वारपुराण

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार… कुणी शोधून काढले असतील माहित नाही, पण तो / ती महानच! अश्मयुगात रोजच उठून शिकार करून खाणाऱ्या, आणि अंधार पडला की काही दिसत नाही म्हणून झोपणाऱ्या "होमो सेपियन" ला अचानक एक दिवस दुसऱ्या दिवसापासून वेगळा आहे हा साक्षात्कार कसा झाला आणि ते दिवस एकदाच न येता परत परत येतात हे सुद्धा कसं कळलं माहित नाही. पण मला पृथ्वी गोल आहे हे एक वेळ पटणार नाही, पण एक सोमवार हा दुसऱ्या सोमवारासारखा असतो आणि एक मंगळवार दुसऱ्या बुधवारसारखा कधीही नसतो हे मात्र अगदी मनापासून मान्य आहे. तशी माझी "श्रद्धा" च आहे. श्रद्धेचा प्रश्न येतो तिथे काही सिद्ध करावं लागत नाही. तरीही, हे वारांचं आख्यान लावतोच आज… कारण तशी गरजच निर्माण झाली आहे.

लहान होतो तेव्हा सोमवार ते शुक्रवार यांच्यामध्ये फरक जाणवायचा नाही. रोज सकाळी उठून शाळेत जायचं हे ठरलेलं. सकाळची सातची शाळा होती तेव्हा, सकाळी "सात" ही फक्त धावपळीची आणि प्रार्थनेला उभं राहण्याची वेळ वाटायची. पण शनिवार सकाळी "सात" ची वेळ ही शनिवारची वेळ जाणवायची. उद्याचे "सात" पहायची गरज नाही आणि आज अर्धी शाळा… त्यामुळे शनिवारी सकाळी सात / साडेसात वाजता ऊन पडलंय असं वाटायचंच नाही. एरवी बुधवारी वगैरे सकाळी पावणेसातच्या उन्हाने पण चटके बसायचे…

रविवारी "सात" ला उठलो नाही तरी आठच्या ठोक्याला वगैरे जाग यायची… आज दादांसोबत (लोकांचे बाबा किंवा पप्पा… आमचे दादा) सोबत बाजारात जायला मिळणार या कल्पनेने मस्त वाटायचं… दादा अंघोळ - पूजा करून बाहेर जायला तयार! त्यामुळे चहासोबत ३ ऐवजी २ च बिस्कीट खाउन पटकन अंघोळ करून तयार व्हायचो. दादा स्कूटरला कीक मारायचे आणि मी समोर ऊभा राहायचो… नुकताच अंघोळ करून आल्याने कान ओले असायचे आणि स्कूटर सुरु झाल्यावर त्यांत थंड वारं जायचं… अहाहा!!

सोमवार ते शुक्रवार जेव्हा सकाळची शाळा होती तेव्हा सकाळी अकरा वाजता दिवस संपत आलेला असायचा. शनिवारी सकाळी अकरा वाजता शाळेतून बाहेर पडता पडताच मित्रांसोबत सगळे प्लान बनलेले असायचे. उरलेला शनिवार त्या plan execution मध्ये जायचा… शनिवारी संध्याकाळी सहा वाजता "पाहुणे" येणार किंवा आपण पाहुणे बनून कुठेतरी पोहे खायला जाणार हे पण ठरलेलं! रविवार सकाळी अकरा वाजता दादांचा बाजार आटोपत आलेला असायचा आणि स्कूटर लांब कुठेतरी लावून मला पायपीट करायला लावली म्हणून मी दादांवर चिडून घरी जेवायला काय असेल याची वाट पाहत असायचो!

रविवारची दुपार पण स्पेशल होती. TV पाहायला बंधन नाही, आई निवांत, ताई तिच्या कामात / अभ्यासात त्यामुळे भांडण वगैरे यांना पण विश्रांती.… दादांचा डोळा लागेपर्यंत पेपर हातात पडायचा नाही, त्यामुळे ते कधी झोपतात त्याची वाट पहायची… मग पेपर, पुरवणी, पुरवणीच्या कोपऱ्यातले अजिबात हसू न येणारे जोक वगैरे सगळं वाचून काढायचं… "संपादकीय" वाचायच्या फंदात पडायचो नाही त्यामुळे उगाच "भेजा फ्राय" वगैरे सुद्धा काही व्हायचं नाही…

कॉलेजात गेलो तेव्हाचे शनिवार रविवार वेगळे होते. आणि आता रविवारी सकाळी दादांसोबत न जाता स्वतःची गाडी काढून गरज असेल तर घरचं काम नाहीतर मित्रांसोबत वगैरे वगैरे… अकरावी बारावीचे रविवार तर आठवतच नाहीत. क्लास / टेस्ट काही न काही… कॉलेजातले सोमवार ते शुक्रवार सुद्धा फार वेगळे वाटत नव्हते.

नोकरीला लागल्यापासून "सोमवार" हा अगदीच वेगळा असा ठळक कळायला लागला. "Monday Blues" वगैरे वगैरे… या दिवसाचा आणि "deadline च्या आधीचा दिवस" हा सोमवार ते रविवार कधीही आदळणारा एक नवा दिवस… या दोन्ही दिवसांचा गळा दाबून खून करावासा वाटायचा… अजूनही वाटतो. फक्त आता "हतबलता" ही भावना वाढत चालली आहे एवढंच…

जसा तो "सोमवार" कळला तसाच अमेरिकेत शिकायला आलो तेव्हा "शुक्रवार" ठळक कळला. अमेरिकेतला "शुक्रवार" हा TGIFच का असतो ते अगदी नीट कळलं. सगळे क्लासेस गुरुवारी संपायचे. शुक्रवारी सकाळी पार्ट टाईम जॉब वर पाट्या टाकून यायच्या आणि दुपारी assignments वगैरे थोडंफार "केल्यासारखं" करायचं… संध्याकाळी पाच वाजल्यापासून "आज रात को क्या करनेका?" या अतिभयंकर प्रश्नावर चर्चा सुरु व्हायची. "आज दारू नको, काहीतरी मस्त करूया!" असा सुरुवातीचा प्रस्ताव असायचा. कुणीतरी चांगला picture डाऊनलोड करायचा, पण तो सगळ्यांना आवडायचा नाही. हव्या त्या movie ची चांगली प्रिंट सापडायची नाही. बाहेर जाणं वगैरे कधीच बारगळलेलं असायचं. शेवटी साडेआठ वाजता कुणीतरी म्हणायचं… "चला लिकर स्टोर ९ ला बंद होण्याआधी घेऊन येऊ…" त्या अर्ध्या तासात आम्ही जेवढं पळायचो तेवढं रोज पळालो असतो तर आज मी फिट असलो असतो! त्या दुकानात गेल्यावर तिथला गुज्जू मालक कमलेश, "आगये!!" असं म्हणून तंबाखूने लाल झालेले दात दाखवत स्वागत करायचा. मग ९ च्या आत त्या मयसभेतून योग्य ती बाटली फायनल करून ८.५९ ला बाहेर पडायचो. क्रेडीट कार्ड ९ नंतर चालणार नाही म्हणून ही ९ ची घाई! मग तिथून घरी येउन १० च्या आसपास प्रोग्राम सुरु व्हायचा… सगळे picture जाऊन जुनेच १०० वेळा पाहिलेले picture पाहता पाहता यापेक्षा भारी कधी झालं नाही आणि कधी होणार नाही, या भावनेने झुलत झुलत आवंढा गिळायचा… हा प्रोग्राम बाटली कमी पडली म्हणून कधी मध्येच थांबायचा… मग "टांगा पलटी घोडे फरार" अवस्थेतच घरासमोरच्या ग्रोसरी वाल्याकडे beer आणायला पळायचो… लाल लाल डोळ्यांनी त्या दुकानात beer च्या fridge समोर पुन्हा "choice" करायची, counter वरचा Joe काहीतरी जोक मारायचा त्याला आपल्या "मादक इंग्रजी" मध्ये उत्तर द्यायचं आणि परत येउन प्रोग्राम कंटीन्यू!!!

लग्न झाल्यावर या अशा शुक्रवारची जागा "रेस्तुरांत" शोधण्याने घेतलीये. शुक्रवारी office मध्ये "रात्रीसाठी प्लेस शोधणे" एवढंच काम असतं हे आता कळायला लागलंय. येल्पपासून urbanspoon पर्यंत सगळा काही चाळून होतं. बायकोने तिच्या ऑफिसमधून तिला पिक करायच्या आधीच काय ते ठरव असा दम दिलेला असतो. आपण लाख caribbean वगैरे हाटेल शोधून जातो, आणि बायको ऐन वेळी माझं पोट भरलं पाहिजे वगैरे म्हणून नेहमीचंच काहीतरी शोधायला लावते. Anniversary सारख्या occasion ला हे शुक्रवारचं व्रत वाट्टेल त्या वारी आणि दुप्पट नाटकी उत्साहाने करावं लागतं. शनिवारची लहानपणीची रम्यता तर आता राहिली नाहीच, पण रविवारचा निवांतपणा, आणि निरागस / "without agenda" अशी वर्तमानपत्रं आणि पुरवण्या वाचन पण संपलंय. आता तर बातम्यांपासून पळताही येत नाही. आता रविवार म्हणजे सोमवारी बॉस ओरडणार म्हणून थरथर कापण्याचा वार, किंवा "सोमवार सहन करता यावा म्हणून आत्ताच काम करून घ्या" असं म्हणण्याचा वार झाला आहे.

काही वेगळेपण संपतंय, आणि काही नकोसं होतंय… आजकाल तर कधी कधी बुधवारही सोमवारचे कपडे घालून येतो आणि रविवाराला त्याचे कपडेच सापडत नाहीत, त्यामुळे तो इतर वारांपेक्षा वेगळा दिसत नाही. त्या होमो सेपियानला वारांचा फरक पडायचा नाही, तसंच आता पुन्हा होतंय की काय माहित नाही. ऐसीवर लेख टाकू म्हणून शनिवारपर्यंत थांबून आता उपयोग नाही, त्यामुळे जी मंगळवार रात्र मिळालीये ती सत्कारणी लावून घेतो.

शेवटी काय, कुणीतरी वार शोधायचे तेव्हा शोधले. पण आता तेच वार वारले तरी फार फरक पडणार नाही!!!

(टीप: हे खूप उस्फूर्त, जसं सुचलं तसं लिहिलंय, त्यामुळे असंबद्ध वाटण्याची शक्यता आहे. मुद्दाम धागा "मौजमजा" सदरात काढतोय. वाचा, पण स्वतःच्या जबाबदारीवर अर्थ वगैरे काढा. Smile )

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

मस्त. मजेशीर. आमची शाळा शुक्रवारी एक तास लवकर सुटायची, शनिवार अर्धा दिवस. पहील्या दोन-तीन नोकर्^या वगळता नोकरीतही शनिवार-रवीवार सुटी; त्यामुळे शुक्रवार कायम आवडीचा.

आजकाल तर कधी कधी बुधवारही सोमवारचे कपडे घालून येतो आणि रविवाराला त्याचे कपडेच सापडत नाहीत, त्यामुळे तो इतर वारांपेक्षा वेगळा दिसत नाही.

आवडलं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त आहे हे.

शनिवार थोर असतो यात वाद नाही. रविवार दुपारनंतरचं डिप्रेशन. शुक्रवारचा फसफसता उत्साह. सोमवार सकाळचं सुतक. सगळं ठीक आहे. याहून निराळं वारांबद्दल काहीतरी म्हणा ना कुणीतरी.

पूर्वी जेव्हा मालिका आठवड्यातून एकदाच लागायच्या, तेव्हा वारांना त्या त्या कार्यक्रमांचे स्वभाव असत. गुरुवार 'देख भाई देख' आणि 'जुबॉं संभालके'मुळे रंगीत. सोमवारी रात्री 'पिंपळपान' लागत असे. 'अंधाराच्या पारंब्या', 'माणूस', 'आवर्तन', 'देव चालले'... साहित्यकृतींचं मराठीतल्या टीव्हीवर जे भलं झालं, ते 'पिंपळपान'मधे शेवटचं. पुढे अंधार. नॅशनल वाहिनीवर 'घुटन' नामक एक रडी, पण इंट्रेष्टिंग आणि अतीव सुंदर शीर्षकगीत असलेली (कहीं सफर है, कहीं अजाब है दिल का... अहाहा!), मालिका गुरुवारी रात्री लागत असे. प्रतिमा कुलकर्णींची 'झोका' बुधवारी रात्री ९ वाजता. त्या काळात बाहेर उंडारून हिरवळ न्याहाळणं चाले आणि घरी परतायला १० तरी होत, तरी बुधवारी नवाच्या ठोक्याला घरात यावंच लागे ते 'झोक्या'मुळे. त्यातलं अमृता सुभाष-सुनील बर्वेचं प्रॅक्टिकल-फ्रेश-हपिसी-मराठी प्रेमप्रकरण बघायला बेहद्द मजा यायची. (तेव्हा निदान मराठीतले तरी दळभद्री डेलीसोप्स 'दामिनी' आणि 'आभाळमाया' इथवरच थांबलेले होते.)

टीव्हीखेरीज वारांना चिकटलेले लागेबांधे म्हणजे खाद्यपदार्थांचे. बाबांना काही काळ उपासाचा किडा चावला होता, त्या काळात शनिवार = साबुदाण्याची खिचडी हे अविभाज्य समीकरण होतं. रविवार सकाळ पोहे आणि केवळ पोहे. नाहीतर थेट मिसळ. बाकीचे दिवस - असले काय, नसले काय.... व्यक्तिमत्त्वहीन.

तुमचे काय आहेत वारांचे लागेबांधे? हापिसाखेरीज आणि शाळेखेरीज काही असेल, तर सांगा बा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रविवार संध्याकाळ म्हणजे ती कातरवेळ, ती हुरहूर, मुख्य जाणीव म्ह. "क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति" ही होय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

परफेक्ट वर्णन त्या रविवार संध्याकाळचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रविवार संध्याकाळ म्हणजे ती कातरवेळ, मुख्य जाणीव म्ह. "क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति" ही होय.

क्या बात है! परफेक्ट!!
झालं, अगदी थोडी वर्षे राहिली आता....
अगदीच मोजायचं झालं तर आठशे सत्तावन्न दिवस!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आठशेसत्तावन्नाचा काय संदर्भ लागला नाय पिडांकाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

८५७ म्हणजे हिलरी किंवा ट्रम्पच्या राज्यात चारऐवजी फक्त एकच वर्षं! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह अच्छा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रविवार = ढीगभर पेपर + पॅटिस/मिसळ हे समीकरण होतं अनेक वर्ष. शनिवार सकाळ = खिचडी हे अनेक वर्ष चालू आहेच. इतर वारी/वेळी खिचडी खाताना विचित्र वाटतं. शाळेत असताना रविवारदुपार इतकं भीषण काही नसे. छान जेवण झाल्यावर आई-वडील सिनेमा बघत बसत आणि मला अभ्यास करायला लावत. रविवार दुपार तेव्हापासून नावडती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

छान जेवण झाल्यावर आई-वडील सिनेमा बघत बसत आणि मला अभ्यास करायला लावत. रविवार दुपार तेव्हापासून नावडती आहे.

मला तर रविवारी सकाळी जास्त झोपूही न देता अभ्यास करायला लावत. वर आणि अलीकडे हे कधी सांगितले तरी "म्हणून इथपर्यंत आलास" ची खास वडिली रेकॉर्ड सुरूच होते. तेव्हापासून तिडीकच बसल्यासारखी आहे....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पेपर आणि पुरवण्या! अहाहा!

गुरुवारी लोकसत्तेची 'रंगतरंग' पुरवणी यायची अनेक वर्षं. तेव्हा तरी त्या पुरवणीत जाहिराती अजिबात नसत. सिनेमातल्या महत्त्वाच्या स्त्री व्यक्तिरेखांवरचं रेखा देशपांडेंचं सदर (भूमिका? बहुतेक), जनरल गॉसिप, क्वचित रसग्रहणं (पण रिव्यू टेम्प्लेटच्या बाहेरची), मुलाखती - असा प्रकार असे. तेव्हाच्या अभिरुचीला ते आवडे. डोक्यानं काढलेली पुरवणी असायची. नंतर तशी डोक्यानं काढलेली पुरवणी मटाची शनिवारची पुरवणी. प्रवीण टोकेकर त्यात हॉलिवुडी नटनट्यांवर एक व्यक्तिचित्रणछाप प्रकार लिहीत. काय स्टाईल! माचकरांचं पोर्ट्रेट नामक शंभरेक शब्दात व्यक्तिचित्र रेखाटणारं एक अफलातून प्रकरण होतं त्यात. ती पुरवणी लावलेली फार मस्त असे. देखणं प्रकरण असायचं. पुढे त्यात जाहिराती घ्यायला सुरुवात झाली आणि मुंटा असं भीषण नाम मिरवून त्या पुरवणीचाही अंत झाला. लोकसत्तेची 'चतुरंग' 'महिला आणि बालविकास कल्याण' खात्याला आंदणच होती आणि आहे. पण त्यातली काही सदरं वाचनीय असत. निदान तात्कालिक तरी असतच. राणी दुर्वेंचं 'शेजार' नामक सुरेख सदर होतं.

रविवारी आवर्जून वाचायचं, वाट पाहून वाचायचं शेवटचं सदर कुठलं होतं बरं? लोकसत्तेत टिकेकरांच्या काळात 'लोकमुद्रा' असे. ती आख्खी पुरवणीच घसघशीत असायची. पण सदर? त्यातल्या त्यात गौतम राजाध्यक्षांचं सदर. पण ते अंमळ छचोर होतं, 'लोकमुद्रे'च्या मानानं तर होतंच होतं. अशोक राण्यांचं 'सखेसोबती', प्रभाळवरकरांची 'अनुदिनी' (पुढे यांतल्या नर्म खुसखुशीत विनोदानं 'टिपरे'मधे बटबटीत अवतार घेतला. कदमबुवा, गोखलेबाई आणि खुद्द प्रभावळकरांचा अभिनय पाहायला मजा यायची. पण त्या सदराचं साटल्य आणि त्या भाषेची सर नाही.) मस्त होती. मटाच्या रविवार 'संवाद'मध्ये दर महिन्याला एक माणूस चार रविवार पुस्तकांबद्दल लिहायचा ते सदर कुठलं? ते कधीकधी जमलेलं असे. 'लोकरंग'मधलं टिकेकरांचं पुस्तकांबद्दलचं सदरही मस्तच होतं.

शनिवारी दुपारी 'महानगर' वाचायलाही मजा यायची. मी 'महानगर' त्याच्या उतरणीच्या काळात वाचला, तरीही. संजय पवारांचं 'चोख्याच्या पायरीवरून' असायचं शनिवारी.

छे! हे टोटल स्मरणरंजन चालू आहे. वारांचं केवळ निमित्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

छे! हे टोटल स्मरणरंजन चालू आहे. वारांचं केवळ निमित्त.

तंतोतंत सहमत. माझ्या खालच्या प्रतिसादात बुधवार बद्दल लिहितांना अगदी हेच वाटलं Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिहायला बसलो तेव्हा पेपर आणि पुरवण्या यांबद्दल इतकंच नेमकं लिहायचं होतं, पण ऐन वेळी नावंच आठवत नाहीत. मी मटा आणि लोकसत्ताची चतुरंग वगैरे आवडीने वाचायचो, "सकाळ" ची पुरवणी पण ठीक… पण लोकमतची पुरवणी तद्दन फालतू होती एवढं मात्र स्वच्छ आठवतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तरुण भारतची एक सिनेमावरची पुरवणी होती. नाव आठवत नाही. पण ती छान होती. कुठल्याशा लेखात (बहुधा सुनील तांबे) इस्तवान त्झाबो हा हंगेरियन दिग्दर्शक मुंबईत फेस्टिवलला आला आणि मग त्याला खरेदी करायला न्यायची जबाबमदारी लेखकावर आली, त्याला डिस्काउंट हवं होतं (इथून तिथून प्रायोगिकवाले गरीबच, यूरोपियन झाले तरी काय झालं! - लेखक), म्हणून मग... असले धमाल किस्से होते. मस्तच पुरवणी. पण ठाण्यात तो पेपर आमच्या पेपरवाल्याकडे मिळत नसे. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तरुण भारतची एक सिनेमावरची पुरवणी होती.

चंदेरी किंवा मायाबाजार नाव असावे असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चंदेरी भवतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मगरपट्टात राहायचे तेव्हा सहाजणी वेगवेगळ्या राज्यातल्या होतो .प्रत्येकजण एकेक दिवशी स्वयंपाक करायची .प्रत्येकीच्या हाताची चव वेगळी . वेगवेगळे पदार्थ शिकणे आणि शिकवणे चालायचे .गोंगुरा पिकल , रस्सम, राजमा चावल, तांदळाची उकड, दाल बाटी , खसखस घालून केलेली फरसबीची भाजी .. गेले ते दिवस ..राहिल्या त्या आठवणी ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

***बुधवार***
बुधवार हा नाशिकच्या बाजाराचा दिवस. हा बाजार नाशिकच्या गोदातीरी (गोदावरी नदी) असायचा. अगदी लहानपणी आजी बरोबर बाजाराला जाणं व्हायचं. ह्या बाजारात नाशिकच्या आजूबाजूच्या खेडेगावातील विशेषतः आदिवासी लोक खुप छान छान वस्तू आणायचे विकायला, लाकडी खेळण्या, बांबू किंवा वेताच्या वस्तू, गोधड्या, बिडाचे तवे-भांडे, मातीची भांडी आणि बरंच. बर्‍याच रान-भाज्या त्या बाजारामुळे समजल्या. ह्या बाजारात ॠतू प्रमाणे खाण्यापिण्याची ही चंगळ असे. उन्हाळ्यात उसाचा रस किंवा ते कोनातले आईसस्क्रिम, हिवाळ्यात गरम गरम मुग-भजी, पाव-वडा(हा एक नाशिकचा खास पदार्थ. पावाच्या आत बटाटा भाजी भरून तो पाव चण्याच्या ओल्या पिठात घोळवायचा आणि तळायचा, त्या सोबत खारवलेल्या मिरच्या. आज-काल चटणीही देतात ती अंबट्गोड). पावसाळ्यात नदीला पुर असल्याने विशेषतः बाजार व्हायचा नाही किंवा पावसामुळे आजी मला न्यायची नाही. हा बाजार करून आलो की घरी येउन आणलेल्या वस्तू पुन्हा पहायला फार मजा यायची. पण काही काळाने हे आठवडी बाजार करणं बंद झालं. पण बुधवार मात्र माझ्यासाठी तरिही विशेष राहिला, कारण नाशिक ला असलेली बुधवारची इंडस्ट्रीयल सुट्टी. बुधवारी नाशिक इंडस्ट्रीयल ऐरीया बंद असे आणि आई-बाबा दोघेही त्या भागात काम करत असल्याने बुधवारची त्यांची सुट्टी आणि माझी मज्जा. बुधवारी अनेकदा आई-बाबा स्वतःहून शाळेत पाठवायचेच नाहीत मला. मग काय, त्यांच्या बरोबर सिनेमे, नाटकं मग त्याला जोडून येणारं बाहेरचं खाणं-पिणं आलंच. कधी आईच्या मैत्रिणी तर कधी बाबांचे मित्र ह्यांचे कुटूंब आणि मग त्यांचे माझे वयाचे मुलं घरी येत असत किंवा आम्ही त्यांच्या घरी - कधी एकत्र जेवणं तर कधी छोट्या सहली, फार काही नाही तर जवळच्या बागेत डबे घेऊन जाणं. घरी आमचे आम्हीच असलो तरी आणि अगदीच काही बाहेरचे बेत नसले तरी घरात नेहमीच्या पोळी-भाजी भात-वरणाला फाटा देऊन वेगळे पदार्थ बनत. माझ्यासारख्या खवैय्याला बाकी काहीही असो, जेवण विशेष म्हणजे दिवस विशेष, हे अगदी लहानपणापासूनच Wink
हे सगळं मी ५-६ वी मधे असे पर्यंत होतं. मग नंतर मी ही टीनेजर वगैरे ने ग्रस्त झालो, आणि दुसरी कडे शाळा/अभ्यास्/ट्युशन्स नावाचा राक्षस जास्त आक्रस्ताळा होऊ लागला, त्याच्या जाळ्यात मी तर अडकलोच पण आई-बाबा जास्तच. त्यामुळे त्यांचा बुधवार चा सुट्टी दिवस बदलून जेव्हा शनिवार झाला तेव्हा आनंदच झाला मला Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्येकाचं वेगळं वेगळं वार-पुराण वाचताना मजा येतेय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रत्येकाचं वेगळं वेगळं वार-पुराण वाचताना मजा येतेय.
खरंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय झपाटलय nostalgiaने सगळ्या लोकांना. ऊत आलाय सगळीकडे नुसता. स्पॉक तुम्हाला माफ करो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

नॉस्टेलजिया ला पर्याय नाही ह्या विषया पुरता तरी..
बाकिचे दिवस तर सेम टु सेम असल्यासारखेच होते, आई-बाबा ऑफिसला,मी आणि बहिण शाळेत किंवा कॉलेज मध्ये. तेव्हाच्या दूरदर्शन वर लागणार्‍या मोजक्याच पण लक्षवेधी सिरियल्स, हाताशी असलेला भरपूर वेळ्...त्यात खेळलेले मैदानी खेळ हा आठौड्याचा फोकल पॉईंट, व महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी आई बाबाना सुट्टी असली की दोन दिवसांची सलग सुट्टी व त्याचे फायदे तोटे असा साधी सोप्पी सऱळ वारांची विभागणी होती.

रविवारी सकाळी उठलं की चिकन किंवा मटणासाठी भरमसाठ लसुण सोलायचे -आलं -लसणाची गोळी करायला, कांदे चिरायचे व नारळ खवणायचे हे एक पक्क बसलेलं समिकरण होतं.

--मयुरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वारांची जाणीव कधी नव्हे ते मला पुण्याच्या नोकरीत झाली. आचरट दंगामस्ती करायला आख्ख्या मैत्रिणी तिथेच पहिल्यांदा मिळाल्या. तिथे माझं दुपारचं जेवण कँटिनात असायचं. वारांप्रमाणे ठरलेलं. इतर वारांचे मेन्यू ठरलेले असायचे, पण बुधवारचे तीन मेन्यू असायचे. त्यातला एक चांगला असायचा बाकी दोन म्हणजे अन्नाच्या नावाखाली सगळा गच्चागोळ असायचा. माझ्यासारखी साध्वीसुद्धा तिथे खाऊ शकत नसे. एक इंजिनियर आणि आम्ही दोघी पोस्टडॉक अशा आम्ही तीन कन्यका बुधवारी बरेचदा बाहेर जेवायला जायचो. आमच्या नादाने ऑफिसातली पोरंही यायला लागली. त्यात बाहेर जेवणाचा भाग कमी आणि आमच्या सुंदर इंजिनियर मैत्रिणीवर लाईन मारणं जास्त असं इतर दोघींचं मत होतं. बाहेर जेवणाच्या नावाखाली काय दंगा चालत असे त्याची थोडी कल्पना इथून येईल.

अमेरिकेत आल्यावर रविवार फारच टोचायला लागलाय. इलेक्टॉनिक्स आणि पुस्तकांची दुकानं, लायब्रऱ्या, ही हक्काची टाईमपास करायची दुकानं रविवारी माध्यान्हीपर्यंत उघडत नाहीत. म्हणून खरेदी उरकून टाकावी म्हणावं तर दारूची दुकानं रविवारी बंद. पहाटे लवकर जाग येणाऱ्या लोकांनी रविवारचा अर्धा दिवस घरात घालवण्याची सक्ती करणाऱ्या मागास आणि धार्मिक अमेरिकेचा निषेध.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शुक्रवार च-ढ-तो! खरच ना कॉफी लागते ना गाणी. शनिवार ह्म्म्म ओक्के. जर शुक्रवार १९-२० वयाचा असेल तर शनिवार २५ शी तीशीचा असतो. रवीवार मात्र उतरंडीची जाणीव करुन देणारा राँग साइड ऑफ फॉर्टीज असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच वाचलेली Reminiscence bump ही संज्ञा (https://en.wikipedia.org/wiki/Reminiscence_bump) आठवली Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम रोचक स्टडी आहे. खरं तर मला खात्री आहे की मेमरीविषयक (स्मृती) बरेच संशोधन चालू आहे. डिमेन्शिआ/अल्झाइमर्स आदि मेमरी रिलेटेड डिसॉर्डर्स, भविष्यात नष्ट होऊ शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणजे आत्मचरित्री म्हातारचळाला खतपाणी घालणारी सोय निसर्गानेच करून ठेवली आहे म्हणायची....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो माझी तिशी पण सुरु नाही झाली अजुन… older adults काय… साधाच nostalgia आहे हा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0