कविंनो, तुम्ही कवितेच्या धंद्याला तयार आहात का?

नव्वदोत्तरी कविता

कविंनो, तुम्ही कवितेच्या धंद्याला तयार आहात का?

कवी - श्रीधर तिळवे-नाईक

कविंनो ,

एकविसाव्या शतकातील कविंनो

साधारण एक मिल्लीयन डोळे डीजीटल
पण कवितेला अवेलेबल फक्त दहा

इन्टरनेटवर नग्नता सिडक्शनचि लाल बाराखडी गिरवत बॉडीफोय होतीये
कम्युनिकेशनचि battery all time चार्ज होतीये
इन्फरमेशनला fashion चा दर्जा प्राप्त होतोय
आणि जो तो तिने डीझाईन केलेले कपडे घालून वेबसाईटतोय

ह्या बेसुमार काळात
कवितेच्या कपड्याखाली बॉडीच उरलेली नाहीये
कवितेची battery हृदयाला रिचार्ज करत नाहीये
कवितेच्या वेबसाईटवर कुणी राहायला येत नाहीये

अश्यावेळी कवितेच्या धंद्याला तुम्ही तयार आहात का कविंनो ?

चेहऱ्यांना मेकप करून त्यांना मुखवटा बनवणारे सौंदर्यशास्त्र आसपास
विशफील थिंकिंगचा सोप ओपेरा सादर करणारे व्यवहारज्ञान थेट श्वासात

हे पाईपड्रीम आहे की पाईपांचा बिझनेस आहे ?
हे टेकचे फ्युचर आहे कि रीवोल्युशनचे फीचर आहे ?

कंपन्या रीस्कमध्ये भळभळतायत कि फळफळतायत ?
हा काळावरचा आक्षेप आहे कि काळातला हस्तक्षेप आहे ?

माणसाला डीजीटीव नेटिव बनवणारा हा काळ
काळजाला सोशल मेडीआ बनवणारा हा इंटरनेटचा फाळ

कवितेचे फळकूट घेवून कुठे जाणार आहात कवींनो ?

जो स्नूझर तो लूझर
जो गेट तो ग्रेट

कॉम्पुटरपुढे सर्व समान
कॉम्पुटरपुढे सर्व सामान

साईझ इररिलेवन्ट होत चाललेल्या ह्या अवकाशात
कवितेच्या फॉर्मवर कसली बोडक्याची चर्चा करताय कवींनो ?

सर्वत्र रिटर्न मिळण्याऱ्या ह्या काळात
कवितेवर परतावा नाही
जगभर पळाली तरी
कौऊटिंगमध्ये तिच्या नावाने धावा नाहीत

ती चेंजचा ईवोल्विङ्ग फोर्स नाही
ती कशाचाही ओरीजनल सोर्स नाही

ना बेटर ना चीपर ना फास्टर
ना सेवर ना लीपर ना सर्वर

ती मार्केटमध्ये इतकी इररीलेवंट
कि तिला धन्द्यालाही बसवता येत नाही

ती पाळीत कायमची उभी कवींनो
मुलांना जन्म देवून जळतिये तिची नाभी

ती वाचकात नाहीशी होणार नाही
ती वाचक नसल्याने नाहीशी होणार आहे

तेव्हा
सेकंदाला दहा लाख ढग तयार करण्याऱ्या ह्या कूल वादळात
कवींचे कुल
एप्रिल फूल आहे………………कवींनो

---

माझी कविता

सगळच बाजारात सरकवण्यात येतंय
आणि मी
जो कधी ईश्वरावर कुर्बान झाला नाही
कि राष्ट्रासाठी ज्याने हौतात्म्य स्वीकारले नाही

ज्याने गुड democrate आणि गुड communist वा socialist व्हायला
कायम नकार दिला

स्वतःच्या दारावर पहारा देतोय

माझे घर अद्याप बाजार झालेले नाहीये

धर्माचे mall
ideology चे mall
management चे mall
उभे करून
बाजार माझ्या दारात उभाय
आणि मी फक्त अध्यात्म बनून
स्वतःची नाणी पाडायला नकार देतोय

खरेतर भाषाही सेल ला लागून
शेवटी विकली गेलीये

माझी सर्व बाजूंनी कोंडी केली गेलीये

मी मरण्याआधीच
माझ्या शवाचा वास
सर्वत्र धाडण्यात आलाय
माझ्या हाताची सालटी सोलून
माझं नशीब हिस्कावण्यात आलंय
माझी कविता jokology चा syllabus झालीये

तरीही गरम रक्ताच्या झऱ्यात
मी आंघोळ करतोय
माझे श्वास
हवेवर ''प्राण'' लिह्तायात

माझी प्रत्येक होम डीली व री
बंद करण्यात आलीये

काहीही करून मी बाजारात उतरावे म्हणून
हे प्लांनिंग आहे

management चे school पचवलेले लोक मला पटवताय त
प्रत्येक माणूस कसा commodity आहे

आणि तरीही मी माझ्या आत्म्यात
गोसीपच्या फुशारक्या मोडून काढत
येणारा प्रत्यक्ष क्षण ''जिवंत'' वाजवतोच आहे

रोज कुरियरने येणाऱ्या फॉर सेल च्या पाट्या
घराबाहेर फेक्तोच आहे

लोकांना वाटतय
मला वेड लागलय
मला माहित आहे
मी माझ्या युगाची

कविता जगतोय.

---

बॉडी

मी केवळ ऑर्गनाईज झालेली पेशींची पाशवी सेन्द्रीयता आहे का ?

टीशुजच्या टीशुज
पेपरपासून बनलेली होमो जीनस झाडे
माझ्यात अहोरात्र जागी
मसल टिश्यूची फसल प्रत्येक क्षणी वाढ-वति

पेशींचा हा कलरफुल हंगामा
सर्व हंगामात डान्स करत शिवनंगा
प्लाझ्मा मेम्ब्रान्सचा ट्रान्सडिस्को
सायटोप्लाझ्मचे हेरीडेटरी मटेरियल
हरदम परंपरेत स्टेज सेट करत

प्रत्येक पेशी माझ्या फिजिकल body-स्टेटचा नागरिक
एका नागरीकातून दुसरा दुसऱ्या नागरीकातून तिसरा तीसऱ्यातून चौथा
हा एक संरचित राजकीय प्लान आहे कि
सायटोप्लाझ्मिक पुलांचे बहुपेशीय नेटवर्किंग ?

प्रत्येक पेशीला न्युक्लीयसचा टपोरा डोळा
स्वतःत वाकून काय पाहतोय ?

अवयव ?
ईश्वर ?
सैतान ?
सत्ता ?
की फक्त स्वतःची पेशीयता ?

बेसिक कम्पोनन्टची ओरीजनल सतत फोटोकॉपिवत
काय रिपीट करतीये ?

मी केवळ blocks ची मांसबिल्डींग आहे का ?

सगळ एकत्र आलं कि सगळ सगळीकडे बदलत नाही का ?

मी माझ्या बॉडीला प्रश्न विचारतोय
आणि बॉडी मला पूर्ण फाट्यावर मारत
स्वतःच्या प्रॉपर्टीज वाढवत
सेल्युलर मुसंडीज मारतीये

---

(सर्व कविता अद्याप असंग्रहित; आगामी 'क.व्ही. २' संग्रहातून)

सर्व प्रताधिकार लेखकाकडे आहेत. मजकूर पूर्णत: वा अंशत: प्रकाशित वा कुठल्याही माध्यमातून प्रसारित करण्यासाठी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच अशा कुठल्याही प्रसारित/प्रकाशित केलेल्या मजकुरासोबत प्रस्तुत लेखाचा 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील दुवा (weblink) देणे आवश्यक. ते शक्य नसल्यास ' 'ऐसी अक्षरे' - दिवाळी अंक २०१५ (http://aisiakshare.com/diwali15) मधून' असे नमूद करणे बंधनकारक राहील.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहील्या कवितेतील दु:ख पोचले.

"ती पाळीत कायमची ...."

वा! बाहेर बसलेली Sad ..... खास कवि उपमाच
____

विशफील थिंकिंगचा सोप ओपेरा सादर करणारे व्यवहारज्ञान थेट श्वासात

ही उपमादेखील खूप आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0