गेट आउट : एकदा तरी पहावाच असा थरार

तसा हाॅरर फिल्म्स् हा माझा प्रांत नव्हे. पण हे चित्रपट मला सतत त्यांच्याकडे आकर्षित करत राहतात. त्यामुळे साहजिकच मी 'द ब्लेअर विच प्रोजेक्ट' वा 'द काॅन्जुरिंग'सारखे मेनस्ट्रीम चित्रपट पाहिलेले नाहीत. पण याउलट मला सायकाॅलाॅजिकल हाॅरर मला आवडतात. मग त्यात 'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' किंवा 'द शाइनिंग'सारख्या चित्रपटांचा समावेश होतो. अलीकडे असाच 'गेट आउट' हा चित्रपट पाहण्यात आला. पण पाहण्यापूर्वी या चित्रपटाचे रिव्ह्यू मी साहजिकच वाचलेले नव्हते. शिवाय याचा जाॅनरही मला माहित नव्हता. त्यामुळे सवयीप्रमाणे मध्यरात्री चित्रपट पाहण्यास सुरू केला. चित्रपट अर्ध्यावर कधी पोहचला तेही कळाले नाही. पण अर्ध्यावर चित्रपट जरासा सायकाॅलाॅजिकल भयपटाकडे वळू लागल्याने पाॅज करून गुगलवर सर्च केला. आणि हाॅरर जाॅनर पाहून चित्रपट तिथेच थांबवला. पण दुसर्‍या दिवशी तो पूर्ण केला. आता ही रटाळ कहाणी सोडून थेट चित्रपटाकडे वळूया.

तर हा चित्रपट अगदी पहिल्याच फ्रेमपासून आपल्यावरील त्याची पकड मजबूत करतो. सुरूवातच एका ब्लॅक स्क्रीनने होते आणि लगेचच एक 'ब्लॅक' व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडशी बोलताना दिसतो, पण त्यानंतरच्या काहीच क्षणात त्याचे अपहरण होते. आणि ही गोष्ट इथेच थांबते. पुढच्याच फ्रेममध्ये आपण एका गाडीत बसलेलो आहोत, असं भासवणारी कॅमेऱ्याची मांडणी, आणि एक गाणं स्क्रीनवर दिसतं. गाणं संपेपर्यंत आपण एका हाॅलमध्ये पोहोचतो. नंतर बेडरूममध्ये एक जोडपं बहुधा ट्रिपसाठी वगैरे पपॅकिंग करत आहे. नंतर कळते की ते जोडपं म्हणजे 'ब्लॅक' फोटोग्राफर 'क्रिस वाॅशिंग्टन' आणि 'रोज आर्मिटेज' हे एका सिरीयस रिलेशनशिपमध्ये आहेत आणि रोजच्या पालकांना भेटण्यासाठी हे दोघे तिच्या वडिलोपार्जित घरी जात आहेत. याच वेळी त्यांच्यात रेसिझमविषयी संवाद व थोडंफार विनोदी संभाषण होतं. आणि पुढच्या काही फ्रेममध्ये प्रवास सुरू होतो. या प्रवासात 'रोज' गाडी चालवत ती चुकीने एका हरीणाला धडकते आणि त्यात ते हरीण मरते. थोडीफार पोलिस चौकशी होते. पुढील सीन्समध्ये आपण तिच्या घरी पोहोचतो. इथे तिचे वडील 'डीन' जे न्युरोसर्जन आहेत आणि आई 'मिसी' जी हिप्नोथेरपिस्ट आहे, यांच्याशी आणि तिच्या घरातील दोन ब्लॅक सर्व्हंटस् - वॉल्टर आणि जाॅर्जिना शी आपली ओळख होते.

