एंडी हार्डीची मालिका म्हणजेच मिकी रूनीची धमाल

75 व्या ऑस्कर सोहळ्यात कर्क डगलस सोबत माइकल डगलसला बघतांना मोठी मौज वाटत होती. बाप-लेक दोघं स्टेज वर होते. लेकाला दोनदा ऑस्कर मिळालंय, पण मला मात्र याने हुलकावणी दिली, ही खंत कर्कने बोलून दाखविली. नंतर नाॅमिनीचं नाव वाचून झाल्यावर माइकल नी लिफाफा आपल्या बापाला दिला.

ते लिफाफा उघडूं लागले, तर माइकल म्हणाला-लिफाफा उघडण्या अगोदर म्हणावं लागतं-

‘एंड दि ऑस्कर गोज टू...’

तिकडे दुर्लक्ष करून ‘एंड दि विनर इज...’ म्हणत कर्कनी लिफाफा उघडून कागद अलगद बाहेर काढलां, त्याचे दोन तुकडे केले. एक माइकलला दिला आणि माइक समोर दोघे एकत्रच ओरडले-’शिकागो...’

छोटया पडद्यावर कर्क डगलसचा ‘स्पार्टाकस’ बघितला होता. सर लाॅरेंस ऑलिव्हिए समोर स्पार्टाकसच्या भूमिकेत कर्क डगलस शोभून दिसला होता. फार पूर्वी त्याचा ‘दि बोल्ड एंड दि ब्यूटीफुल’ बघतांना नकळत गुरुदत्तचा ‘कागज के फूल’ हा चित्रपट आठवला होता. विन्सेंट व्हेन गॉगच्या जीवनावर आधारित ‘दि लस्ट फॉर लाइफ’ देखील अप्रतिम होता. यात त्याचा सोबत एंथनी क्वीन होता...ही सगळी हॉलीवुडची दादा मंडळी...

पण त्यादिवशी त्या सोहळ्यातील ऑस्कर एलबम मधे मिकी रूनी, मारग्रेट ओ ब्रायन ला बघून अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. तेवढ्या वेळांत मिकी रूनी चे एंडी हार्डी सीरिजचे चित्रपट डोळ्यासमोर तरंगून गेले. ‘दि ह्यूमन कॉमेडी’ मधे पोस्टाची तार घरापर्यंत नेऊन त्यातील मजकूरा प्रमाणे वागणारा, ‘ब्वायज टाऊन’ मधे हाॅलीवुडचा दादा कलाकार असलेल्या स्पेंसर ट्रेसी समोर धिटाईने वागणारा छोकरा, ‘पपांनी आपल्या पहिल्या प्रेमपत्रांत तुला काय लिहिलं होतं’ (हे थेट आपल्या आईलाच विचारणारा) अशी मिकीची कितीतरी रूपे मला आठवली.

भारतीय चित्रपटांमधे बाल कलाकारांच्या मानसिकतेची जाण ठेवून काढलेले चित्रपट बोटांवर मोजण्या इतकेच असतील. त्यांत देखील सुरवातीपासूनच केंद्र स्थानी नायक-नायिकाच. आयुष्याची पस्तीशी गाठली, तरी ती नायिकाच. त्या मानाने हॉलीवुडच्या मेट्रो गोल्डविन मेयर (एमजीएम) कंपनीने काढलेले एंडी हार्डी सीरिज चे चित्रपट अमेरिकेत कमालीचे लोकप्रिय ठरले.

1937 ते 1958 च्या दरम्यान या मालिकेचे एकूण 16 चित्रपट आले. 1937 साली ‘ए फैमिली अफेयर’ पासून या मालिकेची सुरवात झाली व 1958 साली ‘एंडी हार्डी कम्स होम’ वर थांबली. खरं म्हणजे या दोन्हीं चित्रपटांची गणती या मालिकेत केली जात नाही. ही मालिका सुरू झाली ती 1938 साली आलेल्या ‘यू आर ओन्ली यंग वन्स’ आणि 1946 साली ‘लव लाॅफ्स एट एंडी हार्डी’ सोबतच संपली.

योजना नव्हती: खरंं म्हणजे एमजीएम ची एंडी हार्डी वर मालिका (सीक्वल्स) काढण्याची काहीच योजना नव्हती. पण ‘ए फैमिली अफेयर’ मधील एंडी हार्डीच्या भूमिकेत मिकी रूनी शोभून दिसला, त्याचा अभिनयामुळे हा चित्रपट यशस्वी ठरला. या यशामुळे एमजीएम ने पुढे मालिका तयार करण्याचं ठरवलं. ‘ए फैमिली अफेयर’ हा चित्रपट आयरानिया रावेरोल च्या ‘स्कीडिंग’ नाटकावर आधारित होता. यात जज हार्डींची भूमिका लियॉनाल बेरीमोर व मिसेस हार्डीची भूमिका स्प्रिंग ब्यिंगटन नी साकारली होती. हा चित्रपट हिट ठरल्यामुळे पुढचा चित्रपट ‘यू आर ओन्ली यंग वन्स’ आला, त्यांत याच भूमिका क्रमश: लेविस स्टोन आणि फे. होल्डन नी साकार केल्या. सोबत मिकी रूनी, सिसिलिया पार्कर व सारा हेडन देखील होते. याशिवाय एंडीची गर्ल फ्रेंड पाली बेनेडिक्ट बनली होती एन रदरफोर्ड. या टीम मधील मिकी रूनी व मिसेस हार्डी (फे. होल्डन) शेवट पर्यंत या चित्रपटांत त्याच भूमिकेत वावरले, इतर पात्र मात्र बदलत गेले.

सुरवातीचे चित्रपट कुठल्याच पात्रावर (कैरेक्टर) केंद्रित नव्हते. त्यांचं कथानक ठळक पणे हार्डीच्या फैमिली भोवती केंद्रित होतं. पण मिकी रूनी च्या असामान्य प्रतिभेमुळे, त्याने साकारलेली एंडी हार्डीची भूमिका अमेरिकन टीन एजर्स मधे खूपच लोकप्रिय ठरली. हा व्रात्य, खोडकर, थोडासा आगाऊ असलेला ‘छोकरा’ किशोरवयीन मुलांमधे खूपच लोकप्रिय ठरला. म्हणून मग चौथ्या चित्रपटापासून एंडी केंद्रीय पात्र ठरला व त्याचं नाव चित्रपटाच्या शीर्षकातच सामील करण्यांत आलं.

सर्वश्रेष्ठ चित्रपट: ‘लव फाइंड्स एंडी हार्डी’ पासून या मालिकेची खरी सुरवात मानली जाते. या चित्रपटा पासूनच एंडीच्या व्यक्तिरेखेचं महत्व वाढलं, अाणि ते 1946 पर्यंत अबाधित होतं. त्याच प्रमाणे हा चित्रपट या मालिकेतील सर्वश्रेष्ठ चित्रपट समजला जातो. यात मिकी रूनी सोबत जूडी गारलैंड व लाना टर्नर देखील होत्या.

फर्स्ट फैमिली: 15 ऑगस्ट 1941 साली हॉलीवुडच्या ग्राउमन्स चाइनीज थिएटर मधे झालेल्या एका सोहळ्यांत या मालिकेतील प्रमुख कलावंत व सदस्यांनी एका फलकाचं उद्घाटन केलं. त्यावर लिहिलं होतं-

‘I, Mayor Fletcher Bowron, on behalf of the citizens of this community, Do hereby proclaim the family of Judge James K. Hardy, The first Family of Hollywood.’

हा फलक थिएटरच्या भिंतीवर लावण्यांत आला होता. पुढे 1943 साली एंडी हार्डी मालिकेच्या चित्रपटांना विशेष अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यांत आलं.

----------------

शेवटचं...

सॉरी, दि रिवर ऑफ नो रिटर्न नाही बघूं शकलो...

त्या ऐवजी सर जेम्स स्टुअर्टचा ‘दि मेन फ्राम लॉर्मी’ बघितला...

1955 सालचा एक तास 44 मिनिटांचा हा वेस्टर्न चित्रपट छान होता...(या बदद्ल लवकरच बोलूं)

जेम्स ची चालण्या-बोलण्याची ढब मस्तच. त्या सोबत माझा अावडता चरित्र अभिनेता होता सर डोनाल्ड क्रिस्प...पावणे दोन तास कसे गेले कळलंच नाही...
------------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दि मेन फ्राम लॉर्मी चे स्पेलिंग द्या ना प्लीज. मला गुगलवर सापडत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असावं. The Man from Laramie

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अरे थँक्स. हा पहातेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग