बहुभाषिक द्वैमासिकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

'इंडियारी' या बहुभाषिक द्वैमासिकामध्ये (indiaree.com) आता मराठी विभाग सुरू होत आहे. त्यासाठी कथा, कविता, ललितलेख इ प्रकारचे लिखाण पाठवण्यासाठी हे आवाहन.
हे मासिक इंटरनेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. त्यातील लिखाणाचे स्वामित्वहक्क लेखकाचे/लेखिकेचे असतील. लिखाणाबद्दल सध्या तरी काही मानधन मिळणार नाही.
सध्या या मासिकात इंग्रजी, हिंदी, बंगाली, कन्नड आणि मल्याळी असे पाच विभाग आहेत. प्रत्येक विभागातील एका साहित्यकृतीचा अनुवाद इतर सर्व भाषांत केला जातो. मराठी विभाग सुरू झाल्यावर त्यातही इतर भाषांतली एकेक साहित्यकृती भाषांतरित करून प्रसिद्ध केली जाईल. आणि मराठीतील एक साहित्यकृती इतर भाषांत भाषांतरित केली जाईल.
इंटरनेटवर आधी प्रसिद्ध न झालेले आपले लिखाण अवश्य पाठवा. ईमेल पत्ता - udayoak@yahoo.com
संपादनात ज्यांना मदत करायची इच्छा असेल त्यांचे स्वागत आहे. वरील ईमेलवर संपर्क साधल्यास सोयीचे होईल.
याचा पुढला अंक १ जुलैला प्रसिद्ध होईल.
त्यासाठी मजकूर पाठवण्याची अंतिम तारीख १ जून आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Observer is the observed