अर्धनारी(?)नटेश्वर

लई लई वर्षांपूर्वी लिहिलेली संवादिका. रुची मासिकात पूर्वप्रकाशित. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसानिमित्त.

: अरे पण तू डान्स क्लासला जायला सुरुवात कशी केलीस? Don’t tell me तुझ्या आईनीच तुला क्लासला घातलं.
: अगं ती जरा एक स्टोरीच आहे.

: अहो, आमचा मोठा मुलगा जायचा तबल्याच्या क्लासला. मी त्याला सोडायला जायचे. हा खूप छोटा होता. घरी एकटं कुठे ठेवणार? म्हणून त्यालापण बरोबर घेऊन जायचे. जेवढा वेळ दादाचा क्लास असेल, तितका वेळ हा इकडेतिकडे भटकत राहायचा. पलीकडच्या खोलीत नाचाचा क्लास सुरू असायचा. हा तासन् तास ते बघायचा आणि घरी येऊन दिवस दिवस नाचायचा. एक ते वेडच डोक्यात घेतलं. नॉर्मल चालायचाही नाही. पावलागणिक 'क्डान् धा' किंवा 'तत् तत् थै' करत पुढे जायचा.

: म्हणजे तू कथ्थक असं एकलव्यासारखं शिकलास?
: एकलव्य वगैरे नाही. स्वप्नातपण मी 'धिं धिं' बडबडायला लागल्यावर असल्या रोगावर उपाय म्हणून शेवटी घातलं मला नाचाच्या क्लासला त्यांनी. पण रोगापेक्षा इलाज भयंकर वाटायला लागला त्यांना.
: भारी! किती वर्षं जात होतास?
: सहा-सात.
: सही. मला नव्हतं माहीत हे. मला फक्त आठवतंय तू शाळेच्या गॅदरिंगमधे नाचायचास ते.
: हो! दरवर्षी. अगदी सातवी-आठवीपर्यंत.
: आपल्या वर्गातली मुलं तुला खूप चिडवायची. गॅदरिंगमधे सगळ्या मुलींचा नाच आणि मुलांचं नाटक असं ठरल्यासारखं असायचं. आणि तू एकटा मुलींत मुलगा लांबोडा.
: तुम्ही मुलीपण काही कमी नव्हतात चिडवण्यात.
: मीपण चिडवायचे...
: नाच म्हणजे बायकी प्रकार असं माझ्या बाबांना वाटायचं. शाळेतल्या मुलांचं ठीक आहे गं, पोरांना चिडवायला काहीही पुरतं. पण बाबाही असं बोलले की मी नर्व्हस व्हायचो.

: एकदा तर शाळेतल्या नाचात त्याला कोणीतरी लिपस्टिक लावली. मग बाकीच्या पोरांनी जो काय त्रास दिलाय. घरी येऊन हा चिडचिड करत बसला. समजावताना पुरेवाट झाली माझी. हे लिपस्टिक प्रकरण आणि एकंदर चिडवाचिडवी त्याला सहन होईना. नाचाच्या क्लासला सगळ्या मुलीच. त्या ह्याच्या मैत्रिणी. यावरून पण मित्र चिडवायचे. मग एकदा म्हटलं, "जाऊ दे बाळा, तू नाच सोडून दे. दुसरं काहीतरी कर. तबला वगैरे." मग सोडला कथ्थकचा क्लास.

: सगळेजण गोपींमधला कृष्ण म्हणून चिडवायचे.
: प्चक्...तुला फिशपाँडपण मिळाला होता ना शाळेच्या ट्रिपला?
: वर्षभर मी अजिबात नाचत नव्हतो. पण बेचैन व्हायचं.
: मग? पुन्हा क्लास लावला?
: हो, पण वेस्टर्न आणि क्रिएटिव्हचा डान्सचा. कथ्थक शिकताना लोक जसे कुजकट बोलायचे, ते थांबलं. वेस्टर्न डान्स करतो म्हटल्यावर कोणी हसायचं नाही.
: कथ्थक बंद?
: हो. बरेच वर्षं त्या अ‍ॅकॅडेमीत वेस्टर्नचे वेगवेगळे प्रकार शिकलो. तिथेच शिकवायलाही लागलो. जगभरातले कितीतरी folk dances शिकलो संधी मिळेल तसतसे. खूप शो केले. बॅले, नृत्यनाट्यं केली.

: कॉलेजचे सगळे ते फेस्ट नि काय काय स्पर्धा गाजवल्यान्. बरेच कार्यक्रमही करायचा ग्रुपबरोबर. पण सगळं अभ्यास, प्रॅक्टिकल सांभाळून हो. त्यामुळे मला बोलायला जागा ठेवलीन् नाही. चिकार बक्षिसं मिळवलीन्. एकदोनदा तर टीव्हीवर पण आलावता. पण शाळा कॉलेजात असेपर्यंत ठीक आहे हो. हा तर त्याचं खूळ घेऊन बसला.

: प्रेक्षकांच्या टाळ्या, कौतुकं, मुलींच्या नजरा...खूपजणी लाइन मारायच्या. मुलं जळायची माझ्यावर. स्टेजची झिंग होती. काय मस्त दिवस होते! एकीकडे M.Sc. झालो.
: मग कॉलेज संपल्यावर?
: मी पुन्हा कथ्थक शिकायला लागलो. कोण काय म्हणेल त्याची पर्वा करणं सोडून दिलं. त्याच सुमाराला प्रोफेशनल कोरिओग्राफीची पहिली मोठी ऑफर आली.
: कूल!
: छे गं, कूल कसलं? माझी नाचानाची वाढत चालली आहे म्हटल्यावर घरातलं वातावरण अस्वस्थ झालं. एक दिवस मी सगळ्यांना सांगून टाकलं की नाच हेच माझं करियर असणार आहे.
: वाव! मग?
: समजावणं, धुसफूस, रागावणं, भांडणं असं चालू राहिलं बरेच दिवस. घरच्यांपासून दुरावत गेलो. पण नाचत राहणं मी माझी निकड होती.

: अहो, माझी एक भाचीपण कुचिपुरी का काय ते नाचते. पण मुलींचं वेगळं पडतं हो. हासुद्धा तेच धरून बसला तर कसं चालेल? दीदीला कोणी शब्दानं बोलत नाही, मग मलाच विरोध का म्हणे. त्याला म्हणलं बेभरवशाचं फिल्ड आहे हे. मोहमयी. आपल्याकडे पुरुषच घरातला कर्ता समजतात. कायमचा असा काहीतरी income source हवाच. पैसा हवाच ना? इतके वर्षं नाचू दिलंच ना आम्ही? पण आता हा हट्ट धरून बसू नकोस.

: शिवाय पुढे लग्न जमवताना problem येईल असं एक कारणही दिलं त्यांनी. असली arguments ऐकून डोकं फिरायचं माझं. शेवटी एक तडजोड झाली. मी एखादा business वगैरे काढावा आणि तो सांभाळून फावल्या वेळात डान्सबिन्स काय ते.
: business?
: छ्या! अडीच वर्षं वाया घालवली एकीकडे business एकीकडे डान्स या प्रकारात.
: वाया?
: तर काय? दोन्ही नीट सांभाळणं मला कधीच जमलं नाही. किती वेळा चांगल्या प्रोग्रॅम्सवर पाणी सोडावं लागलं. तरी 'धंद्याकडे नीट लक्ष देत नाही' असं ऐकावं लागायचंच. मग मी ठरवलं, बोलणी खायचीच आहेत, तर नाहीच द्यायचं लक्ष धंद्याकडे.

: एक दिवस भांडणच झालं मोठं. खूप तणतण केली त्यानं. business बंद करून टाकून पूर्ण वेळ कोरिओग्राफी करणार म्हणतोय. कसं समजवावं याला? ऐकत म्हणून नाही.

: कसं पटवून देऊ आईबाबांना? माझं ऐकतच नाहीत.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

कलाकारांची व्यथा खूप छान मांडली आहे.
.
पण आई-वडीलांचे देखील मला पटते. शिवाजी व्हावा पण शेजारच्या घरात. व्यावहारीक दृष्टीकोन ठेवणे त्यांना भागच आहे. अपत्याला संभाव्य धोके, पोटेन्शिअल पराभव यांची जाण देणे हेच त्यांच्याकडून अपेक्षित आहे. मला आई वडीलांचे जास्त पटले.
.
चार्वी सिनेसृष्टीत, स्वतःची इन्स्टिट्युट याखेरीज नृत्याचा अविष्कार कुठे होतो? प्रत्येकजण ट्रेल्ब्लेझर असतो का? नाही मग सामान्य मुलांनी काय हा सट्टा खेळायचा का? सॉरी मला हार्शली नाही बोलायचं. मला दुसरी बाजू हवी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

* धन्यवाद.
*

मला आई वडीलांचे जास्त पटले.

हाहाहा
* हल्ली, विशेषतः टीव्हीवर बरेच चॅनेल्स झाल्यापासून कोरिओग्राफीवाल्यांना बरे दिवस आले आहेत. पुरस्कार सोहळे, आजा नच ले वगैरे कार्यक्रम, पौराणिक सीरियल अशी कुठे कुठे संधी मिळते. नाटकांत लागतात कोरिओग्राफर्स. शास्त्रीय नृत्याचे बरेच कार्यक्रम, सोहळे होत असतात. तिरुपतीसारखी देवस्थानं, धार्मिक/ सांस्कृतिक/ भाषिक संस्था (उदा. आंध्रा असोसिएशन), कोणार्क-खजुराहोसारखी देवळं-कम-पर्यटन स्थळं, मायबाप सरकारच्या अखत्यारितल्या बर्‍याच संस्था/ खाती (उदा. ICCR, संगीत नाटक अकादमी), अनेक खाजगी संस्था शास्त्रीय नृत्याचे महोत्सव आयोजित करत असतात. परदेशी पाहुण्यांना आपली कला दाखवणे वगैरेसाठी राष्ट्रपती भवनसारख्या ठिकाणी, कॉमनवेल्थ गेम्ससारख्या निमित्तांनी, कॉर्पोरेट किंवा शैक्षणिक परिषदांच्या शेवटी - अशा अनेक ठिकाणी व निमित्ताने शास्त्रीय नृत्याचे कार्यक्रम सादर होत असतात. नाच शिकवणे हाही मोठा व्यवसाय झाला आहे. टीव्ही कार्यक्रमांसाठी नाच शिकवण्यापासून विद्यापीठांत पदवी अभ्यासक्रमांसाठी नाच शिकवणे, physically challenged मुलामुलींना therapy म्हणून नाच शिकवणे असे अनेक पैलू त्याला आहेत आणि हजारो लोक या व्यवसायांत आहेत.
* नृत्यच काय, अनेक क्षेत्रांत, व्यवसायांत सुरुवातीला सट्टा खेळावाच लागतो. कुठलाही धंदा केला तरी त्यात रिस्क घ्यावीच लागते.
* 'नृत्य हा व्यवसाय म्हणून करणे' या मुद्द्यापेक्षाही, एका मुलाने (मुलग्याने) या (हल्ली) 'बायकी' (समजल्या जाणार्‍या) क्षेत्रात उतरणे या मुद्द्यावर मला भर द्यायचा होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एका मुलाने (मुलग्याने) या (हल्ली) 'बायकी' (समजल्या जाणार्‍या) क्षेत्रात उतरणे

होय होय चार्वी माझं या मुद्द्याकडे जाम दुर्लक्ष झाले. Smile हाच मुद्दा आहे लेखाचा. अगदी बरोबर.
तू दिलेली माहीती आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लेखन!

वाचताना ओबामचे "देअर आर रेड स्टेट्स, देअर आर ब्लू स्टेट्स, बट टुगेदर वी आर.." वगैरे आठवत होतं Wink

===

हळुळू याच घाशाघिशीतून जुन्या समाजाची वीण सैल होत जाईल - जाताना दिसतेच आहे. नव्या प्रकारची नव्या पेडांची वीण बसेल.
लाल संवाद निळे होतील, कोणतेतरी वेगळेच संवाद लालची जागा घेतील..
हे असंच चालु होतं, आहे आणि राहील... आणि रहिलंच पाहिजे!

==

बरंच काही डोक्यातून उमटलं, उमटतंय.. त्याला कारण ठरणारं ताकदीचं लेखन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असेच म्हणते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे असंच असतंय. घराबाहेर पडून एकदा रोजीरोटीची थोडी व्यवस्था केली की घरचे काय म्हणतात याला फाट्यावर कोलणे सोपे जाते. घरच्यांवर अवलंबून असले तर डोक्यावर पडल्यागत अर्ग्युमेंटे बिनकामी ऐकावी लागतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुढे!!?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही काय साठा उत्तरांची कहाणी आहे सुफळ संपूर्ण व्हायला? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाहा, नाही गोष्ट रोचक झाली होती म्हणून पुढे काय झालं असेल याची उत्सुकता लागली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग मी ठरवलं, बोलणी खायचीच आहेत, तर नाहीच द्यायचं लक्ष धंद्याकडे. इथपर्यंत येण्यासाठी फार कष्ट पडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अच्चा अचं झालं तर...!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

चार्वीजी, इतके क्लिशे कथानक आपण लिहले तरी कसे ? ही तर युगोयुगोंकी कहानी हय...! जे पोरीला(पोराला) करायचय ते कुटुंबाला योग्य वाटेलच असे नाही. पुन्हा त्याला टायटल अर्धनारीनटेश्वर देउन अजुन महा गल्लत केली कारण टायटलच्या अनुशंगाने विचारप्रवास (रोधी/विरोधी) कथानायकाचा अथवा इतरांचा उतरवलाच नाहीये ही तर निव्वळ करीअर काउंसेलिंगची केस बनवली आपण Sad आपण लेखात मार्मीक वैचारीक चित्रण करायची संधी घालवली आहे. मुळ मुद्यालाच बगल... Sad

नोटः- लक्षात घ्या राग तुम्हाला, सुख तुम्हाला. जरा तट्स्थ अन अंतर्मुख व्हा मी श्रेणींना नॉनसेंन्स म्हटले आहे ते देणार्‍यांच्या बुध्दीला न्हवे. मेक सेंन्स ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

लेख आवडला. कुठच्याही गुणावमूल्यनाशिवाय दोन्ही बाजू मांडल्यामुळे तिढा स्पष्ट व्हायला मदत होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोष्ट आवडली. पुढची प्रतीक्षा....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्‍र्र्..ती प्रतिक्रिया इथून हलवलेली दिसत्ये. पण तो मुद्दा (कथ्थक/ भरतनाट्यम् नाचणारे पुरुष काहीतरीच दिसतात) मला महत्त्वाचा वाटतो. चिं.जं.नी या मुद्द्याला उत्तर दिलेले आहे, पण तरी मीही लिहिते:

नाचतानाच नव्हे तर एरवीच्या वागण्यातही नाजूक हालचाली करणारे आणि त्यामुळे 'बायले' समजले जाणारे अनेक नर्तक माझ्या पाहण्यात आहेत. त्यांना पाहून मला वाटत असे, की हे असे बायकीपणे का वागतात-बोलतात? (शास्त्रीय नृत्याच्याच परिभाषेत बोलायचे झाले तर) लास्य का करतात? नृत्यात तांडव हा भागही असतो. मग हे मुलगे राकट, जोशपूर्ण का नाचत नाहीत? पुढे असे दणदणीत शास्त्रीय नृत्य करणारे मुलगे पाहिले, तेव्हा वाटले, बघा - बायकीपणा न करता, पुरुषी सौष्ठवानेही नाचता येते.

पण नंतर माझे विचार बदलले. वाटू लागले, की नाजूकपणा बायकांनी करायचा आणि दांडगाई पुरुषांनी हे खरंच नैसर्गिक आहे का ह्या समाजाने रचलेल्या गोष्टी आहेत? शास्त्रीय नृत्य करताना नाजूक हालचाली करणारे पुरुष पाहून आपल्याला कसेसेच का होते? पुरुषांनी तसे हातवारे करायचे नसतात हे आपल्या समाजाने बिंबवलेले असते म्हणून? पुरुषाने लास्य केले तर काय बिघडले? कथ्थक/ भरतनाट्यम् नाचणारे पुरुष काहीतरीच दिसतात कारण कोणत्या लिंगाच्या व्यक्तीने कसे वागायचे याच्या ज्या रूढ सामाजिक चौकटी आहेत, त्यात ते बसत नाही म्हणून. पण या चौकटी कितपत योग्य आहेत? स्त्रीवादी चळवळी/विचारसरणींत काही टप्प्यांत 'स्त्रियांनी असेअसे वागू नये'च्या चौकटी बरेचदा मोडल्या गेल्या. पोशाखापासून शिक्षण घेण्यापर्यंत, मोठ्याने हसू-बोलू नयेपासून पुरुषी समजल्या जाणार्‍या क्षेत्रांत नोकरी करण्यापर्यंत. पण पुरुषांना सो-कॉल्ड बायकी वागण्याची मुभा असणे (उदा. रडण्याची, स्कर्ट घालण्याची) ही त्याच नाण्याची दुसरी बाजू आहे. काही काळानंतर, 'बायकी'पणे नाचणारे पुरुष नर्तक मला खटकेनासे झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे. माझेही पूर्वी असे व्हायचे. पुढे नृत्य ही निव्वळ एक अभिव्यक्ती आहे. नर्तक काहीतरी सांगु पाहत असतो. नर्तक हा स्वतः नसतो तर त्या नृत्याचा भाग असतो त्यावेळी ते नृत्य जर लास्याची डिमांड करत असेल तर किती उत्तम उतरले आहे ते पहावे. नर्तक बाई आहे की बुवा या अगदीच गैरलागू गोष्टी आहेत. इत्यादी गोष्टी जसजशा समजू लागल्या पचू लागल्या तसे हे खटकणे बंद झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ल्हानपणीच गोपीकृष्ण यांचा एक कार्यक्रम पाहिला होता. तेव्हापासून पुरुषदेखिल उत्तम नृत्य करू शकतात हे उमजले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाजूकपणा बायकांनी करायचा आणि दांडगाई पुरुषांनी हे खरंच नैसर्गिक आहे का ह्या समाजाने रचलेल्या गोष्टी आहेत?

शरीराचा विचार केला तर या निसर्गाने रचलेल्या गोष्टी आहेत, ज्याला समाजाने स्विकारले, बिकॉज सिंपलीसीटी सरवाइवज. आणी नैसर्गीकता धारण करावी लागत नाही ती आपोआप विना सायास अस्तित्वात असते. उदा. कोणा पुरुषला गोल स्तन आहेत असे दाखावायचे असेल तर त्याला टेनीस बॉल धारण करावे लागतील म्हणुन ते करणे अनैसर्गीक. आणि तरीही त्याची इछ्चा कमी होत नसेल तर त्याला स्तन इतके आवडतात की तो वेडाच्या भरात साध्य आणी साधक यातला फरक विसरला आहे. त्याला साध्यच साधकता दिसत आहे. आणी एखादी गोश्ट तुम्हाला आवडणे आणी तुम्ही ती असने यातिल फरक जाणवुन देणे नक्किच आवश्यक आहे.
लक्षात घ्या आयम नॉट अगेंस्ट फँटसीज. ज्याला जे पाहिजे ते त्याने जगावे. आयम अगेंस्ट कंसीडरींग देम अब्सोल्युटली नॅचरल.

'बायकी'पणे नाचणारे पुरुष नर्तक मला खटकेनासे झाले.

मिसमॅच वाटणे आणी खटकणे यात फरक आहे. कदाचीत अवांतर/गैरलागु वाटेल पण माझ्या उदाहरणातले मर्म आपन समजुनही घ्याल. मी टीवीवर बायका भरत नाट्यम वगैरे करायला लागल्या की लगेच चॅनेल बदलायचो पण एकदा अरंगेत्रम अंटेंड करावा लागला होता आणी स्त्रियांना प्रत्यक्षात शास्त्रीय नृत्य करताना बघणे हा एक जबरा कमालीचा लोभस, अत्यंत आनंददायी अनुभव ठरला. आय जस्ट कांट टुक ऑफ माय आइज.. द वे दे डीड इट ऑल, अगेन अँड अगेन. पुन्हा सांगतो एखाद्या अलंकारीत तरुणीला शास्त्रोक्त नृत्य करताना बघणे हा एक अतिशय आनंददायी अनुभव आहे. चुकवु नका.

असो मुद्दा हा आहे (इनकेस माझे उदाहरण वरकरणी गैरलागु वाटत असुनही) एखाद्या बाबतीत आपला द्रुश्टीकोन बदलने याचा नैसर्गीकता काय आहे याचाशी काडीचा संबंध नसतो हे वास्तव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

जर तुमच्या भवती प्रत्येक स्त्री आणि पुरुषा दोघेही नाचत असतील (जसे अनेक आदिवासी कबिल्यांमध्ये घडते) तर तुम्हाला मुळात पुरुषांनी नाचणे अनैसर्गिक वाटणारच नाही. फक्त आपल्या नागर समाजात लहानपणापासून ते भवताली (त्यात टिव्हीही आला) दिसत नसल्याने तसे कंडिशनिंग होते. ते उतरवून बघा! बाकी असो. मी थांबतोय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी थांबतोय!

इतनी जल्दी क्या है ? अभि तो मैने स्टार्ट किया है...!

पुरुषांनी नाचणे अनैसर्गिक वाटणारच नाही.

आयफा अ‍ॅवार्डमधे काही वेळ रणवीर सिंग पिंगा गाण्यावर स्त्रियांप्रमाणे(वेश न करता) नाचला. त्याने अतिशय मस्त स्टेप्स केल्या मला आवडल्या. ही डीड इट ग्रेसफुली अँड पुल्ल्ड इट ऑफ नाइसली, इट वाज एंटर्टेनिंग. पण उद्या पुर्णवेळ त्याने हा उद्योग केला तर मी नक्किच म्हणे तो डोक्यावर पडला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

पुरुषांचा डान्स फक्त २ केसेसमध्ये बघायला आवडतो- एक म्हणजे गणपती डान्स आणि दुसरा म्हणजे ट्रायबल डान्स-त्यातही तलवारींसोबत केलेले नृत्य आवडते, उदा. इथे पहा.

बाकी ते शास्त्रीय डान्स वगैरे फक्त बायकांनीच केलेला चांगला दिसतो असे माझे प्रामाणिक मत आहे. विजयनगर फॅशनची ती साडी चोपून नेसलेल्या, कमरेखालपर्यंत वेणी असलेल्या, अंबाड्याच्या गोलाला सराउंडिंग मोगर्‍याचा गजरा, पायात ते टनभर वजनाचे घुंगरू, किलोभर दागिने, इ. सेटपमध्ये नेसलेल्या त्या सुंदर नर्तकी पाहिल्या की बसल्याजागी कृष्णदेवरायाच्या दरबारातच जणू पोहोचलोय असे वाटते. (आणि चांदोबाचीही आठवण येते, खोटं कशाला बोला? प्रीइस्लामिक भारत कसा होता तर चांदोबात दाखवल्यागत हे आमचे लाडके मत अजूनही तितकेसे बदललेले नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वर नंतरजे वर्णन केलंय त्यात चुकीचे काहीच नाही.

फक्त "शास्त्रीय डान्स वगैरे फक्त बायकांनीच केलेला चांगला दिसतो" असे माझे मत आहे इतकेच. चांगला दिसणे सापेक्ष आहे वगैरे मान्य केले आहे (बहुदा आपण दोघांनी).
प्रश्न नैसर्गिक असण्या नसण्याचा आहे. आणि पुरुषांनी नाचणे अनैसर्गिक नाही असे मला वाटते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारतीय शास्त्रीय डान्स ज्याला म्हणतात त्या प्रकारचे डान्स करणारे पुरुष अनैसर्गिक वगैरे वाटतात इतकेच म्हणणे आहे.

याला उपमाच द्यायची तर पुरुषाने साडी नामक वस्त्र परिधान केलेले अनैसर्गिक वाटते, याचा अर्थ चड्डी, पँट, इ. वस्त्रे परिधान केलेले चालत नै असा नाही. वस्त्र परिधान करण्याला आक्षेप नै तर कुठले वस्त्र परिधान करावे याच्याशी निगडित आक्षेप आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काही वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रियांनी पाटलोण घालणं वा केस कापणंही अनैसर्गिक वाटत असे याची आठवण इतिहासप्रेमी ब्याटेश्वरांना करून देत आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नक्की मुद्दा काये? एखादी गोष्ट भविष्यात नॉर्मल असेल म्हणून आता त्याला विचित्र वाटतं असही नाही म्हणायच?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

विचित्र वाटते म्हणजे अनैसर्गिक आहेच असे नव्हे हा मुद्दा आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दा पुरुषांचा असताना स्त्रियांचे काय आणताहात मध्ये?

बाकी रोमन सेनेटरही पायघोळ झगाच घालायचे. मुद्दा सद्यकालीन टेस्टचा आहे. सद्यकालीन टेस्टप्रमाणे साडी घातलेला पुरुष विचित्र वाटतो. तुम्हांला तो नॉर्मलाईझ करायचा असेल तर करा चळवळ तशी. त्याची टर उडवायला आम्ही आहोतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुद्दा पुरुषांचा कुठे आहे? मुद्दा जेंडर ड्रेसिंगचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असूदे ना मग. अमुक एक गोष्ट विचित्र वाटते हे साधं मत आहे. ती गोष्ट अनैसर्गिक आहे असे आमचे मत आहे फक्त. प्रत्यक्षात काय आहे त्याने जीवनात काय फरक पडतोय? जर फरक पडत असेल तर सांगा. तुमच्या लेखातली स्थिती जर कधी आलीच तर त्यावेळी पाहू काय करायचे ते. तोवर आहे हे मत कायम राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही बिरजू महाराजांचं नृत्य पाहिलं नाही का कधी? किंवा नवीन पिढीतल्या नकुल घाणेकर किंवा मल्लिका साराभाईंच्या मुलाचं (नाव नाही आठवत)?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिरजू महाराजांचे नृत्य पाहिलेय आणि ते कै खास वाटले नै.

(मला नृत्य आणि संगीत यातले कै कळत नै हे अगोदरच कबूल आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खास वाटलं नाही ते ठीक. सगळ्यांनाच सगळं कळतं असं नाही.
पण अनैसर्गिक काय वाटलं त्यात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनैसर्गिक म्हणजे ते हावभाव (भलेही त्या कुठल्या चौकटीतलेच असले तरीही) आमच्या गावठी टेस्टला बायकी आणि म्हणून अनैसर्गिक वाटतात. बस इतना ही मत है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लोकहो, कत्थक मधे दोन भाग असतात.

त्यातला अभिनय करुन दाखवण्याचा भाग असतो म्हणजे कॄष्ण गोपींचे कपडे पळवतो आहे वगैरे. हे करताना पुरुष जे अंगविक्षेप आणि विभ्रम वगैरे करतात ( गोपींच्या रोल मधे ) ते भीषण दिसते.

दुसरा जो टेक्निकल प्रकार असतो, तुकडे, पर्ण वगैरे त्यात अभिनय नसतो. तो कोणीही केला तरी वाईट दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> भारतीय शास्त्रीय डान्स ज्याला म्हणतात त्या प्रकारचे डान्स करणारे पुरुष अनैसर्गिक वगैरे वाटतात इतकेच म्हणणे आहे.

खूपच सरसकट विधान आहे त्यामुळे प्रतिवाद करण्याची गरज भासत नाही.

>> तुम्ही बिरजू महाराजांचं नृत्य पाहिलं नाही का कधी?

जोरदार टाळ्या. त्याच प्रमाणे केलुचरण महापात्रा. सडसडीत, लवणारं, चपळ आणि लालित्यपूर्ण शरीर. त्यात अजिबात स्त्रैणपणाचा लवलेशही नाही. वरच्या ऋच्या कथकलीसारख्या नृत्याविषयीच्या मुद्द्याशीही जोरदार सहमती. तसाच प्रकार यक्षगानातल्या पुरुषांमध्येही दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रतिवाद करण्याची गरज भासत नाही.

वैयक्तिक आवडीनिवडींचा प्रतिवाद करणेच मुळात निरर्थक आहे. बिरजू महाराजांचे नृत्य खरेच कसे आहे या मुद्याबद्दल चर्चा असती तर भाग वेगळा. इथे त्यांचे नृत्य कसे वाटतेय हा मुद्दा आहे. त्यामुळे प्रतिवाद वगैरे इथे मुळातच अस्थानी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> वैयक्तिक आवडीनिवडींचा प्रतिवाद करणेच मुळात निरर्थक आहे.

'खास वाटले नै' असं तुम्ही म्हणताय. पण प्रथमेश नृत्याच्या दर्जाविषयी किंवा व्यक्तिगत आवडीनिवडीविषयी बोलतच नसावेत असा अंदाज आहे. म्हणून प्रतिवाद करत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इथे त्यांचे नृत्य कसे वाटतेय हा मुद्दा आहे

नाही ओ बॅटमॅन. त्यांच्या किंवा स्पेसिफिक कोणाच्याच नृत्याच्या दर्जाविषयी प्रश्न पाडत नाहीये. तुम्ही ते अनैसर्गिक वगैरे म्हणून ज्याला नाक मुरडताय, ते ही उदाहरणं बघून तरी सरळ होईल असं वाटलं म्हणून दिलेली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला इथे जरा गोंधळ होतोय असं वाटतं
कॉसड्रेसिंग मी बोलत नाहीये. (त्याबद्दल दुसरीकडे बोलू Wink )

पुरुषांनी केलेल्या शास्त्रीय नृत्यांबद्दल म्हणतोय. त्या शास्त्रातच पुरुषांसाठी काही नियम घालतेले असतात. त्या चौकटीतच ते पुरूष सहसा नाचतात. बिरजू महाराज वगैरे प्रसिद्ध उदाहरणे अहेतच. तेव्हा पुरुषांनी शास्त्रीय नृत्य नाचणे हे नवे नाही. दुसरे मुद्रांचे किंवा हावभावांचे ते नर्तक जे पात्र उभे करतोय त्याला साजेसे आहे का हे महत्त्वाचे आहे.

कथकली सारख्या नाचात पुरुष मोठ्या संख्येने नाचतात (तिथे तर सगळी मदार चेहर्‍यावरील भावमुद्रांवर असते. फक्त त्या डीकोडेड असतात) तिथे ते नैसर्गिक होते (बहुतांशांना ते तसे वाटते) आणि भरतनाट्यममध्ये (त्याहून अधिक कथ्थकमध्ये) केवळ सामान्यांना अधिक समजतीलशा भावमुद्रा असल्याने अचानक ते अनैसर्गिक होते असे तर शक्य नाही ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनैसर्गिक वाटते इतके खरे. का वाटते कारण हावभाव बायकी वाटतात. याहून अधिक स्पष्टीकरण देणे मला तरी शक्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुरुषांनी केलेल्या शास्त्रीय नृत्यांबद्दल म्हणतोय. त्या शास्त्रातच पुरुषांसाठी काही नियम घालतेले असतात. त्या चौकटीतच ते पुरूष सहसा नाचतात.

