जंटलमन्स गेम - ५ - बॉयकॉट, बोथम आणि चॅपल!

१९६५ चा सप्टेंबर महिना...

लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर जिलेट कप या वन डे टूर्नामेंटची फायनल सुरु होती.
प्रतिस्पर्धी होते सरे आणि यॉर्कशायर!

सरेचा कॅप्टन मिकी स्टुअर्टने टॉस जिंकून फिल्डींग घेतली होती. यॉर्कशायरच्या बॅट्समननी केलेली कमालिची संथ सुरवात स्टुअर्टचा हा निर्णय सार्थ ठरवणार अशीच चिन्हं दिसत होती! पहिल्या १४ ओव्हर्समध्ये केवळ २२ रन्स निघाल्या होत्या! वन डे क्रिकेट बाल्यावस्थेत असलं, तरी इतक्या संथ सुरवातीची अपेक्षा कोणालाच नव्हती!

विशेषतः यॉर्कशायरचा कॅप्टन ब्रायन क्लोजला!

सॉमरसेट विरुद्ध क्वार्टरफायनलमध्ये या दोघांपैकी एकाने २३ रन्स काढण्यासाठी तब्बल ३२ ओव्हर्स खेळून काढल्या होत्या! मात्रं फायनलमध्ये हे अर्थातच परवडणारं नव्हतं! बहुतेक याच हेतूने डेव्हीड सिडनहॅमच्या बॉलवर केन बॅरींग्टनने ओपनिंगला आलेल्या केन टेलरचा कॅच घेतल्यावर नेहमी पाचव्या किंवा सहाव्या नंबरवर येणारा क्लोज वन डाऊन बॅटींगला उतरला. क्रीजवर पोहोचताच त्याने दुसर्‍या ओपनरला ठणकावलं,

"Listen, if I call, you bloody well run!"

क्लोजच्या या वक्तंव्याचा आणि त्याने दिलेल्या 'कानमंत्रा'चा चांगलाच उपयोग झाला!
त्या दुसर्‍या ओपनरने १५ बाऊंड्री आणि ४ सिक्स मारत १४६ रन्स फटकावल्या!

कॅप्टन क्लोज (७९) बरोबर त्याच्या १९२ रन्सच्या पार्टनरशीपमुळे यॉर्कशायरने ६० ओव्हर्समध्ये त्यावेळी रेकॉर्ड ३१७ रन्स काढल्या आणि सरेला अवघ्या १४२ रन्समध्ये गुंडाळत तब्बल १७५ रन्सनी चँपियनशीप जिंकली!

हा दुसरा ओपनर म्हणजे दुसरं-तिसरं कोणी नसून जेफ बॉयकॉट!

यॉर्कशायरच्या बार्न्सली क्रिकेट क्लबमधून बॉयकॉटने आपल्या करीयरची सुरवात केली. बार्न्सलीच्या संघात निवड होण्यापूर्वीही अनेकदा तो तिथे प्रॅक्टीससाठी जात असे! एक दिवस प्रॅक्टीस संपल्यावर आपल्यापेक्षा सिनीयर असलेल्या दोघा खेळाडूंशी बोलताना तो म्हणाला,

"By the time I am 23, I shall have full white rolls of Yorkshire on my cap and England lions on my chest!"

अद्याप बार्न्सलीच्या संघातही निवड झालेली नसताना त्याच्ता स्वरातला ठाम आत्मविश्वास ऐकून ते दोघे चकीत झाले!

एकजण होता पुढे ब्रिटनमधला सगळ्यात यशस्वी टॉक शो निवेदक मायकेल पार्कीन्सन!
आणि
दुसरा यॉर्कशायरसाठी काऊंटी खेळलेला आणि अंपायर म्हणून जगप्रसिद्ध असलेला हॅरॉल्ड 'डिकी' बर्ड!

वयाच्या २३ व्या वर्षी यॉर्कशायर आणि इंग्लंडसाठी खेळण्याचे आपले शब्दं बॉयकॉटने खरे करुन दाखवले!

डिकी बर्ड म्हणतो,
"His application, concentration and absolute belief in himself! He had one great gift, mental strength. You can have all the coaching in the world but the most important thing is to be mentally strong!"

मात्रं हे सगळं असूनही बॉयकॉट ओळखला गेला तो स्वार्थी, स्वत:पुरता आणि स्वतःच्याच अपार प्रेमात असलेला - सेल्फ ऑब्सेस्ड खेळाडू म्हणूनच!

अर्थात याला केवळ तो स्वतःच जबाबदार होता!

१९६२ मध्ये यॉर्कशायरसाठी बॉयकॉटने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा तो तसा अपयशीच ठरला होता. यॉर्कशायर कमिटीच्या सदस्यांचं त्याच्याबद्दल प्रतिकूल मत होतं. परंतु अशावेळी बॉयकॉटच्या मागे भक्कमपणे उभा ठाकला तो ब्रायन क्लोज! १९६३ मध्ये क्लोज कॅप्टन झाल्यावर बॉयकॉटला यॉर्कशायरच्या टीममध्ये ठेवण्यासाठी त्याला बरीच मेहनत करावी लागली होती! अर्थात क्लोजचा विश्वास पुढे बॉयकॉटने सार्थ ठरवला! त्याने आपल्या पहिल्या दोन काऊंटी सेंच्युरीज काढल्या त्या लँकेशायर विरुद्ध!

(इंग्लिश कौंटी क्रिकेटच्या इतिहासात लँकेशायर विरुद्ध यॉर्कशायर ही अ‍ॅशेस किंवा भारत - पाकिस्तान पेक्षाही 'पुरानी दुष्मनी' आहे!)

यॉर्कशायरच्या खेळाडूंमध्ये जिगरबाज खडूसपणा, विशेषतः बॅटींगच्या बाबतीत पुरेपूर भिनलेला! या बाबतीत भारतात जे स्थान मुंबईचं तेच इंग्लंडमध्ये यॉर्कशायरचं! खुद्दं ब्रायन क्लोज हा त्या खडूसपणाचा आणि जिगरबाज भांडकुदळपणाचा अर्क! वेस्ट हॉल आणि चार्ली ग्रिफीथला तोंड देताना (आणि पुढे मायकेल होल्डींगला) ब्रायन क्लोजने हे सिद्धं केलं होतं. परंतु खडूसपणा पराकोटीला नेला की त्याचा 'बॉयकॉटपणा' होतो! खुद्दं बॉयकॉटनेच हे सिद्धं केलं आणि ते देखील भारताविरुद्धं!

१९६७ मध्ये मन्सूर अलीखान पतौडीच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर आला होता. लीड्स (हेडींग्ली) ला झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये कॅप्टन क्लोजने टॉस जिंकून बॅटींग घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने २८१ / ३ अशी मजल मारली होती.

दिवसभरात सहा तास खेळून बॉयकॉट १०६ वर नॉटआऊट होता!
रुसी सुरती आणि बिशनसिंग बेदी हे दोघं टी नंतर बॉलिंग करण्यास असमर्थ ठरले असूनही!

दुसर्‍या दिवशी थोडासा आक्रमक पवित्रा घेत बॉयकॉटने सुमारे चार तासात १४० रन्स काढल्या! क्लोजने इंग्लंडची इनिंग्ज डिक्लेअर केली तेव्हा बॉयकॉट पावणेदहा तासात ५५५ बॉलमध्ये २४६ रन्स काढून नॉटआऊट होता!

बॉयकॉटच्या या कूर्मगती बॅटींगमुळे त्याच्यावर टीका झाली नसती तरच नवंल!

जॉन वुडकॉक म्हणाला,
"It was more of an occupation than any innings! A defenceless army was hunted down. Low birds were blown to pieces!"

Playfair Cricket Monthly मध्ये गॉर्डन रॉसने लिहीलं,
"He would have bored the spectators a good deal more had he not been a Yorkshireman! Perhaps it was as well that the match was not being played at Old Trafford. Every cricketer on the ground winced when he played a full toss or half-volley back to the bowler."

डेली मिरर मध्ये ब्रायन चॅपमनने लिहीलं,
"Cricket could not afford to put in the shop window a joyless effort of this sort… nobody but Boycott could be blamed".

