मालकीण

म

तोंडावरचा पदर हलला तसे सोनीचे डोळे उघडले. अंगावर आवघा जयवंत्या ओणवलेला. दोन केसाळ मजबूत हातं सोनीच्या खांद्यावर रोवलेले. जेसीबीने आर्म रोवून स्वतःला उचलावे तसा झुकलेला जयवंत जरा वर उठला.
"फुकने, दोन दिवसात पैशाची सोय बघाया सांग हांडग्याला. डीलर मागं लागलाय. डिलीव्हरी देतो म्हंतय लगीच"
"आरं करनार तरी कसं, तुझी भूक मोठी, येवढं न्हाय झेपाया त्यांस्नी."
"त्याला झेपाया न्हाई म्हनून तर खाली हैस न्हवं माझ्या. आता तूच बघ ते"
"आरं हजारपाचशाची बातंय व्हय, घरातबी नसतेत येवढं"
"सोने, आखरीचं सांगतो, चोरी कर, डाका घाल पन मला पाच लाख दे"
"उठंय उंडग्या, काय ते नंतर बघू. आता घ्यायला आला हाईस ते घेऊन जा"
.............................
सोळा सतराची सोनी म्हनलं तर आंगांग फुलल्याली झेंडूच जणू. पिवळ्याजर्द साडीत आगदी कात टाकलेल्या नागिनीगत चमकायची. सोताच्याच मस्तीत वळायची. खुडक बापाच्या खोकल्यानं बेजार झोपडी सोनी आसली की नागपंचमीच्या वारुळागत नटायची. जानारायेनारा वळूवळू बघायचा पन सोनी सोताच्याच नादात. चारचौघीगत कधी दिसली न्हाई की वागली न्हाई. सकाळी ट्यांकराच्या गर्दीत कधी उभारली न्हाई. रणरणत्या उन्हात हापशाला चार घागरी भरुन आणाया सोनी हमेशा तैय्यार. तंबाखू मळत बसलेल्या चार उंडग्याच्या नजरा सोनीच्या कमरेसंगं हेलकावं खायाच्या. कळशीतल्या पान्यासंगं डुचमळायच्या.
.
हापसा पार झोपडपट्टीच्या कोपर्‍याला. नाईकाच्या बंगल्याबाजूला. सोनी हापसायली की निबार कॉन्ट्रॅक्टर शिरपत नाईक ग्यालरीत मोबाईल घेऊन उभा राह्यला लागला. सोनीच्याबी दोन च्या जागी चार फेर्‍या हुवू लागल्या. तलखी वाढली न हापसा जड चालला. घामानं भरल्याली कपाळपट्टी दोनदा पुसताच नाईकानं इशारा केला. पदर ओढून सोनी आत घुसली आन बंगल्यातली मोटर चालू झाली. पाण्याचा रतीब वाढला तसा सोनीचा बाप पेटला. कोडग्या सोनीला हानून उपेग नव्हता. नाईकाकडं गेला आन हजाराच्या नोटांनी तोंड लिंपून आला. दारात एक जेसीबी, चार ट्राक्टर न कार्पिओ उभं करणार्‍या नाईकाला एक सोनी जड नव्हती. नाईकाची बाईल लग्नाच्या टाइमाला घरात गेलेली. आता तिरडीवरच दिसणार हे सार्‍या गावाला माहीती. बिनालेकराची लक्ष्मी कशी दिसती घरच्या नोकर ड्रायव्हरांना माहीत न्हाई ते सोनीला बी कधी दिसलं न्हाई.
.
झोपडीतल्या सोनीची रवानगी नीट्ट गावाभईर प्लॉटवर झाली. कधीतर चार खोल्या बांधलेल्या होत्या नाईकानं त्या सोनीच्या संसाराला साक्ष राह्यल्या. सालं गुजरली तसा हप्त्याचे चार दिवस येणारा नाईक एक दिवसावर येऊ लागला. बंगल्याची कूस रिकामी तशी प्लॉटची पण रिकामीच राह्यली. नाईकाचं येणं कमी झालं पण बंगल्याची गाडी रोज प्लॉटवर थांबायली. नाईकाचा ड्रायव्हर जयवंता चार वर्षं प्लॉटच्या खोलीबाहेर तंबाखू मळत राह्यायचा. नाईकानं दिलेला पैसा इमानदारीनं सोनीचं जोडवं बघत तिच्या हातावर टाकायचा. नाईकाच्या फेर्‍या कमी झाल्या अन जयवंताची नजर हळूहळू वर चढू लागली. दारात उभं राहून पैसे देता देता एक दिवस खोलीतल्या दिवानावर टेकला. आडदांड जयवंताला चार वर्षं खोलीत यायला लागली. त्यानंतर दोनच दिवसात तो आत आला की खोलीचं दार बंद व्ह्यायला लागलं.
................................................
मालकाची कॉर्पिओ चलवतानाचा जयवंत्या जेसीबी चलवताना मात्र बदलायचा. त्या अवजड राक्शसाला लीलया हालवायचा. दोन हायड्रालिक सपोर्ट जिमीनीवर रोवलं की शीट आलाद फिरायचं. दोन दंडक्यावर तो आर्म सोताच्या हातागत फिरायचा. रश्यात बुडवलेला भाकरचा घास उचलावा इतक्या आल्लाद बकेटीनं जिमीनीला उचलायचा. चारच बकेटात ट्रायली भरताना जयवंताला जणू भीम झाल्यागत वाटायचं. धंदा करायचा तर जेसीबीचाच हे डोस्क्यात बसलेलं. नाईक काय शेपरेट जेसीबीला उचल देनार न्हाई. हातची नोकरी गेलीतर सोन्याची खान सोनी दारात बी उभं करणार न्हाई. डिलर ५ लाखाच्या डीपीला तयार होता. एकडाव जेसीबी दारात उभारला की पैशाला तोटा न्हवता. डोळ्यास्मोर सारखं दुपारच्याला जेसीबीच्या बकेटीच्या सावलीत बसलोय आन पिवळ्या साडीतली सोनी भाकर घेऊन येतीय असंच दिसायलं.
................................................
जयवंतानं सोनीसंगं घर चाचपलं. तीसचाळीस तोळं अन तेवढेच हजार. घर तर न्हाई नावावर. नाईकाच्या केसातला अन ढगातला काळेपणा सरला. बिनालेकरानं खचलेला नाईक आता पुन्हा बरसात करनार न्हवता. त्याच्या पावसानं न उजवलेली जमीन उकरायची म्हणजे सोपं काम न्हवतं. अशात हातरुणावर खिळलेल्या नाईकाला बघायला सोनी धडकली बंगल्यावर. काय पट्टी फिरली की दोन दिवसात नाईक हसाया खेळाया लागला. प्लॉटवर कॉर्पिओची हप्त्याची नियमीत डबल फेरी सुरु झाली अन सोनीच्या गालावरली खळ भरायली. दाराभाईर कॉर्पिओत बसून मिनट मिनट मोजणारा जयवंत्या नजरंसमोर जेसीबी नाचवायचा. कल्पनेतच नाईकाला पार सपाट करुन टाकायचा लेव्हलिंगगत. जेसीबीच्या केबिनात सोनीसंगं खिदळायचा.
.................................................
स्वप्नागत दिवस सरलं आन सोनीची कूस उजवली. नाईकाच्या पैशानं तालुक्याला थाटात डिलीव्हरी झाली. कॉर्पिओतून परत येताना जयवंत्याला मधल्या शीटावर बसलेल्या सोनीच्या पदरामागचा बारका जीव देवदूतागत भासत व्हता. ह्याचं नाव जीसीबीवर रेडीयमनं करायचंच पण कवा करायचं तेवढं सुचत नव्हतं. हेंदकाळत्या गाडीसंगं जयवंत्या गुंगला की मागनं आवाज आला.
"जयवंत्या गाडी नीट बंगल्याकडं घे"
"आगं सोने, प्लॉटवर जायाचं नं, यील की म्हतारं आह्यार घेऊन. आपल्या दोघांच्या......न्हवं न्हवं तिघांच्या जेसीबीसाठी."
"गपंय उंडग्या, हाय त्यो जेशीबी बी उद्याच इकायला न्हाई लावला तर बघ. मालकाला मालक म्हनायचं आन मालकीनीला मालकीन. समाजलं का? धाकटं नाईक झोपलेत. हळू चलीव जरा"
...............................................

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

झकास लिहिलंय अभ्या.

आता चित्रही आलेलं दिसतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कथा आवडली. चपखल शिर्षक. उपमा मस्त जमल्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाण्ण तेजायला. जबर्‍या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अभ्या शेठ , मस्त हो !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नवीन लिवलेलं टाकायचा इचार करत व्हतो, पन तुमच्या जेशीबीनं पा..र लेवल करुन टाकली राव!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मस्त लिहिलंय अभ्या! सॉलिड!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मस्त लिहिलय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह! मस्तं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कथा आवडली. बोलीभाषेमुळे विशेष रंगत आली, किंबहुना त्या विशिष्ट भाषेशिवाय ही कथा कल्पिता येणं अशक्य.

द मा मिरासदारांची एक कथा आहे "व्यंकूची शिकवणी" नावाची. तिच्यातलं चित्रण इतकं शोषणावर आधारित केलेलं नाही. मिरासदारांच्या कथाविश्वाला साजेसं खेळीमेळीचं वातावरण. प्रस्तुत कथा हा, त्या मिरासदारांच्या कथेचा जेंडर-रोल्स पालटून केलेला व्यत्यास आहे असं एका अर्थाने म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रात्री निवांत वाचण्यासाठी अभ्याची ही कथा ठेवली होती.

भरुन पावलो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी काल इथे दिलेली प्रतिक्रिया पोचलीच नै वाट्टं
असो.

कथा लै आवडली. कथेची वार कमी ठेवल्याने अधिकच खुमारी आलीये! जियो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कथा आवडली.
नीट जमून आली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजकारणी आहे ती सोनी. कथा आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हरेक वाक्यात काय ताकद आहे!
विशेषतः एकाच वाक्यात काळ सरण्याचे आणि प्रवृत्तींतील बदलांचे सूचक निर्देश जब्रा - ...नाईकाच्या फेर्‍या कमी झाल्या अन जयवंताची नजर हळूहळू वर चढू लागली.., नाईकाच्या केसातला अन ढगातला काळेपणा सरला.., प्लॉटवर कॉर्पिओची हप्त्याची नियमीत डबल फेरी सुरु झाली अन सोनीच्या गालावरली खळ भरायली..

--------------------

..निबार कॉन्ट्रॅक्टर..
निबार =?
..यील की म्हतारं आह्यार घेऊन..
आह्यार = ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निबार = निब्बर, जून झालेला.
आह्यार = आहेर, भेटवस्तू
.
धन्यवाद अमुकराव आणि सर्वच वाचकांनो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभ्या तुम्ही विशेषतः कलाकार आहात म्हणून विचारतेय - पिवळा जर्द रंगच का घेतला? त्याचे उग्रसर सौंदर्य? नागीणीशी त्याचे साम्य? की आणखी काही? ते तुमच्या भाषेत कळू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा अंदाज :

हा पिवळा जेसीबीचा रंग आहे.

Jcb

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पिवळा अन काळा ह्या रंगांना लक्ष खेचून घ्यायची ताकद असते. आठवा एस्टीडीआयएस्डीझेरॉक्स चे बोर्डस.
उग्रपणा, हाय्येस्ट कॉन्ट्रास्ट अन नागिणीचा रंग हे साधर्म्य आहेच.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा जेसीबीचा (जवळपास सार्‍याच अर्थमुव्हर्सचा) रंग.
जेसीबी (हामरिकन भाषेत बॅकहो लोडर) मुद्दामून घेतलाय विषयात. रेफरन्स कळला चित्रातून तर ओके. नसल्यास मी सांगेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरी.
धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कमीतकमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त प्रभाव पाडणारे लेखन.
नाईकानं दिलेला पैसा इमानदारीनं सोनीचं जोडवं बघत तिच्या हातावर टाकायचा. म्हणजे इतकी मान खाली घालून......जबरदस्तच...
रश्यात बुडवलेला भाकरचा घास उचलावा इतक्या आल्लाद बकेटीनं जिमीनीला उचलायचा. आहाहा... काय उपमा....
अण्णा भाऊ साठेंसारखं धारधार लेखन वाटलं. मजा आली. अजून लिहा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0