असहमत. गोटीपुआ किंवा कुचिपुडीसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारात परंपरेने पुरुषांनी स्त्रीवेषात नाचणे अपेक्षित होते, स्त्रिया हे प्रकार नाचत नसत. पण हे पुरुष स्त्रीपात्र म्हणून नाचत. उलट दासीअट्टम् (भरतनाट्यम् चे मूळ)सारख्या प्रकारात फक्त स्त्रिया (देवदासी) नाचत. त्यामुळे भारतीय नाट्य(नृत्य)शास्त्रात पुरुषांसाठी असे वेगळे नियम नाहीत.

पुरुषाने पुरुषाचा पोशाख घालून नृत्य करणे हे काही भारतीय नृत्यपरंपरांत नवे आहे.

क्रॉस ड्रेसिंगचा मुद्दा यासाठी काढला, की कपडे जसे सामाजिक रचनेने ठरवलेले आहेत, तसे विशिष्टलिंगी व्यक्तीने विशिष्ट हातवारे करावेत ही सामाजिक रचना आहे हे मत स्पष्ट व्हावे म्हणून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

की कपडे जसे सामाजिक रचनेने ठरवलेले आहेत, तसे विशिष्टलिंगी व्यक्तीने विशिष्ट हातवारे करावेत ही सामाजिक रचना आहे हे मत स्पष्ट व्हावे म्हणून.
पुरुषांना पँटीला झिप असणे पुरेसे आहे. पुरुषांना उन्नत दिसण्यासाठी ब्रा ची आवश्य्कता नाही. अर्थात तुम्ही एकदा स्वतःला फसवायचेच ठरवले असेल तर वास्तवता सहज इग्नोर करु शकता पण ते नैसर्गीक अजिबात न्हवे हे विसरु नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

धोतराविषयी काय म्हणता?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धोतर म्हणजे लुगडं न्हवे म्हणतो.

ऑन सेकंड केर्फुल थॉट चार्वीजी मला हे बोलायला खरेच आष्चर्य वाटत आहे की तुम्ही मुद्दा समजावताना कपड्याचे उदाहरण देउन जरी घोडचुक केली आहे तरीही आपणास समजुन घेण्याच्या द्रुश्तीकोनाने आपल्या विधानाचा काहीक्षण न्युट्रल राहुन विचार केला तर येस विशिष्टलिंगी व्यक्तीने विशिष्ट प्रकारे हातवारे करावेत ही एक सामाजिक ? रचना आहे हे मत मला तार्कीक पातळीवर पटते, आता हे वागण्ञात अ‍ॅक्सेप्ट करणे मला जमेल की नाही माहित नाही. पण वैचारीक पातळीवर मला पटते. म्हणजे शक्य आहे की एखादा मुलगा स्त्रियांच्यात वाढला तर तो तसेच हातवारे करुन बोलेल, एखादा जंगलात वाढला तर त्याचे एक्स्प्रेशन ( हातवारे वेगळे असतील) आणी ते काय असावे याचा त्याचे जेंडर काय आहे याचाशी नेमका संबंध जोडता येणार नाही. इट इज जस्ट पार्ट ऑफ संस्कार (सामाजीक रचना).

फक्त यात एव्हडाच प्रॉब्लेम आहे जर हे सर्व सामाजीक रचना ठरवते तर ते घडुनही ते न पाळणारे त्याला न मानणारे का निर्माण होतात ? आणी ठीक आहे मुलगा स्त्रियांच्यात वाढला अत्से हावभाव करुन बोलु लागला पण तेंव्हा काय होइल जेंव्हा त्याला तो पुरुष असल्याची जाणीव होइल ? मोगलीचे काय होइल जेंव्हा त्याला लक्षात आले असेल तो जानवर नाही इन्सान आहे ? म्हणजे माझ्या मनात अजुनही गोंधळ आहे. आपणास काय वाटते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

फक्त यात एव्हडाच प्रॉब्लेम आहे जर हे सर्व सामाजीक रचना ठरवते तर ते घडुनही ते न पाळणारे त्याला न मानणारे का निर्माण होतात ?

पहिल्याप्रथम अमुकतमुक निव्वळ सामाजिक रचना (सोशल कॉन्स्ट्रक्ट) आणि अमुकतमुक निव्वळ नैसर्गिक प्रेरणा असं स्पष्ट काळंपांढरं वेगळं काढता येत नाही. दोन्हींचा काही ना काही प्रमाणात त्यात हातभार असतो. त्यातही दोन्ही परिणाम एकजिनसी नसतात. माणसामाणसाप्रमाणे आणि समाजासमाजाप्रमाणे त्यांत वैविध्य असतं. म्हणूनच वरचा सगळा वाद 'मला विचित्र वाटतं' हे ठीक आहे, पण 'हे अनैसर्गिक आहे' असं म्हणणं योग्य नाही याप्रकारे चालला आहे. असो. हालचाल कशी करावी याच्या काही नैसर्गिक प्रेरणा असतात (विशिष्ट भाव हे जगभर सार्वत्रिक आहेत.) तर काही गोष्टी समाजाने ठरवलेल्या आपण शिकतो (आख्ख्या हाताने खायचं की बोटांनीच खायचं की काटे चमचे वापरायचे). हालचाली कशा कराव्यात हे जसं या दोन्हींमधून घडतं, तसंच हालचालींचा अर्थ काय लावायचा हेही ठरतं. त्यात सामाजिक भाग बराच मोठा असतो. नैसर्गिक आणि सामाजिक या दोन्ही परिणामांचं डिस्ट्रिब्यूशन मोठं असल्यामुळे त्या डिस्ट्रिब्यूशनच्या टेल एंडचे लोकही दिसून येतात. हा नॉर्मल डिस्ट्रिब्यूशनचा भाग आहे हे समजून न घेता आपण सरासरीच्या जवळचे ते नैसर्गिक, आणि पुरेसे लांबचे ते अनैसर्गिक अशी विभागणी करतो.

मुलगा स्त्रियांच्यात वाढला अत्से हावभाव करुन बोलु लागला पण तेंव्हा काय होइल जेंव्हा त्याला तो पुरुष असल्याची जाणीव होइल ?

लिंगभान हा प्रचंड क्लिष्ट विषय आहे. शरीर पुरुषाचं असलं तरीही आपलं मन, जाणीव ही एका स्त्रीची आहे (किंवा उलट) असे प्रकार कायम घडतात. त्यातही अनैसर्गिक काही नाही. आपल्याला माहीत असलेल्या चारचौघांपेक्षा ते वेगळं आहे इतपतच म्हणता येतं. 'पुरुष हे पुरुष असतात आणि स्त्रिया या स्त्रिया असतात तेव्हा त्यांनी तसंच वागलं पाहिजे' ही विचारपद्धती फारच ढोबळ आणि रिजिड आहे. वैविध्य असतं, आणि ते स्वीकारावं ही विचारपद्धती त्यामानाने अधिक व्यापक आणि लवचिक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

. वैविध्य असतं, आणि ते स्वीकारावं ही विचारपद्धती त्यामानाने अधिक व्यापक आणि लवचिक आहे

बुध्दीला पटतयं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

Smile
छान. असं कोणी म्हटलं की एकदम याचसाठी केला होता अट्टहास असं होतं! मनःपूर्वक आभार

लैंगिकता काय, लिंगभान काय हे मोठे वर्णपट आहेत. अल्टाव्हायोलेट ते इन्फारेड अशी पूर्ण भरगच्च रेंज त्यात आहे. फक्त मधोमध असणारा शुद्ध हिरवा रंगच तेव्हढा नैसर्गिक बाकी सहा रंग आणि अगणित रंगछटा अनैसर्गिक असं काही आपण म्हणतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी माणूस आहे ( असं मी मानतो) आणी माणुस बुध्दीसोबतच भावनेनेही काम करत असतो ( मोस्ट ऑफ द टाइम). आणी बुध्दीला पटलेल्या नव्या गोष्टीची स्विकाराहार्य भावना बनायला पुरेसा अवधी, आणी अजुन बरेच काही अनुकुल असावे लागते. ते अजुन घडले नाही. मे बी अजुन माझ्यासाठी पृथ्वी सपाटच आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

सगळ्यांचंच असं होतं अरे. बुद्धीला पटतंय ही एक महत्त्वची आणि मोठी स्टेप आहे.
आणि भावन काहीही असल्या तरी बुद्धीला काय पटतंय याची स्पष्ट जाणीव असणं ही तर केवळ माणूस नाही तर अधिकच चांगला माणूस असण्याची गोष्ट आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> पुरुषांना पँटीला झिप असणे पुरेसे आहे. पुरुषांना उन्नत दिसण्यासाठी ब्रा ची आवश्य्कता नाही.

पुरुषांना उन्नत दिसायची इच्छा असो नसो, ब्राची जागा चुकली काय? आणि ट्रॅकपॅन्ट हा तुम्हाला अतिशय अश्लील कपडा वाटतो का? कारण त्यात (काही) पुरुष उन्नत दिसू शकतात Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पुरुषांना उन्नत दिसण्यासाठी ब्रा ची आवश्य्कता नाही.

'ब्रो' बद्दल ऐकलं आहे काय तुम्ही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> विशिष्टलिंगी व्यक्तीने विशिष्ट हातवारे करावेत ही सामाजिक रचना आहे हे मत स्पष्ट व्हावे म्हणून.

तुम्ही होमोफोबिक वगैरे आहात का? शिवाय, संस्कृतीसापेक्षतेचा भागही ह्यात असतो. आपल्याकडे स्त्रैण समजल्या जातील अशा हालचाली असलेले अनेक पुरुष परदेशात दिसले / भेटले. काट्याचमच्यानं खाण्याची पाश्चात्य रीतभात ज्याला अवगत आहे अशा पुरुषाला खाताना पाहिलं तरी अनेक भारतीयांना ते स्त्रैण वाटू शकेल, पण पाश्चात्य समाजात ते नॉर्मल असतं. ह्याउलट, कित्येक भारतीय पुरुषांची जेवण्याची पद्धत तिथे किळसवाणी म्हणता येईल इतकी रासवट वाटू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आँ? माझी लिहिताना काहीतरी गडबड झालेली दिसते. वास्तविक तुम्ही जे म्हणत आहात, तेच मला म्हणायचं आहे असं मला वाटतं.
मला साधारण असे म्हणायचे होते: 'विशिष्ट जेंडरच्या व्यक्तीने कसे वागावे (त्यात हातवारे, कपडे, खाताना करायच्या हालचाली समाविष्ट) याविषयीचे नियम (विशिष्ट काळातला, विशिष्ट ठिकाणचा) समाज (त्यात संस्कृती आलीच) घालून देतो. व्यक्तीच्या जीवशास्त्रीय लिंगाचा या नियमांशी संबंध असतो असे कधी कधी भासते खरे, पण तसे असेलच असे नाही. अनेकदा हे नियम सोशल कंस्ट्रक्शन (=सामाजिक रचना) असू शकतात.'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह आत्ता कळलं. खरंच की Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

विजयनगर फॅशनची ती साडी चोपून नेसलेल्या, कमरेखालपर्यंत वेणी असलेल्या, अंबाड्याच्या गोलाला सराउंडिंग मोगर्‍याचा गजरा, पायात ते टनभर वजनाचे घुंगरू, किलोभर दागिने, इ. सेटपमध्ये नेसलेल्या त्या सुंदर नर्तकी पाहिल्या की बसल्याजागी कृष्णदेवरायाच्या दरबारातच जणू पोहोचलोय असे वाटते. (आणि चांदोबाचीही आठवण येते, खोटं कशाला बोला? प्रीइस्लामिक भारत कसा होता तर चांदोबात दाखवल्यागत हे आमचे लाडके मत अजूनही तितकेसे बदललेले नाही.)

http://res.cloudinary.com/sagacity/image/upload/c_crop,h_786,w_1084,x_0,y_61/c_scale,w_1080/v1430677876/0515-town-indian-film-bollywood-dancer-shovana_lflljm.jpg
.
https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/ee/7a/e0/ee7ae0e48b16025bdd9dff95c9767394.jpg
.
https://encrypted-tbn3.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSbN4QdiYmIYEzDS8pQ4l1kH7O6ITyjtPL1FnNBDPaJfzrL7R2e4A

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहाहाहाहा. क्या बात है शुचिजी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

http://www.shobana.in/photo-gallery.html

ये देखेगा तो येडा हो जायेगा. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चार्वीताई - तुम्ही इतक्या डीफेंसिव्ह का होताय? मला कथ्थक नाचात स्त्रीयांचा अभिनय करणारे लोक बघायला काहीतरीच वाटतात. मला वाटतात तर वाटतात, ते माझे मत झाले.

तुम्हाला तसे वाटत नाही तर ठीक आहे. ते तुमचे मत झाले. मला त्याच्या मागच्या कारणमिमांसेत ही रस नाही.

तुम्हाला काहीही आवडले तरी त्यामागचे कारण जस्टीफाय करायची गरज नाही. किंवा त्या मागे आपला फार मोठ्ठा विचार आहे हे दाखवुन द्यायची पण गरज नाहीये. तुमची आवड ही तुमची आहे आणि मला त्याबद्दल काहीही रस नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वैयक्तिक आवडीनिवडीचा प्रतिवाद होऊ शकत नाही. पण वैयक्तिक आवड अनेकदा समाजाच्या आवडींनी प्रभावित होत असते. म्हणून चर्चा इ. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> किंवा त्या मागे आपला फार मोठ्ठा विचार आहे हे दाखवुन द्यायची पण गरज नाहीये.

तुमच्यापाशी नसेल हो विचार आणि वैचारिक क्षमता अनुताई, आणि तुम्ही ते तुमच्या उक्तीतून दाखवून द्यायलाही मोकळ्या आहात, पण म्हणून बाकी जगात कुणाचाही विचार नसेल असं नाही ना. आणि एखाद्याचा असला आणि त्यांनी तो मांडला तर लगेच 'दाखवून द्यायची गरज नाहीए'? शोभतं का हे तुम्हाला? कुठे नेऊन ठेवलंत मग तुमचं (येता जाता ज्याची आठवण काढता ते) अभिव्यक्तिस्वातंत्र्य?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आमच्या नाटकाच्या group मध्ये एक सर शास्त्रीय नृत्य गुरूगृही राहून शिकलेले होते . त्यांच्या कलेबद्दल आदर होताच . पण रोजच्या जगण्यात त्यांचे ते हावभाव आणि चालायची पद्धत यावरून खूप लोक हसत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकवेळ नाचताना सहन होईल, पण रोजच्या वागण्यात असले बघणे म्हणजे कठीण आहे सखि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो खर आहे .

लोक खूप चेष्टा करतात अग . आता तरी reality shows वगैरे आहे . तेव्हा तसं काही नव्हतं . कला वगैरे आहेच , पण सामान्य लोकांना नाही कळत ते . त्या सरांचं लग्न पण होत नव्हतं त्यामुळे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर प्रतिसादांमध्ये पुरुषी नाच आणि यक्षगाना या दोन्हींचा उल्लेख झाला आहे. मी एकदाच हे यक्षगाना बघितलंय. त्यात दोन मुख्य पात्रं होती; एक दिसायला थोराड, ओबडधोबड किंवा रासवट पुरुषी दिसणारा आणि दुसरा नाजूक चेहेरा-शरीर असणारा. हा फरक वयामुळेही असावा, नाजूक नर्तक तरुण असेल. पण रासवट दिसणाऱ्या माणसाच्या नृत्यात ग्रेस होती; कसलेल्या नर्तिकांच्या हालचाली जशा असतात किंवा फेडरर, शारापोवा यांच्या खेळात जसं सौंदर्य असतं ते दिसत होतं.

नृत्याच्या त्या कार्यक्रमाबद्दल आता फारसं काही आठवत नाही. पण रासवट चेहेऱ्याच्या पुरुषाच्या नाचातली नजाकत अजूनही आठवते. पाचेक मिनीटांत दुसऱ्याकडे लक्षही जाईनासं झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला. मनातला कोलाहल चांगला मांडला आहे.
यंदा जानेवारीमधे सवाई गंधर्वमधे राजेंद्र गंगाणी यांचं कथ्थक नृत्य पत्नीबरोबर पाहिलं. त्यांची नृत्यातली निपुणता, लोकांपुढे सादर करतानाचा उत्साह, ऊर्जा , नजाकत आणि चापल्य या सर्वांसमोर त्यांच्या हालचाली स्त्रैण आहेत किंवा कसे, याचं भान मला काही नव्हतं. कथ्थक नृत्याचे जे काही चांगले पर्फॉर्मन्स पाहिले आहेत त्यांच्यात हा अनुभव नक्की आहे.

खाजगी आयुष्यात त्यांच्या हालचाली स्त्रैण असतील तर गंमत वाटेल. विचित्र वाटणार नाही. अनैसर्गिक असं काही मुळीच वाटणार नाही.

इन जनरल, बाई नि पुरुषांच्या आविर्भावापासून, दिसण्या-वागण्यावरून, कर्तुमकर्तुमत्वावरून ठसठशीतपणे बनवले गेलेले जेंडर रोल्स यातून बाहेर पडण्याचा मी प्रयत्न करत आलेलो आहे. त्यातला फोलपणा मला उमगलेला आहे. समाजात वावरणार्‍या बहुसंख्यांना जेंडर स्टिरिओटाईप्समधे अडकलेलं मी पाहतो. ते सर्व वैयक्तिक अभिरुचीच्या ठिकाणी ठीकच आहे. मात्र स्टिरिओटिपिकल वर्तन/निवडीपेक्षा वेगळं असण्याची स्पेस समाजाने व्यक्तींना द्यावी; जिथे ती स्पेस आक्रसत आहे तिथे तसं होऊ न देण्यासाठी प्रयत्न करत राहावेत अशा मताचा मी आहे. वरचे काही प्रतिसाद या धर्तीचे आहेत. काही सदस्यांनी काही गोष्टी अनैसर्गिक/विचित्र वाटतात असं म्हण्टलंय. ठीक आहे. सार्वजनिक स्पेसमधे वावरण्याचं, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य जोवर अबाधित आहे तोवर मतामतांच्या गलबल्याबद्दल विशेष वेगळं काय वाटून घ्यायचं ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.