शनी महादशा- दशा की दुर्दशा? महाशंका आणि कुशंका!

तमाम ज्योतिष जाणकार आणि प्रवीण मंडळींना मी काही प्रश्न, शंका आणि कुशंका विचारू इच्छितो. ते सगळे प्रश्न शनीच्या महादशेसंदर्भात आहेत.

१. शनीची महादशा नेहेमी दुर्दशाच करते का?

२. राशीनुसार आणि जन्मलग्नानुसार शनीच्या महादशेचे फळ कमी जास्त तीव्र किंवा कमी जास्त चांगले आणि वाईट असते का? करिअर आणि कुटुंबावर वर काय परिणाम होतो?

३. मित्र ग्रहांच्या राशींना शनी हा त्याच्या महादशेत त्रास देत नाही असे आहे का?

४. शनी महादशेत शनीची साडेसाती आली तर दुप्पट त्रास होतो का? शनी महादशेच्या दरम्यान शनीची अंतर्दशा आली तर काय होते? आणि त्यात शनीची साडेसाती सुरु असेल तर काय होते?

५. शनीच्या राशी कुंडलीच्या ज्या घरात असतील आणि शनी ज्या घरात असेल त्या घरांचे फळ शनी महादशेच्या काळात मिळते का? ते फळ शनी उच्चीचा असेल तर चांगले आणि निचीचा असेल तर वाईट मिळते का? किंवा शनी महादशेत त्या घरांचे नेहेमी वाईटच फळ मिळते?

६. महादाशेचे पूर्ण १९ वर्षे फक्त आणि फक्त त्रासच होतो काय?

७. एखाद्या लहान बाळाच्या जन्माच्या वेळेपासून त्याला शनी महादशा सुरु होत असली तर त्यालाही त्रास होतो का?

८. महादशेत त्रास असलेल्या काळात तीव्रता कमी करण्यासाठी कशाची उपासना करावी? काही उपाय तोडगे? वागण्या बोलण्यात काही बदल करावेत का?

९. एका कुंडलीत मीन लग्न आहे. रास वृषभ असून चंद्र तृतीय स्थानी आहे. अकराव्या आणि बाराव्या स्थानात शनीच्या राशी आहेत आणि शनी कर्केत पाचव्या स्थानात आहे. आणि शनीची महादशा ३०/१०/२०१६ पासून सुरु होत आहे तर त्याचे फळ काय?

(इतर ग्रह स्थिती -
प्रथम स्थान - मीन रास - शुक्र (उच्चीचा)
द्वितीय स्थान - मेष रास - केतू / अष्टम स्थान - तूळ रास - राहू, हर्शल
तृतीय स्थान - वृषभ रास - चंद्र , गुरु
चतुर्थ स्थान - मिथुन रास
पंचम स्थान - कर्क रास - शनी (कर्केचा शनी उच्च कि नीच ?)
षष्ठ स्थान - सिंह रास
सप्तम स्थान - कन्या रास - प्लुटो)
नवम स्थान - वृश्चिक रास - नेपच्यून
दशम स्थान - धनु रास
एकादश स्थान - मकर रास - मंगळ (उच्चीचा)
द्वादश स्थान - कुंभ रास - सूर्य आणि बुध )

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

हा धागा मनातील छोटेमोठे प्रश्न वर हलविता येईल का?
सोनार जी असे प्रश्न "छोटे मोठे प्रश्न" धाग्यात टाका हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमचे एक म्हातारे बॉस म्हणायचे,"शनिमहाराज बुरा नही है. वो सिर्फ तुम्हे दिखाता है की 'देख भाई.. तेरी असली औकात ये है'".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्योतिषशास्त्रात असेच एक्स्प्लनेशन असते शनिमहादशा, साडेसाती, पनवती वगैरेचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या लहान बाळाच्या जन्माच्या वेळेपासून त्याला शनी महादशा सुरु होत असली तर त्यालाही त्रास होतो का?

माझ्या जन्मापासून मला शनि महादशा होती . ती संपेपर्यंत , माझी प्रकृती तोळामासा, काडीपैलवान अशी होती. शनि महादशा संपायच्या वेळेसच, योगायोगाने आम्ही गांव बदललं. आणि पुन्हा योगायोग! माझी तब्येत वेगाने सुधारुन अभ्यासातही मी अव्वल नंबरावर गेलो. आता याचा अर्थ कसा लावायचा ते तुम्हीच ठरवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

बायपोलर होती टीनेजपासून पण नवर्‍याच्या अथक प्रेम-परिश्रमांती शेवटी डाय्ग्नोस साडेसातीत झाली. & that was the best thing ever that happened to me albeit TOUGHEST TOO!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शनीमहाराज कर्मानुसारच फळ देतात. या काळात किंवा हा काळ आपल्यावर येऊ नये असे वाटते त्याने दीन-दरिद्री-अपंग-परित्यक्त-वारांगना-तृतीयपंथी यांना शक्य तितकी मदत करावी. मानवी समूहातील ही अत्यंत दुर्दैवी मंडळी. अशा जीवांना पहिल्यापासून मदत करणे महाराजांना अपेक्षित आहे. पण आपण मात्र आपल्याच कोषात जगत राहतो. मी, माझी पत्नी व मुलं यांच्यासाठीच सारं काही असं मानतो. तसं ते नाहीये! दुःख दारिद्र्य अन्याय अपमानाने होरपळलेल्या जीवांना मदत करा! तुमच्या शक्तीनुसार! मग बघा ही माऊली किती दयाळू होते ते! मंत्र कर्मकांड अनुष्ठान शनीमहाराजांना भुलवू शकत नाही. अत्यंत निरिच्छ व निर्मोही दैवत आहे तो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कर्केचा शनि - डेबिलिटेटेड (=नीचीचा) नाही पण मी ऐकलाय तो शब्द बहुतेक - डेट्रिमेन्टल.
कारण कर्केची विरुद्ध (१८० अंश) मकर ना. मग मकर स्वराशी म्हणून तिथे शनि उच्चीचा नसला तरी खूष असतो.
त्यामुळे कर्केत नाखूष.
___
१२ व्या स्थानातील सूर्य बालपणी पितृवियोग दर्शवतो. असे वाचले आहे. कदाचित वडीलांची बदली वगैरेही असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी आजगायत आपली जन्मपत्री कुणलाच दाखविली नाही. मुलीचे लग्नहि विना जन्म कुंडली मिळविता केले. कारण प्रत्येकाला त्याचा भूतकाळ माहित असतो. वर्तमान तो जगात असतो. भगवंत खेरीच पुढच्या क्षणाला काय होणार हे कुणीच सांगू शकत नाही. कुंडलीतले शनी महाराज सुद्धा. बाकी सूर्याच्या भोवती फिरणाऱ्या शनी ग्रहा जवळ एवढा वेळ नाही कि कुणाच्या डोक्यावर येऊन बसेल.

बाकी सत्य आहे अवकाशात फिरणाऱ्या अब्जावधी ग्रह, नक्षत्र, तारामंडलांचा प्रभाव निश्चित मानवावर पडतो. पण प्रत्येकातून कोणते पदार्थ (जैविक, रासायनिक, किरणे) पृथ्वीवर येतात, याची माहिती असायला पाहिजे.

घरात, घराबाहेर, समुद्र किनार्यावर, पर्वतावर, पृथ्वीवर त्याची राहण्याची जागा, विभिन्न मौसम, प्रत्येक माणसाची शारीरिक आणि मानसिक प्रकृती या सर्वांचा सारासार विचार करता, प्रभावाचा मोजमाप करणे सध्या तरी शक्य नाही. अजून आपल्यापाशी तेवढे उन्नत तंत्रज्ञान नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला ज्योतिषातले काहीही कळत नाही पण आकाशस्थ ग्रहांच्या जन्मवेळीच्या स्थितीवरून व्यक्तीचे आयुष्य कसे असेल आणि जाईल असे सांगण्याचा प्रयत्न हे 'शास्त्र' करते अशी माझी समजूत आहे.

ती जर बरोबर असली तर ज्योतिषाच्या जाणकारांना पुढील बाबतीत कुंडली कशी तयार केली जाईल हे सांगता येईल काय?

चन्द्रावर माणूस आता उतरलेला आहे. त्यामुळे एक पुरुष आणि एक स्त्री चन्द्रावर उतरून तेथे दीर्घ काळ राहून स्त्रीने एका मुलाला जन्म देणे आता अशक्य म्हणता येणार नाही. असे झाले तर त्या मुलाची कुंडली ग्रहांच्या पृथ्वीवरून दिसणार्‍या स्थितीप्रमाणे ठरेल की चन्द्रावरून दिसणार्‍या? तसेच त्या कुंडलीत चन्द्राचे स्थान कोठले असेल?

तसेच जन्मदिवस कसा ठरेल? पृथ्वीवर एक दिवस - सूर्योदय ते सूर्योदय - हा काळ सुमारे २४ तासांचा आहे तर चन्द्रावरचा दिवस - सूर्योदय ते सूर्योदय - सुमारे १५ पृथ्वीदिवसांबरोबर आहे. ह्यापैकी कोठला पकडायचा? असे अनेक अन्य प्रश्नहि सुचतील. त्या प्रश्नांची उत्तरे देता येत नसली तर त्या मुलाला काही भविष्यच नाही असे मानायचे का?

(प्रश्न निश्चितच thought experiment प्रकारचा आहे. येथे आइन्स्टाइनचा प्रसिद्ध thought experiment आठवतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक सांगू शकते की चंद्रावरती गुरुत्वकर्षण कमी असल्याने, प्रसूतीच्या वेळी त्या बाळाला पुश करणं प्रचंड अवघड जाइल. ते काम कठीण आहे.
बाकी प्रश्नांची उत्तरे नाहीत Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कित्येक वर्षांपूर्वी कुठल्यातरी दिवाळी अंकात पाहिलेलं एक व्यंगचित्र यावरून आठवलं. परग्रहावरच्या प्राण्यांचं एक कुटुंब काळजीत पडलेलं होतं, कारण त्यांच्या मुलीला पृथ्वी असल्यामुळे तिचं लग्न जमत नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

अजून शंकांचे दीर्घ आणि लघु प्रकार कोणाला सुचले नाहीत, ही निरागसता, की आत्मनिग्रह? जे काय, ते कौतुकास्पद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतके आशावादी राहू नका. या शंकांचा निचरा झाल्याने बहुतेक जण निपचीत पडले असावेत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. शनीची महादशा नेहेमी दुर्दशाच करते का?

नाही.

२. राशीनुसार आणि जन्मलग्नानुसार शनीच्या महादशेचे फळ कमी जास्त तीव्र किंवा कमी जास्त चांगले आणि वाईट असते का? करिअर आणि कुटुंबावर वर काय परिणाम होतो?

कधी जन्मलग्न प्रभावी असते तर कधी जन्मरास. हे ज्योतिषी आपल्या निरिक्षणानुसार व अनुभवानुसार ठरवतो. त्यामुळे सापेक्ष आहे.

३. मित्र ग्रहांच्या राशींना शनी हा त्याच्या महादशेत त्रास देत नाही असे आहे का?

मित्र म्हणुन उपद्रवमूल्यात तो सवलत देतो.पण उपद्रव हा हक्क.

४. शनी महादशेत शनीची साडेसाती आली तर दुप्पट त्रास होतो का? शनी महादशेच्या दरम्यान शनीची अंतर्दशा आली तर काय होते? आणि त्यात शनीची साडेसाती सुरु असेल तर काय होते?

नाही साडेसातीत उत्कर्ष झाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. दशा अंतर्दशा व साडेसाती एकत्र आल्याने परिणाम दुप्पट होतो हे स्केल चुकीचे आहे. फारतर वाढतो असे म्हणता येईल.

५. शनीच्या राशी कुंडलीच्या ज्या घरात असतील आणि शनी ज्या घरात असेल त्या घरांचे फळ शनी महादशेच्या काळात मिळते का? ते फळ शनी उच्चीचा असेल तर चांगले आणि निचीचा असेल तर वाईट मिळते का? किंवा शनी महादशेत त्या घरांचे नेहेमी वाईटच फळ मिळते?

राशीकुंडली पेक्षा लग्नकुंडली विचारात घ्या. शनी उच्चराशीत म्हण्जे तुळेत असला तरी झटका देतो असे ज्योतिषि मानतात. याला जमीनीवर आणणे म्हणतात. शनी हा माज उतरवणारा ग्रह आहे. नीचेचा शनी हा न्यायनिष्ठुर असतो. याला वाईट म्हणायचे असेल तर म्हणा.

६. महादाशेचे पूर्ण १९ वर्षे फक्त आणि फक्त त्रासच होतो काय?

नाही.

७. एखाद्या लहान बाळाच्या जन्माच्या वेळेपासून त्याला शनी महादशा सुरु होत असली तर त्यालाही त्रास होतो का?

नाही.

८. महादशेत त्रास असलेल्या काळात तीव्रता कमी करण्यासाठी कशाची उपासना करावी? काही उपाय तोडगे? वागण्या बोलण्यात काही बदल करावेत का?

उपाय तोडगे हे थेट ज्योतिषात नाहीत. ते अप्रत्यक्ष आहेत. सश्रद्धांना त्याचा उपयोग होतो. त्रास असलेल्या काळात वागण्या बोलण्यात बदल करावेत. सायकोथेरपीस्टचा आधार घ्या. अश्रद्धांनाही उपयोग होतो.

टीप- काटव्यांचे शनि विचार हे पुस्तक वाचा. तसेच द्वा. ना. राजे यांचे जातकदीप हे पुस्तक वाचा.
अवांतर- आपल्या कुंडलीत नेपच्चून प्रभावी दिसतो.
भविष्य- काही वर्षांनंतर या सर्व प्रकारात काही अर्थ नाही ही भावना आपल्याला एकदा तरी जाणवेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/