फुरसुंगीचा फास्टर फेणे आणि फास्टर फेणेची फुरसुंगी

फुरसुंगीचा फास्टर फेणे आणि फास्टर फेणेची फुरसुंगी

- केतकी आकडे

.फास्टर फेणे लहानपणी वाचलं तेव्हा ना पुणं माहिती होतं, ना फुरसुंगी! बाकीच्या ठिकाणांची नावंही वाचूनच माहीत. फाफेने त्याच्या २० पुस्तकांच्या कारकिर्दीत अनेक करामती केल्या. रत्नागिरीच्या किल्ल्याजवळच्या गुहेत अडकलेल्या नानांना सोडवलं, फुरसुंगीच्या स्टेशनमधे आलेल्या उमद्या रेसच्या घोड्याला पळवून नेण्यापासून वाचवलं, गुजरातमधे काठेवाडला जाऊन तेल विहिरींमधलं तेल वाचवलं. देशासाठी काहीतरी करण्याच्या दुर्दम्य इच्छेमुळे हा काटकुळ्या मुलगा साक्षात भारत-चीन युद्धात नेफा आघाडीवर पॅराशूटमधून उडी मारली आणि शत्रूचा रणगाडा उलथवला, 'G7' छावणीमधे राहून सैनिकांना पडेल ती मदत केली, प्रसंगी पायावर गोळीही झेलली, तिथल्या गावातल्या मुला-मुलींना गोळा करून 'बनियन कंपू' स्थापन केला आणि कितीतरी चिनी हेर पकडून सैन्याच्या हवाली केले, काश्मीरला गेला असताना तिथेही आपला दोस्त अन्वर याच्यासोबत पाकिस्तानी हेरांचे मनसुबे धुळीला मिळवले, मुंबईच्या समुद्रात एका छोट्या बेटावर असणार्‍या कपारीत लपवून ठेवलेला तस्करीचा माल सोडवला, दहशतवाद्यांनी हायजॅक केलेलं विमानसुद्धा सुखरूप परत आणलं. तुरुंगातून पळालेल्या किती सराईत चोरांना त्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं याची तर गणनाच नाही. आता १०-१२ वर्षं पुण्यात गेल्यावर फाफे पुन्हा वाचायला मिळालं, तेव्हा जाणवले ते फास्टर फेणेमध्ये विखुरलेले अनेक जागांचे संदर्भ. त्यांपैकी पुणे आणि आसपासच्या जागांचा घेतलेला हा धांडोळा!

जुन्या पुण्याचं वर्णन अनेक ठिकाणी वाचायला मिळेल, पण एका काल्पनिक कथेत इतकी हुबेहूब वर्णनं फक्त भागवतच करू जाणोत! फाफेच्या कथांचं पहिलं पुस्तक- 'फुरसुंगीचा फास्टर फेणे' प्रकाशित झालं ते साधारण १९६० च्या सुमारास. नंतर १९८९ पर्यंत इतर सगळे भाग येत गेले. मग त्या पुस्तकांतली वर्णनं वाचून उत्सुकतेपोटी आम्ही त्यांपैकी माहीत नसलेल्या ठिकाणी भटकायचा मनोरंजक उद्योग करायला घेतला.

