सत्य नारायण कथा - सामाजिक समरसतेची कथा

काही वर्षांपूर्वीची गोष्ट, दिल्लीच्या दत्त विनायक मंदिरात सत्यनारायणाची कथा सुरु होती. मंदिराच्या प्रांगणात एक ग्रहस्थ काही लोकांसोबत सत्यनारायण कथेचा माखौल उडवित होते. मी हि तिथे पोहचलो. थोड्यावेळातच लक्ष्यात आले, हे ग्रहस्थ नुकतेच पुण्याहून परतले आहे, आणि तिथल्या एका महाविद्वानाची मुक्ताफळे आपल्या तोंडाने फेकत आहे. मी हि त्या चर्चेत शामिल झालो. एखादी कथा हजारों वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे, तर निश्चितच त्या कथेत सामान्यांना भावणार काही तरी असणारच. सत्यनारायणाची कथा सामान्य माणसाला सत्यमार्गावर चालण्याची प्रेरणा तर देतेच शिवाय सामाजिक समरसतेचा संदेश हि देते. समाजातील सर्व वर्गांना हि कथा एक सूत्रात बांधते.

हिंदू धर्मात सदैव दोन प्रवाह राहिले आहे. एक प्रवाह स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यासाठी समाजात दुही माजविण्याचे कार्य करतो, ज्याला आपण आसुरी शक्ती म्हणू शकतो तर दुसरा प्रवाह समाजात सौख्य निर्माण करणारा अर्थात दैवीय शक्ती म्हणू शकतो. सत्यनारायण कथा सामान्य लोकांसाठी आहे. सत्यनारायणाची कथा लोकांना सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते व समाजात सौख्य हि निर्माण करते. नवीन कामाची सुरुवात लोक सत्यनारायणाची कथा करून सुरु करतात. नवीन विवाहित जोडपे या कथेचे श्रवण करून आपला संसार सुरु करतात. सत्य आणि परस्पर विश्वास हे सुखी जीवनाचे सार आहे.

सत्यनारायण कथेतील पहिले पात्र एक दरिद्री ब्राम्हण आहे. हा ब्राम्हण दरिद्री का बरे असेल हा विचार मनात आलाच. जर ब्राम्हण जास्ती दक्षिणेच्या लालचाने पूर्व निश्चित यजमान सोडून दुसरी कडे जाईल तर काय होईल. त्याला पहिल्या यजमानाशी खोटे बोलावे लागेल. काही काळ ब्राम्हणाला जास्त दक्षिणा मिळेल. पण नंतर अधिकांश यजमान त्याला बोलावणे सोडून देतील. ब्राह्मण दरिद्री होईल. अश्याच एका दरिद्री ब्राम्हणाला नारद मुनींनी सत्याचरणाचा उपदेश केला. ब्राम्हणाची परिस्थिती बदलली. तो श्रीमंत आणि समृद्ध झाला.

दुसरे पात्र एक मोळीविक्या आहे अर्थात आजच्या पुरोगामी भाषेत म्हणायचे तर दलित समाजातला. तो ब्राम्हणाचा घरी येतो, कथा ऐकतो आणि प्रसाद हि भक्षण करतो. याचा अर्थ त्या काळी ब्राम्हणाच्या घरी हि दलिताचे स्वागत होत होते. दुसर्या शब्दांत सत्यनारायण कथेत अस्पृश्यतेचा निषेध केला आहे.

या कथेत अंगध्वज नावाचा राजा हि एक पात्र आहे. राजा म्हणजे क्षत्रिय. जंगलात गवळी समाजाचे लोक (वनवासी) सत्यनारायणाची कथा करीत आहे. राजा अंगध्वज त्यांच्या हातून प्रसाद स्वीकार करीत नाही. जातीपातीच्या भेदभावावर विश्वास ठेवणारा राजाच्या हातून प्रजेचे कल्याण संभव नाही. राजा प्रजेचा विश्वास गमावतो. परिणाम, राजाचे राज्य नष्ट होते. राजा अंगध्वजाला त्याची चूक उमगते. तो वनात राहणार्या गवळी लोकांसोबत सत्यनारायणाची पूजा करतो आणि त्यांच्या सोबत प्रसादाचे भक्षण करतो. अर्थात राजा अंगध्वज सामाजिक भेदभावाच्या नीतीचा त्याग करतो व जनतेचा विश्वास पुन: संपादित करतो. राजाने सामाजिक भेदभाव सोडून समस्त प्रजेशी भातृभाव ठेवला पाहिचे याचा बोध या कथेतून मिळतो.

या कथेत साधूवाणी (वैश्य समाजातला) हि एक पात्र आहे. हा व्यक्ती दिलेला शब्द न पाळणारा आणि सदैव खोटे बोलणारा आहे. हिंदीत एक म्हण आहे 'काठ कि हांडी बार बार नही चढती'. साधुवाणीला खोटे बोलण्यचे फळ भोगावे लागतात. कैद हि भोगावी लागते आणि व्यापारात नुकसान हि होते. शेवटी साधुवाणीला सत्य मार्गावर चालण्याचे महत्व कळते. वैश्याला (व्यापारीला) हि सत्य मार्गावर चालायला पाहिजे हा बोध या कथेतून मिळतो.

सारांश सत्यनारायणाच्या कथेत समाजातील सर्व वर्णांचे पात्र -ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, दलित आणि वनवासी आहेत. सामान्य माणसाला कळावे म्हणून कथेत अनेक चमत्कार हि आहेत. पण या चमत्कारांच्या मागचे कारण समजून सत्यनारायण कथेकडे बघितले तर कळेल हि कथा सर्वांनी सत्य धर्माचे आचरण करावे आणि जातिगत भेदभावाचा मार्ग सोडून बंधुभावाने राहण्याचा संदेश देते. त्या गृहस्थाना सत्यनारायण कथे कडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाली. बिना वाचता, समजता पुरातन कथांचा विरोध करणे हि एक प्रकारचे अज्ञान आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खरंय सैराटची गाणी खूपच भारी आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो ना आणि गेम ऑफ थ्रोन्सचा दुसरा एपिसोडही आलाय आता!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नको बाई ती कत्तल बित्तल नको मला... आपलं पर्मनंट रुममेट बरं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सत्यनारायण कथा सामाजिक समरसतादाची प्रेरणा तर देतेच, शिवाय स्त्रीवादाचा संदेशही देते.
सत्यनारायण कथेतील एक पात्र कलावती आहे. कलावती लग्नानंतरही माहेरी राहत असते. तिचा पती आपल्या सासर्‍याबरोबर धंदा करतो. याचा अर्थ त्या काळी मुली विवाहानंतरही आपल्या मात्यापित्याच्या घरी राहत, व त्यांचे पती घरजावई बनून आपल्या पित्याच्या नव्हे, तर सासर्‍यांच्या व्यवसायात मदत करत.
सारांश कथेत स्त्री व पुरुष अशी दोन्ही लिंगांची पात्रे आहेत. ही कथा सर्वांना स्त्री-पुरुष भेदभावाचा मार्ग सोडून स्त्रीवादी आचरण करण्याचा संदेश देते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चार्वी ताई, समाजातील विभिन्न जातींचा विचार करून लेख लिहिताना कथेतील हा पैलू लक्षात आला नाही. जाणीव करून दिल्या बाबत धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पात्रांकडे पाहण्याचा रोचक नजरिया!

अवांतर - मला सत्य नारायण कथेमधला हा भाग आवडत नाही -> आयुष्यात काहीही समस्या आली की सोल्युशन एकच! सत्यनारायण घालायचा आणि प्रसाद खायचा ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला आवडतो ब्वॉ सत्यनारायणाचा प्रसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रणव, मला सत्यनारळाची कथा आवडते. काहीही लफडं झालं की स्पीकरच्या भिंती लावा आणि खा-प्या-पार्टी करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सत्यनारायणाला स्पीकर कोण लावतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> दुसरे पात्र एक मोळीविक्या आहे अर्थात आजच्या पुरोगामी भाषेत म्हणायचे तर दलित समाजातला. तो ब्राम्हणाचा घरी येतो, कथा ऐकतो आणि प्रसाद हि भक्षण करतो. याचा अर्थ त्या काळी ब्राम्हणाच्या घरी हि दलिताचे स्वागत होत होते. दुसर्या शब्दांत सत्यनारायण कथेत अस्पृश्यतेचा निषेध केला आहे.

खरं तर अस्पृश्यता भारतात नव्हतीच. मनूस्मृती काही तरी खोटं सांगत्ये. त्याला ऐतिहसिक आधार काही नाही. सत्यनारायण कथेला सामाजिक कंगोरे दाखवणारी सत्यकथा म्हणून ऐतिहासिक आधार आहे. शिवाय, आजही लोक सत्यनारायण पूजा करतात, पण आज मनूस्मृतीत सांगितलेलं कुणीही पाळत नाही. म्हणजे लोकप्रियता आणि रसिकप्रियता दोन्ही निकषांवर सत्यनारायणच खरा ठरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अधिकार्यांसाठी वेगळे toilet असले पाहिजे असा काही नियम सरकारी नियमावलीत नाही. तरी हि सर्व कार्यालयांमध्ये मोठे अधिकारी लाखों रुपये (जनतेचे) खर्च करून वेगळे toilet बनवितात. सर्वात मोठे कार्यालय सुद्धा याला अपवाद नाही. कर्मचार्यांनी अधिकाऱ्यांचे toilet वापरू नये असे आदेश हि काढल्या जातात. कुठल्या आधारावर कुणालाच माहित नाही. तसेच काही मनुस्मृतीचे आहे. काही स्वार्थी ब्राम्हणांनी आपल्या स्वार्था साठी मनुस्मृतीत व इतर ग्रंथांमध्ये बरीच भेसळ केली, आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही स्वार्थी ब्राम्हणांनी आपल्या स्वार्था साठी मनुस्मृतीत व इतर ग्रंथांमध्ये बरीच भेसळ केली, आहे.

हे कशावरून? काही आधार इ. आहे की कसे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...मी तर असेही ऐकले होते की सत्यनारायणाची प्रथा ही बंगालातल्या कोणत्याशा मुसलमानी प्रथेवरून (सत्यपीर की साचापीर की असेच काहीतरी) एकोणिसाव्या शतकात 'आपण' (बोले तो, हिंदूंनी) ढापलेली आहे म्हणून.

अर्थात, यात सत्य किती आणि पीर... आपले, नारायण... आपले, वावडी किती, हे एक तो सत्यपीर जाणे नि दुसरा तो सत्यनारायण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी तर असेही ऐकले होते की सत्यनारायणाची प्रथा ही बंगालातल्या कोणत्याशा मुसलमानी प्रथेवरून (सत्यपीर की साचापीर की असेच काहीतरी) एकोणिसाव्या शतकात 'आपण' (बोले तो, हिंदूंनी) ढापलेली आहे म्हणून.

यग्जाक्टली. एक मायनर दुरुस्ती म्ह. अठराव्या शतकात.

त्याअगोदरच्या कुठल्याही जुन्या हिंदू धर्मग्रंथात सत्यनारायणाचा उल्लेखच सापडत नाही. कुणाला सापडल्यास अवश्य द्यावा, तेवढीच नवी माहिती मिळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्याअगोदरच्या कुठल्याही जुन्या हिंदू धर्मग्रंथात सत्यनारायणाचा उल्लेखच सापडत नाही. कुणाला सापडल्यास अवश्य द्यावा, तेवढीच नवी माहिती मिळेल.

हे काय आता?

एखादी कथा हजारों वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे, तर निश्चितच त्या कथेत सामान्यांना भावणार काही तरी असणारच

हे वाचलं नै का तुम्ही?

वाचन वाढवा!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी बरोबर, वाचन वाढवलेच पाहिजे. पण गेलाबाजार कुठला धर्मग्रंथ ते सांगितले तर वाचू म्हणतो.

किंवा कुठल्यातरी वैदिक गणितानुसार हजार = दोनशे/तीनशे असे कन्व्हर्जन फ्याक्टर असायचे.

याचा निर्णय लागेपर्यंत कलियुगात आजवर गुप्त असलेल्या आणि अलीकडेच प्रगट झालेल्या या स्तोत्राचे मनन करीत आहोत. आपणही ते करून पुण्य मिळवावे अशी विनंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>कलियुगात आजवर गुप्त असलेल्या आणि अलीकडेच प्रगट झालेल्या या स्तोत्राचे मनन करीत आहोत. आपणही ते करून पुण्य मिळवावे अशी विनंती.

हे स्तोत्र माझ्या एकतीसाव्या जन्मात मी यजुर्वेदात घुसडले होते. परंतु यवनांच्या आक्रमणात ते लुप्त झाले. अलिकडे एका निखिल नामक व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन मी त्याला हे लिहून प्रसिद्ध करायचा दृष्टांत दिला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी तर ऐकले होते कि "सत्य नारायण" नावात 'अ' साइलेंन्ट आहे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समजा, आधी कुठलीही पूजा न ठेवता, यजमानांनी सर्वांना केवळ प्रसाद उर्फ शिरा खायला बोलावले, तर त्यांत खाणार्‍यांचे नुकसान आहे. ती लांबलचक पूजा संपण्याची वाट पहाताना, जमलेल्या मंडळींचा जठराग्नि प्रज्वलित होतो. त्यांना चांगली भूक लागते व एवढा तुपाने थबथबलेला प्रसाद त्यांना सहज पचतो. उपाय एक, फायदे अनेक.

सबरका फल मीठा होता है, हे पुन्हा एकदा सिद्ध होते.
सगळा खाल्लेला प्रसाद पचल्यामुळे, अन्नाची नासाडी होत नाही.
ब्राह्मणाच्या संपत्तीत भर पडते(कॅश आणि काईंडमधे)
जमलेल्या लोकांचे सोशल सर्कल वाढते.

फकस्त एकच शंका:
सत्यनारायण हा विष्णुचा कितवा अवतार म्हणे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

फकस्त एकच शंका:
सत्यनारायण हा विष्णुचा कितवा अवतार म्हणे ?

अवतार नाय, विष्णूच आहे तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणताही धर्म लोकांमधे पसरावा म्हणून मुद्दाम नैतीकता अन पाप पुण्यांची निर्मीती केली जाते अन्यथा तो धर्म लोकांमधे पसरु शकत नाही. बरं नुसती निर्मीती करुन फायदा काय जर ती पाळली जात नसेल तर ? मग झाले उपासकांवर वागणूकीचे बंधन आपोआप आले, आणी वरुन तुच तुझ्या अवस्थेला कारणीभुत म्हणायलाही धर्माचे उपदेशक मो़कळे. म्हणजे त्याचीही जबाबदारी देव घेत नाही. सगळं आपल्यावरच अन नैतीकतेची चाडही आपणच ठेवायची. मग देवाचं काम काय ... पण मी इतकं अवांतर का बोलतोय ?

आयम अ सेल्फ ऑब्स्सेस्ड पर्सन, मला सामाजिक समरसतेशी काहीही देणे घेणे नाही, समाज माझ्यासारखे वागायला मुक्त आहे असे माझे मत आहे, त्यामुळे माझा फारच सोपा प्रश्न भाजीवाल्याचे देखील प्रोब्लेम समजुन घेणार्‍या पटाइटकाकांना इतकाच आहे डज इट वर्क्स ? म्हणजे विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिम् वगैरे प्रकरण अशा कथा वाचुन खरेच घडते काय यावर प्रकाश टाकलात तर खरा अंधःकार दुर होइल. हे सामाजीक भान वगैरे भंपकता पुराण, धर्म याबाबत मधे न आणलेलीच बरी. कारण मुळात सामाजीक भान वगैरे इश्युज (इश्युज एअर कोट्स मधे वाचावे) निर्माण करण्यात धर्माचाच फार मोठा हात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

फिरता फिरता एका ब्लॉगवर सत्यनारायण संबंधी माहीती सापडली - http://khattamitha.blogspot.com/2015/06/blog-post.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या शब्दांनी गूगल केल्यास माहितीचा अक्षरशः खजिनाच समोर उघडतो.
अखण्ड बंगालचा मिश्र वारसा, साहित्य, हिंदु-मुस्लिमांचा एकमेकांवर प्रभाव, बंगाली अस्मिता अनेक गोष्टींवर अतिशय मूलगामी भाष्य जालावर उपलब्ध आहे. (हे वाचताना महाराष्ट्राबाबत तितकेसे नाही, किंवा इतक्या उत्तम भाषेत मांडलेले असे जवळजवळ काहीच नाही, याची खंतही वाटते. अपवाद- शं.गो.तुळपुळे यांचे जालोपलब्ध साहित्य.))
आणखी एक सुंदर प्रबंध (मला वाटते हवाई युनिवर्सिटीमध्ये किंवा सहकार्याने सादर केलेला) वाचायला मिळाला होता. ह्या जवळजवळ सव्वादोनशे पानी प्रबंधात बंगालच्या गेल्या सहाशे सातशे वर्षांच्या समाजव्यवहाराचा वेध उत्तम शैलीत अनेक संदर्भांसह घेतलेला आहे. बंगाल हे काय अद्भुत गौडबंगाल आहे ते केवळ हा प्रबंध वाचला तरी लक्ष्यात येण्यासारखे आहे. याची लिंक दुर्दैवाने आत्ता लगेच सापडली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपक्रमावर यावर बेफाम चर्चा झाल्याचं आठवतंय. कोणाला वेळ असेल तर प्लीज दुवा हुडकावा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या एका मित्राच्या मते सत्यनारळाचा प्रसार हा पेठेतल्या धार्मिक प्रकाशनांनी केला. त्यांच्या कथापुस्तिकांचा खप किती प्रचंड आहे हे सत्यनारळच जाणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

मान गये पटाइतजी!! आपकी पारखी नजर और सत्यनारायण कथा दोनोंको...

आता सतीची चाल, केशवपनासारख्या पुरोगामिंनी वैट्ट वैट्ट ठरवलेल्या प्रथांमागचे उदात्त हेतु ऐकण्यास फार उत्सुक आहे..

I know you can do it!! तुम्ही शिवधनुष्य (तुमच्या दृष्टीने खरतर खूप सोपच आहे ते) उचलाच..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सीता, मंदोदरी, तारा, अहल्या, द्रोपदी, कुंती सारख्या स्त्रीयांना सती आणि प्रात: स्मरणीय म्हंटले आहे, या पैकी कुणीही स्वत:ला जाळून घेतलेले नाही. बाकी म्हणाल तर मी स्वत:ला आणि आपल्या परिवाराला खरा पुरोगामी समजतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छे छे! मध्ये ऐसीवरच कुणीसं लिहिलं होतं की या पंचकन्यांबद्दल. (तो प्रतिसाद मिळाला, तर कृपया द्या.)
- सीतेला भाजून घेऊन स्वत:ची शुचिता सिद्ध करावी लागली, नंतर तिने जमिनीच्या खाचेत उडी घेऊन आत्महत्या केली
- मंदोदरीला नवर्‍याचा बाहेरख्यालीपणा गपचीप मान्य करावा लागला
- अहल्येला क्षणाच्या मोहासाठी नवर्‍याची लाथ खाऊन मग दगड होऊन पडावे लागले, ते दुसर्‍या एमसीपी पुरुषाच्या लाथेची वाट पाहत
- तारेवर दीराने बलात्कार केला
- द्रौपदीला अर्जुन सोडून कुणी चालेल का नाही हे कुणी विचारलेच नाही , कौरवांच्या विटंबनेबद्दल तर बोलायलाच नको
- कुंती त्यातल्या त्यात सुखी. तिलाही पहिले मूल सोडून द्यावे लागले.
असतील नाहीतर काय असल्या अभागी बायका प्रात:स्मरणीय एमसीपीजना! जे जे काही बिचार्‍यांनी कमावले ते असल्या विपरीत परिस्थितीवर मात करून स्वतेजाने कमावले. समाज आणि समाजधुरिणांनी त्याला हयातभर विरोध केला आणि नंतर वंदन केले. चाटायचे आहे होय ते?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या सर्व आब्जेक्शनांना कैच्याकै अशी श्रेणी देत आहे. मुळात 'पतिव्रता स्त्री'ची व्याख्याच 'पतीने जे काही अत्याचार केले ते निमूटपणे सहन करणारी' अशी केली ही सगळी आब्जेक्शनं सपोर्टिंग एव्हिडन्स बनतात हे तुमच्या लक्षात (की लक्ष्यात?) येतं आहे का?

तुम्हाला प्राचीन आणि प्रगल्भ हिंदू संस्कृतीची काही जाण नाही हेच तुमच्या प्रतिसादातून दिसतं. शिवाय पुरोगामी या शब्दाचा अर्थ कळलेला नाही हेही उघड आहे. तेव्हा खाली बसा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसर्‍या परिच्छेदातल्या सर्व गोष्टी मी अभिमानाने भाळी मिरवीत आहे. ते असो. पण मुळात त्यांना कुणी जाळून मारले नाही, असे विधान होते त्याच्या प्रतिवादार्थ हा विदा देण्यात आला हे विद्रटांना कळू नये याचे आश्चर्य वाटते हे लक्ष्यात घ्यावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे असे क्लॉजेटेड लोक बाहेर येतात गं अशा प्रतिसादांमुळे. काहीही झालं, कसंही झालं तरी आपल्या भुक्कड संस्कृतीबद्दल वावगा शब्द खपवून घ्यायचा नाही.

भटोबा, सती या प्रथेच्या नावाखाली बाईला जिवंत जाळणं इज सो नाईटीन्थ सेंच्युरी. आता निराळ्या गोष्टी चालतात; 'सातच्या आत घरात', 'मुलगी शिकली प्रगती झाली' याची जमेल तशी टर उडवणं, अशा निरनिराळ्या गोष्टी सद्यकालात 'हेप्' आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>भटोबा, सती या प्रथेच्या नावाखाली बाईला जिवंत जाळणं इज सो नाईटीन्थ सेंच्युरी.

मला मधे गोवण्याचं कारण?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाटले म्हणून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण मुळात त्यांना कुणी जाळून मारले नाही, असे विधान होते त्याच्या प्रतिवादार्थ हा विदा देण्यात आला हे विद्रटांना कळू नये याचे आश्चर्य वाटते हे लक्ष्यात घ्यावे.

मग, त्यांना नाही ना जाळून मारलं? काही विदा आहे का जाळून मारलं हे सिद्ध करण्याचा? आता सीतेला अग्निपरीक्षा करायला लावली हे खरं आहे. पण म्हणजे जाळून मारणं होतं का? नाही ना? मग खाली बसा. तुमच्यासारख्या स्त्री आयडींना इथे लिहिण्याची परवानगी मिळते हेच पुरेसं नाही का? उगाच पुरुष लोक बोलत असताना काहीतरी प्रतिवाद वगैरे करण्याची काय गरज आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चला, म्हणजे आता अग्निपरीक्षेबद्दल तरी मान्य आहे म्हणायचं. बाकी माझ्या परवानगीचं मी आणि व्यवस्थापिकाबाई काय ते बघून घेऊ. तुम्ही आधी तुमचं पौरुष सिद्ध करा बघू, मग आपण पुढच्या वादाचं बघू.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मग, जिने लग्न करण्याआधी शिवधनुष्य उचलण्याची परीक्षा घेतली, तिची घेतली थोडीशी परीक्षा तर काय बिघडलं? तिला ती परीक्षा न देण्याचा हक्क होताच की. आणि त्याकाळी तसलंच चालायचं. तुम्ही पुरोगामी लोकं त्याला आजचे निकष लावून अर्थाचा अनर्थ करता. अॅबनॉर्मल हेच नॉर्मल झालंय आजकाल त्याला काय करणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग तुमच्यासारखे ढुढ्ढाचार्य पुन्हा न्यू नॉर्मल कशाला आणू बघताय म्हणे? त्यामुळे तोंड उघडणं भाग पडतं. आणि हो, 'लग्नाआधी शिवधनुष्य' या वाक्प्रयोगात नवीन त्रिशतकी धाग्याची बीजं आहेत, त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नवे नॉर्मल कोण आणतंय? तुम्ही जुन्या नॉर्मलांना शिव्या घालताहात म्हणून त्या काळी तसंच चालायचं एवढंच सांगतोय. त्याकाळी स्त्री ही नवऱ्याची दासीच असे जणू. नवऱ्याने सांगितलेलं प्रेमपूर्वक ऐकायचं आणि कितीही कष्ट पडले तरी नवऱ्याला साथ द्यायची अशी मूल्य होती. त्या मूल्यांवर चमकणारींनाच पतिव्रता म्हणत. हे समजावून सांगितलं तरीही तुम्हां आंधळ्या पुरोगाम्यांना पूर्वीची व्यवस्था आणून बसवण्याचा प्रयत्न वाटतो. आक्रमक लोक बचावालाच आक्रमण समजतात त्याला काय करणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेव्हाची मूल्यं असतील तर तेव्हाच्या कपाटात गप् बसायचं. बाहेर येऊन नाचानाच केली की लाथा मिळायच्याच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तेव्हाची मूल्यं असतील तर तेव्हाच्या कपाटात गप् बसायचं.

लेखात त्या कपाटातल्या गोष्टीच सांगितलेल्या आहेत. त्या काळी सगळं कसं चान चान होतं - अर्थात त्या काळच्या मूल्यांनुसार असंच म्हटलं आहे. पण तुम्हालाच ते कपाट उस्कटून सर्व गोष्टी बाहेर काढून आजच्या व्यवस्थेप्रमाणे लावण्याची खाज आहे. तुम्हाला सांगितलं कोणी होतं कपाटात शिरून आरडाओरडा करायला? आता होती सीता पतिव्रता असं म्हटलं कोणी कपाटात, तर ती नव्हतीच कशी हे सिद्ध करण्याची काय गरज आहे?

बाहेर येऊन नाचानाच केली की लाथा मिळायच्याच!

हा हा हा, समलिंगी लोक जेव्हा 'बाहेर येतात' तेव्हा मात्र त्यांना तुम्ही लाथा घालत नाही. कसे धार्ष्ट्याने बाहेर आले वगैरे म्हणून कोडकौतुक करता. त्यांना जे लोक 'मुकाट्याने कपाटात राहा' म्हणतात त्यांच्या नावाने तुम्ही खडे फोडता. हे असलं दोन डगरींवर पाय ठेवणं किती वेळ झेपेल?

आणि हो, हातातली वस्तू फेकून मारण्याबद्दल तुमची ख्याती आहे, आता लत्ताप्रहार करण्याइतकी जवळीक साधणं म्हणजे फारच प्रगती झाली की तुमची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तारेवर दीराने बलात्कार केला

तारा म्हणजे वाली सुग्रीवाची नाय हो.
ती हरिश्चंद्राची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या तारेचीही वाटच. पोटचा पोरगा दिला नवर्‍यानं शब्द न विचारता. नि ही गपगुमान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

स्त्रि पतिव्रता असणे म्हणजे ती अबला असणे साउंड होइल. खरे तर वास्तव उलट आहे, पतिव्रताज गॉट मेनी पॉवर्स... फार बेटर दॅन मेलीसांड्रे. पण त्यांनी त्या शक्ती कधी आपल्या पुरुषांविरुध्द वापरल्या नाहीत याचा कुजकट राग करणे अबल व्यक्तींनी आता थांबवले पाहिजे असे वाटत नाही काय आपणास ? प्रत्येक जण स्वतःसारखा नसतो आणी म्हणून तो चुक होता त्याच्यावर अन्याय झाला असे मानणे आपण केंव्हा थांबवणार ?

हो मला राग आहे माझा वर्गात पहिला नंबर नाही आला, आयम नॉट लाइक दॅट पर्सन. हो, मी उठ सुट बोलणी खाल्ली यावरुन सगळ्यांची, समाजाची, आणी विषेशतः माझ्याच घरच्यांची, क्षणॉक्षनी. पण म्हणून अशा पहिल्या येणार्‍या व्यक्ती अथवा प्रथम क्रमांक मिळवण्याचे गुण अंगी असणे मी केंव्हापासुन दुर्दैवी मानु लागलो ? WTP (व्हॉट्स द पॉइंट) ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

प्रत्येक जण स्वतःसारखा नसतो आणी म्हणून तो चुक होता त्याच्यावर अन्याय झाला असे मानणे आपण केंव्हा थांबवणार ?

आवड्ले.

हो मला राग आहे माझा वर्गात पहिला नंबर नाही आला, आयम नॉट लाइक दॅट पर्सन. हो, मी उठ सुट बोलणी खाल्ली यावरुन सगळ्यांची, समाजाची, आणी विषेशतः माझ्याच घरच्यांची, क्षणॉक्षनी. पण म्हणून अशा पहिल्या येणार्‍या व्यक्ती अथवा प्रथम क्रमांक मिळवण्याचे गुण अंगी असणे मी केंव्हापासुन दुर्दैवी मानु लागलो ?

हे देखील.

दुसर्‍याची रेघ खोडून स्वतःची मोठी करणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेमकं काय वाइट झालं हो त्या तारामतीचे शेवटी ? उगाच उचलला हात बडवला किबोर्ड अन एखादीच्या वागणूकीवर शिंतोडे उडवत सुटायचे ? कसले विकृत आसुरी समाधान उपभोगायचे यातुन ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

खिक! योग्य ठिकाणी पोचून झोंबतो म्हणायचा की उपरोध. असो, मोठे व्हा, सबळ व्हा, जमलंच तर पत्नीव्रत व्हा! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मेघना माझी खरी मैत्रीण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तरी बिंडोकपणाला माफि नाही.

ती ओसामा बिन लादेनचे जरी मैत्रीण असती तरी तिला तिच्या पेक्षा श्रेष्ठ स्त्रियांबद्दल समाजात दिशाभुल करायचा कोणताही अधिकार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

अहो, इतकं काय काय(काय) बोलताहात तुम्ही, तरी तुमच्याशी खेळकरपणे नि संयमानं बोलताहेत लोक. त्याला माफी नाही तर काय म्हणतात! त्यामुळे माफी नाही वगैरे झूट आहे. (पण तुमच्या मनात येईल ती दिशाभूल करण्याचा तुम्हांला(ही) अधिकार आहे. त्याला अभिव्यक्तिस्वातंत्र्य असं म्हणतात. :ड)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

म्हणून जगातील समस्त पुरुषांनी पत्नीव्रत होउ नये अथवा अरेरे श्रीरामांनी एकपत्नीव्रत पाळुन काय घोडचुक केली अशी मुक्ताफळे मी धागोधागी उधळत नाही परंतु आपण मात्र पतिव्रतांना बदनाम करायची अबला ठरवायची एकही संधी सोडत नाही आणी त्याबद्दल खेद व्यक्त केला तर आपल्या या वागणूकीचे आपण कोणतेही स्पश्टीकरण देत नाही याला मी अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गैरफायदा घेणे मानतो. आपण तो घेउ नये विशेषतः ज्या स्त्रिया तुमच्या पेक्षा श्रेश्ठ आहेत त्यांच्याबाबत तर नाहीच नाही. मी फार सोपा प्रश्न तुम्हाला विचारला होता ( आपणास आकलन क्षमता आहे हे गृहीत धरुन) तारामतीचे नक्कि काय वाइट झाले याचे उत्तर तुम्ही अजुनही दिले नाही ते नाही वरुन मुळ मुद्यावर चर्चा सोडुन मला मात्र फुकटचे सल्ले द्यायला विसरला नाही याला चर्चेच्या अनुशंगातुन बिंडोकपणा म्हणतात अभिव्यक्तिस्वातंत्र्य न्हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

(जांभई)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेमकेपणा बोअर होतो कधी कधी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

भलत्या ठिकाणी रक्त गेलं की मेंदूला पुरेसं रक्त, पर्यायाने प्राणवायू मिळत नाही म्हणून जांभई येते. सध्या मला संसर्गाची जांभई आली; समोरच्या व्यक्तीला आल्यावर आपल्यालाही येते तसली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याच्याशी काय संबंध ? तुम्ही पाहीजे तेव्हड्या जांभया द्या.
पण तारामतीचे उदाहरण चालु होते अन त्यात तिचे नक्कि काय वाइट झाले या मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ना मेघनाने दिले आहे ना तुम्ही. तेंव्हा विषयावर चर्चा केली तर बरे, आनी नाहीच जमले तरी आश्चर्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

मला तर प्रश्न पडलाय कोण तारामती (ही म्हणे हरीशचंद्राची नाही) नि तिच्यासाठी किंवा विरुद्ध मी इतक्या वर्षांनी का भांडाय्चं!
जाऊ दे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(जांभई)

काय हे अदिती?! रेड बुल असताना जांभई येऊच कशी शकते तुला? रक्त पुरवठा कमी पडूच कसा शकतो? संसर्गजन्यसुद्धा कशी येऊ शकते? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याचा उपयोग तर केला पाहिजे ना ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

रक्तपुरवठावाली मी नाही; मी संसर्गाला बळी पडणारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी कुणापेक्षा तरी श्रेष्ठ आहे असं सर्टिफिकेट द्या ना भौ मला.

नै तुम्ही व्यक्तीच्या श्रेष्ठतेची तुलनात्मक यादी बनवली आहे म्हणून म्हणतो !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

स्वारी आपल्याबाबत मी बोलु शकणार नाही कारण विषय तारा आणी तिला अबला ठरवणार्‍या मेघना यांचा प्रतिसाद यानुशंगाने चर्चा चालु आहे. पण तुम्ही मधे मधे येताय ते बरे वातते आहे. म्हणजे राजपाल यादव जॉनी लिवर वगैरे वगैरे कसे चित्रपटाची कथा हलकी फुलकी करायचा प्रयत्न करतात अगदी तसेच. अर्थात विषयानुशंगाने आपल्याशी चर्चा करायची माझी तयारी आहेच. तर मी श्रेश्ठ स्त्रियांची उठसुट बदनामी खपवुन घ्यायच्या विरोधात आहे हा माझा भुस्कुटेंच्या प्रतिसादानुशंगाने मुद्दा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

मला जॉनी लीवरच्या तोडीचा विदूषक म्हणून सर्टिफाय केल्याबद्दल अनेक धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इट्स जस्ट आयम प्रेजिंग योर अटेम्ट्स अँड किपीट अप आर माय ओन्ली वर्ड्स फॉर यु फो नाव. चिचा मे बी सम डे यु गेट सर्टीफाइड हु नोज ? बट नॉट टूडे एंड नॉट हिर.

चला अता बघुया कोण कोण मैदानात उतरतयं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

हे असे "खिक" "मोठे व्हा" वगरै प्रतिसाद आवडला नाही, पटला नाही. प्रतिवाद करायचा तर प्रतिवाद करा, पण कोणी पोटतिडकीने लिहीले असेल तर असला प्रतिसाद चूक वाटतो.

तुम्ही अल्रेडी मोठ्या आहात, त्यामुळे तुम्हाला काय सांगणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दु.क.ये.आ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

माझ्या बाबतीतही आणी पतिव्रतांच्या बाबतीतही.. आणि हो झोंबणे म्हणजे काय याचा आपणास अनुभव हवा आहे का ? म्हणजे इतरांवर त्यानुशंगाने शेरेबाजी करताना नुसताच उचलला हात बडवला किबोर्ड असे करणार नाही आपण...?

अवांतरः- वैयक्तीक शेरेबाजी टाळावी मी तीही करु शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

वा वा! सिद्धच करताहात की माझं मत. चालू दे. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तरी थांबा म्हंणुन तुम्ही स्वत: थोड्याच थांबणार आहात ? तरीही विनंती आहे पतिव्रता स्त्रियांची बदनामी करणे थांबवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

पतिव्रता स्त्रियांची बदनामी कुठे केली आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वरील प्रतिसाद सविस्तर वाचावेत. तरीही त्यात बदनामी आहे हे न समजल्यास मी दिमतीला आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

ती तारामती.. पाचातली तारा वाली/सुग्रीवाचीच..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नै हो, त्या तारेचा रोल अगदीच अल्पस्वल्प आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाचातली तारा वाली/सुग्रीवाचीच..

बोले तो, सत्यनारायणाच्या कथेत चारी वर्णांच्या पात्रांचा समावेश आहे (म्हणून आपली संस्कृती ग्रेट), असे कायसेसे आर्ग्युमेंट वरती कोठेतरी पटाईतकाका करत होते असे वाटले. (चूभूद्याघ्या.) पण आता पंचकन्यांमध्ये एका माकडिणीचाही समावेश आहे, म्हटल्यावर आपल्या संस्कृतीच्या ग्रेटत्वाविषयी संदेहास जागाच उरली नाही. (अगदी जेथे सूर्य प्रकाशत नाही तेथेसुद्धा!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

! मध्ये ऐसीवरच कुणीसं लिहिलं होतं की या पंचकन्यांबद्दल

मीच ती लिहीणारी मेघना तै

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा! दुवापण द्या ना प्लीज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पटाईतकाका चांगली संधी आहे..

या पंचकन्याना दिलेली वागणूक् कशी बरोबर होती.. आणि त्यामुळे त्यांचच कसं भलं झालं हे लिहा बघु... कै च्या कै बरळतायत हे फुर्रोगामी (पुरोगामी नाही म्हटलय हा यांना)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर फारच तिरकस धाग्यांची गर्दी झाली आहे. म्हणून लालबैलाला इथे उत्तर लिहिते आहे:

१. माझ्यापेक्षा या पंचकन्या श्रेष्ठ आहेत असं मला वाटत नाही. (यावर वादसंवाद होऊ शकतो, पण प्रामाणिकपणे सांगायचं तर तो निराळ्या धाग्याचा विषय आहे.)
२. या स्त्रियांची श्रेष्ठता वादग्रस्त म्हणून काही वेळ सोडून देऊ. माझं मत असं आहे की त्यांच्यावर अन्याय झाला आहे. उदाहरण तारामतीचं घेते (इथे मिसेस हरिश्चंद्र आहेत असं घटकाभर धरू). तिच्या नवर्‍यामुळे तिची फरफट झाली. एकही निर्णय स्वतंत्रपणे तिनं घेतलेला दिसत नाही. तथाकथित श्रेष्ठता कशात, तर पतीच्या वचनात बद्ध असण्यात. हे मला अतिशय करुण वाटतं. वर हे करुण असणं कसं थोर, ते श्लोकांमधून गळा काढून सांगणं. ही तर अन्यायाची परिसीमा आहे. अशानं त्या बाईच्या आत्मसन्मानाचं काय पोतेरं झालं असेल, त्याची कल्पना करूनही अंगावर शहारा येतो.
३. हे अर्थातच माझ्या काळाला अनुसरून केलेलं मूल्यमापन आहे. तिच्या काळात तिला बिचारीला जे भोगावं लागलं ते लागलं, तिनं काळाला धरून सोसलं म्हणून च्याप्टर क्लोज केलास्ता. पण जिथेतिथे हे मचप लोक येऊन ते आदर्श देतात नि त्याचे गुण गातात नि वर आत्ताच्या काळात लोकांनी याच मूल्यांना धरून वागावं अशी सुप्त अपेक्षा बाळगतात, म्हणून तोंड उघडणं भाग पडतं.
४. थोडक्यात - तारामतीच्या आत्मसन्मानाची पार बोंब लागली असं माझं मत आहे, म्हणून मी तिची टोटल कीव करते आणि तिला थोरबिर म्हणणार्‍या यच्चयावत कावेबाज लोकांचा घोर निषेध करते.
५. (अवांतर: कन्याच स्मरायच्या असतील तर (खरं म्हणजे काही स्मरूबिरू नयेच. आपलं आयुष्य जगायला शेवटी आपणच येतो. पंचकन्या नाहीत. पण ते वर म्हटलं तसं निराळ्या धाग्या...), सावित्रीबाई फुले (आद्य मराठी शिक्षिका), रमाबाई (ख्रिस्ती झालेल्या), लक्ष्मीबाई टिळक (स्मृतिचित्रेकार), मालतीबाई कर्वे (रधों या मालतीबाईंचे पती), ताराबाई शिंदे ('स्त्री-पुरुषतुलना'कार) मला आवडतील. यादी वाढवता येईल. पण मी आल्रेडी 'न'व्या मोडमध्ये शिरलेय! तर तूर्तास थांबते...)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रतिसाद चांगला असला तरी अस्थानी आहे
ही जागा पटाईतकाकांसाठी होती.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो, जागा अनेक अर्थांनी चुकलीय! Wink
प्रतिसाद योग्य ठिकाणी हलवण्याची संपादकांना णम्र विनंती..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

(अवांतर: कन्याच स्मरायच्या असतील तर (खरं म्हणजे काही स्मरूबिरू नयेच. आपलं आयुष्य जगायला शेवटी आपणच येतो. पंचकन्या नाहीत. पण ते वर म्हटलं तसं निराळ्या धाग्या...), सावित्रीबाई फुले (आद्य मराठी शिक्षिका), रमाबाई (ख्रिस्ती झालेल्या), लक्ष्मीबाई टिळक (स्मृतिचित्रेकार), मालतीबाई कर्वे (रधों या मालतीबाईंचे पती), ताराबाई शिंदे ('स्त्री-पुरुषतुलना'कार) मला आवडतील. यादी वाढवता येईल. पण मी आल्रेडी 'न'व्या मोडमध्ये शिरलेय! तर तूर्तास थांबते...)

यात ब्राह्मण % जास्त आहे- ६०%. तो अजून कमी करता आला तर बघा, म्हणजे शाहूफुलेआंबेडकरांच्या पुरोगामी म्हाराष्ट्रात हे पंचायतन अजून अ‍ॅक्सेप्ट होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कमी कसले करताय, एक सुद्धा नाव असले तर चालणार नाही.

अरे हो, १४ टक्क्यावाल्यांचे एक नाव पाहिजेच, नाहीतर असहिष्णु म्हणले जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी अगदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोघींचे धर्मांतर लक्षात घेतले तर हा टक्का ६०% नव्हे तर फक्त २०% उरतो.

अर्थात तेदेखिल जवळपास सहापटीने जास्तच आहे म्हणा!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धर्मांतरानी जात बदलत नाही सुनिल साहेब.

धर्म आणि जातीचा काडीचा संबंध नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द्या टाळी! बघावं तसं दिसतं. मुळात जात-धर्म हा निकषच नव्हे, हे कसं पटवून द्यायचं पण? असो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

भारतात इतके दोन निकष च तर असतात...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. माझ्यापेक्षा या पंचकन्या श्रेष्ठ आहेत असं मला वाटत नाही.
मला ही आय्जॅक न्युटन माझ्या पेक्षा श्रेश्ट आहे असे अजिबात वाटत नाही (यावर वादसंवाद होऊ शकतो, पण प्रामाणिकपणे सांगायचं तर तो निराळ्या धाग्याचा विषय आहे.)

२. या स्त्रियांची श्रेष्ठता वादग्रस्त म्हणून काही वेळ सोडून देऊ. माझं मत असं आहे की त्यांच्यावर अन्याय झाला आहे. उदाहरण तारामतीचं घेते (इथे मिसेस हरिश्चंद्र आहेत असं घटकाभर धरू). तिच्या नवर्‍यामुळे तिची फरफट झाली. एकही निर्णय स्वतंत्रपणे तिनं घेतलेला दिसत नाही. तथाकथित श्रेष्ठता कशात, तर पतीच्या वचनात बद्ध असण्यात. हे मला अतिशय करुण वाटतं. वर हे करुण असणं कसं थोर, ते श्लोकांमधून गळा काढून सांगणं. ही तर अन्यायाची परिसीमा आहे. अशानं त्या बाईच्या आत्मसन्मानाचं काय पोतेरं झालं असेल, त्याची कल्पना करूनही अंगावर शहारा येतो.

सी धिस इज द प्रॉब्लम. विजेत्याने जेतेपद मिळवायला घेतलेले कश्ट बघुन तुम्हाला शहारा येतोय. करुण वाटतयं ? हे सगळं का तर तुम्हला हे करणे शक्य नाही. दुर्दैवाने तारामतीने घेतलेला एक स्वतंत्र निर्णय उद्या रामायण घडवायला कारणीभुत ठरला अस्ता तरीही तुम्ही पुरुषांनाच चुक ठरवणार.. होय की नाय ? नीट अभ्यास करा ( झेपलं नाही तर मी आहेच) तिची नेमकी श्रेश्ठ्ता तुम्हाला अजुनही कळेल. डोळे उघडे हवेत.

३. हे अर्थातच माझ्या काळाला अनुसरून केलेलं मूल्यमापन आहे. तिच्या काळात तिला बिचारीला जे भोगावं लागलं ते लागलं, तिनं काळाला धरून सोसलं म्हणून च्याप्टर क्लोज केलास्ता. पण जिथेतिथे हे मचप लोक येऊन ते आदर्श देतात नि त्याचे गुण गातात नि वर आत्ताच्या काळात लोकांनी याच मूल्यांना धरून वागावं अशी सुप्त अपेक्षा बाळगतात, म्हणून तोंड उघडणं भाग पडतं.

तुम्ही व्यथीत आहात मान्य. पण तरीही तारामतीला अयोग्य म्हणने असायुक्तीकच. वरील मुद्यावरील विधान परत वाचा.

४. थोडक्यात - तारामतीच्या आत्मसन्मानाची पार बोंब लागली असं माझं मत आहे, म्हणून मी तिची टोटल कीव करते आणि तिला थोरबिर म्हणणार्‍या यच्चयावत कावेबाज लोकांचा घोर निषेध करते.

- कुठेही बोंब लागलेली नाही. तिने आणी तिच्या नवर्‍याने अतिशय धिराने प्रसंगाला सामोरे जाणे म्हणजे काय याचा वस्तुनिश्ट पाठ समाजाला दिलेला आहे ज्याबद्दल दोघांबद्दलही ब्र काढायचे कोणतेही कारण नाही.

५. (अवांतर: कन्याच स्मरायच्या असतील तर (खरं म्हणजे काही स्मरूबिरू नयेच. आपलं आयुष्य जगायला शेवटी आपणच येतो. पंचकन्या नाहीत. पण ते वर म्हटलं तसं निराळ्या धाग्या...), सावित्रीबाई फुले (आद्य मराठी शिक्षिका), रमाबाई (ख्रिस्ती झालेल्या), लक्ष्मीबाई टिळक (स्मृतिचित्रेकार), मालतीबाई कर्वे (रधों या मालतीबाईंचे पती), ताराबाई शिंदे ('स्त्री-पुरुषतुलना'कार) मला आवडतील. यादी वाढवता येईल. पण मी आल्रेडी 'न'व्या मोडमध्ये शिरलेय! तर तूर्तास थांबते...)
- मला वाटते हे अवांतर नाही. हे तर स्वागतकरण्याजोगे वास्तव आहे. माणसासारखा विचार लिहल्याबद्दल जाहिर अभिनंदन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

विजेती? तारामती?? हिहिहिहि! आता मात्र थांबते. खूप अभ्यास आहे. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हिम्मत असेल यावर सेपरेट धागा काढा आपले सर्व समज गैरसमज दुर केल्या जातील.

विजेती? तारामती?? हिहिहिहि!

हे कशा बद्दल ? तारामतीने पतिच्या सत्यपालन व्रताला दिलेली मनापासुन साथ यात काय चुक आहे ? मुलात सत्यव्रताचे अथवा पत्नीव्रताचे पालनाचे कोणतेही बंधन दोघावर नसुन त्यांनी ते स्वेछ्चेने पाळले आणी यात ते यशस्वी झाले तर नक्कि पोटशुळ कोणता आहे कशाबद्दल आहे ? तुम्ही तुमची तुलना पुन्हा पुन्हा तारामतीसोबत करुन त्यानुशंगाने वक्तव्ये का करत आहात ? माझा मुद्दा समजुन घेण्यास काही अडचन आहे का ? नाही तर किमान माझा मुद्दा कोणता आहे( ज्यावर तुम्ही भाश्य केले) हे जरा सांगु शकाल काय ?

पहिल्यांदा ती कथा काय सांगते हे स्पश्ट करा ( निपक्षपाती)
नंतर लोक यावरुन काय अर्थ काढतात ते स्पश्ट करा ( तुमच्या अनुभवाने)
नंतर तुम्हाला काय खटकले तुम्ही काय अर्थ या कथेतुन काढुन विधाने करता ते स्पश्ट करा ( न चिड्चिड करता).

स्त्रि पतिव्रता असणे म्हणजे ती अबला असणे साउंड होइल असे विचार एकतर्फी का पसरवत आहात . खरे तर वास्तव उलट आहे, पतिव्रताज गॉट मेनी पॉवर्स... फार बेटर दॅन मेलीसांड्रे. पण त्यांनी त्या शक्ती कधी आपल्या पुरुषांविरुध्द वापरल्या नाहीत याचा कुजकट राग करणे अबल व्यक्तींनी आता थांबवले पाहिजे असे वाटत नाही काय आपणास ? प्रत्येक जण स्वतःसारखा नसतो आणी म्हणून तो चुक होता त्याच्यावर अन्याय झाला असे मानणे आपण केंव्हा थांबवणार ?

हो मला राग आहे माझा वर्गात पहिला नंबर नाही आला, आयम नॉट लाइक दॅट पर्सन. हो, मी उठ सुट बोलणी खाल्ली यावरुन सगळ्यांची, समाजाची, आणी विषेशतः माझ्याच घरच्यांची, क्षणॉक्षनी. पण म्हणून अशा पहिल्या येणार्‍या व्यक्ती अथवा प्रथम क्रमांक मिळवण्याचे गुण अंगी असणे मी केंव्हापासुन दुर्दैवी मानु लागलो ? WTP (व्हॉट्स द पॉइंट) ?

असो तुम्हाला फक्त तुमची मते काय आहेत ते इतरांवर लादण्यातच रस आहे, त्यावर संपुर्ण साधकबाधक चर्चेत आपण कधीच उतरणार नाही हे माहीत होते आणी आहे त्यामुळे तुमच्या मताचा प्रतिवाद करायचा मुद्दाच निकाली आहे नाही ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

बाकी सगळ्यावर बोलत नाही पण तारामतीच्या आत्मसन्मानाची बोंब लागली हे नक्की कसं ठरवलं? आताच्या आत्मसन्मानाच्या कल्पनेवरून की तेव्हाच्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी असं माझ्या आत्मसंमानाची बोंब लागेल तेंव्हाच वागेन असं माझे मत असल्याने तारामतीच्या आत्मसंमानाची बोंब लागली असे मला वाटत असावे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

पाने