वर्गातली गंमत .......[कविता]

वर्गातली गंमत .......
#################

वर्गात मुलांनी आणले मासे
प्लास्टिक बरणीत ठेऊन दिले

पाणी भरता काठोकाठ
मासे पळती पाठोपाठ

मुले हे पाहत रोज रोज
घडे नवी गंमत दररोज

मुलांनी बांधली प्रश्नांची मोट
माशांना कसे पायाचे थोट?

हळूहळू एक गंमत झाली
माशांना पायांची जोडी आली

हरकली मुले पाहून सारे
वर्गात घुसले हसरे वारे

गुरूजींनी हे पाहून सारे
दिले एकच उत्तर न्यारे

हे नाहीत हो मासे राव !!
हे तर आपले बेडूकराव !!
#######################

फारूक एस.काझी"समीर"
farukskazi82@gmail.com

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0