फाफे वाचताना कर्वे रस्ता, पौड फाटा, पुणे स्टेशन, कँप, लक्ष्मी रस्ता, कसबा पेठ, बंडगार्डन, रेसकोर्स, बिबवेवाडी अशी शेकडो ठिकाणं लगेच डोळ्यासमोर तरळतात. 'साचपिर' रस्त्यासारख्या छोट्या छोट्या दुर्लक्षित जागासुद्धा मधूनच डोकावून जातात. पाताळेश्वर मंदिर आणि त्याच्या गुहेत लपून बसणारा चिनी हेर बन्या आणि त्याची मामेबहीण माली या दुकलीने पकडून दिलेला दिसतो. पानशेत धरण फुटल्यावर आलेला पूर आणि त्या वेळची परिस्थिती याचं अतिशय चित्रदर्शी वर्णन भागवतांनी 'आगे बढो फास्टर फेणे'मध्ये केलंय. जंगली महाराज रस्त्यावरची २०-२२ फुटी झाशीची राणी बुडवणारा पूर किती भयंकर असेल याची आत्ता कल्पनासुद्धा करवत नाही. ज्या पुराने भविष्यात पुण्याचा तिप्पट विस्तार केला, त्या पुराची रेषा अजूनही मुठेच्या पात्राजवळ असलेल्या एका जुन्या इमारतीवर आखलेली दिसेल. अशा पुरात आबासाहेब देवकुळ्यांच्या ऐतिहासिक तळघरातून महत्त्वाची कागदपत्रं आणि माली, मधू यांचे जीव वाचवून 'आमची उडालीय फेफे, लवकर या - फा.फे.' असा संदेश धोतरावर पताकेसारखा लिहून ठेवणार्‍या या हडकुळ्या पठ्ठ्याची गोष्ट कल्पनेतली आहे म्हणता? असेल बुवा!

पुण्याच्या आजूबाजूला असणार्‍या जागांपैकी जेजुरी गड एका कथेत येतो. प्रतापगडावर सहल गेलेली असताना सुभाषचं झालेलं अपहरण, त्याच रात्री झालेला कोयनानगरचा महाभयानक भूकंप आणि त्यातून वाचलेल्या फाफे आणि सुभाषची गोष्ट 'प्रतापगडावर फास्टर फेणे' मधे आहे. 'चिंकू चिपांझी आणि फास्टर फेणे’मध्ये खंडाळ्याचं जंगल, पुणे-मुंबई असा पूर्ण रेल्वेमार्ग आणि त्यात साखळी खेचून ट्रेन थांबवून कर्जतजवळच्या जंगलात चिंकूचा शोध घेणारा फास्टर फेणे दाखवला आहे.

फाफेची शाळा- विद्याभवन- ही साधारण रेसकोर्सच्या जवळपास असावी. आत्ता त्या जागी इतर बर्‍याच शाळा आहेत, पण 'विद्याभवन' किंवा तत्सम नावाची कोणतीही शाळा आढळली नाही. आत्ता हडपसर आणि फुरसुंगीपासून शाळेची जागा जवळ वाटते, पण फाफे पहिल्यांदा गावातून शाळेत आला, तोच मुळी साक्षात ग्लायडरमधे बसून! हे ग्लायडिंग सेंटर अजूनही हडपसरला आहे.


ग्लायडिंग सेंटर, हडपसर

याच हडपसरला फास्टर फेणेचा जालीम शत्रू इंद्रू इनामदार आणि त्याच्या श्रीमंत वडलांचा बंगला होता ते आठवलं. कदाचित इथेच कुठेतरी एका कुंभाराच्या खोपट्यात बनेश आणि त्याच्या जिगरी मित्राला - सुभाषला - किडनॅप करून ठेवलं असेल. ज्या सायकल रेसमध्ये फाफे हरावा म्हणून एवढं सगळं केलं, ती शर्यतसुद्धा याच रस्त्यावर झालीय 'आगे बढो फास्टर फेणे'मध्ये.