खुद्दं बॉयकॉटची प्रतिक्रीया मात्रं मासलेवाईक होती.
"I didn't expect praise for my first-day performance. It was a grim-looking innings and I didn't need anybody to tell me that. But I had shown that I had the character to stick with it. The alternative was to give me wicket away and return to the anonymity of the dressing room. I was never conscious of the time factor... but when you are in bad nick you never seem to get half-volleys. And when you do play a shot, the ball always seems to hit fielders."

एमसीसीच्या सिलेक्टर्सनी बॉयकॉटला पुढच्याच मॅचमधून ड्रॉप केलं! वास्तविक ब्रायन क्लोजने बॉयकॉटला ड्रॉप करु नये म्हणून सिलेक्टर्सना पटवण्याचा बराच प्रयत्नं केला, परंतु सिलेक्शन कमिटीत क्लोज एकाकी पडला! बॉयकॉटने मात्रं या सगळ्याचा दोष क्लोजच्याच माथी मारला!

"Close did not go in to bat for me!" बॉयकॉट म्हणाला!

"Boycott had not been dropped for low scoring but for selfish batting!" हे जाहीर करुन सिलेक्टर्सनी बॉयकॉटच्या जखमेवर आणखीन मीठ चोळलं!

याच दौर्‍यावर यॉर्कशायरविरुद्धच्या मॅचमध्ये यॉर्कशायरचे अनेक बॅट्समन चंद्राला खेळताना गोंधळून जात होते. बॉयकॉट मात्रं चंद्राला आरामात खेळून काढत होता! अखेर एका बॅट्समनला चंद्राला खेळून काढण्याचा मार्ग सापडल्यावर तो बॉयकॉटला म्हणाला,

"I got it Jeffery! I found out how to tackel him!"

“I’ve known for a week, don’t tell the others.” बॉयकॉट थंडपणे त्याला म्हणाला!

बॉयकॉट हा बॉलर्सच्या दृष्टीने त्रासदायक बॅट्समन होताच, पण त्याच्या सहकार्‍यांच्या दृष्टीने तितकाच धोकादायकही होता! विशेषतः त्याच्याबरोबर बॅटींग करताना!

आपल्या पार्टनरला रनआऊट करण्याची त्याला वाईट खोड होती!
याबाबतीत त्याची तुलना फक्तं इंझमाम उल हक (किंवा काही प्रमाणात दादा गांगुली) शीच करता येईल!
गंमत म्हणजे स्वतः रनआऊट होणं हे मात्रं त्याला मंजूर नव्हतं!
इतकंच नव्हे तर ते खिलाडूपणे स्वीकारण्याची त्याची वृत्तीही नव्हती!

१९७३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध नॉटिंगहॅमशायरच्या ट्रेंटब्रिज ग्राऊंडवर बॉयकॉट (५१), डेनिस एमिस (४२) आणि अ‍ॅलन नॉट (४९) यांच्यामुळे इंग्लंडने पहिल्या इनिंग्जमध्ये २५० रन्स काढल्या. टोनी ग्रेग आणि जॉन स्नो यांनी न्यूझीलंडची पहिली इनिंग्ज केवळ ९७ मध्ये गुंडाळली!

दुसर्‍या इनिंग्जच्या पहिल्याच ओव्हरमध्ये....

रिचर्ड कॉलिंजचा बॉल डेनिस एमिसने मिड ऑफला खेळला आणि बॉयकॉटला २ रन्ससाठी कॉल दिला. पहिली रन आरामात निघाली. परंतु दरम्यान कव्हरला असलेल्या व्हिक पोलार्डने बॉल गाठला होता. एमिसने एकच रन पुरे असल्याच्या दिलेल्या सिग्नलकडे बॉयकॉटने साफ दुर्लक्षं केलं आणि तो एमिसच्या दिशेने धावत सुटला! त्याला आपल्या दिशेने येताना पाहून साहजिकच एमिसने बॅट क्रीजमध्ये टेकवली!

परिणाम?

बॉयकॉट रनआऊट १!

बॉयकॉट ड्रेसिंगरुममध्ये परतला तो घुश्श्यातच! ग्राऊंड सोडण्यापूर्वी एमिसला त्याचा जन्मं विवाहबाह्यं संबंधातून झाला आहे हे ऐकवण्यास तो विसरला नाही! त्याच्या मताप्रमाणे एमिसने त्याच्यासाठी आपली विकेट गमावणं हे नैतिकदृष्ट्या योग्यं ठरलं असतं! स्वतः एमिसच्या कॉलकडे दुर्लक्षं केल्याचं मात्रं तो सोईस्करपणे विसरला होता! त्यातच एमिसने टोनी ग्रेगबरोबर २१० रन्सची पार्टनरशीप करत शतक झळकावल्याने त्याचा जास्तंच जळफळाट झाला!

“That bastard is scoring all my runs!” बॉयकॉट आपल्या सहकार्‍यांना म्हणाला!

इंग्लंडने टेस्ट जिंकण्यासाठी दिलेलं ४७९ रन्सचं भलंमोठं टार्गेट गाठण्याचा न्यूझीलंडने कसोशीने प्रयत्नं केला! बेव्हन काँग्डन (१७६) आणि व्हिक पोलार्ड (११६) यांच्या १७७ रन्सच्या पार्टनरशीपनंतर एक वेळ अशी आली होती की न्यूझीलंड मॅच जिंकणार याबद्दल अनेकांना खात्री वाटू लागली, परंतु मोक्याच्या वेळी टोनी ग्रेगने पोलार्ड आणि डेल हॅडलीच्या विकेट्स घेतल्याने इंग्लंडने केवळ ३८ रन्सनी टेस्ट जिंकली!

मॅच संपल्यावर बॉयकॉटने एमिसला धमकावलं,
"I will run you out in next test you bugger!"

इंग्लंडचा कॅप्टन होता बॉयकॉटइतकाच यॉर्कशायरचा खडूसपणा पुरेपूर मुरलेला रे इलिंगवर्थ!

मॅचनंतर इलिंगवर्थ आपल्या दोन्ही बॅट्समनसह डिनरला गेला. अर्थात तिथेही बॉयकॉटची टकळी सुरुच होती! विशेषतः एमिसने काढलेल्या शतकाला शक्यं ती सगळी दूषणं देऊन झाल्याबद्दल आणि एमिसने काहीही चूक नसतानाही सॉरी म्हणूनही त्याचं समाधान झालं नव्हतं! अखेर रे इलिंगवर्थने बॉयकॉटला ठणकावलं,

"If you could not sort it out with your partner, I will make sure that the you will never play for England again as long as I am the skipper!"

इलिंगवर्थकडून असा मजबूत दम मिळाल्यावर बॉयकॉटने आपलं तोंड आवरतं घेतलं आणि एमिसशी तडजोड केली खरी, परंतु....

काही आठवड्यांनी एमिसने त्याच्या घरी सहज म्हणून फोन केला. फोन घेतला तो बॉयकॉटच्या आईने!

"Is Geoffrey home?" एमिसने विचारलं.

"Yes, I will get him. Who’s speaking?”

"This is Dennis Amiss!"

“He’s not in!” मिसेस बॉयकॉटनी फोन आदळला!

काऊंटीमध्ये पदार्पण करतानाच बॉयकॉटची सुप्तं महत्वाकांक्षा होती ती यॉर्कशायर आणि पुढे इंग्लंडचा कॅप्टन होण्याची! १९७० च्या मोसमात वादग्रस्तं परिस्थितीत कप्तानपदावरुन ब्रायन क्लोजला हटवण्यात आल्यावर कॅप्टन म्हणून कोणाची निवड करावी याबद्दल यॉर्कशायर कमिटी द्विधा मनःस्थितीत होती. अर्ध्या सदस्यांची पसंती रिचर्ड हटनला होती तर उरलेल्या अर्ध्यांची बॉयकॉटला! अखेर कमिटीच्या अध्यक्षपदी असलेल्या ब्रायन सेलर्सचं मत बॉयकॉटच्या पारड्यात पडलं!

अखेर एकदाचं बॉयकॉटचं यॉर्कशायरचा कॅप्टन होण्याचं स्वप्नं साकार झालं!

मात्रं बॉयकॉटच्या कॅप्टनपदाचा १९७१-१९७८ हा आठ वर्षांचा काळ यॉर्कशायरसाठी अंधःकारमयच ठरला!
आठ वर्षांत यॉर्कशायरने एकही काऊंटी चँपियनशीप जिंकली नाही!
मात्रं बॅट्समन बॉयकॉट १९७१ ते १९७३ मध्ये कमालीचा यशस्वी ठरला होता!

इंग्लिश कौंटी चँपियनशीपमध्ये त्याकाळी पहिल्या ८५ ओव्हर्समध्ये १५० च्या वर फटकावण्यात आलेल्या दर २५ रन्सना १ बोनस पॉईंट मिळत असे. १९७१ च्या पहिल्याच मोसमात बॉयकॉटने १०० पेक्षा जास्तं अ‍ॅव्हरेजने २५०३ रन्स काढल्या, परंतु यॉर्कशायरला मात्रं नगण्यंच बोनस पॉईंट्स मिळाले होते!

यॉर्कशायरचा भूतपूर्व खेळाडू आणि फास्ट बॉलर फ्रेडी ट्रूमनच्या मते याला कारणीभूत बॉयकॉटचा स्वार्थीपणाच होता. कोणत्याही परिस्थितीत संघहितापेक्षाही स्वतःच्या रन्स त्याच्यादृष्टीने मोलाच्या होत्या.

ट्रूमन म्हणाला,
“It will never cease to amaze me that a man can average 100 and we still end near the bottom in the batting points … disgusting.”

१९७२ आणि १९७३ मध्येही बॅट्समन म्हणून बॉयकॉट यशस्वी ठरला असला तरी कॅप्टन म्हणून तो साफ अपयशी होताच, पण जोडीला रिचर्ड हटनसह अनेक खेळाडूंशी त्याचे वादही झाले होते! एव्हाना यॉर्कशायर कमिटीच्या अनेक सदस्यांशी आणि एकेकाळी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार्‍या ब्रायन क्लोजशीही त्याने वाद ओढवून घेतला होता!

यॉर्कशायरप्रमाणेच इंग्लंडचा कॅप्टन होण्याच्या त्याच्या महत्वाकांक्षेने याचवेळी उचल खाल्ली होती!

१९७३ मध्ये वेस्ट इंडी़जविरुद्धच्या सिरीजनंतर कॅप्टन रे इलिंगवर्थ रिटायर झाला. इलिंगवर्थनंतर कॅप्टनपदाची माळ आपल्या गळ्यात कधी पडते याची बॉयकॉट आतुरतेने वाट पाहत होता! परंतु इंग्लिश सिलेक्टर्सचं मत मात्रं वेगळंच होतं! गेल्या तीन वर्षांत यॉर्कशायरच्या कॅप्टनपदी असताना त्याला आलेलं अपयश ते विसरलेले नव्हते! इंग्लंडच्या कॅप्टनपदी त्यांनी निवड केली ती माईक डेनेसची!

बॉयकॉटचा जळफळाट झाला नसता तरच नवंल!

वेस्ट इंडी़जच्या दौर्‍यावर एक सिनीयर खेळाडू म्हणून माईक डेनेसला सहकार्य करण्याचं त्याने साफ नाकारलं! वेस्ट इंडीयन खेळाडूंमधले कच्चे दुवे हेरुन त्यावर लक्षं केंद्रीत करण्याच्या दृष्टीने आणि एकूणच संघाच्या विजयासाठी कोणतेही डावपेच आखण्याच्या दृष्टीने एक चकार शब्दंही त्याने काढला नाही! इतकंच नव्हे तर नेट प्रॅक्टीसवरचं बॉयकॉटचं प्रेम ध्यानात घेऊन प्रॅक्टीस सेशन्सची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्याचा डेनेसचा प्रयत्नही त्याने 'हे माझं काम नाही!' म्हणून धुडकावून लावला!

पोर्ट ऑफ स्पेनची पहिली टेस्ट वेस्ट इंडीजने ७ विकेट्सने जिंकल्यावर पुढच्या ३ टेस्ट इंग्लंडने कशाबशा ड्रॉ केल्या होत्या. पोर्ट ऑफ स्पेनच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये काढलेल्या ९३ रन्स वगळता बॉयकॉट साफ अपयशी ठरला होता. त्यातच पाचव्या टेस्टपूर्वी बर्म्युडाविरुद्धच्या मॅचवरुन बॉयकॉट आणि कॅप्टन डेनेस यांच्यात वाद उफाळला! बॉयकॉटला वन डे खेळायची होती तर डेनेसला ३ दिवसाची प्रॅक्टीस मॅच!

दोघांमध्ये वाद झाल्यावर बॉयकॉट्ने त्याला सुनावलं,
“Get out of here before I do something I’ll regret.”

टोनी ग्रेगशी डेनेसबद्दल बोलताना तो म्हणाला,
“I have no confidence in Denness’s professional ability and no respect for him as a man.”

पाचवी टेस्ट पुन्हा झाली ती पोर्ट ऑफ स्पेनलाच!

पहिल्या इनिंग्जमध्ये बॉयकॉटने ९९ रन्स काढल्या, पण त्यासाठी त्याने तब्बल साडेसहा तास खेळून काढले! बर्नाड ज्युलियनच्या बॉलवर डेरेक मरेने त्याचा कॅच घेतल्यामुळे त्याचं शतक हुकलं! पण दुसर्‍या इनिंग्जमध्ये मात्रं तब्बल सात तास खेळून काढत त्याने ११२ रन्स काढल्या! २२६ रन्सचं टार्गेट घेऊन खेळण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडीजला पहिल्या इनिंग्जमध्ये ८ विकेट्स घेणार्‍या टोनी ग्रेगने दुसर्‍या इनिंग्जमध्येही ५ विकेट्स घेत हादरवलं आणि इंग्लंडने २६ रन्सनी मॅच जिंकली!

सिरीज १-१ अशी ड्रॉ झाली!
अर्थातच माई़क डेनेसची कॅप्टनपदावरुन होऊ शकणारी गच्छन्ती टळली!

ड्रेसिंगरुममध्ये डेनेस आपल्या सहकार्‍यांचं अभिनंदन करताना बॉयकॉट उद्गारला,
“Unfortunately, that is the worst win we could have had for English cricket.”

मॅच संपल्यावर प्रेझेंटेशनच्या दरम्यान फिजीओ बर्नाड थॉमसला तो म्हणाला,
“Bernard, that’s buggered my chances of the England job!”

१९७४ मध्ये भारताविरुद्धच्या एकमेव टेस्टनंतर आपण इंग्लंडसाठी खेळण्यास उपलब्धं नाही असं बॉयकॉटने सिलेक्टर्सना कळवलं! टेस्ट क्रिकेट खेळण्यात आपल्याला फारसा रस उरला नसल्याचं कारण त्याने दिलं असलं, तरी आपल्याला डावलून माई़क डेनेस आणि पुढे टोनी ग्रेगची कॅप्टन म्हणून नेमणूक केल्याचा निषेध म्हणून त्याने इंग्लंडसाठी खेळण्यास नकार दिला असावा असं मानण्यास वाव आहे!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर १९७५ चा मोसम बॉयकॉटला आणि पर्यायाने यॉर्कशायरलाही अगदीच खराब गेला. १९७६ मध्येही त्याच्या हाती फारसं काहीच लागलं नाही. त्यातच ब्रायन क्लोज आणि इतरांशी त्याचे संबंध अधिकच ताणले गेले होते!

दरम्यान...

हजारो मैल दूर ऑस्ट्रेलियात एक वेगळंच नाट्यं आकाराला येत होतं!

त्यात सहभागी असलेले कलाकारही तितक्याच ताकदीचे आणि तोलामोलाचे होते!

एक होता 'स्लेजिंग' हा प्रकार क्रिकेटमध्ये प्रचलित करणारा आणि "Win at all cost" हे तत्वं ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सच्या जनमानसात रुजवणारा कॅप्टन इयन चॅपल!

आणि

दुसरा होता पुढे सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून जगप्रसिद्ध पावलेला आणि सरदारकीने सन्मानित करण्यात आलेला इयन बोथम!

इयन चॅपल तेव्हा टेस्ट आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमधून रिटायर झालेला होता. नॉर्थ मेलबर्न संघासाठी क्लब मॅचेस खेळण्यासाठी तो मेलबर्नमध्ये आला होता. बोथमच्या करीअरची नुकतीच कुठे सुरवात होत होती. अद्याप त्याने टेस्टमध्ये पदार्पण केलेलं नव्हतं. जेमतेम दोन वन डे तेवढ्या तो खेळला होता. व्हिटब्रेड स्कॉलरशीपवर युनिव्हर्सिटी क्लबकडून क्रिकेट खेळण्यासाठी तो ऑस्ट्रेलियात आला होता!

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या बारमध्ये दोघांची प्रथम गाठ पडली!

इयन चॅपलच्या मतानुसार बोथमने आधीच बर्‍याच बियर ढोसल्या होत्या आणि त्याला चांगलीच चढलेली होती! विशेषतः ऑस्ट्रेलियन खेळाडूंना तो मुक्तकंठाने शिव्या घालत होता! काही वेळ त्याची बडबड ऐकून घेतल्यावर चॅपलने त्याला ऐकवलं,

"Yeah, you’re a typical county player, you’re the sort of player who thinks that if an Australian hasn’t been to England and played county cricket, he can’t play. You think the only guy who can play in the Australian side is Greg Chappell because he played two years for Somerset.”

चॅपलच्या या बोलण्याला बोथमने अर्थातच होकार दर्शवला! इंग्लंडमध्ये खेळण्याच्या लायकीचा ग्रेग चॅपल हा एकच ऑस्ट्रेलियन बॅट्समन आहे हे त्याने चॅपलला ठणकावलं!

चॅपलच्या स्वतःच्या म्हणण्यानुसार त्याचा संयम ढासळला आणि तो म्हणाला,
“Well you blokes wouldn’t know shit from a bull’s foot.”

चॅपलच्या या वक्तव्यावर बोथमने १९७७ च्या इंग्लंड दौर्‍यावर येणं टाळण्यासाठीच त्याने रिटायरमेंट घेतल्याचा आरोप केला! बोथम म्हणाला,
"Too many blokes were looking to knock your block off!"

दोघांचा वाद याच भाषेत काही काळ सुरु राहिला!

दुसर्‍या दिवशी - शुक्रवारी पुन्हा एमसीजीच्या बारमध्ये दोघांची गाठ पडली!

बोथमच्या म्हणण्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी चॅपल बारमध्ये इंग्लिश खेळाडूंच्या नावाने खडे फोडत होता. जेव्हा हे असह्यं झालं तेव्हा बोथमने त्याला धमकावलं,

"If you carry on there would be trouble!”

अर्थात बोथमच्या या धमकावणीचा चॅपलवर काहिही परिणाम झाला नाही. त्याची बडबड सुरुच होती! चॅपलच्या म्हणण्याप्रमाणे बोथमचा स्वतःवरचा ताबा उडाला. तो चॅपलला शिवीगाळ करत म्हणाला,

"Everyone’s looking for you in county cricket, because you are a prick. You abused me when Australia played Somerset.”

सॉमरसेट विरुद्ध आपण खेळलेलो नाही हे चॅपलला पक्कं माहीत होतं, पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे बोथम ते मानायला तयार होत नव्हता! एव्हाना त्याच्या रागाचा पारा इतका चढला होता की बियरचा रिकामा ग्लास चॅपलच्या मानेपाशी धरुन तो म्हणाला,

“I’ll fucking cut you from ear to ear.”

"Son, that won’t fucking impress me very much." चॅपल उत्तरला, "In fact, would be an act of cowardice. I’ll tell you what would impress me – if you cut me with a cricket ball. And you’ll get every chance tomorrow because I’ll make sure I bat for as long as I can and give you every fucking chance. But I’ll just give you one tip. You better do it with a cricket ball that bounces. If you try doing it with a beamer, you had better make it a fucking good one because if I can get up I’ll get down the other end and I’ll hit you over the head with the fucking bat!"

बोथमच्या म्ह्णण्याप्रमाणे चॅपल असं काही बोलण्यापूर्वीच त्याने त्याला एक सणसणीत ठोसा लगावला! बोथमच्या ठोशामुळे चॅपल टेबलावरुन घसरुन जाऊन ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबॉलच्या खेळाडूंमध्ये जाऊन पडला आणि त्यांची ड्रिंक्स सगळीकडे सांडली!

ग्लास घेऊन चॅपलला धमकावल्याचा बोथमने अर्थातच ठामपणे इन्कार केला!

चॅपलच्या म्हणण्याप्रमाणे बोथमने ठोसा मारला नाही, परंतु त्याला खुर्चीवरुन जोराने मागे ढकललं! इतक्यावरही बोथमचं समाधान झालं नव्हतं! चॅपलला आव्हान देत तो ओरडला,

“C’mon let’s fight.”

"It is stupid, one lands up either in a hospital or a jail and I have no intention of going to either of those places over a cunt like you.” चॅपल उत्तरला!

बोथमच्या म्हणण्याप्रमाणे त्याने मारलेल्या ठोशाने ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबॉलच्या खेळाडूंच्या अंगावर जाऊन पडलेला चॅपल उठून बारमधून बाहेर पळून गेला! बोथम त्याला आणखीन बदडण्याच्या दृष्टीने त्याच्या मागे धावत बारमधून बाहेर पडला. बेभानपणे धावताना एका कारच्या बॉनेटवर तो आदळला, पण काही अंतरावर पोलिस कार दिसल्यावर चॅपलचा नाद सोडून तो पुन्हा बारमध्ये परतला!

चॅपलच्या म्हणण्याप्रमाणे तो बारमधून पळाला वगैरे नाही तर शांतपणे बाहेर पडून निघून गेला! बोथम बियरची रिकामी बाटली घेऊन त्याच्या मागे धावण्याच्या बेतात होता, परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेटर इयन कॅलनने बोथमला मागून पकडून ठेवलं आणि शांत केलं!

बोथमने बियरची बाटली घेऊन त्याच्या मागे जाण्याच्या चॅपलच्या दाव्याची धादांत खोटेपणा म्हणून संभावना केली! चॅपलने कॉमेंट्री करताना बोथमचा उल्लेख habitual liar असा केला!

"As far as I am concerned it is par for the course!" बोथमने त्या घटनेचं केलेलं वर्णन वाचल्यावर चॅपल म्हणाला!

"As far as I am concerned, Chappell as human being is a nonentity!" बोथमने पलटवार केला!

बोथम आणि चॅपल यांच्यातील वादाची ही आता कुठे सुरवात होती!
अर्थात चॅपलला वाद हा प्रकार नवीन नव्हता!

१९७३-७४ च्या न्यूझीलंडविरुद्धच्या सिरीजमध्ये चॅपल आणि ग्लेन टर्नर यांची जोरदार खडाजंगी झाली होती. इतकी की 'न्यूझीलंडच्या ड्रेसिंगरुममध्ये पाय ठेवलास तर तंगडं मोडून ठेवेन!' अशी जाहिर धमकी टर्नरने त्याला दिली होती! चॅपलच्या ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंशी असलेल्या वर्तणूकीमुळे त्याच्या संघाला 'अग्ली ऑस्ट्रेलियन्स' असं नाव पडलं होतं!

चॅपल म्हणाला,
"Although we didn't deliberately set out to be a 'bunch of bastards' when we walked on to the field, I'd much prefer any team I captained to be described like that than as 'a nice bunch of blokes on the field.' As captain of Australia my philosophy was simple: between 11.00am and 6.00pm there was no time to be a nice guy. I believed that on the field players should concentrate on giving their best to the team, to themselves and to winning; in other words, playing hard and fairly within the rules. To my mind, doing all that left no time for being a nice guy."

माईक डेनेस एव्हाना इंग्लिश संघातून बाहेर गेला होता. १९७७ च्या मोसमात अखेर माईक ब्रिअर्लीच्या नेतृत्वाखाली अ‍ॅशेस सिरीजमधल्या तिसर्‍या टेस्टमध्ये बॉयकॉट इंग्लंड टीममध्ये परतला!

हीच इयन बोथमची पहिली टेस्ट होती!

आपल्या घातक स्वभावाला अनुसरुन पहिल्याच इनिंग्जमध्ये ट्रेंट ब्रिज या डेरेक रँडॉलच्या होम ग्राऊंडवर बॉयकॉटने त्याला रनआऊट करवलं! परंतु त्याचं दडपण न घेता तब्बल सात तास बॅटींग करत त्याने १०७ रन्स काढल्या! दुसर्‍या इनिंग्जमध्येही पाच तासात ८० रन्स काढून तो नॉटआऊट राहिला! डेरेक रँडॉलसह त्याने इंग्लंडसाठी विजयी रन काढली!

या टेस्टच्या पाचही दिवशी बॉयकॉटने बॅटींग केली होती!
अशी करामत करणारा तो पहिलाच इंग्लिश बॅट्समन होता!

बॉयकॉटच्या पाचही दिवस बॅटींग करण्यावर बोथमची प्रतिक्रिया मात्रं नमुनेदार होती!
"The Aussies, shell-shocked at having to bowl at Boycott for twenty-two and a half hours, capitulated without much of a fight!"

लीड्सच्या चौथ्या टेस्टमध्येही बॉयकॉटने पहिल्या इनिंग्जमध्ये तब्बल साडेदहा तास विकेटवर तंबू ठोकत १९१ रन्स काढल्या! ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग्ज बोथम (५) आणि माइक हेंड्रीक (४) यांच्यापुढे १०३ रन्समध्ये कोसळली! दुसर्‍या इनिंग्जमध्ये ऑस्ट्रेलियाने २४८ रन्स काढल्या खर्‍या परंतु इनिंग्जने पराभव टाळणं ऑस्ट्रेलियाला जमलं नाही!

अ‍ॅशेस सिरीजमधील कामगिरीमुळे पाकिस्तानच्या दौर्‍यावर जाणार्‍या इंग्लंड संघात कॅप्टन माईक ब्रिअर्लीचा व्हाईस कॅप्टन म्हणून बॉयकॉटची नेमणूक झाली. लाहोर आणि हैद्राबाद (सिंध) इथल्या पहिल्या दोन्ही टेस्ट ड्रॉ झाल्या. दोन्ही टेस्टमध्ये बॉयकॉट चांगलाच फॉर्मात होता. हैद्राबाद टेस्टच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये त्याने साडेपाच तासात नाबाद शतक झळकावलं होतं.

तिसर्‍या टेस्टपूर्वी सिंधविरुद्धच्या मॅचमध्ये सिकंदर बख्तचा बॉल हातावर लागल्याने ब्रिअर्लीचा हात फ्रॅक्चर झाला आणि तो तिसर्‍या टेस्टमध्ये खेळण्यास असमर्थ ठरला!

... आणि इंग्लंडचा कॅप्टन होण्याची बॉयकॉटची इच्छा अखेर एकदाची पूर्ण झाली!

कराचीची तिसरी टेस्टही ड्रॉ झाल्यामुळे पाकिस्तान विरुद्धची सिरीज ०-० अशीच राहिली, पण कॅप्टन म्हणून बॉयकॉटच्या काही अनाकलनीय निर्णयांपुढे अनेक खेळाडूंनी प्रश्नचिन्हं उभं केलं होतं!

पाकिस्तानच्या दौर्‍यानंतर इंग्लंडने न्यूझीलंडची वाट धरली. दरम्यान बॉयकॉटबद्दल इतर खेळाडूंमधली नाराजी आता उघडपणे दिसू लागली होती! इंग्लंड संघातील अनेक खेळाडू मनापासून त्याचा तिरस्कार करु लागले होते! त्यातच कॅप्टन म्हणून इतरांशी संवाद साधण्याच्या भानगडीतही तो पडलाच नव्ह्ता!

वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्ववर झालेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंग्जमध्ये न्यूझीलंडने २२८ रन्स केल्या त्या जॉन राईट (५५) आणि बेव्हन काँग्डन (४४) यांच्यामुळे. जॉन राईटची इनिंग्ज कमालीची मंदगतीची असली (३४८ मिनीटं!) तरी इंग्लंडच्या पहिल्या इनिंग्जमध्ये बॉयकॉटने मात्रं कहर केला!

तब्बल सात तास आणि बावीस मिनीटांत त्याने ७७ रन्स काढल्या!

एकवेळ तर अशी होती की फर्स्टक्लास क्रिकेटमधली सगळ्यात कूर्मगती हाफ सेंच्युरी काढण्याचा ट्रेव्हर बेलीचा विक्रम (!) बॉयकॉट मोडतो की काय अशी परिस्थिती होती! १९५८-५९ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये ट्रेव्हर बेलीने ब्रिस्बेनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल सहा तास (३५७ मिनीटं) बॅटींग करुन हाफ सेंच्युरी काढली होती! (राहुल द्रविड - तू बच्चा होतास रे!)

बॉब विलीसने न्यूझीलंडची दुसरी इनिंग्ज १२३ मध्ये गुंडाळल्याने इंग्लंडला मॅच जिंकण्यासाठी फक्तं १३७ रन्स हव्या होत्या, पण पहिल्या इनिंग्जमध्ये ४ विकेट्स घेणार्‍या रिचर्ड हॅडलीने दुसर्‍या इनिंग्जमध्ये ६ विकेट घेत इंग्लंडचा ६४ रन्समध्ये अक्षरशः खिमा केला!

दुसरी टेस्ट होती क्राईस्टचर्चला!

बॉयकॉटने टॉस जिंकून बॅटींग घेतली खरी, पण स्वतः बॉयकॉट, ब्रायन रोझ आणि डेरेक रँडॉल झटपट परतल्याने इंग्लंडची अवस्था २६ / ३ अशी झाली होती! ग्रॅहॅम रुप (५०) आणि जेफ मिलर यांनी ७९ रन्सची पार्टनरशीप करत इंग्लंडची इनिंग्ज सावरली, पण रिचर्ड कॉलिंजचा बॉल हातावर आदळल्याने मिलर रिटायर हर्ट झाला. पाठोपाठच क्लाईव्ह रिडली आणि मिलर आऊट झाल्याने इंग्लंडची पुन्हा १२८ / ५ अशी अवस्था झाली!

बोथम आणि विकेटकीपर बॉब टेलर यांनी १६० रन्सची पार्टनरशीप करुन इंग्लंडला सावरलं. यात टेलरच्या केवळ ४५ रन्स होत्या! टेलर आऊट झाल्यावर बोथमने टेस्ट क्रिकेटमधलं आपलं पहिलं शतक झळकावलं, पण तो लगेचच आऊट झाल्यावरही एव्हाना दुखापतीतून सावरलेला जेफ मिलर (८९) आणि फिल एडमंड्स (५०) यांनी इंग्लंडचा स्कोर ४१८ पर्यंत नेला!

न्यूझीलंडने पहिल्या इनिंग्जमध्ये २३५ पर्यंत कशीबशी मजल मारली ती बॉब अँडरसन (६२) आणि जॉन पार्कर (५३*) यांच्यामुळे आणि शेवटी शेवटी रिचर्ड कॉलिंज (३२) ने केलेल्या फटकेबाजीमुळे. बोथमने ५ तर एडमंड्सने ४ विकेट्स घेतल्या होत्या.

पहिल्या इनिंग्जमध्ये १८३ रन्सचा लीड इंग्लंडला मिळाला होता, पण एव्हाना मॅचचा चौथा दिवस उजाडला होता! दुसर्‍या इनिंग्जमध्ये झटपट रन्स करुन विलीस, बोथम, क्रिस ओल्ड आणि एडमंड्स यांना न्यूझीलंडवर सोडण्याचा इतर कोणाही कॅप्टनने विचार केला असता! विशेषतः वेलिंग्टनची पहिली टेस्ट गमावल्यावर तर नक्कीच, पण बॉयकॉट?

ब्रायन रोजबरोबर ओपनिंगला आलेला बॉयकॉट कोणतीही घाई न करता आरामात खेळत होता! खेळायला जाण्यापूर्वी रोझने बॉयकॉटला विचारलं,

"I suppose we're going to go out and slog it?

"You play it your way, I'll play it mine." बॉयकॉट थंडपणे उत्तरला!

८० मिनीटांत आणि ४० बॉलमध्ये ७ रन्स केल्यावर कॉलिंजच्या बॉलवर विकेटकीपर वॉरन लीसने रोजचा कॅच घेतला. रनरेट वाढवण्यासाठी आणि फटकेबाजी करुन रन्स काढण्यासाठी व्हाईसकॅप्टन असलेल्या बॉब विलीसने डेरेक रँडॉलला वन डाऊन पाठवलं. रँडॉलने १६ बॉलमध्ये १३ रन्स काढल्या, पण इवान चॅटफिल्डने त्याला बॉल टाकण्यापूर्वी क्रीजमधून बाहेर गेल्यावर नॉन स्ट्रायकर एन्डला रनआऊट केलं!

मंकडींग!

रँडॉलला आऊट करण्यापूर्वी खिलाडूवृत्तीला धरुन दिली जाणारी वॉर्निंगही चॅटफिल्डने रँडॉलला दिली नव्हती त्यामुळे इंग्लिश खेळाडू, विशेषतः विलीस आणि बोथम चांगलेच भडकले होते. त्यातच एका बाजूने संघहिताला कोणतंही प्राधान्यं न देता थंडपणे खेळणारा बॉयकॉट!

चौथ्या क्रमांकावर विलीसने बढती दिली ती बोथमला!
फटकेबाजी करुन झटपट रन्स वाढवण्याच्या जोडीला एक खास सूचनाही दिली.

"Go and run the bugger out!"

क्रीजवर पोहोचल्यावर सर्वात पहिले बोथमने चॅटफिल्डला सुनावलं,
“Be careful what you do son, you have already died in a Test match once!”

इवान चॅटफिल्डच्या पहिल्याच टेस्टमध्ये पीटर लिव्हरचा बॉल डोक्यावर लागल्यामुळे तो कोसळला होता. काही क्षणांसाठी त्याचं हृदय बंद पडलं होतं! पीचवरतीच इमर्जन्सी सीपीआर दिल्यामुळे तो वाचला होता! त्यालाच उद्देशून बोथमने हा शेरा मारला होता!

बोथमशी गाठ पडल्यावर रन्स काढणं आपल्याला कठीण जात असल्याची बॉयकॉटने त्याच्यापाशी तक्रार केली! वास्तविक ८० बॉलमध्ये २६ रन्स काढताना बॉयकॉटने अनेक हाफ व्हॉली आणि फुलटॉस फुकट घालवले होते!

"Don't worry Boycs! I will sort it out!" बोथम डोळे मिचकावत म्हणाला!

सुमारे वीस मिनीटांनी बोथमला अखेर संधी मिळाली!

इवान चॅटफिल्डचा बॉल कव्हर्समध्ये खेळून बोथमने कॉल दिला आणि तो धावत सुटला! बॉयकॉटची पहिली रिअ‍ॅक्शन रन काढण्याची होती, परंतु काय घडतं आहे हे लक्षात येताच त्याने बोथमला परत पाठवण्याचा प्रयत्नं केला! तोपर्यंत बोथम नॉन स्ट्रायकर एन्डला क्रीजमध्ये पोहोचला होता! दरम्यान कव्हर्समध्ये असलेल्या जेफ हॉवर्थचा थ्रो आरामात वॉरन लीसकडे आला होता!

परिणाम?
बॉयकॉट रनआऊट २६!

"What have you done, what have you done," बॉयकॉट बोथमवर चरफडत उद्गारला!

"I've run you out, you bugger!" बोथमने त्याला सुनावलं!

"I couldn't look at him," बोथम नंतर म्हणाला, "I cracked up and had to go for a walk around the back of the umpire."

बॉयकॉटच्या 'त्या' रनआऊटबद्दल हसू आवरत बोलणारा बोथम

बोथम ३१ बॉलमध्ये ३० रन्स फटकावून नॉटआऊट राहिला.
पण एवढ्यावरच भागलं नव्हतं!

बोथम आणि रुप दिवसाचा खेळ संपल्यावर ड्रेसिंगरुममध्ये परतले तेव्हा कॅप्टन बॉयकॉट एका कोपर्‍यात टॉवेलने डोकं आणि चेहरा झाकून बसला होता! त्याची स्वतःशीच अखंड बडबड सुरु होती!

"What am I doing? Playing with children?"

शेवटी फिल एडमंड्सने त्याला विचारलं,
"Okay Boycs, what are we doing now?"

"You and Willis are in charge of this tour... you work it out." टॉवेल न काढता बॉयकॉट उत्तरला!

इंग्लंडला २७९ रन्सचा लीड मिळाल्यामुळे बॉयकॉट इनिंग्ज डिक्लेअर करेल अशी बहुतेकांची अपेक्षा होती. बॉयकॉटची इनिंग्ज डिक्लेअर करण्यास हरकत नव्हती, पण त्यापूर्वी हेवी रोलरचा वापर करुन विकेट आणखीन थोडी बिघडवण्याचा त्याचा विचार होता! अर्थात रोलर वापरायचा असेल तर एक बॉलसाठी का होईना, पण इंग्लंडला बॅटींग करायला लागणार होती!

विलीसचं माथं या प्रकारामुळे चांगलंच भडकलं! त्याची आणि बॉयकॉटची चांगलीच खडाजंगी उडाली! टीममधील बहुतेक सर्वांचा विलीसला पाठिंबा होता! अखेर सगळ्यांच्या मतापुढे मान तुकवणं बॉयकॉटला भाग पडलं! आपण इनिंग्ज डिक्लेअर केल्याचं खेळ सुरू होण्यापूर्वी जेमतेम पंधरा मिनीटं त्याने न्यूझीलंड कॅप्टन मार्क बर्जेसला सांगितलं!

बॉयकॉटशी झालेल्या या खडाजंगीमुळे भडकलेल्या विलीसने न्यूझीलंडची अक्षरशः वाताहात केली! न्यूझीलंडची अवस्था त्याने २५ / ५ अशी करुन टाकली! त्यातच मार्क बर्जेसला विलीसचा बॉल लागल्यामुळे रिटायर हर्ट व्हावं लागलं!

विलीसच्या स्पेलनंतर बॉयकॉटने बोथमला बॉलिंगसाठी बोलावलं, पण स्वतः त्याच्याशी एक चकार शब्द न बोलता! मिड ऑफला असलेल्या क्रिस ओल्डमार्फत!

बोथम बॉलिंग करत असताना फिल्ड प्लेसमेंटबाबत बॉयकॉटचे संदेशही क्रिस ओल्डमार्फत येत होते!

"Boycs wants to know if you want another slip!" ओल्डने विचारलं.

"That would be nice!" बोथम उत्तरला!

न्यूझीलंडचा १०५ मध्ये खुर्दा करत इंग्लंडने मॅच जिंकली तरी बॉयकॉटने बोथमशी अबोला धरला होता!

ऑकलंडला झालेली तिसरी टेस्ट ड्रॉ झाली असली तरी पहिल्या इनिंग्जमध्ये ५४ रन्स काढण्यासाठी बॉयकॉटने तब्बल चार तास घेतले होते! परंतु बॉयकॉटचाही गुरु शोभावा अशा पद्धतीने क्लाईव्ह रिडलीने पावणे अकरा तासात १५८ रन्स काढल्याने बॉयकॉटवर होणारी टीकेची धार कमी झाली!

१९७८ च्या इंग्लिश मोसमात माईक ब्रिअर्ली पुन्हा इंग्लंड संघात परत येताच बॉयकॉटची कॅप्टनपदावरुन उचलबांगडी झाली ती कायमची!

ब्रिअर्ली म्हणाला,
"When he took over after I broke my arm, Boycott won little except the recognition he was not the man to captain England!"

मोसमाच्या सुरवातीलाच बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे बॉयकॉटला अनेक मॅचेसना मुकावं लागलं होतं. त्याच्या ऐवजी जॉन हँपशायरने यॉर्कशायरच्या कॅप्टनपदाची जबाबदारी घेतली. बॉयकॉट परतल्यावरही अनेकांची कॅप्टन म्हणून हँपशायरलाच पसंती होती! यॉर्कशायरच्या ड्रेसिंगरुममध्ये चक्कं मतदान घेण्यात आलं! खेळाडूंपैकी ९५% जणांनी हँपशायरच्या बाजूने मत दिल्याने बॉयकॉटवर चांगलाच दबाव आला होता, त्यातच...

१५ सप्टेंबर १९७८ ला बॉयकॉटची आई कॅन्सरने मरण पावली!

मातृभक्तं बॉयकॉटवर आईच्या मृत्यूचा खूप परिणाम झाला होता. मानसिकरित्या तो पूर्णपणे खचला होता. त्यातच अवघ्या १४ दिवसांनी, २९ सप्टेंबरला यॉर्कशायरच्या कमिटीने बॉयकॉटची गाठ घेऊन कॅप्टनपदावरुन त्याची हकालपट्टी करण्यात येणार असल्याची, परंतु एक बॅट्समन म्हणून यॉर्कशायरला त्याला खेळवण्यात रस असल्याची स्पष्ट सूचना दिली! आईच्या निधनाने आधीच खचलेल्या बॉयकॉटला यॉर्कशायर कमिटीचा हा निर्णय म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखा वाटला!

मायकेल पार्कीन्सनच्या टॉक शो मध्ये ७ ऑक्टोबरला यॉर्कशायर कमिटीबद्दल बॉयकॉट म्हणाला,
"They are small-minded people – people who think they are always right. The whole thing was a set up. They knew they were going to sack me, but at least they could have postponed the meeting. They could have allowed my mother to be buried in peace, but they could not wait."

बॉयकॉटच्या या वक्तव्यावरुन यॉर्कशायर कमिटीने त्याच्यावर टीका केली असली तरी जनमताची सहानुभूती मात्रं बॉयकॉटलाच मिळाली.

१९७९-८० मध्ये माईक ब्रिअर्लीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात आलेल्या बोथमची पुन्हा एकदा गाठ पडली ती इयन चॅपलशी!

टेस्ट मधून रिटायरमेंट घेतल्यावर आणि पॅकर सर्कशीनंतर चॅपल ऑस्ट्रेलियन संघात परतीच्या मार्गावर होता. शेफील्ड शिल्डच्या पहिल्याच मॅचमध्ये अंपायरला शिव्या घातल्यावरुन त्याला तीन आठवड्यांच्या बंदीला सामोरं जावं लागलं होतं! त्यातच साऊथ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये बोथमने चॅपलला झिरोवर बोल्ड केल्यावर अगदी व्यवस्थितपणे मैदानावरुन 'सेंड ऑफ' दिला होता! या मॅचमध्येही अंपायरला शिव्या घातल्यावरुन आणि इंग्लिश खेळाडूंशी भांडल्यावरुन चॅपलवर बंदी घालण्यात आली होती, परंतु त्याने अपिल केल्यावर बंदीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली!

चॅपल आणि बोथम पुन्हा समोरासमोर आले ते वन डे मध्ये!

चॅपल खेळायला आल्यावर बोथमने त्याच्यावर बंपर्सचा मारा आरंभला. या बंपर्समधला एक बंपर इतका वरुन गेला की तो अंपायरने नो बॉल दिला. निमित्ताला टपलेल्या चॅपलने बोथमला सुनावलं,

"If you do it again, better hit me because if it doesn't, I'm going to come down there and whack you with bat."

बोथमने उत्तरादाखल लागोपाठ तीन बंपर्स टाकले!
चॅपल ६० रन्स काढून नॉटआऊट राहिला!

दोन इनिंग्जमधल्या इंटर्वलमध्ये ब्रिअर्लीने ऑस्ट्रेलियन कॅप्टन आणि इयन चॅपलचा धाकटा भाऊ ग्रेग चॅपलची गाठ घेऊन चॅपलने माफी मागावी अशी मागणी केली! अर्थात चॅपल माफी मागणं शक्यंच नव्हतं!

इंग्लंडच्या इनिंग्जमध्ये बोथम खेळायला आल्यावर चॅपलने डेनिस लिलीला यॉर्कर टाकण्याची सूचना दिली!

चॅपल म्हणाला,
"That bastard would be expecting a bouncer! Give him a yorker!"

चॅपलच्या सूचनेकडे काणाडोळा करत लिलीने बोथमला बंपर टाकला!
बोथमने तो मैदानाबाहेर हूक केला! सिक्स!

पुढच्या ओव्हरमध्ये रॉडनी हॉगने चॅपलची सूचना ध्यानात घेत बोथमला एलबीडब्ल्यू पकडलं!
इंग्लंडने विजयासाठी आवश्यक १९५ रन्स आरामात काढल्या त्या बॉयकॉटच्या ८५ रन्सच्या नॉटआऊट इनिंग्जमुळे!

१९८०-८१ मध्ये इंग्लंड संघ वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर गेला होता. या दौर्‍यावर बॉयकॉटचा कॅप्टन होता इयन बोथम! इंग्लंडने ही सिरीज २-० अशी गमावली असली तरी बॉयकॉटने अँटीगाच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये १०४ रन्स फटकावल्या होत्या!

याच सिरीजमध्ये ब्रिजटाऊन, बार्बाडोसच्या टेस्टमध्ये मायकेल होल्डींगच्या करीअरमधली सर्वोत्कृष्ट ओव्हर त्याने बॉयकॉटला टाकली!

मायकेल होल्डींगची बॉयकॉटला टाकलेली 'ती' ओव्हर!

बोथमला कॅप्टनपदावरुन डच्चू मिळाल्यावर पुन्हा एकदा बॉयकॉटच्या इंग्लंडचा कॅप्टन होण्याच्या इच्छेने उसळी मारली, पण कॅप्टनपदाची माळ गळ्यात पडली ती माईक ब्रिअर्लीच्या!

१९८१ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर डेनिस लिलीच्या बॉलवर रॉडनी मार्शने बॉयकॉटचा ६० वर कॅच घेतला तेव्हा तो कमालीचा निराश झाला होता! अंपायरने आऊट दिल्यावरही कितीतरी वेळाने आणि अत्यंत नाईलाजाने तो क्रीजवरुन निघून पॅव्हेलियनमध्ये परतला! ही त्याची शंभरावी टेस्ट होती आणि त्यात शतक पूर्ण करण्याची संधी हुकल्यामुळे तो हळहळला होता! त्यातच बोथमच्या पराक्रमामुळे इंग्लंडने अ‍ॅशेस जिंकल्यावर तर माईक ब्रिअर्लीच्या कॅप्टनपदावर शिक्कामोर्तबच झालं!

बॉयकॉटला आता एकच आस लागली होती!
टेस्ट मध्ये सर्वात जास्तं रन्स करण्याचा गॅरी सोबर्सचा विक्रम मोडण्याची!

१९८१ मध्ये इंग्लंडचा संघ भारतात आला होता. या दौर्‍यासाठी तरी आपली कॅप्टन म्हणून नेमणूक होईल अशी बॉयकॉटला आशा होती, पण इंग्लंड सिलेक्टर्सना चाळीशीपुढे गेलेला बॉयकॉट कॅप्टनपदी नको होता! कीथ फ्लेचरची कॅप्टन म्हणून निवड करण्यात आल्यावर बॉयकॉत वैतागून म्हणाला,

"Even the Yorkshire Ripper got a fair trial in the dock but I've not been given a single chance!"

दिल्लीच्या तिसर्‍या टेस्टमध्ये अखेर एकदाचं बॉयकॉटचं सर्वात जास्तं रन्स करणारा बॅट्समन होण्याचं स्वप्नं साकार झालं!

... आणि त्याबरोबरच त्याचा दौर्‍यातला इंटरेस्ट संपला!

कॅप्टन कीथ फ्लेचर म्हणतो,
"He was uncooperative and did not seem interested in playing any further after the milestone."

कलकत्त्याच्या चौथ्या टेस्टमध्ये तर इंग्लिश संघ फिल्डींग करत असताना बॉयकॉट गोल्फ खेळताना आढळला होता! डॉक्टरने आपल्याला मोकळी हवा मिळण्यासाठी गोल्फ खेळण्याचा सल्ला दिला होता असा बॉयकॉटने दावा केला असला तरी त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही! त्याला ताबडतोब इंग्लंडला परत जाण्याची सूचना देण्यात आली!

इंग्लंडला परतलेल्या बॉयकॉटने लगेच दक्षिण आफ्रीकेचा दौरा आयोजित केला! बॉयकॉटच्या या दौर्‍यावरच्या संघात गूच, एड्रीच, एमिस, हेन्ड्रीक, एम्बुरी, नॉट, लारकीन्स, जॉन लिव्हर, ओल्ड, साईडबॉटम, अंडरवूड, विली, बॉब वूल्मर अशा अनेक टेस्ट क्रिकेटर्सचा समावेश होता!

एमसीसीने त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घातली!

दरम्यान यॉर्कशायर कमिटी - विशेषतः ब्रायन क्लोज आणि बॉयकॉट यांच्यातील वाद पराकोटीला पोहोचला होता. १९८४ च्या मोसमात यॉर्कशायरने बॉयकॉटशी काँट्रॅक्ट करु नये असं क्लोजचं स्पष्टं मत होतं!

“You ought to be the most popular man in cricket, but you can’t name me two blokes in the game who have a good word to say for you.” क्लोजने बॉयकॉटला तोंडावर सुनावलं होतं!

चाळीशीच्या पुढे असला तरी बॉयकॉट अद्यापही जोरदार फॉर्मात होता. इंग्लंड संघात पुन्हा त्याची निवड होण्याची कितपत शक्यता आहे असं कॅप्टन डेव्हिड गावरला विचारण्यात आल्यावर गावर उत्तरला,

"Geoffrey's been a marvellous servant for England but we have to look to the future and, in view of his age, it wouldn't make an awful lot of sense to pick him again."

दरम्यान १९८४ मध्ये पाकिस्तानच्या दौर्‍यावरुन मध्येच परतल्यावर बोथमने एक भन्नाट वक्तंव्य केलं होतं!
“Pakistan is the kind of place to send your mother-in-law for a month, all expenses paid.”

अद्यापही पाकिस्तानच्या दौर्‍यावर असलेल्या इंग्लंड संघाच्या मॅनेजरला बोथमच्या वतीने बिनशर्त माफी मागावी लागली होती!

१९८५ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये लीड्सवर टिम रॉबिन्सनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७५ रन्स फटकावल्यावर बॉयकॉटच्या होमग्राऊंडवर इंग्लंड ड्रेसिंगरुमच्या बाल्कनीतून बोथम गाऊ लागला,

“Bye bye Boycott!”

१९८६ मध्ये यॉर्कशायरने बॉयकॉटशी काँट्रॅक्ट करण्यास नकार दिला. यॉर्कशायरच्या या पवित्र्यामागे अर्थातच ब्रायन क्लोजचा हात होता.

क्लोज म्हणाला,
“I would have loved Geoffrey to have gone on breaking records, but in reality I had to say that his retention would not have helped us. We just couldn’t carry on with a cult figure grinding out his personal glory while the rest of the players simply made up the numbers.”

१९९० मध्ये चॅनल नाईनच्या रे मार्टीनने बोथम आणि चॅपल यांच्यातील वाद मिटवण्याच्या दृष्टीने दोघांचा एकत्रं इंटरव्ह्यू घेतला! सर्वात शेवटी मार्टीनने विचारलं,

"At the end of the day they would two of you still have a drink together?"

"Yea! That's cricket mate! You sit down and have a beer or a wine." बोथम उत्तरला!

"And you?" चॅपलकडे वळून पाहत मार्टीनने विचारलं.

“No Ray. I can find plenty of decent people to have a drink with. I won’t be drinking with him!” चॅपल थंडपणे म्हणाला!

१९९५-९६ मध्ये बोथम आणि अ‍ॅलन लँब यांनी इमरान खानवर बॉल टँपरींग आणि वर्णभेदी कॉमेंट्सवरुन खटला भरला होता. या खटल्यात बोथमच्या वतीने साक्षीदार म्हणून ब्रायन क्लोज आला होता तर इमरान खानच्या वतीने साक्षीदार होता जेफ बॉयकॉट! खटल्यादरम्यान बोथमच्या वकीलाने क्लोजला विचारलं,

"Is Boycott an honest man?"

"No Comment!" क्लोज उत्तरला!

“Can I say one thing, it will take three minutes!” बॉयकॉट मध्येच उठून उभा राहिला!

...आणि जजने परवानगी दिलेली नसतानाही सुमारे अर्धा तास ब्रायन क्लोजच्या तक्रारींचा पाढा वाचत राहिला!

ऑस्ट्रेलियाच्या चॅनल नाईनने १९९८-९९ च्या मोसमात बोथमची कॉमेंटेटर म्हणून नेमणूक केली! इयन चॅपल चॅनल नाईनचा परमनंट कॉमेंटेटर! चॅपल आणि बोथम पुन्हा आमनेसामने येण्याच्या कल्पनेनेच धसका घेतलेल्या पत्रकारांनी चॅपलला याबद्द्ल विचारलं असता चॅपल म्हणाला,

"That's all right as long as they don't expect me to socialise with him because I certainly won't be doing that. I haven't had many words with him since ... it would suit me if I never spoke to the guy again!"

दोघांपैकी एकजणही आपल्या भूमिकेपासून रेसभरही मागे हटण्यास तयार नव्हता!

२००७ मध्ये बोथमला जेव्हा सरदारकीने गौरवण्यात आलं तेव्हा प्रतिक्रीया व्यक्तं करताना चॅपल म्हणाला,
"There are many skeletons dangling in Botham's cupboard, ranging from stories of drug-taking to general thuggery, and if he keeps peddling his lies, there's every chance more of these stories will emerge. Someone is going to regret awarding him a knighthood!. Apart from having us in the same bar, the rest is a fairytale."

चॅनल नाईनच्या कॉमेंट्रीबॉक्समधून कॉमेंट्री करतानाही दोघांमधली ही खुन्नस लपून राहिली नाही! मॅच सिच्युएशन आणि अंपायरच्या निर्णयाबद्दल बोथमने केलेल्या दोन कॉमेंट योग्य असल्याचं कोणीतरी चॅपलच्या निदर्शनाला आणून दिल्यावर चॅपल म्हणाला,

“Even a broken clock is right twice a day!”

बोथमचा आवाज सहन होत नसल्याने आपण त्याची कॉमेंट्री म्यूट करतो असंही पुढे चॅपलने बोलून दाखवलं!

डेव्हीड लॉईड म्हणतो,
"Although Botham and Chappell are often in the same vicinity, for the good of world peace they do everything they can to avoid each other!”

२०११ च्या अ‍ॅशेस सिरीजच्या दरम्यान अ‍ॅडलेड मध्ये बोथम आणि चॅपल पुन्हा आमनेसामने आले! बोथम त्यावेळी स्काय स्पोर्ट्सचा कॉमेंटेटर होता तर चॅपल चॅनल नाईनचा! अ‍ॅडलेडच्या कार पार्कमध्ये दोन्ही टीव्ही स्टेशनच्या गाड्या नेमक्या शेजारी-शेजारी उभ्या होत्या!

बोथम गाडीतून उतरुन ग्राऊंडच्या दिशेने जाणार इतक्यात बाजूनेच जात असलेल्या चॅपलची कॉमेंट त्याच्या कानावर आली..

"Fucking bugger!"

“Oh, Fuck off, you bastard!” बोथमने सुनावलं!

पण इतक्यावरच थांबला तर तो बोथम कसला?
आपली बॅग गाडीत टाकून तो वळला आणि म्हणाला,

“Right that’s it, once and for all. Come on!”

चॅनल नाईनचा फ्लोअर मॅनेजर रॉन दोघांच्या मध्ये पडला. दोघांनाही शांत होण्याची विनंती करत तो म्हणाला,

“Come on fellas, ease off now. We can’t have this!”

"Beefy was absolutely steaming!" डेव्हीड लॉईड म्हणतो, "Just fucking wait till I get him on my own in a lift!”

बोथमचा राग शांत होण्यास दोन दिवस लागले!

आपलंच म्हणणं बरोबर आहे आणि दुसरा एक नंबरचा खोटारडा आहे हे बोथम आणि चॅपल यांचं एकमेकाबद्दलचं प्रामाणिक मत आजही कायम आहे!

सुंभ जळला तरी पीळ जात नाही!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet