खूप माज वाढलाय !

खूप माज वाढलाय !

तसा तो आधीपासूनच आहे

खूप आधीपासून

अगदी जन्मापासून.

आधी त्याला काही कळत नव्हतं

पण जसजसं कळायला लागलं

तसतसा त्याचा माज वाढतंच चाललाय.

हो खरंच ! माज वाढतंच चाललाय !

घरात आश्रित असावा तसा तो

शहरात नवीन असावा असा तो

अगदी पाहुण्यासारखा तो.

पण तरीही

पण तरीही खूप माज वाढलाय !

प्रत्येक गोष्ट स्वत:ची म्हणवतोय,

मुळात त्याचं आहे का काही ?

खरं तर काहीच नाहीये

आणि हे त्यालाही माहितीये.

पण तरी खूप माज वाढलाय !

हे माझं ते माझं

हेही माझं आणि तेही माझं.

तुमचं, तुझं असं काही नाही.

आणि आपलं असं तर काहीच नाही.

जे काही आहे

ते फक्त माझं आणि फक्त माझंच.

असं साधारण चालूय.

खूप माज वाढलाय !

प्रश्न पडतो असं नेमकं करतंय तरी कोण ?

कोणाची एवढी हिंमत झाली ?

ही जात तरी कुठली ?

उत्तर मिळालं, ही जात माणसाची !

field_vote: 
0
No votes yet