"सेफ, अ‍ॅण्ड फोर" - रिची बेनॉ

७०-८० च्या दशकातील इंग्लंडमधल्या एखाद्या मैदानावर चाललेली टेस्ट. तुमच्या लक्षात असेल तर तेव्हा साधारण पॅव्हिलियन च्या बाजूने एक कॅमेरा लावलेला असे, आणि बराचसा खेळ त्यावर दिसत असे. त्यामुळे मुख्य पिच व जवळचे फिल्डर्स त्यावर दिसत. बाकीचे कॅमेरे अधूनमधून टीव्ही कव्हरेज वर येत. अशीच एक मॅच. बॅट्स्मन एक फटका हवेत मारतो आणि तो स्क्रीन वर दिसणार्‍या भागाच्या बाहेर हवेत जातो. अशा वेळेस दुसरा कॅमेरा आपल्याला तिकडे नेइपर्यंत बघणार्‍याच्या डोक्यात येणार्‍या दोन प्रश्नांची उत्तरे रिची बेनॉ कमीत कमी शब्दांत देतो, "Safe, and Four"! तेथे कोणी कॅच घेतला का, आणि नसेल तर फोर गेली का, बास!

सध्याच्या फिल्डर पेक्षाही जास्त बॉल बडबडीत चेस करणार्‍या, लांबच लांब वाक्ये बोलून तरीही फारशी माहिती न देणार्‍या ("Raina is going after it, will it cross the boundary, it probably will... no he stops it inches before. will they run 3?...") कॉमेण्टेटर्सच्या तुलनेत या जुन्या मॅचेस मधल्या कॉमेण्टरीचे वेगळेपण लगेच जाणवते.

खरे सांगायचे तर एक जबरी कॉमेण्टेटर यापेक्षा बेनॉबद्दल खूप सखोल माहिती नाही. तो खेळाडू म्हणूनही ग्रेट होता, चांगला स्पिनर आणि कप्तान होता, भारतातही चांगला खेळून गेला आहे हे वरवरचे माहीत आहे. पण एक कॉमेण्टेटर म्हणून त्याचा खेळाचा, खेळाडूंचा अभ्यास जबरदस्त होता. त्यापेक्षाही खेळातील विविध स्टेजेस मधे आपल्याला समोर जे पटकन समजत नाही ते सहज 'पिक' करून ते सांगण्याची त्याची पद्धत इतरांपेक्षा त्याचा वेगळेपणा दाखवून द्यायची.

चॅनेल ९, इएसपीन, स्टार स्पोर्ट्स वगैरे वर रिची बेनॉ, बिल लॉरी, इयान चॅपेल, बॉयकॉट, गावसकर, वगैरे लोक असले की कॉमेण्टरीला एक वेगळाच क्लास आहे असे वाटते. त्यात सहसा रिची बेनॉ बरोबर एक दोन भरपूर बोलणारे कॉमेण्टेटर असत. पण त्याचबरोबर समोर जी गेम चालू आहे ती जज करण्याचे, व त्याबद्दल कमीत कमी शब्दांत बोलण्याचे कौशल्य, हे रिची बेनॉच्या कॉमेण्टरीला वेगळेच वजन देउन जायचे. त्यामुळे तो बोलू लागला की लोक लक्ष देउन ऐकत.

त्याचे असंख्य कोट्स माझे फेवरिट आहेत. जे आत्ता लक्षात आहेत ते खाली देत आहे. जसे आणखी आठवतील, सापडतील तसे देइन. तुम्हीही द्या.

"That’s it. Well I think it's only logical. If you need to get 24 runs to avoid follow-on, why wouldn’t you get it in 4 hits"
१९९० च्या लॉर्ड्स कसोटीत भारताच्या ९ विकेट्स गेल्या होत्या व कपिल स्ट्राईक वर होता. २४ रन्स हवे होते. एडी हेमिंग्ज च्या त्या ओव्हर मधे त्याने ४ सिक्सेस मारून फॉलो ऑन टाळला (आणि पुढच्या ओव्हर मधे हिरवानी आउट झाला). तेव्हा बेनॉ ची ही कॉमेण्ट.

"Oh no! Now that could be the match!"
पुन्हा कपिल. १९८५ च्या वर्ल्ड सिरीज कप मधे न्यूझीलंड विरूद्ध सेमी फायनल मधे आधीचे लोक वेगात खेळू न शकल्याने "आस्किंग रेट" बराच वाढला होता. तेव्हा कपिल खेळायला आला. त्यानंतर साधारण १८ वर असताना त्याचा कॅच किवीज नी सोडला. तेव्हा ही भविष्यवाणी. नंतर कपिल ने ३० बॉल्स मधे ५० मारून मॅच जिंकून दिली.

“Is it possible that Imran Khan might just be getting Greg Chappell’s measure?”
ही क्लिप माझ्या दुसर्‍या ("बाउन्सर्स आणि यॉर्कर्स") लेखातही आहे. इम्रान ग्रेग चॅपेल ला ज्या तर्‍हेने सेट अप करत होता ते बहुधा रिची बेनॉ ने ओळखले. नंतर पुढच्याच बॉल ला ग्रेग चॅपेल ची दांडी उडाली.

याखेरीज अनेक अॅशेस मॅचेस, ऑस्ट्रेलियातील इतर टेस्ट्स, भारताच्याही अनेक मॅचेस मधे तो होता. १९९८ च्या शारजाच्या (डेझर्ट स्टॉर्म) स्पर्धेतही त्याने कॉमेण्टरी केलेली आहे. आता त्यातील क्लिप्स पुन्हा बघायला हव्यात.

तुम्हीही द्या माहीत असतील तर अजून!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

चांगल्या समालोचकांच्या यादित गावसकर आणि बिल लॉरी???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

मस्त. लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या.
बेनॉ स्वतःही चांगला खेळाडू होता हे ऐकूनच माहित आहे. कारण आम्ही त्याचं समालोचन बघायचो तेव्हाच तो वयस्क बुजुर्ग म्हणून मान्यताप्राप्त झाला होता. चॅनेल नाइनचा लोगो असलेल्या नऊ चौकटी पार्श्वभूमीला घेऊन स्टायलिशपणे दिवसभरच्या खेळाचा वृत्तांत देत हायलाइट्स दाखवणारा रिची बेनॉ. त्यावेळी इतक्या अॅंगल्समधले चांगल्या दर्जाचे कॅमेरे, छान स्लोमोशन वगैरे बघणं म्हणजे पर्वणी वाटायची. रिची बेनॉचं समालोचन - तटस्थ पण रंगतदार. क्रिकेटच्या वृत्तांतासाठी तो एक सन्माननीय चेहेरा बनला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0