अनुभव - माझी मैत्रिण - सारिका

आकृती/चित्रे साभार - षटचक्रे - दर्शन व भेदन (संग्रह- विश्वास भिडे)
___________

माझी अन तिची भेट होणे हे मी माझे पूर्वसुकृत समजते. तिच्याशी दाट मैत्री होणे, मला, तिला जवळून पहावयास मिळणे हा मी माझा भाग्ययोग समजते. ऐसीवरती अनेक तर्काधारित , Rational लेख येतात. कारण काही का असेना पण अध्यात्मिक, metaphysical लेख खूप कमी येतात. नगण्यच येतात. त्या पार्श्वभूमी वरती माझ्या मैत्रिणी बद्दलचा हा अत्यंत intimate लेख मला टाकावासा वाटला. ज्यांना या विषयाची आवड असेल त्यांनी वाचावा अन्य लोकांनी Quackery (भोंदूगिरी) म्हणून सोडून द्यावा. या लेखातून मला माहीत असलेले थोडेसे अध्यात्मिक्/मेटॅफिझिकल ज्ञान देण्याचा हा प्रयत्न.
.
कुंडलिनी जागृत होण्याकरता लागणारे योगिक सामर्थ्य ना तिच्यात होते ना तेवढी गतजन्मीची पुण्याई. पण शुक्र-चंद्र-नेपच्युन त्रिकुटाच्या शुभ खरं तर शुक्र+नेपच्युन घट्ट संलग्न व चंद्र दोघांना त्रिकोणात अशा इन्टेन्स योगामुळे तिला काव्य-अध्यात्म-मानसशास्त्र या तीही मध्ये नक्कीच आवड व गती होती. पण नुसती गती असून उपयोग नसतो, ज्याप्रमाणे शस्त्र वापरून वापरून बोथट होते त्याप्रमाणेच उपासने शिवाय, अंगभूत गुणांना अनंत मर्यादा येतात हे ती जाणून होती. अर्थात वेळ मिळेल तेव्हा उपासना , स्तोत्रपठण, ध्यान आदि चांगल्या सवईन ची जोड व शिस्त तिने अंगिकारली होती.
.
हां तर ही गोष्ट आहे तिची जी मूलाधार चक्राच्या व आज्ञा चक्राच्या आवर्तनात आंदुळत असे अशा माफक प्रमाणात मिस्टिक स्त्रीची.
.
पहाटे उठून शुचिर्भूत अशा तिच्या दिवसाची सुरुवात सर्वात प्रथम गणपतीची पूजा व स्तोत्रपठणाने होई. प्रथम चक्राचे मूलाधारा चे स्पंदन हे दिवसाच्या प्रारंभी होणे आवश्यकच असते हे ती जाणून असे. लाल अर्थात कुंकुम वर्णाच्या,चार दलांच्या या ऊर्जा चक्राची देवता गणपती.


वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥


https://html2-f.scribdassets.com/8r2nozibggu4hn9/images/20-b2e1ad9da0.jpg

निरोगी रीतीने स्पंदन झाले (pulsate ) झाले तर "सर्व्हायवल" अर्थात अस्तित्वाच्या लढाईत विजय मिळवुन देणारे, संपूर्ण अस्तित्वाचे पायाभूत चक्र. शरीराची पूर्ण फ्रेम = अस्थी, मज्जा, त्वचा ज्याप्रमाणे हाडांच्या सांगाड्यावर उभी असते एका structure वरती आधारीत असते त्याप्रमाणे सर्व वरची सर्व चक्रे या बेस चक्राच्या स्पंदनावरतॆ अवलंबून असतात. दिवसाची किंवा कोणत्याही कार्याची सुरुवात उगाच नाही गणपतीच्या मंत्राने करत. या तिच्या चांगल्या दिनक्रमाच्या प्रारंभाने की काय परंतु "पैशाची" चणचण तिला ना कधी भासली ना तिचे अस्तित्व कधी jeopardise झाले. व्यवस्थित नोकरी, सांभाळून, दोन तीन मंद्या अनुभवूनही ती नेहमीच आर्थिक दृष्ट्या सुरक्षितच राहिली नाही तर एखाद्या सावली देणार्या वटवृक्षा प्रमाणे ती आपल्या कुटुंबाचा आधार बनून राहिली.
.
पुढे दिवसभरात स्वाधिष्ठान (प्रसिद्धी ज्याच्या कारकत्वाखाली येते असे चक्र), मणिपुर व अनाहत (अतीव मधुर असे भक्तीचे प्रेमाचे) चक्र यांचे कोवळे, फिकट स्पंदन ती अनुभवत राही, आणि कोणते चक्र केव्हा pulsate (स्पंदित) होते आहे त्याचे भानही तिला बरेचदा ८०% वेळा तरी रहात असे.अर्थात चक्र स्पंदित होते म्हणजे शारीरीक दृष्ट्या काही चुणचुण वगैरे अनुभवते अशातला भाग नसून मानसिक प्रतलावर या गोष्टी सूक्ष्म अशा जाणवतात असे तिचे म्हणणे. म्हणजे एखादी कविता किंवा राधा-कृष्ण रासक्रीडा वाचून हृदय उलल्याप्रमाणे वाटणे, उमलल्याची "भावना" होणे, अतिशय प्रेमाने चित्त दाटून येणे आदि वर्णन ती करत असे.
.
रात्री गादीवर पडल्यावर मात्र तिला वेध लागत ते भ्रूमध्य द्विदल (हं, क्षं) आज्ञा चक्राचे. तिची स्वप्ने खूप मोठ्या प्रमाणात psychic च असत. बरेचदा तिच्या स्वप्नात विस्तृत जलाशय, निळे पाणी, स्फ़टीकासारखे चमकणारे कृश अथवा मध्यम जलप्रपात दिसत, बरेचदा वनचर, पक्षी दिसत. क्वचित कीटक, फुलपाखरे यांचे copulation स्वप्नात नजरेस पडे , कदाचित भूतनाथ (चराचरातील प्राणीमात्रांचा ईश्वर) व काही जलदेवता तिला प्रसन्न असाव्यात.


पशुपतीन्दुपतिं धरणीपतिं
भुजगलोकपतिं च सती पतिम् ॥
गणत भक्तजनार्ति हरं परं
भजत रे मनुजा गिरिजापतिम् ॥


https://html2-f.scribdassets.com/8r2nozibggu4hn9/images/65-b53923bd91.jpg

निळ्या जलाशयात कधी बचकन हात किंवा पाय बुचकळल्याचा प्रमाद तिच्या हातून स्वप्नातही घडत नसे.
९९% वेळा पाणी स्वप्नात आलेल्या रात्री नंतरचा दिवस उन्मनी जात असे, अतिशय समाधानाने काठोकाठ भरलेला. किंबहुना रात्री पडणारया स्वप्नावरून आजचा दिवस कसा जाणार हे ती ९९% अचूक सांगू शके. स्वप्ने दिवसा खूप काळपर्यंत लख्ख आठवत - आज्ञा चक्र pulsate होण्याचे अजून एक व्यवच्छेदक लक्षण. कवितेतील गूढार्थ अचानक समजणे व एकंदर जीवनाबद्दल एक intuitive understanding असणे, घटनांचे symbolic (प्रतिकात्मक) अर्थ आकळणे - हे दुसरे लक्षण.
.
आमची मैत्री अद्याप. अजून तरी घट्ट आहे. मलाही नेमकी ज्योतिष, अध्यात्म व काव्य या विषयांची आवड असल्याने तिला काय म्हणायचहे आहे ते मला कळते. आमच्या तारा जुळतात, अगदी resonate होतात . किंबहुना ती माझी प्रियतम मैत्रिण असल्यामुळेच मी "सारिका" हा आय डी घेतला असे म्हणता येईल. तिच्याबद्दल लिहायचे होते. काल-परवा मध्ये तिची परवानगी घेऊन हा लेख टाकत आहे. हो ती मला स्वप्नांपासून सर्व इन्टिमेट गोष्टी सांगते. विचित्र वाटले तर वाटू दे पण आमची बालपणापासून मैत्री आहे. मला ती सख्ख्या बहीणीसारखी आहे. माझी अतिप्रिय मैत्रिण असल्याने कृपया तिच्यावरची व्यक्तीगत टीका टाळावी. अर्थात ही फक्त विनंती आहे, बाकी ऐसीवर कधी होत नाही परंतु माफक प्रमाणात झाली धुळवड तर होऊ देत अजुन काय बोलू. खरं तर इतक्या pessimistic नोटवर हा लेख संपवायचा नव्हता. पण असोच : )

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet