ती (आणि आम्हीसुद्धा) आतमध्ये बसलो नाही कारण दुसऱ्या वर्गाचं तिकीट काढून पहिल्या वर्गाच्या डब्यातून प्रवास केला.

---

शुचि, रस्त्यावर बसून झोपलेला माणूस तिथेतरी का होईना, पसरला का नाही याचा विचार करत होते. फार थंडीही नव्हती, निदान माझ्यासाठी. त्याला कदाचित दारू, गांजा जास्त झालेला असेल. तासाभराने पुन्हा तिथूनच गेले तर त्या माणसाचा तिथे नामोनिशाणा नव्हता. त्याच्याबद्दल मला फक्त सहानुभूती वाटली नाही, कुतूहलही वाटलं.
हीच गोष्ट त्या फळीवर बसलेल्या माणसाची. उगाच हीरोगिरी, माको*पणा म्हणून आचरट (शारीरिक आणि शाब्दिकही) कसरती करणारे लोक चिक्कार बघितल्यामुळे लगेचच सहानुभूती, वाईट वाटेलच असं नाही.

*macho

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय मला ही ते जाणवलं की तो दारु पीऊन गटारात लोळत होता. अगदी हेच शब्द डोक्यात आले. अन मला देखील हेच कुतुहल वाटलं की त्याची "स्टोरी" काय असावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

कुर्ला स्टेशनवर

समस्त त्रिभुवनात यापेक्षा घाण जागा नसावी. I just hate this bloody place.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

टाक की अजून. रस नाही वाटला तर नाही बघणार. WinkBlum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यातले बरेचसे तुमच्या चेपुच्या भिंतीवर पाहिलेत.
आता नवा फ्रेश ष्टाक येऊ द्या! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असेच म्हणतो. तुकडे आणि नोंदी आवडल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरा सूर्योदय हुकलाच आहे. क्लीशे कल्पना - "शहरी क्षितिज."
फोटो लिस्टपेक्षा कोलाज रूपात पहायला जास्त मजा आली असती.

'स्पॅम' ह्या फोटोचा अर्थ जरा उलगडून सांग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


हे ते चित्र. रूशा नावाच्या चित्रकाराने हे चित्र का काढलं असावं याबद्दल तिथे व्याख्यान ऐकलं. त्याबद्दल म्हणे बऱ्याच कल्पना लढवल्या गेल्या आणि शेवटी निष्कर्ष निघाला की त्याने उगाच, काहीसं चिडवण्यासाठी हे चित्र काढलं. या चित्राच्या खालच्या भागात स्पॅमचा डबा प्रत्यक्षात जेवढा असतो त्या आकाराचा आहे.
स्पॅम नामक खाद्यप्रकार चित्रात आहे अशा डब्यात मिळायचा, चित्राला नाव नाही म्हणून मी त्याला 'स्पॅम' म्हणते. या शब्दाचा दुसरा अर्थही हवा तेव्हा वापरता येतो.

--

"खरा" सूर्याोदय त्या घरात बसून हुकतोच. ठाण्याच्या पूर्वेला कळवा/मुंब्र्यांच्या टेकड्या आहेत, त्यांच्यामागून सूर्य वर आल्यानंतरच दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सूर्याोदय मधील र्याो कसे टाईपले ते सांगण्याची कृपा करावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बहुदा इनस्क्रिप्टमध्ये येते. उदा.- उदाााा, सोा, इिी, पूा, वगैरेाो Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं