मुझे तो हैरान कर गया वो...

नासिर काजमीने खूप गजला लिहील्या. भारतातल्या अंबाल्यात रचला गेलेला हा कवी पुढे पाकिस्तानात गेला. फाळणीवर त्याने पुष्कळ काही लिहीलं आहेच. पण अगदी "हंगामा", "चुपके चुपके" वगैरे ग्लॅमर लाभलेल्या चार गजलांवरच मैफिलीतून उठलेल्यांनीसुद्धा नासिरची "दिलमें एक लहेरसी उठी है अभी" ऐकलेली असते.

"कुछतो नाजुकमिजाज है हमभी
और ये चोटभी नयी है अभी"

ही अवस्था नासिरच्या काही गजल्स पहिल्यांदाच ऐकल्यावर अन वाचल्यावर झालेली असते. पण ते सर्वांना नाही जाणवणार कदाचित. अशातली एक गजल इथे आज घेतो.

गए दिनोंका सुराग लेकर किधरसे आया किधर गया वो
अजीब मानूस अजनबी था मुझे तो हैरान कर गया वो

गेलेल्या काळाची चाहूल परत घेऊन, त्याची जाणीव देत तो कुठून आला आणि कुठे गेला कोण जाणे..! अनोखा आणि अनोळखी मनुष्य हुरहूर लावून गेला.

.....

माझ्यामते हा दुसरातिसरा कोणी नाही.. कवीचाच एक भाग आहे..

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो घुमतो शीळ वाजवतो

ही खरेची कविता अगदी यासारखी वाटते. आपल्यातल्या प्रत्येकात एक रुमानी शख्स असतोच असतो. तो दुनियादारीच्या पलीकडे असतो.

.....

बस एक मोतीसी छब दिखाकर बस एक मीठीसी धुन सुनाकर
सितारा ए शाम बनके आया ब रंग ए ख्वाब ए सहर गया वो

निखळ आनंदाचं वर्णन. आपल्याच हातून झालेलं काहीतरी सुंदर असतं आणि ते नेहमीच एकदाच घडलेलं असतं. आपण बहुतांश लोक वन हिट वंडर्स असतो. आपण शाळेत एकाच मॅचमधे एकच सिक्सर मारलेला असतो. आपण एकच कविता कॉलेजात असताना अफलातून सळसळत्या चैतन्याने लिहीलेली असते. आपण एकाच कॅम्पफायरला गळा खोलून मुक्त गायलेले असतो..

तीच ती आठवण असावी का इथे? एक छोटीसी स्वतःच्या नजाकतीची चमकदार झलक, एक हलकीशी गोड शीळ ऐकवली बस्स.. संध्याकाळचा तारा बनून तो आला आणि पहाटेच्या साखरझोपेतल्या स्वप्नाचे रंग लेवून परत गेला..रात्र जागवलीच..?

.........

न अब वो यादोंका चढता दरिया न फुर्सतोंकी उदास बरखा
यूंही जरासी कसक है दिलमें जो जख्म गहरा था भर गया वो

हा गजलेचा हाय पॉईंट भासतो..

काळ दु:खातून सुटका करतो, तो औषध आहे हे तर घिसंपिटं झालं आता सर्वांसाठी. पण आता सगळ्याच्या पलीकडे पोहोचल्यावर या शांत क्षणी काय जाणवतंय नासिरला?

आता ती आठवणींची समुद्रभरती नाही आणि भरपूर मोकळा वेळ असणारा तो डिप्रेसिंग पावसाळी मौसमही नाही..
पण वेदना जाणवते ती याची की साली ती जखम आता भरुन गेली..

खोल जखम भरली की त्या जागी व्रणाचा जाड थर बनतो. नंतर तिथे जास्तच प्रोटेक्टिव्ह जाडी कातडी वाढते. हायपरट्रॉफी..त्याचं नासिरला दु:ख होतंय.

कोणी असंही म्हणेल की "आता खोल घाव भरला, आणि फक्त जरासं दु:ख शिल्लक आहे" असा सरळ अर्थ यात आहे. नजरिया अपना अपना..

याच चालीवरचा नासिरचाच "दयार ए दिलकी रातमें चिरागसा जला गया" या अतिसुंदर गजलेतला हा शेर आठवतो:

जुदाईयोंके जख्म दर्द ए जिंदगीने भर दिये
तुझेभी नींद आगयी मुझेभी सब्र आ गया

....

याच पोस्ट ट्रॉमॅटिक रिकव्हरी मूडमधे नासिर आपल्याला आणखी घोळवत राहतो:

कुछ अब संभलने लगी है जाँ भी, बदल चला दौर ए आसमांभी
जो रात भारी थी टल गई है, जो दिन कडा था गुजर गया वो

.....

आपण स्वतः आणि "तो" यांच्यात भयंकर फरक आहे हे नासिरला पूर्ण माहीत आहे. म्हणूनच तो ही गजल लिहीत असावा.

बस एक मंजिल है बुल हवसकी, हजार रस्ते है अहल ए दिलके
यही तो है फर्क मुझमें उसमें, गुजर गया मैं ठहर गया वो

शारीर पशुपातळीच्या प्रेमात वाईट असं काही नाही, पण जे त्याचे गुलाम झालेत त्याचं एकच सरळसोट ध्येय आहे.. आणि तिथे ते संपतं.
हृदयापासून प्रेम करणार्‍यांना मात्र हजारो निरनिराळे अनोखे रस्ते घ्यायचे असतात..

हाच फरक आहे माझ्यात आणि त्याच्यात.. मी कुठच्याकुठे गडप झालो आणि तो मात्र मागे उरला..

............................

वो रातका बे नवा मुसाफिर, वो तेरा शायर वो तेरा "नासिर"
तेरी गलीतक तो हमने देखा था फिर न जाने किधर गया वो

तो रात्री भटकणारा भणंग, तुझाच शायर, तुझाच मी..
तुझ्या गल्लीच्या तोंडापर्यंत गेलेला दिसला खरा.. पण नंतर कुठे गेला कोण जाणे..

वाह नासिरसाब.. वाह..

दुभंगलेलं व्यक्तिमत्व असावं तर असं दिलदार...!!! बहोत शुक्रिया, बडी मेहरबानी इस गजल से हमारी शामें भर देने के लिये..

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

माझ्या आवडत्या अल्बमपैकी हा एक. दर वेळी प्रतिक्रिया लिहायला जमतेच असे नाही, पन तुम्ही लिहा, वाचते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अप्पा,

न अब वो यादोंका चढता दरिया न फुर्सतोंकी उदास बरखा
यूंही जरासी कसक है दिलमें जो जख्म गहरा था भर गया वो

हितं

फुरक़त, فرقت म्हंजी जुदाई, सेप्रेशन, हिज्र वगयरे अरथं अस्लेला शब्द हवा हाये. फुर्कतोंकी उदास बरखा असंच आयकू बी येतंया गज़्लेत.

बाय्द्वे, मिराज़ ए गज़ल आप्लावाला पन लय आवडता अल्बम हाये बर्का.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

..फुर्कत असाही शब्द चालला असता..एखाद्या मैफिलीत तो कोणीतरी बदल म्हणून घेतलाही असेल ऐनवेळी.
पण मूळ गजलेत फुर्सतोंकी असंच असल्याने मी ते तसंच उल्लेखलं आहे..लेखात जोडलेल्या साउंडट्रॅकमधे फुर्सतोंकी असंच स्पष्ट गुलाम अली साहेबांच्या तोंडी आहे..तरीही फुरकतोंकी हे व्हेरिएशन उत्तम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रवासात हे ललीत वाचलं अन प्रचंड मोह झाला उत्कृष्ट ही श्रेणी देण्याचा. पण लॉगिन करता आलं नाही. असो.
ती गझल तर चांगली आहेच पण गविंनी दिलेल्या अर्थाने बहार आणली आहे.
_____
पूर्वीचे (अगदी ५ वर्षांपूर्वीचे म्हणा ना) आपण अन आत्ताचे फरक असतो हे खरय. जास्त चांगले अथवा वाईट असतो असे नाही पण वेगळे १००% असतो. पूर्ण इमोशनल लॅड्स्केप क्वचित बदलून गेलेला असतो, बरच पाणी पूलाखालून वाहून गेलेले असते. "वहाणा" हा मुसुंचा मिपावरचा धागा याच विषयावर आहे - http://www.misalpav.com/node/462
____
वेगळाच अर्थ लागला या गझलचा. आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्यातल्या प्रत्येकात एक रुमानी शख्स असतोच असतो. तो दुनियादारीच्या पलीकडे असतो.

शॉल्लेट.

हर महफिल मे शरीख होती है कई सारी महफिले
गौर से देखोगे तो हर शख्स तनहा होगा

अशा अर्थाचा एक शेर आहे. नेमके शब्द आठवत नाहीत. बहुतेक निदा फाजलींचा असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याच हातून झालेलं काहीतरी सुंदर असतं आणि ते नेहमीच एकदाच घडलेलं असतं. आपण बहुतांश लोक वन हिट वंडर्स असतो. आपण शाळेत एकाच मॅचमधे एकच सिक्सर मारलेला असतो. आपण एकच कविता कॉलेजात असताना अफलातून सळसळत्या चैतन्याने लिहीलेली असते. आपण एकाच कॅम्पफायरला गळा खोलून मुक्त गायलेले असतो..

व्यक्ती आणि वल्ली -- "दोन वस्ताद" ; पु ल देशपांडे
.
.
बाकी उत्तम आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फाळणीवर त्याने पुष्कळ काही लिहीलं आहेच.

फाळणीवरील, जाँ निसार अक्ख्तर यांची ही गझल माझा जीव घेते.

https://rekhta.org/nazms/khaak-e-dil-jaan-nisar-akhtar-nazms?lang=Hi
.
लखनऊ मेरे वतन मेरे चमन-ज़ार वतन
तेरे गहवारा-ए-आग़ोश में ऐ जान-ए-बहार
अपनी दुनिया-ए-हसीं दफ़्न किए जाता हूँ
तू ने जिस दिल को धड़कने की अदा बख़्शी नहीं
आज वो दिल भी यहीं दफ़्न किए जाता हूँ
दफ़्न है देख मेरा अहद-ए-बहाराँ तुझ में
दफ़्न है देख मिरी रूह-ए-गुलिस्ताँ तुझ में
मेरी गुल-पोश जवाँ-साल उमंगों का सुहाग
मेरी शादाब तमन्ना के महकते हुए ख़्वाब
मेरी बेदार जवानी के फ़िरोज़ाँ मह ओ साल
मेरी शामों की मलाहत मिरी सुब्हों का जमाल
मेरी महफ़िल का फ़साना मिरी ख़ल्वत का फ़ुसूँ
मेरी दीवानगी-ए-शौक़ मिरा नाज़-ए-जुनून
मेरे मरने का सलीक़ा मिरे जीने का शुऊर
मेरा नामूस-ए-वफ़ा मेरी मोहब्बत का ग़ुरूर
मेरी नब्ज़ों का तरन्नुम मिरे नग़्मों की पुकार
मेरे शेरों की सजावट मिरे गीतों का सिंगार
लखनऊ अपना जहाँ सौंप चला हूँ तुझ को
अपना हर ख़्वाब-ए-जवाँ सौंप चला हूँ तुझ को
अपना सरमाया-ए-जाँ सौंप चला हूँ तुझ को
लखनऊ मेरे वतन मेरे चमन-ज़ार वतन
ये मिरे प्यार का मदफ़न ही नहीं है तन्हा
दफ़्न हैं इस में मोहब्बत के ख़ज़ाने कितने
एक उनवान में मुज़्मर हैं फ़साने कितने
इक बहन अपनी रिफ़ाक़त की क़सम खाए हुए
एक माँ मर के भी सीने में लिए माँ का गुदाज़
अपने बच्चों के लड़कपन को कलेजे से लगाए
अपने खिलते हुए मासूम शगूफ़ों के लिए
बंद आँखों में बहारों के जवाँ ख़्वाब बसाए
ये मिरे प्यार का मदफ़न ही नहीं है तन्हा
एक साथी भी तह-ए-ख़ाक यहाँ सोती है
अरसा-ए-दहर की बे-रहम कशाकश का शिकार
जान दे कर भी ज़माने से न माने हुए हार
अपने तेवर में वही अज़्म-ए-जवाँ-साल लिए
ये मिरे प्यार का मदफ़न ही नहीं है तन्हा
देख इक शम-ए-सर-ए-राह-गुज़र चलती है
जगमगाता है अगर कोई निशान-ए-मंज़िल
ज़िंदगी और भी कुछ तेज़ क़दम चलती है
लखनऊ मेरे वतन मेरे चमन-ज़ार वतन
देख इस ख़्वाब-गह-ए-नाज़ पे कल मौज-ए-सबा
ले के नौ-रोज़-ए-बहाराँ की ख़बर आएगी
सुर्ख़ फूलों का बड़े नाज़ से गूँधे हुए हार
कल इसी ख़ाक पे गुल-रंग सहर आएगी
कल इसी ख़ाक के ज़र्रों में समा जाएगा रंग
कल मेरे प्यार की तस्वीर उभर आएगी
ऐ मिरी रूह-ए-चमन ख़ाक-ए-लहद से तेरी
आज भी मुझ को तिरे प्यार की बू आती है
ज़ख़्म सीने के महकते हैं तिरी ख़ुश्बू से
वो महक है कि मिरी साँस घुटी जाती है
मुझ से क्या बात बनाएगी ज़माने की जफ़ा
मौत ख़ुद आँख मिलाते हुए शरमाती है
मैं और इन आँखों से देखूँ तुझे पैवंद-ए-ज़मीं
इस क़दर ज़ुल्म नहीं हाए नहीं हाए नहीं
कोई ऐ काश बुझा दे मिरी आँखों के दिए
छीन ले मुझ से कोई काश निगाहें मेरी
ऐ मिरी शम-ए-वफ़ा ऐ मिरी मंज़िल के चराग़
आज तारीक हुई जाती हैं राहें मेरी
तुझ को रोऊँ भी तो क्या रोऊँ कि इन आँखों में
अश्क पत्थर की तरह जम से गए हैं मेरे
ज़िंदगी अर्सा-गह-ए-जोहद-ए-मुसलसल ही सही
एक लम्हे को क़दम थम से गए हैं मेरे
फिर भी इस अर्सा-गह-ए-जोहद-ए-मुसलसल से मुझे
कोई आवाज़ पे आवाज़ दिए जाता है
आज सोता ही तुझे छोड़ के जाना होगा
नाज़ ये भी ग़म-ए-दौराँ का उठाना होगा
ज़िंदगी देख मुझे हुक्म-ए-सफ़र देती है
इक दिल-ए-शोला-ब-जाँ साथ लिए जाता हूँ
हर क़दम तू ने कभी अज़्म-ए-जवाँ बख़्शा था!
मैं वही अज़्म-ए-जवाँ साथ लिए जाता हूँ
चूम कर आज तिरी ख़ाक-ए-लहद के ज़र्रे
अन-गिनत फूल मोहब्बत के चढ़ाता जाऊँ
जाने इस सम्त कभी मेरा गुज़र हो कि न हो
आख़िरी बार गले तुझ को लगाता जाऊँ
लखनऊ मेरे वतन मेरे चमन-ज़ार वतन
देख इस ख़ाक को आँखों में बसा कर रखना
इस अमानत को कलेजे से लगा कर रखना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फाळणीवरील, जाँ निसार अक्ख्तर यांची ही गझल माझा जीव घेते.

खूपच सुरेख...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

आपल्याच हातून झालेलं काहीतरी सुंदर असतं आणि ते नेहमीच एकदाच घडलेलं असतं. आपण बहुतांश लोक वन हिट वंडर्स असतो. आपण शाळेत एकाच मॅचमधे एकच सिक्सर मारलेला असतो. आपण एकच कविता कॉलेजात असताना अफलातून सळसळत्या चैतन्याने लिहीलेली असते. आपण एकाच कॅम्पफायरला गळा खोलून मुक्त गायलेले असतो..

बहोत खूब!!! परत परत वाचावे असे रसग्रहण!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही गजल तर सुंदर आहेच. आणि त्याची चाल, ती सुरु होण्याआधीचे, केवळ अप्रतिम हाच शब्द योग्य होईल, असे म्युझिक पीसेस! दोघांनीही सोनं करुन ठेवलं आहे त्यातील गजलांचं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.