मग आम्ही भेट दिली फाफेच्या जन्मगावी - फुरसुंगीला. फुरसुंगी गाव पुण्याच्या पूर्वेला सासवडकडे जाताना डावीकडे लागेल. हडपसरच्या पुढे सोलापूर रस्त्याला गेलात की सोलापूरकडे न जाता वारीच्या मार्गे सासवड रस्ता घ्या; १० मिनिटांवर फुरसुंगी ग्रामपंचायत आपलं स्वागत करेल. पण आपल्या फाफेचं खरं गाव इतक्या लवकर सुरू होत नाही. फुरसुंगी फाट्यावरून सरळ आत गेलात आणि साधारण २ किमी अंतर आत गेलं की खरं गाव सुरू होतं. मोठी उसाची शेतं, छोटेखानी घरं, पेरूच्या आणि नारळाच्या तुरळक बागा, आणि या सगळ्यांसोबत हवेत असणारा उरळीच्या कचरा डेपोकडून येणारा दुर्गंध. अर्थातच हा कचरा डेपो अलीकडचा असावा, कारण फाफेमध्ये असा काहीही उल्लेख नाही. पण हळूहळू त्या वासाची नाकाला सवय होते आणि आपण फाफेच्या गावात शिरतो. भागवतांनी त्या काळी फुरसुंगीला जाण्याच्या बस आणि रेल्वे या पर्यायांचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे. थोड्याफार फरकाने ते आजही तसंच आहे. आधी मला वाटलं होतं की इतर रामपूर, सोमपूर वगैरे सारखं हे काहीतरी काल्पनिक गाव असणार, पण आपण जेव्हा गावात पुस्तकातले संदर्भ शोधायला लागतो, तेव्हा लेखकाचं कौतुक वाटल्यावाचून राहत नाही. एकमेकांशेजारी असलेली मशीद आणि विठोबाचं मंदिर, मंदिरात असलेल्या नरहर महाराजांच्या पादुका, मंदिराबाहेरची चावडी, तुकाई देवीचं मंदिर, त्या शेजारची मराठी शाळा, सगळं अजूनही जागच्या जागी आहे.

मशीद, विठोबाचं मंदिर, तुकाई देवीचं मंदिर, शेजारची मराठी शाळा, मंदिराबाहेरची चावडी

पूर्वीचं पुणं राहिलं नाही असं लोक म्हणतात, खरं आहेच ते! सामाजिक आणि आर्थिक व्यवहार पूर्वीपेक्षा अर्थातच बदलले, लोकसंख्या प्रचंड वाढली. तसंच फुरसुंगीसुद्धा बदललंय. गावात शिरताना लागणारी थोडीफार उसाची शेतं सोडली तर इतर शेतजमीन बरीचशी संपलीय. कौलारू घरं जाऊन पक्की घरं आली आहेत. चावडीशेजारचं वडाचं झाड आणि त्याचा पार मात्र अगदी आत्ता गेल्या वर्षीच्या पावसाला बळी पडला. चावडीचं रूप बदलून तिचा 'ज्येष्ठ नागरिक सेवा संघ' झाला. धुळीने माखलेले रस्ते जाऊन छान सिमेंटचे रस्ते आले आणि जवळ असलेल्या कचरा डेपोमधून उडून येणार्‍या कचर्‍यामुळे असेल, पण गाव मुद्दाम स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न जाणवले.

फाफेच्या पहिल्याच पुस्तकात गावच्या जत्रेची एक गोष्ट आहे. आम्ही विचार केला की एवढ्या सगळ्या खर्‍या खर्‍या जागा गावात सापडल्या, तर या जत्रेबद्दलसुद्धा विचारून पाहू. चौकशी केल्यावर कळलं की ही वैशाख पौर्णिमेची जत्रा त्यानंतर ८ दिवसांतच आहे!
जत्रेचं वर्णन पुस्तकात वाचताना इतकं अतिरंजित वाटतं, की जेव्हा गावकरी 'अहो, खरंच असं होत असतं' असं म्हणाले, तेव्हा त्या जत्रेला हजेरी लावायलाच हवी असं आम्ही ठरवलं. ज्यांना पुस्तकातलं वर्णन आठवत नसेल त्यांना थोडी माहिती सांगते - जत्रेचा मान फार पूर्वी हरपळे घराण्याकडे असावा. पुस्तकात तसा उल्लेख आहे. पण आता गेल्या काही वर्षांपासून तो खुटवड घराण्याकडे आहे. तर या घराण्यातला मानकरी जत्रेआधी ९ दिवस देवीच्या देवळात उपवासाला बसतो. फक्त फळं खायची, दूध, पाणी प्यायचं आणि देवळाच्या आवारातच राहायचं. सुरुवात म्हणून आम्ही बबन खुटवड यांना भेटायला गेलो.

बबन खुटवड

बबन खुटवड आज ८६ वर्षांचे आहेत आणि ते तरुण असल्यापासून हा मान त्यांच्याकडे आहे. आपल्या गावच्या जत्रेचं वर्णन असं कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेल्या पुस्तकात आहे असं कळल्यावर त्यांना इतका आनंद झाला, की त्यांनी आमच्याकडचं 'फुरसुंगीचा फास्टर फेणे' वाचायलाच ठेवून घेतलं.

ऐन जत्रेच्या दिवशी देवीची पूजा होते. ढोल ताशांच्या गजरात मंदिरासमोर पोतराज देवीची गाणी म्हणतो. जो माणूस गाडा ओढणार, त्याची पूजा होते आणि त्याच वेळी त्या उपवास केलेल्या मानकर्‍याच्या अंगात त्या दिवशी देवी संचारते. देवी अंगात येणे हे बर्‍याचदा जत्रांमधे मी याआधी पाहिलं होतं, पण ते विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत. अंगात देवी येणारे पुरुष इथेच पाहिले. डोक्यावर लालभडक रंगाची - धनगर लोक घालतात - तशी पगडी, कमरेला धोतर आणि संपूर्ण अंग हळदीने माखलेलं, अशा वेषात तो माणूस घुमायला लागतो. त्याला कसंबसं आवरत देवीच्या पारंपरिक गाड्याकडे नेलं जातं. या गाड्याला १२ बैलगाड्या एकामागोमाग एक जोडून तयार असतात आणि त्यात माणसं खच्चून बसलेली असतात. तातडीने मानकर्‍याच्या कमरेला दोरी अडकवली जाते आणि तो एकटाच या सगळ्या गाड्या ओढून गावात फिरवून आणतो.

फुरसुंगीतली जत्रा

अंगात येणे हा प्रकार कितीदा पाहिला तरी असं कुणी माणूस आजूबाजूला असलं की तयार होणारं भारावलेलं वातावरण, आख्ख्या गावातल्या लोकांनी त्या माणसाकडे अपेक्षेने पाहत राहणं आणि काहीतरी संमोहन झाल्यासारखं त्याने अपेक्षापूर्ती करणं हे मला पाशवीपणाकडे झुकणारं वाटत राहिलं. यात अजून एक अंधश्रद्धा अशी, की या गाड्यांमधे बसलेल्या आणि आजूबाजूला असलेल्या कुणाच्याही अंगावर काळ्या रंगाचं कापड असेल तर या गाड्या हलत नाहीत. जर गाड्या थांबल्या, तर एक नारळ फोडून हवेत भिरकावला जातो. तो (म्हणे) बरोब्बर जाऊन काळं कापड घातलेल्या माणसाला जाऊन लागतो. आमच्यापैकी एकीनं घातलेलं काळं जॅकेट त्यांनी तिला काढून ठेवायला लावलं.

दुसरं म्हणजे, या फोटोंमधेही नीट पाहिलं तर दिसू शकेल की दोरी जरी एकाच माणसाच्या कमरेला बांधलेली असली, तरी पहिल्या गाड्याच्या दांडीच्या मागे ४-५ चांगले पेहेलवान लोक पोझिशन घेऊन उभे असतात, ज्यांची गाडी ओढणार्‍याला नक्कीच मदत होत असावी. आणि हे सगळ्यांना माहीत असतं, दिसतही असतं पण कुणीही त्याचा उल्लेख करत नाही. जुन्या काळापासून असलेल्या समजुती, त्याही विशेषतः देवाच्या बाबतीत, या इतक्या घट्ट रुजलेल्या असतात की दिसत्या गोष्टीलाही एवढा मोठ्ठा समूह सहज नाकारू शकतो. जत्रेच्या गोष्टीमधेही भागवत या अंधश्रद्धेबद्दल सांगतात. खुद्द फाफेला असं वाटत असतं की त्या बैलगाड्यांच्या आजूबाजूला इतकी माणसं असतात, की ती गर्दी नक्कीच गाड्या पुढे लोटण्यात सहभागी असेल. फाफेच्या त्या गोष्टीत गाड्या मधूनच थांबतात तेव्हा एकाकडे काळा दोरा सापडतो आणि पब्लिक त्याच्या अंगावर धावतं. तेव्हाही फाफे त्या प्रकरणाचा छडा लावतो आणि गाड्या अचानक थांबण्याचं खरं कारण गावकर्‍यांसमोर आणतो. जत्रा बघून पुस्तकातलं ते सगळं वर्णन आठवलं.
हे आम्ही पाहिलेल्या गावच्या जत्रेचे काही फोटो -


अशा एकामागून एक ओळखीच्या गोष्टी गावात जसजशा सापडत गेल्या, तशी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, - हा काल्पनिक का असेना, पण त्यांच्या गावचा असलेला, सुपरहिरो बनेश फेणे गावात कुणालाही माहिती नाही. आम्ही जितक्या लोकांशी बोललो, त्यातल्या फक्त २ लोकांना फास्टर फेणे हे नाव ऐकून माहिती होतं. इतरांना तेही नाही. शाळेपासून सायकल हाणत फाफे आख्ख्या पुण्यात सगळीकडे फिरला, पुण्याबाहेरही अनेक करामती करून तो प्रसिद्ध झाला. पण त्याला ओळखणारे बालवाचक त्याच्याच गावात उरलेले नाहीत.

फाफेच्या गोष्टीतल्या पुण्यात आंतरशालेय सायकल शर्यतींसाठी रस्ते बंद ठेवले जायचे. पर्वतीच्या पायर्‍या सायकल चालवत उतरून दाखवण्याच्या स्पर्धा होत असत. आता स्वतः फुरसुंगीपासून पुण्यात सायकल चालवत आणली तेव्हा जाणवलं की सुरक्षितपणे सायकल चालवता येतील असे रस्तेच पुण्यात राहिलेले नाहीत आणि मुळात फाफेच्या वयाची मुलंही सायकल हे वाहन म्हणून वापरताना फारशी दिसत नाहीत. इतर गोष्टीतल्यासारखी काल्पनिक ठिकाणं फाफेच्या गोष्टीत नाहीत, पण आता अर्थातच सगळे संदर्भ बदलले आहेत.

हे सगळे बदल होणं जितकं अपरिहार्य आहे, तितकंच भाषिक बदल, बदललेली मूल्यं, सादरीकरणाची माध्यमं यामुळे फास्टर फेणेसारख्या गोष्टी विस्मृतीत जाणं हेही अपरिहार्य आहे. जीवनशैलीशी सुसंगत असणारं बरंच बालसाहित्य कायमच कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतं आणि ते स्वागतार्ह आहेच. पण भागवतांचे विशेष आभार यासाठी की त्यांनी तेवढ्यावरच न थांबता फास्टर फेणेच्या निमित्ताने मुलांना देशासाठी प्राण वेचणार्‍या सैनिकांची आणि त्यांच्या कामाच्या गांभीर्याची जाणीव करून दिली. भूकंप, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमधे कसं वागावं ते शिकवलं. गोवा मुक्ती संग्रामासारखे संदर्भ देऊन मुलांची इतिहासाबद्दलची उत्सुकता चाळवण्याचा प्रयत्न केला. अंधश्रद्धा न मानणारा, विज्ञाननिष्ठ, धर्मनिरपेक्ष, भूतदयावादी, दोस्तांसाठी जीव टाकणारा, अतिशय तरल आणि संवेदनशील मनाचा फास्टर फेणे जन्माला घातला. हा फास्टर फेणे आजच्या मुलांनाही नक्की आवडू शकेल. पण फक्त गरज आहे योग्य माध्यमातून केलेल्या सादरीकरणाची!

