व्हिज्युअल काॅमेडी लेखमालिका - भाग २ : व्हिज्युअल काॅमेडी आणि तिचा वापर

भाग १
-----------
मागील लेखात आपण दृश्य माध्यमाविषयी थोडंफार बोललो. आता यावेळी आपल्या मूळ विषयावर म्हणजेच व्हिज्युअल काॅमेडीविषयी बोलू.

मुळात 'व्हिज्युअल काॅमेडी'चा शोध कुणी लावला, वगैरे प्रश्न आपण बाजूला ठेवू आणि व्हिज्युअल काॅमेडीवर लक्ष केंद्रित करू. तर मूकपटांच्या काळात चित्रपटांतून संवाद साधण्याचे साधारण दोनच प्रकार होते. एक म्हणजे चित्रफितीमध्येच जेथे दोन पात्रं संवाद साधताना दाखवायचे आहेत, त्या ठिकाणी साइन बोर्ड्स वापरून संवाद लिहायचे आणि दुसरा म्हणजे संवाद दाखवायचेच नाहीत. यातील दोन्हीही प्रकार तत्कालीन चित्रपटांमध्ये तितक्याच प्रमाणात वापरले जातात. पण, दुसरा प्रकार बहुतांशी प्रस्थापित आणि व्हिज्युअल काॅमेडीकरिता ओळखले जाणारे दिग्दर्शक वापरताना दिसतात. म्हणजे पात्रांमध्ये काय संवाद होतोय, यापेक्षा जास्त महत्त्व एखाद्या किंवा 'त्या' विशिष्ट फ्रेममध्ये काय घडतंय, या गोष्टीला देण्यात येते. जे चित्रपट दृश्य माध्यम म्हणून वापरताना, आणि व्हिज्युअल काॅमेडी करत असतानाच प्रेक्षकांशी संवाद साधताना उपयोगी पडते.
व्हिज्युअल काॅमेडीमध्ये प्रेक्षक हा महत्त्वाचा दुवा असतो. म्हणजे प्रत्येक फ्रेम, प्रत्येक दृश्य हे प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचवायचे आणि प्रेक्षक ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहील, कसा विचार करेल, या सर्व गोष्टींचा विचार करून तयार करण्यात आलेले असते. हे प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना योग्य कॅमेरा अँगल्स, योग्य वेळी परिणामकारक संगीत, पार्श्वसंगीत, फ्रेममध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक साधनाचा विनोदनिर्मितीसाठी योग्यरीत्या केलेला वापर, इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. म्हणजे एखादे पात्र एखादी कृती करत आहे, तर ती कोणत्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत योग्यरीत्या पोहोचेल याचा विचार करणे गरजेचे आहे.
उदाहरणार्थ, एखादे पात्र शिडीवर चढत आहे. मग हे शाॅट्स टाॅप अँगल्स किंवा साइड व्ह्यूमधून दाखवून ते दृश्य परिणामपरिणामकारक ठरणार नाही, आणि अपेक्षित व्हिज्युअल काॅमेडी होणार नाही. यासाठी हे दृश्य भिंतीच्या समोरच्या बाजूनेच व भरपूर झूम आउट ठेवूनच चित्रित करावे लागेल. यावेळी सध्या चलतीत असणारे क्लोजअप शाॅट्स व फ्रेम्स घेऊन चालणार नाही.[१]

यासोबतच, याआधीही उल्लेखल्याप्रमाणे संगीत किंवा साउंड इफेक्ट्स हे व्हिज्युअल काॅमेडीमध्ये महत्त्वाचे आहेत.) मुळात इथे संगीत म्हणजे तांत्रिकदृष्ट्या 'फिल्म स्कोअर'. या फिल्म स्कोअरलाच बॅकग्राऊंड स्कोअर, बॅकग्राऊंड म्युझिक, साउंडट्रॅक असे पर्यायी शब्द आहेत.) या संगीतामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे चित्रपटाच्या संवादांच्या आधी व नंतर असलेले संगीत अर्थात बॅकग्राऊंड स्कोअर किंवा बॅकग्राऊंड म्युझिक. तर चित्रपटातील गाणी जी साउंडट्रॅकहून निराळी मानली जातात. (शिवाय, बॅकग्राऊंड साउंड आणि नॅट साउंड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बॅकग्राऊंड साउंडमध्ये मूळ पात्राखेरीज इतरही लोक बोलत असतात, व सभोवतालचे इतर आवाजही समाविष्ट असतात. पण, मूळ घटक संवाद हाच राहतो आणि त्यावरच फोकस असतो. तर नॅट साउंडमध्ये विशिष्ट पात्राने, गोष्टीने केलेले आवाज समाविष्ट असतात. आणि त्यावरच फोकस असतो.)
आता या संगीताच्या आणि त्यातील घटकांच्या योग्य वापराविषयी बोलूयात. याआधीही म्हटल्याप्रमाणे संगीत, पार्श्वसंगीत हे व्हिज्युअल काॅमेडीमध्ये महत्त्वाचे आहे. मग या सगळ्याचा वापर व्हिज्युअल काॅमेडीमध्ये नक्की कसा केला जातो, हे पाहूयात. तर सुरूवातीच्या काळातील मूकपटांमध्ये अर्थात फिल्म्समध्ये संवाद नसल्याने, संगीत म्हणून बॅकग्राऊंड म्युझिक आणि नॅट साउंड या दोनच मुख्य गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो. मग यामध्ये एखादी घटना, एखादे दृश्य घडताना दिलेले म्युझिक ते दृश्य व प्रेक्षक यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरते. मग ते म्युझिक परिस्थितीनुसार साधे, सरळ, आजही वापरण्यात येते तसे (पियानो, ट्रम्पेट, वगैरे वापरून) वापरणे आणि व्हिज्युअल काॅमेडीचे दृश्य सादर करताना पात्राच्या कृतीला समांतर आवाज व म्युझिक वाद्यं (इथंही ही वाद्यं म्हणजे पियानो, वगैरेच) वापरून किंवा ऑन स्क्रीन गोष्टींचा मूळ आवाज वापरून (नॅट साउंड) दिले जायचे.[२]

यानंतर व्हिज्युअल काॅमेडीमध्ये महत्त्वाची असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्रेममध्ये आणि थोडक्यातच त्या सीनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये, सभोवतालच्या गोष्टींचा केलेला वापर. म्हणजे पात्र जर आपल्या घरासमोरील बागेतील झाडाला पाणी घालत असेल तर त्यामध्ये त्याची फजिती कशी व कोणत्या प्रकारे होऊ शकते, यासाठी सामान्य परिस्थितीमध्ये आसपास उपलब्ध असून शकणाऱ्या गोष्टींचा विनोदनिर्मितीसाठी योग्यरीत्या वापर करणे, हे महत्त्वाचे ठरते. मग अशावेळी तिथे काय काय उपलब्ध असू शकेल? तर पात्र पाइपमध्ये अडकून पडू शकते, बागकामासाठीच्या फावडे, वगैरे गोष्टींवर पाया पडून पात्राला लागू शकते (हे बहुतेक ठिकाणी आपण पाहिले आहेच), वगैरे बऱ्याच गोष्टी इथे घडू शकतात. इथे 'शकतात'ला फार महत्त्व आहे. मग काय दाखवायचे, कसे दाखवायचे, इत्यादी त्या दिग्दर्शकांच्या व इतरांच्या कल्पकतेवर अवलंबून आहे.
या सगळ्या गोष्टी, घटना या निरीक्षणातून आत्मसात केल्या जाऊ शकतात. कारण, व्हिज्युअल काॅमेडीमध्ये 'निरीक्षण' हा महत्त्वाचा घटक आहे. संगीत असो वा कॅमेरा अँगल्स, किंवा दृश्यातील घटकांचा अर्थात प्राॅप्सचा वापर, हे सगळे निरीक्षण यावरच अवलंबून आहेत.[३]

याशिवाय, व्हिज्युअल काॅमेडीमधील शेवटची आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'अतिशयोक्ती'. ह्या अतिशयोक्तीचा पाया हा 'अशक्यप्राय' गोष्टी करण्यावर भर देणे, हा असू शकतो किंवा बऱ्याचदा असतो. ही अतिशयोक्ती तर आपल्याला सर्वत्र आढळते. (आपल्याकडील आणि सगळीकडीलच बहुतांशी मेनस्ट्रीम चित्रपटांची तर पटकथाच अतिशयोक्तपूर्ण आणि अशक्यप्राय असते!) मग ही अतिशयोक्ती अगदी पात्राच्या मार उठण्या-बसण्यापासून ते चालण्यापर्यंत आणि मारण्यापासून ते मार खाण्यापर्यंत सर्व घटना आणि परिस्थितींमध्ये आढळून येऊ शकते, आणि दाखवली जाऊ शकते.[४]
(आता बहुतांशी वेळा या सगळ्या गोष्टी एकत्र गुंफून पात्राचा स्वभाव, शारीरिक हालचाली, पात्राचे किंवा पात्राविषयीचे समज गैरसमज, इत्यादी गोष्टी एकत्र करून लिखाण केलेले दिसते.)

या सगळ्याच गोष्टी रोवन अॅटकिन्सन[५], या लेखक - अभिनेत्यांपासून, ते चार्ली चॅप्लिन [६], वेस अॅन्डरसन [७] ते एडगर राइट [८] या दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये आढळून येते. लाॅरेल अॅण्ड हार्डी[९]च्याही प्रत्येक एपिसोडमध्ये व्हिज्युअल काॅमेडी दिसून येते. हे सगळे तर व्हिज्युअल काॅमेडीसाठी प्रसिद्ध आहेत, या प्रकारात प्रस्थापित आहेतच. पण, इतरही अनेक चित्रपटांमध्ये व्हिज्युअल काॅमेडी कळत नकळत दिसूदिसून येते. फक्त त्या दृश्यांचे प्रमाण कमी आहे. याच दिग्दर्शक, अभिनेत्यांच्या काही व्हिडिओजच्या लिंक्स देऊन या लेखाचा समारोप करत आहे. पुन्हा एकदा भेटूच, या लेखमालिकेतील पुढील आणि शेवटच्या लेखामध्ये. तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया कळवा, तुमची मतं कळवा. काही मुद्दे राहिले अथवा पटले असल्यास, काही आक्षेप असल्यास कळवा. त्यावर प्रतिसादांमध्ये चर्चा करूच. शिवाय, काही सजेशन्स असतील तर तीही कळवाच...
----------

[१] बस्टर कीटनच्या 'दि गोट' या लहानशा चित्रपटातील कॅमेरा अँगल्सचा उत्तम वापर आणि योग्यरीत्या केलेले छायांकन - https://youtu.be/Fwls7oS-MHI
[२] चार्ली चॅप्लिनच्या एका चित्रपटात केलेला संगीत, पार्श्वसंगीताचा उत्तम वापर - https://youtu.be/5v08wIxpA70
[३] Jacques Tati च्या अनुक्रमे 'मोन आॅन्कल' आणि 'प्ले टाइम'मधील सभोवतालच्या गोष्टींचा वापर -
https://youtu.be/LE9t98Gox60
https://youtu.be/LjDNfK99Pec
[४] लाॅरेल अॅण्ड हार्डीच्या 'पियानो मूव्हर्स'मधील अतिशयोक्ती - https://youtu.be/yWsqGEeb9hM
[५] रोवन अॅटकिन्सन याने व्हिज्युअल काॅमेडीवर आधारितच एक विनोदी व्हिडिओंची मालिका बनवली. त्यातील पाच भाग - https://youtu.be/E9fsn6lQBV4
https://youtu.be/r7JGaLgF8HM
https://youtu.be/_9k9lWYwrBY
https://youtu.be/ELyAYOfLCJc
https://youtu.be/sYrK0VhMjyI
[६] चार्ली चॅप्लिनच्या 'दि किड'मधील काही दृश्यं - https://youtu.be/qNseEVlaCl4
[७] वेस अॅन्डरसन हा एक अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक आहे. जो त्याच्या विनोदी आणि इतर प्रकारातील चित्रपटांसाठी ओळखला जातो. अॅन्डरसनच्या संदर्भांसाठी या दिग्दर्शकाचे 'द ग्रॅण्ड बुडापेस्ट हाॅटेल', आणि इतर चित्रपट पहावेत.
[८] दिग्दर्शक एडगर राइटच्या चित्रपटातील विनोदनिर्मिती - https://youtu.be/rjobpa1j3zs
दिग्दर्शक एडगर राइटच्या चित्रपटात व्हिज्युअल काॅमेडीकरिता केलेला कॅमेर्‍याचा योग्य वापर - https://youtu.be/vedJVCvdBgI
[९] लाॅरेल अॅण्ड हार्डीच्या चित्रपटांतील व्हिज्युअल काॅमेडी - https://youtu.be/qIPSsW8cbLg

----------
भाग ३

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

खूपच मस्त लेख. फाईव्ह स्टार दिलेत. बाकी खूप बोरिंग आणि वाह्यात लेखन असत या साईटवर , सर्प्राईज्ड कि इतका डिटेल अभ्यासून लिहिलेला लेख इथे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

धन्यवाद. तिसरा (आणि शेवटचा) भागही येईल पुढच्या रविवारी, तोही वाचा आणि प्रतिक्रिया कळवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखादे दृश्य घडताना दिलेले म्युझिक ते दृश्य व प्रेक्षक यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरते.

फुगे या सिनेमात स‌ंगीताचा उत्त‌म‌ वाप‌र‌ केलेला आहे.
__________
छान‌ छान लिंका ड‌क‌व‌लयात तुम्ही. मी द‌ गोट पाहीला. आव‌ड‌ला.
अन्य‌ ब‌घेन्.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्या लिंक्स शोधण्यातच बराच वेळ घालवला मी. त्या त्या उदाहरणाला साजेसा व्हिडिओ शोधावा लागला. माझ्याकडे असलेल्या लिंक्सच्या ढिगाऱ्यातच या सापडल्या. तुम्हाला आवडल्या हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0