पहिला ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल- एक अभिप्राय

प्रेरणा- चिंतातुर जंतू यांचे आवाहन: http://www.aisiakshare.com/node/5574#comment-147687

नुकतंच नागपुरात भरवण्यात आलेल्या पहिल्या ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलला (27 ते 29 जानेवारी) उपस्थित राहण्याचा योग आला. या नेटक्या आणि सफल आयोजनाबद्दल आधी आयोजकांचे अभिनंदन. विशेष म्हणजे यात ऐसीकर चिंतातुर जंतू अथ पासून इतिपर्यंत धावपळ करत सामील होते. त्यांना 'याची देहि याची डोळा' बघण्याचा व भेटण्याचा योग आला. वेळेअभावी मैफिल बसवता आली नाही . असो. महोत्सवावरचा हा थोडक्यातला अभिप्राय.

व्हीआयपी आमंत्रण नसल्यामुळे उद्घाटनाच्या आणि वेळ नसल्यामुळे समारोपाच्या कार्यक्रमाला मी नव्हतो त्यामुळे त्याबद्दल पास.

पहिलाच महोत्सव असला तरी पिफची टीमच मुख्य आयोजक असल्यामुळे फारशा तक्रारी करायला जागा नाही. काही लोकांना साहजिकच बोअर झालं तरी तसं फिल्टरेशन आपोआपच होणं हीसुद्धा चांगलीच गोष्ट असते. तरी हा पहिलाच असा कार्यक्रम होता ही गोष्ट लक्षात घेतली तर प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला होता असंच म्हणेन. पहिल्याच Good Bye Berlin पासून , Villa 69, Excuse My French पर्यंत प्रेक्षकांची इन्वॉल्वमेंट होती. तरी काही गोष्टींचा पुढच्या वेळेस व इतरही ठिकाणी असे महोत्सव भरवताना विचार करता येईल.

1. सिनेमांचा महोत्सव ही संकल्पना पुणे-मुंबई सोडली तर अजून फारशी रुळलेली/परिचित नाही. म्हणजे संगीताच्या मैफिलीत जाऊन काय करायचं याची सर्वसाधारण रसिकाला कल्पना असते पण फिल्म फेस्टीव्हल्स मध्ये नेमकं काय पाहायचं हे नवीन शहरात (जरी इथे अ‍ॅक्टीव्ह फिल्म क्लब असले तरी)सर्वांनाच माहिती असेल अशी अपेक्षा करणं जास्त होतं. त्याबद्दल अधिक पीआर, कॅम्पेनिंग वर्क आवश्यक आहे. विशेषत: इंजिनीयरींग, मेडिकल आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांपर्यंत (ज्यांना इतके पैसे एकदम देणं सहज शक्य असतं, अशी माझी समजूत आहे) थेट कॉलेजात जाऊन हे करणं आवश्यक आहे. महंमदाने पर्वताकडे जायचे दिवस संपले असून अर्थपूर्ण सिनेमा टिकवून ठेवायचा असेल तर पर्वतालाच महंमदाकडे जाणं भाग आहे.

2. पिफमध्ये कॅटलॉग शेवटपर्यंत न मिळण्याची प्रथा होती/आहे (?). कुठले पिक्चर दाखवणार हे माहीत नसताना 500 रू कसे काढायचे अशी अनेकांना शंका होती. नागपुरात ही अडचण होती असं वाटतं. आता काय होतं तर कॅटलॉगमधलं नाव वाचून ट्रेलर गूगलावं लागतं, त्यात अनेकदा सिनेमांची प्रादेशिक शीर्षकं व इंटरनॅशनल शीर्षकं वेगळी असतात. सगळ्यांनाच हे जमतं असं नाही. त्यासाठी एक बारीक सूचना अशी की फेबुवर जशी पब्लिसिटी चालू होती त्यासोबतच एकदा सिनेमांची नावे फायनल झाली की त्यांचे ट्रेलर्स दाखवण्याची फेबुवरच ऑनलाईन व्यवस्था करावी. किंवा हॉटेलातील 'आजचा मेनू' प्रमाणे वेन्यूवरच ट्रेलर्स एखाद्या एलसीडीवर लूपमध्ये टाकून डिस्प्ले करावीत.

3. सिनेमांच्या निवडीबाबत काय क्रायटेरिया होता याची कल्पना नाही. काही फिल्मस थोड्या जुन्या तर काही अगदी लेटेस्ट होत्या. तरी सर्वसाधारणपणे एक समतोल साधणारं सिलेक्शन होतं. इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल म्हणताना एकाच देशावर (अर्जेंटीना) फोकस झाला असं वाटतं. तो जाणीवपूर्वक होता की होऊन गेला याबद्दल आयोजकच अधिक सांगू शकतील.

4. हा पहिलाच प्रयत्न होता म्हणून पुणेकरांचा सहभाग जास्त असला तरी यापुढे स्थानिक पातळीवर कायमचं एच आर इंफ्रास्ट्रक्चर उदा. स्वयंसेवक, तंत्रज्ञ आदी उभारणं गरजेचं आहे.

तूर्त इतकेच.

मी पाहिलेले चित्रपट:
1. Good Bye Berlin (German)
2. Heidi (Swiss/German)
3. Resurrection (Argentina)
4. Godless(Bulgaria)
5. The Irish Prisoner(Argentina)
6. Villa 69 (Egypt)
7. Afghan Star(English Documentary)
8. Excuse My French(Egypt)(अर्धाच पाहिला)
9. नाती खेळ (मराठी)‌ (अर्धाच पाहिला)
10. मातीतली कुस्ती, कल्पवृक्ष व स्पर्धेतले इतर काही लघुपट

(सिनेमांबद्दल मी लिहिलं नाहीये, लिहू का? काय म्हणता?)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

अनेक आभार! पाहिलेल्या चित्रपटांविषयीही लिहिलंत तर आवडेल.

एकाच देशावर (अर्जेंटीना) फोकस : इजिप्त आणि अर्जेंटिना असे दोन 'कंट्री फोकस' होते. तुम्ही पाहिलेले 'व्हिला ६९' आणि 'एक्सक्यूज माय फ्रेंच' इजिप्त फोकसचा भाग होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सिनेमांबद्दल लिहाच. किमान तुम्हाला हे सिनेमे मनापासून आवडले त्यांबद्दल तरी लिहाच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अशा फेस्टिवलला गेलेलो नाही कधी पण जायला नक्कीच आवडेल.लिहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिनेमे आवडले किंवा कसे वाटले ते लिहा की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0