दोन संवेदनशील लघुपट दिग्दर्शक

(या लेखात उल्लेखलेल्या तीनही लघुपटांमधील कथा उघड केलेली नाही. अर्थात, यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्पाॅयलर नाहीत. ''8'' या लघुपटाची लिंक शेवटी दिली आहे.)

लघुपट हे कमी कालावधीत जास्त परिपूर्ण, परिपक्व व परिणामकारक विषय मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेतच. त्यातल्या त्यात आपल्याकडे लघुपट निर्मितीची एक क्रेझ आजकाल निर्माण झाली आहे. पण, त्यातील विषय, त्याची हाताळणी याकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय का, हे पाहणे आता गरजेचे आहे. असो.
तर आपल्याकडेही कित्येक अप्रतिम दिग्दर्शक आहेत. ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करता येतील अशी - क्रांती कानडे, राम गावकर, इत्यादी मराठी नावंही आहेत. क्रांती कानडेची जी. ए. कुलकर्णींच्या कथेवर आधारित 'चैत्र', किंवा रामचंद्र गावकर दिग्दर्शित 'सेल्फी' अशा कित्येक परिपूर्ण शाॅर्टफिल्म्स उदाहरण म्हणून सांगता येतील. असो.
तर लघुपट या विषयावर पुन्हा कधीतरी सविस्तर बोलूच, पण तूर्तास तरी आजच्या विषयाकडे वळू.

गेल्या काही वर्षांत मानवी स्वभाव, मानवी भावनांचे कंगोरे दर्शविणाऱ्या बऱ्याच शाॅर्टफिल्म्स पाहण्यात आल्या. त्यातीलच दोन दिग्दर्शकांविषयी. हे दोघेही शाॅर्टफिल्म्स आणि थोडक्यातच चित्रपटांविषयी पॅशनेट आहेत. यातील पहिला म्हणजे aćim vasić. युट्यूबवर याच नावाचा चॅनेल आहे. ज्यावर या दिग्दर्शकाच्या अप्रतिम शाॅर्टफिल्म्स पाहता येतील. त्याचीच 8 ही अप्रतिम शाॅर्टफिल्म.
'8' हे या शाॅर्टफिल्मचं नाव आहे. ते तसं का हे शेवटी सांगतो. आधी स्टोरीविषयी. तर शाॅर्टफिल्ममध्ये तीन कॅरॅक्टर्स आहेत - दोन सैनिक व एक घुबड. शाॅर्टफिल्म साधारणतः 'वर्ल्ड वाॅर टू'च्या काळात घडते, असं अनुमान पात्रांच्या पेहरावावरून काढता येतं. मुळात या फिल्ममध्ये एकही संवाद नाही. संवाद म्हणून 'X' जो काही आवाज काढतो, त्याचं मी वर्णनच करू शकत नाही. यातील पात्रांना नावं नाहीत. यातील पात्रांच्या हेल्मेटवर 'O' व 'X' लिहिलेलं आहे. ही टिक-टॅक-टोची गेम सर्वश्रुत आहेच. असं करण्यामागील कारण म्हणजे जसं या गेममध्ये डाव प्रतिडाव होत राहतात, तसंच इथे घडतं.

पहिलं पात्र 'X' आहे. तो बर्फाळ प्रदेशात असताना, विमानाचा आवाज येतो. तो त्याकडे धाव घेतो. तिथे त्याला 'O' दिसतो. 'X' त्याला बंदी बनवतो आणि स्वतःपासून काही अंतरावर पुढे चालायला लावतो. त्याचं कारण पुढे येईलच. मध्येछ तयार झालेल्या एका परिस्थितीनुसार 'O' पळतो. मग 'X' त्याच्या पायाला गोळी मारतो. या सीन्समधील कॅमेरा म्हणजे अप्रतिम. यानंतर तो पुन्हा 'O' ला चालायला लावतो. इथे स्टोरीत एक ट्विस्ट येतो. आणि या एका ट्विस्टमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 'O' पुन्हा पळतो व आणखी एक गोळी खातो. यानंतरचे ट्विस्ट्स फिल्मध्येच पहावेत. या शाॅर्टफिल्मचं नाव '8' आहे. '8' हा आकडा इथे इन्फिनिटी दर्शवतो. शिवाय, फिल्ममध्ये थर्ड पर्सन म्हणून घुबडाचा वापर केलाय. तोही इथे अजिबात खटकत नाही. यातील बॅकग्राऊंड स्कोअर व एकूणच सगळे संगीत म्हणजे अप्रतिम आहे. सिनेमेटोग्राफीविषयी क्या कहना.

या शाॅर्टफिल्मचा दिग्दर्शक आहे aćim vasić. याच्याच आणखीही काही शाॅर्टफिल्म्स 'aćim vasić' याच नावाच्या युट्यूब चॅनेलवर आहेत.
अफाट डायरेक्शन, सिनेमेटोग्राफी, अ‍ॅब्सर्ड विषय, विषयाची सुंदर मांडणी आणि मस्त म्युझिक. माझ्यामते aćim vasić हा चित्रपटाविषयी पॅशनेट आहे. त्यामुळेच त्याने बनवलेल्या सर्वच शाॅर्टफिल्म्स यामध्ये तो त्याचा स्वतःचा असा एक फॅक्टर जणू ओतततोच. या शाॅर्टफिल्मसाठी ओरिजिनल ट्यून्स व म्युझिक बनवण्यात आलंय. जिथे आपल्याकडे पूर्ण लांबीच्या चित्रपटासाठीदेखील ओरिजिनल कंपोझिशन होत नाही, याउलट या माणसाने केवळ एका शाॅर्टफिल्मसाठी ओरिजिनल म्युझिक बनवायला प्राधान्य दिलंय, ही गोष्ट विशेष.
याच दिग्दर्शकाच्या 'द प्रोटिन्स', 'गार्लिक सर्व्हायलन्स', 'वी'ल सी', 'डार्क साइड ऑफ द अर्थ' अशा सुंदर विषय, तितकीच सुंदर हाताळणी केलेल्या शाॅर्टफिल्म्स आहेत. त्याही याच चॅनेलवर मिळतील.

आणि असाच दुसरा दिग्दर्शक म्हणजे Simon Ellis. याच्या साॅफ्ट, जाम टुडे या माझ्या विशेष आवडत्या शाॅर्टफिल्म्स. या शाॅर्टफिल्म्स 'व्हिमियो' अॅपवर बघता येतात. यातील 'साॅफ्ट' ही 2006 मधील. अमेरिकेतही आढळणारे त्रासदायक व उडाणटप्पू मुले, वडील व मुलातील नातं, अशा विषयांवरील ही सुंदर शाॅर्टफिल्म. सुरूवात अमेरिकेत सर्रास वापरल्या जाणाऱ्या व्हिडिओ कॅममधील शाॅट्समधून होते. चार पाच जणांची टोळी लोकांना त्रास देत असल्याचे दिसते. हा आणि इतरही काही शाॅट्स व्हिडिओ कॅममधून घेणं व त्याची रेग्युलर कॅमेर्‍यातून घेतलेल्या शाॅट्ससोबत केलेली सुंदर एडिटिंग. इथे पहिली फ्रेम येते. रेग्युलर कॅमेर्‍यातून, एक घर दिसू लागतं. घराच्या समोरील लेनमधील एका विशिष्ट अँगलमधील बिल्डिंगवरून शूट करत हा शाॅट दिसू लागतो. फिल्ममधील वडिलांचं कॅरेक्टरची एंट्री होते. दार बंद होऊन आतमधील संवाद दिसतो. वडील दूध आणण्यासाठी जवळच्या दुकानात येतात. तिथे ही टोळी असतेच. तिथे वडील व त्या टोळीत झटापट होते. टोळी त्या व्यक्तीच्या मागावर असते. पुन्हा घरातील वडील व मुलातील संवाद येतो. इथे टोळी त्यांना त्रास द्यायला सुरूवात करते. मुलालाही ह्याच टोळीने आधी त्रास दिलेला असल्याने तो अर्थातच चिडतो. पण, वडील त्याला थांबवतात. पुढे काय घडतं, ते फिल्मध्येच पाहणं सार्थ ठरेल. पण, शेवटच्या काही फ्रेम्समध्ये मुलीने केलेल्या कृतीनंतर तो ज्या कटाक्षाने वडिलांकडे पाहतो, तो कटाक्ष पाहून फिल्मचा उद्देश सफल झाल्याची जाणीव होते.
प्रत्येक मुलासाठी त्याचे वडील हे त्याचे पहिले हिरो असतात, पण त्याच प्रतिमेवर होणारा आघात ही शाॅर्टफिल्म सहजरीत्या दाखवते. शिवाय, यातील छायाचित्रण ही सुंदर आहे. म्हणजे एखादा सीन आधीच्या कॅमेरा अँगलसारखाच दाखवून, फक्त पात्रांचा स्वभाव आणि कथानकातील काही लहान सहान बदल टिपणे, हे मला जास्त आवडले.

याच सायमन एलिसची आणखी एक, 2010 मधील शाॅर्टफिल्म म्हणजे 'जाम टुडे'. अतिशय सुंदर, संवेदनशील व भावनात्मक विषयावरील शाॅर्टफिल्म. वयात येत असलेल्या एका मुलाची (वय साधारणतः बारा) व त्याच्या कुटुंबाची सुंदर गोष्ट. पहिलीच फ्रेम आपलं लक्ष वेधून घेते. मुलगा व त्याचे वडील, दोघेही एकाच मुलीकडे पाहून स्मितहास्य करताना दिसतात, असा तो शाॅट. यानंतरही काही अप्रतिम सीन्स येत राहतात.
पण, मुळात शाॅर्टफिल्म ज्या मूळ गोष्टीवर आधारित आहे, ती शेवटच्या काही मिनिटांत येते. तो सीन म्हणजे, त्या मुलाने आपल्या आई-वडिलांना 'त्या' अवस्थेत पाहणे. यावेळी व इतरत्रही, मुलाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्याचा अभिनय या शाॅर्टफिल्मचा पीक पाॅईंट ठरतो. ज्यासाठी त्याला बऱ्याच फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बेस्ट अ‍ॅक्टर'चा पुरस्कारही मिळालाय. सायमनच्या या दोन शाॅर्टफिल्म्स त्यातल्या त्यात नितांत सुंदर अशा आहेत.

या किंवा इतरही अनेक शाॅर्टफिल्म्स पाहणे, हा त्या अर्थी एक सोहळा असतो. ऑस्कर मिळालाय या व्यतिरिक्तही काही गोष्टी असतात, याची तर जाणीव होतेच. पण, आपण कुठे आहोत, हेही कळते.

https://youtu.be/He9FeJZua20

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

तिन्ही लघुपट नक्की बघा आणि लेखावरील प्रतिक्रिया कळवा झाल्यास अजून लिहू की नको तेही सांगा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या फिल्म नक्की बघणार.
तुम्ही लिहीत रहा
वाचायला आवडेल.
बाय द वे अब म्हणजे हिन्दीतला की अजुन काही अर्थाने आय डी आहे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

अब ही माझी इनिशियल्स आहेत. तीही फक्त माझं व वडिलांचं नाव, यातीलच. शक्यतो लिखाण करताना अ. ब. अशाच नावे लिहितो. त्यामुळे इथेही सध्या तरी तेच ठेवलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीव‌र स्वाग‌त तुम‌चे.

ऐसीव‌र ब‌ऱ्याच दिव‌सात राडा झालेला नाही ... स‌ग‌ळे लोक अत्य‌ंत शांत‌प‌णे च‌र्चा क‌रीत आहेत. तेव्हा तुम्हीच काहीत‌री क्रिएटिव्ह क‌रा म्ह‌ंजे राडा क‌र‌ता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोलवा...
करू करू राडाही करूच. आता जर एखादा सदस्य चित्रपट आणि पुस्तकं, किशोर रफी बर्मनदा आणि इतरही बर्‍याच गोष्टींवर बोलणारा असला म्हणजे चर्चाही होईल आणि झाल्यास मतभेदही होतच राहतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोलवा...
करू करू राडाही करूच. आता जर एखादा सदस्य चित्रपट आणि पुस्तकं, किशोर रफी बर्मनदा आणि इतरही बर्‍याच गोष्टींवर बोलणारा असला म्हणजे चर्चाही होईल आणि झाल्यास मतभेदही होतच राहतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोलवा...
करू करू राडाही करूच. आता जर एखादा सदस्य चित्रपट आणि पुस्तकं, किशोर रफी बर्मनदा आणि इतरही बर्‍याच गोष्टींवर बोलणारा असला म्हणजे चर्चाही होईल आणि झाल्यास मतभेदही होतच राहतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कीती ते ध‌न्य‌वाद्?
एक‌च प्र‌तिसाद पुन्हापुन्हा टाकून ऐसीव‌र राडा होत नाही. बौद्धीक कारागिरी दाख‌वावी लाग‌ते.

ग‌ब्बु सार‌ख्या स‌ंब‌ंध‌ न‌स‌लेल्या लिंका फेक‌ता याय‌ला पाहिजेत्.
म‌नोबा सार‌खे वेड‌ घेउन पेड‌गाव‌ ला जाता आले पाहिजे.
अजोंसार‌खे सेल्फ-गोल क‌र‌ता याय‌ला पाहिजेत्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझे नाव‌ व‌ग‌ळ‌ल्याचा निषेध‌. अजोपूर्व‌ काळापासून‌ मी राडे क‌र‌त आलेलो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅन , सोपंय ... तुम्ही जे करता ते अनुताईंना 'राडा' वाटत नसेल ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझे नाव‌ व‌ग‌ळ‌ल्याचा निषेध‌.

बॅटोबा, तुझे नाव जाणिवपूर्व‌क व‌ग‌ळ‌ले होते, कार‌ण तुला प‌ट‌ले नाहीत‌र तू अंगाव‌र धाऊन येशील अशी भिती वाट‌ते आणि ते सुद्धा त‌ल‌वार घेऊन ( त‌ल‌वार ती सुद्धा छ‌त्र‌प‌ती शिवाजी म‌हाराजांच्या काळात‌ली गंज‌लेली, ध‌नुर्वाताची भिती वाट‌ते ).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐयो, लाज‌लो च‌क्क‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

( त‌ल‌वार ती सुद्धा छ‌त्र‌प‌ती शिवाजी म‌हाराजांच्या काळात‌ली गंज‌लेली, ध‌नुर्वाताची भिती वाट‌ते ).

हा हा हा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनु बॅक इन ह‌र एलिमेन्ट्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो, एकदा प्रतिसाद टाकला आणि त्यानंतर वारंवार 'काहीतरी चुकीचे घडत आहे', असा फलक दिसत राहिला. मग म्हटलं की, नंतर प्रतिसाद देता येईल. पुन्हा मागील पानावर गेलो तर चौदा प्रतिसाद. त्यातीलही अकरा माझेच दिसले. नंतर प्रयत्न करूनही ते हटवता काही येत नव्हते. त्यामुळे ते तसेच राहिले.
(तसेही राडा घालण्याकरिता आम्हास अशा कुबड्यांची गरज नव्हे महाराज. त्याकरिता आमचे लेखच पुरेसे आहेत. (पण, तेही असे वारंवार प्रकाशित झाले नाही म्हणजे मिळवले. खिक.)असो.)
आता ऐसीच्या 'वापरकर्त्यांशी संवाद साधावयाच्या साधनाशी' (यूजर इंटरफेस महाराज) जुळवून घ्यायला थोडा वेळ तर लागेलच. तोपर्यंत असेच राडे झाले नाही म्हणजे मिळवले. नाहीतर आमच्या प्रतिमेवरील डाग आम्हाला तसेही सहन होत नाहीत...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजोंसार‌खे सेल्फ-गोल क‌र‌ता याय‌ला पाहिजेत्.

म्ह‌ंजे काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्या टिम‌ ला अजो आप‌ल्या टिम‌क‌डुन खेळ‌ताय‌त असे गेम सुरु झाल्याव‌र वाट‌त असते, तेंव्हा अचान‌क अजो स्व‌ताच्याच गोल‌पोस्ट व‌र ह‌ल्ला च‌ढ‌व‌तात्. त्यामुळे मुळ मॅच बाजुला राहुन अजो आणि त्यांची टिम ह्यात‌च राडा सुरु होतो.

ब‌रं हे प‌ण फार काळ टिक‌त नाही, अजो पुन्हा अचान‌क दुस‌ऱ्या बाजुच्या गोल‌पोस्ट व‌र ह‌ल्ला क‌र‌तात्. ते क‌रुन कंटाळा आला त्यांना की प्रेक्षकांक‌डे ब‌घुन ओर‌डाआर‌डा क‌राय‌ला लाग‌तात्. ह्या स‌र्वातुन, मुळ मॅच बाजुला र‌हाते आणि प्रेक्ष‌क प‌ण मैदानात उत‌रुन राडा होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

च‌प‌ख‌ल्. नेम‌कं. अचूक निरिक्ष‌ण्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

__/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अफाट‌ निरीक्ष‌ण‌. मान‌ ग‌ये. _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आम‌च्या एका मित्राला या ल‌घुप‌टांबाब‌त माहीती दिलेली आहे. तो ल‌ई इंट्रेष्टेड आहे.

पाह‌तो म्ह‌णाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कसे वाटले कळवा मग. तुम्ही नाही पाहणार का. हा हा हा...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म‌ला का माहीत नाही प‌ण तो "८" ल‌घुप‌ट विशेष अॅप्रिशिएट क‌र‌ता आलाच नाही Sad
जाऊ दे स‌र्वांना स‌र्व‌ ज‌म‌त‌ं अस‌ं कुठेय? Wink - हे तुम्ही बोलाय‌च्या आत मी बोलून घेते

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या लघुपटावाषयी:-
मुळात त्याला आठ ''8'' नाव दिलं, कारण त्यातील गोष्ट आपल्याला टिक टॅक टोच्या माध्यमातून सांगितली आहे. शिवाय, त्यातील घुबडाचा एक तटस्थ म्हणून विचार केला आहे. त्याच्या डोळ्यांचा आकार इन्फिनिटी च्या चिन्हासारखा म्हणूनही पाहता येतो.
इन्फिनिटीचा वापर व संदर्भ यासाठी की दोघेही सैनिक आपल्या चाली, डाव प्रतिडाव खेळतात, पण तरीही शेवटी दोघेही एकाच ठिकाणी येऊन पोहचतात. वर सांगितल्यानुसार तो काळ वर्ल्ड वाॅर दोन अथवा सिव्हिल वाॅर च्या दरम्यानचा असावा. थोडक्यात, युद्धजन्य परिस्थिती आहे.
यात दिग्दर्शकाला अभिप्रेत अर्थ असा की दोन्ही बाजू लढत आहेत, आपल्या चाली खेळत आहेत, पण हे सर्व अनंत काळ जरी सुरू राहिलं तरीदेखील शेवटी दोन्ही बाजू एकाच पातळीवर येऊन थांबतील किंवा एखादी बाजू कदाचित जिंकेलही, पण त्याचा फायदा काय? शेवटी ह्युमनिटी अथवा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास युद्ध चुकीचेच. विजय कोणाचाही झाला तरीदेखील शेवटी माणसाचा त्यातील फायदा काय?
याउलट यातील घुबड, जे नेचर अर्थात निसर्गाचं प्रतीक मानलं तर त्याचाही काही परिणाम आपल्यावर होताना दिसत नाही. शिवाय, ते घुबडच या दोघांहूनही हुशार असंही अभिप्रेत असावं.

युद्धात कोणीही जिंकत नाही. हा मूळ मुद्दा आहेच. शिवाय, शेवटी ती दोघेही अडकतात, पण घुबड मात्र उडून जातं किंवा जाऊ शकतं. थोडक्यात, ते फक्त एक तिसरा व्यक्ती म्हणून त्या दोघांकडे पाहतं. आणि आपणही त्या घुबडाप्रमाणेच एक तिऱ्हाहित म्हणून या सगळ्याकडे पाहतो.

हुश्श... थोडक्यात, असं सगळं काही आहे. युद्धात कोणीही जिंकत नाही किंवा जिंकलं तरी उपयोग नाही, वगैरे गोष्टी यातून मांडल्या आहेत. शिवाय, यात एकही संवाद नाही, त्यामुळे सिनेमा हे दृश्य माध्यम म्हणून खरंतर कसा हाताळायला हवा, हे कळतं. निव्वळ टाळ्या घेणारी वाक्यं म्हणजे सिनेमा नव्हे. तर यातील सिनेमेटोग्राफी, संगीत, बॅकग्राऊंड स्कोअर व अभिनय, दृश्यं, चित्रपट म्हणून योग्य उदाहरण, इत्यादी गोष्टींमुळे मला खरं तर ही शाॅर्टफिल्म आवडते.
आता तुमच्या शंका दूर झाल्या असाव्यात, अशी अपेक्षा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय‌ हे स‌र्व‌ मी त्या व्हिडीओ खालील क‌मेंट‌स‌म‌ध्ये वाच‌ले होते. प‌ण त‌रीही म‌ला नाही आला अॅप्रिशिएट क‌र‌ता Sad
____
आम्ही म‌ठ्ठ आहोत स‌ग‌ळ‌ं स्पेल आऊट केलेल‌ं आव‌ड‌त‌ं. यात फार‌च रेएडिंग बिट‌वीन द‌ लाइन्स होते Wink
____
बाय‌ द‌ वे माझ्याव‌रुन ऐसीचा आय क्यु जोखुन प‌ळून जाऊ न‌का खिक‌!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या लघुपटावाषयी:-
मुळात त्याला आठ ''8'' नाव दिलं, कारण त्यातील गोष्ट आपल्याला टिक टॅक टोच्या माध्यमातून सांगितली आहे. शिवाय, त्यातील घुबडाचा एक तटस्थ म्हणून विचार केला आहे. त्याच्या डोळ्यांचा आकार इन्फिनिटी च्या चिन्हासारखा म्हणूनही पाहता येतो.
इन्फिनिटीचा वापर व संदर्भ यासाठी की दोघेही सैनिक आपल्या चाली, डाव प्रतिडाव खेळतात, पण तरीही शेवटी दोघेही एकाच ठिकाणी येऊन पोहचतात. वर सांगितल्यानुसार तो काळ वर्ल्ड वाॅर दोन अथवा सिव्हिल वाॅर च्या दरम्यानचा असावा. थोडक्यात, युद्धजन्य परिस्थिती आहे.
यात दिग्दर्शकाला अभिप्रेत अर्थ असा की दोन्ही बाजू लढत आहेत, आपल्या चाली खेळत आहेत, पण हे सर्व अनंत काळ जरी सुरू राहिलं तरीदेखील शेवटी दोन्ही बाजू एकाच पातळीवर येऊन थांबतील किंवा एखादी बाजू कदाचित जिंकेलही, पण त्याचा फायदा काय? शेवटी ह्युमनिटी अथवा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास युद्ध चुकीचेच. विजय कोणाचाही झाला तरीदेखील शेवटी माणसाचा त्यातील फायदा काय?
याउलट यातील घुबड, जे नेचर अर्थात निसर्गाचं प्रतीक मानलं तर त्याचाही काही परिणाम आपल्यावर होताना दिसत नाही. शिवाय, ते घुबडच या दोघांहूनही हुशार असंही अभिप्रेत असावं.

युद्धात कोणीही जिंकत नाही. हा मूळ मुद्दा आहेच. शिवाय, शेवटी ती दोघेही अडकतात, पण घुबड मात्र उडून जातं किंवा जाऊ शकतं. थोडक्यात, ते फक्त एक तिसरा व्यक्ती म्हणून त्या दोघांकडे पाहतं. आणि आपणही त्या घुबडाप्रमाणेच एक तिऱ्हाहित म्हणून या सगळ्याकडे पाहतो.

हुश्श... थोडक्यात, असं सगळं काही आहे. युद्धात कोणीही जिंकत नाही किंवा जिंकलं तरी उपयोग नाही, वगैरे गोष्टी यातून मांडल्या आहेत. शिवाय, यात एकही संवाद नाही, त्यामुळे सिनेमा हे दृश्य माध्यम म्हणून खरंतर कसा हाताळायला हवा, हे कळतं. निव्वळ टाळ्या घेणारी वाक्यं म्हणजे सिनेमा नव्हे. तर यातील सिनेमेटोग्राफी, संगीत, बॅकग्राऊंड स्कोअर व अभिनय, दृश्यं, चित्रपट म्हणून योग्य उदाहरण, इत्यादी गोष्टींमुळे मला खरं तर ही शाॅर्टफिल्म आवडते.
आता तुमच्या शंका दूर झाल्या असाव्यात, अशी अपेक्षा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीवर स्वागत.

हा लेख, आणि तुमचे आधीचे मराठी 'वेब कंटेंट'बद्दलचं लेखन वाचताना प्रश्न पडला की तुम्ही जे इंग्लिशाळलेलं मराठी वापरता त्यामागे अद्न्यान, आळस की काही विशेष हेतू आहे? मराठीत 'फुल्लीगोळा' हा सर्रास उपलब्ध असलेला शब्दप्रयोग सोडून टिक टॆक टो का? 'नंबर्स मॆटर करतात' असा धेडगुजरीपणा का? मराठीबद्दल जर इतकी कन्सर्न असेल तर यु नो, व्हाय नॊट खरोखर यूज मराठी वर्ड्स?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आळस हेच कारण असेल बहुतेक... (...असे म्हणून अज्ञानाचा पांघरूण घालतोय...)
विनोदाचा भाग सोडा. पण, बहुतांशी चित्रपटांविषयी बोलताना काही टर्म्स अर्थात संज्ञांविषयी वाचकाचा गैरसमज होऊ शकतो. वरील किंवा याआधीच्या लेखात तरी अशा गैरसमजाला फारसा वाव नाही. पण, पुढे मी लिहिणार असलेली लेखमालिका, जी 'व्हिज्युअल काॅमेडी' या विषयावर आधारित आहे, त्यामध्ये असे गैरसमज होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, 'व्हिज्युअल काॅमेडी' ही संज्ञा मराठीत मांडताना किंवा मांडल्यावर असे घडू शकते. 'व्हिज्युअल काॅमेडी' हे मराठीत सांगताना त्याला ठराविक असा शब्द नाही. त्याला अर्थ नक्कीच आहे. (तो साधारण असा - चित्रपटातून विनोद समोर मांडताना चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, प्रत्येक दृश्याचा वापर संवांदाशिवाय विनोदनिर्मितीसाठी करणे.) आता प्रत्येक वेळी हा अर्थ समोर मांडणे, यामुळे तो भाग वारंवार येईल. जे मी किंवा इतरही लेखक सहसा टाळेल. शिवाय, हा अर्थ झाला. त्याला ठराविक असा शब्द नसल्याने, अशावेळी इंग्रजी शब्द वापरणेच योग्य वाटते.

आता चित्रपट असला सिनेमाविषयी बोलताना चित्रपट हे दृश्य माध्यम आहे, असं मी म्हणू शकतो किंवा अशा प्रकारची वाक्यं वापरू शकतो. पण, हेच वरील संज्ञा किंवा चित्रपट क्षेत्राशी संबंधित इतर काही संज्ञा वापरताना शक्य होईल असे मला तरी वाटत. त्यामुळे अधूनमधून असे शब्द एखादा अपवाद म्हणून वापरतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा आक्षेप तांत्रिक शब्दांना नव्हता. टिकटॆकटो, आणि नंबर्स मॆटर करतात यांसारख्या सामान्य भाषेतल्या गोष्टींना होता. मराठी 'कंटेंट' जालावर पसरवण्याची इच्छा असेल तर सामान्य माणसाची भाषा वापरणं योग्य नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे असल्यास ठीक आहे. कारण, दरवेळी ते शक्य होणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए ब‌म्म‌न लोग इत‌ने नाझी क्यों होते है? पूरी काय‌नात ऐसीज म‌राठी वाप‌र‌ते प‌न् हे ऐसीवाले लोक ऐसी म‌राठी का प‌संद ना क‌र‌त?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लंगडा आला रे

हा हा हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमची कायनात फारच ल्हान दिस्ते भौ. अहो, या बम्मन लोकांनी इंग्लिश मीडियम शाळांचं एज्युकेशन म्हाग करून ठेवलेलं आहे. त्येंचीच पोरं खेळून ऱ्हायलीत टिक्टॅक्टो. महाराष्ट्रातल्या एखाद्या गावात जाऊन शाळेतल्या पोरांना म्हणून बघा, 'चला टिक्टॅक्टो खेळूया'. मग बोला कायनातीबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0