***

श्रेयोल्लेखाशिवाय असलेली सर्व छायाचित्रे: केतकी आकडे
हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरचे चित्रः जालावरून साभार
फास्टर फेणेचे पुणे: ऋषिकेश

***
field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

छानच! आताचे फुससुंगी आणि पुस्तकातील स्थळे शोधताना घेतलेली मेहनत लेखातून लख्ख जाणवतेय!
नुसती माहिती मिळवणेच नाही तर ती इतक्या छान लेखात बांधणे, तितकेच भारी आहे!

भागवतांचा विशेषांक चहुबाजुंनी बहरतोय!

अतिशय आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला. अशा प्रकारचे खूप कमी लेख बघायला मिळतात. तुम्ही फाफेसाठी जे केले ते जीएंच्या कथांसाठी अमृत यार्दी यांनी एका पुस्तकात केले आहे. "जीएंची कथा- एक परिसर समथिंग" असे काहीसे नाव आहे. मी फक्त परिचय वाचलाय, पुस्तक पाहिलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जुने काहीतरी वाचल्याचे प्रत्यक्षात संदर्भ लागावेत असं खूप वाटत असतं. पुस्तकातलं एखादं पात्र अवचित आपल्यासमोर येउन उभं रहावं असाही एक आयतोबा सारखा विचार आपण करत बसतो, पण मेहनत घेतली जात नाही. ही मेहनत मनापासून केल्याबद्दल अभिनंदन! खूप छान वाटलं… फुरसुंगीच्या लोकांनाच फाफे माहित नसणे काही प्रमाणात अपेक्षित होते… पण असं काही आपल्या गावाबद्दल लिहिलं आहे हे ऐकून त्यांच्या डोळ्यांत आलेली चमक तुला बघायला मिळाल्याबद्दल तर दुबार अभिनंदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कसली मेहनत घेऊन लिहिलेला लेख आहे! फाफेच्या सगळ्या गोष्टी डोक्यात रिवाइण्ड झाल्या...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आंतरजालावर आत्तापर्यंत पाहिलेल्या अंक आणि फीचर्सपैकी सर्वात उत्कृष्टपैकी हा अंक आहे. जबरदस्त रेंज आहे पैलूंची. फॅनफिक, कौटुंबिक भारा, फुरसुंगीचं आजचं रुप, भारांच्या लेखनावर आधारित कलाकृती करणार्‍यांचं मनोगत, भारांचं कौतुक आणि पॉझिटिव्ह्ज दाखवणारे आणि त्याचसोबर भारांच्या लेखनाच्या मर्यादाही नम्रपणे आदरासहित दाखवून देणारे लेख, रेखाचित्रं.. भरपूर विचार करुन खणखणीत अंक काढला आहे.. आभार आणि अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खणखणीत अंक. मुखपृष्ठापासून ते अर्कचित्रांपर्यंत सगळंच दमदार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+२

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१ असेच म्हणते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला! बॅटमॅन म्हणतो त्याप्रमाणे जीएंच्या कथेवरच्या पुस्तकाची आठवण झाली! (असंच पुस्तक लंपनवर यावं अशी एक इच्छा आहे.)

एकदा काही कामासाठी फोर्टात गेलो असताना अचानक "शेरे पंजाब" हॉटेल दिसलं. "दुर्मिळ तिकिटाची साहसयात्रा"मध्ये बिपिन आपल्या टॅक्सीवाल्या दोस्ताला घेऊन इथेच "पुख्खा झोडतो". एकदम भारी वाटलं! त्यावेळी तिथे जाऊ शकलो नाही, आणि अजूनपर्यंत योग आलेला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

(असंच पुस्तक लंपनवर यावं अशी एक इच्छा आहे.)

अगदी असेच म्हणतो. आणि लंपनबद्दल बोलायचं तर त्याचं भाषांतर खास सीमाभागातील कन्नडमध्येही व्हावं असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लंपनच्या पुस्तकात असा एक नकाशा दिला आहे. शिवाय अमलताश नावाच्या संतांच्या पत्नीने लिहिलेल्या पुस्तकातही थोडेफार जागांचे रेफेरन्स सापडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो, तो 'लई बेष्टं' वाला नकाशा. तो माहितीये, पण डीटेल्ड त्याच विषयाला डिव्होटेड असं काही वाचायला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओह, प्लीज!

ज़ी. एंचा विषय निघालाच आहे म्हणून म्हणावेसे वाटते, त्यांच्या एकाच कथेतले बेळगाव लंपनची चारी-पाचही पुस्तके ओवाळून टाकली तरी येणार नाही. लंपन मधलं बेळगाव म्हणजे हम्म्, धोतरीचा पाला!
[एक पार्टली बेळगावकर लंपन हेटर]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

अहो पण लंपन काय फेणेगिणे समजलात का काय तुम्ही म्हणतो मी? फेणे म्हटलं तर गुप्तहेरं, म्हटलं तर डॉन एकदमं! हे लंपन गाव सोडून जायचं अवघड, फेणे गाठ पडला तरच जाणार हेनं. तेच्या गोष्टीत बेळगाव लै दिसणार कसं म्हंटो मी?

अवां औन्द गल्ली बिट्ट जास्ती आड्ड्याडतिद्दिला मत्तु औन्दु पुस्तकवळगं हेंग बरबेकु कंप्लीट ऊरिन वर्णना??????

लंपन वेगळा ओ. त्याला हेट करणारे लोक म्हणजे उदाहरणार्थ रोचक बगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फार छान लेख केतकी. अश्या पद्धतीने अभ्यास आणि कष्ट करुन लिहीलेले ( जालावर ) बघायला मिळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केतकी खरच खुप सुंदर आणि आभ्यास पुर्ण लेखन. फाफे माझ्या अजुनही वाचण्यात आलेला नाही. पण तु फाफेचा घेतलेला मागोवा खुपच छान!! वाचण्यात आलेल स्वता: जाउन अनुभव घेणे हा उपक्रम खुपच स्तुत्य.
पुलेशु!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख छान उतरला आहे. अक्षरक्षः चित्रदर्शी वर्णन आहे. फार आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या ऐसीचा अजुन एक सदस्य 'सिफर' यानेही या लेखासाठी माहिती जमवाजमव करण्यासाठी केतकीला मदत केल्याचे कळते.
केतकी व सिफर दोघांचे आभार मानणे (व कौतुक करणे) अगत्याचे आहे.

दोघांचेही कौतुक! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

__/\__
अरे मेघुतै अन केतकीची आदरयुक्त भिती (दरारा) आणि भितीयुक्त लौ. जमवाजमव करण्याखेरीज काही पर्याय नव्हताच राव ;).

नुक्ता खाल्याबद्दल तुझी पहीली चुक समजून तुला माफ करण्यात येत आहे. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वांचे आभार!! _/\_
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर ग्लायडरमधे बसलेला जो शिळशिळीत म्हातारा दिसतोये ते एक थोर कॅरेक्टर आहे. त्याच्यासोबत उडण्याची मजा काही औरच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! तुम्ही ग्लायडींग केलय? मजा येत असेल :). मलाही करायचे आहे कधीतरी. बंजी जंपिंग करण्याइतकी हिंमत नाही पण ग्लायडींग आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाची कल्पना आणि सादरीकरण, दोन्ही उत्तम.

एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचं लेखन या अंकाच्या निमित्ताने बघून मेघनाबद्दल आदर वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आणि फोटो , दोन्ही आवडले. सिफर आणि केतकीचे खरच कौतुक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम वेगळा लेख.
आजवर तरी काल्पनिक लोकांच्या खर्‍याखोट्या मुळांची तपासणी करणारं काही वाचलं नव्हतं.
ही आयडीया खूप आवडली आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयडियासाठी मेघुतैंना धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केतके, आभार. कशाबद्दल विचार. (आयडियेसाठी घेतलेली "मेहनत" जागोजागी दिसतेय, असं न म्हटल्याबद्दल! ;-))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

केतकी तै,
छान लेख आहे. लेकाची आयडीया छान आहे. फोटो, इ मस्त आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.