त्या रात्री त्यांच्यामध्ये थोडाफार संवाद होतो. शिवाय आपली भेट 'रोज'च्या भावाशी होते. आणि दुसर्‍या दिवशी एक फॅमिली 'गेट टुगेदर' आहे, असे कळते. पण त्याच रात्री 'मिसी' क्रिसला सिगारेट सोडविण्याच्या बहाण्याने संमोहित करते. आणि इथूनच खऱ्या अर्थाने ट्विस्ट्स अॅण्ड टर्न्स चालू होतात. तर यानंतर काय होते, हे चित्रपटात पाहणेच योग्य ठरेल. (कारण मुळातच इथपर्यंत पोहोचतानाच मेजर स्पाॅयलर कसे टाळावे लागले, ते माझे मला माहित! असो.) तर यानंतरचा आणि याआधीचा, असा सगळा प्रकार हा एकदा तरी अनुभवण्यासारखाच आहे.
चित्रपटाची रचना टाॅम अॅण्ड जेरी सारखी आहे. म्हणजे कधी कुणाचे पारडे जड होईल आणि कधी कुठली घटना घडेल, याबाबतीत आपल्याला प्रेक्षक म्हणून सतत धक्के बसत राहतात. यामुळे चित्रपट कुठेच फारसा प्रेडिक्टेबल होत नाही. आणि जरी झाला तरीही त्याची मांडणी आणि आपण पात्रामध्ये गुंतलेलो असल्याने ते आपल्याला उशिरापर्यंत जाणवत नाही. थोडक्यात, थोडेसे हटके कथानक हा या चित्रपटाचा एक प्लस पॉइंट आहे.

याआधीही उल्लेखल्याप्रमाणे हा चित्रपट सुरुवातीपासूनच आपल्यावर एकदम घट्ट पकड ठेवतो. विशेष म्हणजे हा दिग्दर्शक 'जाॅर्डन पीले'चा पहिला चित्रपट. तर पहिल्याच प्रयत्नात अगदी षट्कार ठोकणाऱ्या काही मोजक्या दिग्दर्शकांत याचेही नाव नक्कीच समाविष्ट करावे लागेल. मुळातच मला कथानक जरासे दमदार वाटले. शिवाय सादरीकरणात जरासे नावीन्य आहे. याची सिनेमेटोग्राफी मला आवडली. बहुतेक वेळा कॅमेऱ्याला फारसा वाव नव्हता, पण त्यातही रिपीटेड कॅमेरा अँगल्स आढळत नाहीत. या सिनेमात संगीत आणि पार्श्वसंगीत हुकमी एक्का म्हणून काम करते. शिवाय, 'द सन्कन प्लेस'चा दरवाजा म्हणून काम करणार्‍या चहाच्या कपाचा तो आवाज तर अजूनही माझ्या कानात घुमतो आहे! सर्वच कलाकारांचे काम दखलपात्र आहे. मग ते लीड रोलमधील डॅनियल असो वा व्हिलन साकारणारे इतर कलाकार असो. थोडक्यात चित्रपट उत्तम आहे. बाकी कमर्शियल आणि क्रिटिकल दोन्ही अक्लेम मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत याचं नाव आहेच. शिवाय, 'रेसिझम' यावरही तो थोड्याफार नव्हे तर उत्तमरित्या भाष्य करतो. त्यामुळे हाही याचा प्लस पॉइंट मानता येईल. बाकी कुणाला तो कितपत आवडेल, हे सांगणे तसे अवघड असले तरी हा दीड तासांचा थरार (हाॅरर नव्हे!) नक्कीच अनुभवण्यासारखा आहे.
(शिवाय याचा शेवट खास पाहण्यालायक आहे. तो मला टॅरंटिनो किंवा स्काॅर्सेसीची आठवण करून देतो.)
बाकी माझ्या मते तर हा यावर्षीच्या काही उत्कृष्ट चित्रपटांपैकी तर आहेच शिवाय काही उत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणांपैकीही एक आहे. थोडक्यात याही दिग्दर्शकाच्या पुढील चित्रपटाची वाट पाहण्यास हरकत नाही!

- अ. ब. शेलार

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

सिनेमा पाहिला आणि आव‌ड‌ला.
ओळ‌ख‌ क‌रून दिल्याब‌द्द‌ल‌ ध‌न्य‌वाद! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.
सिनेमा नक्कीच आवडण्याजोगा आहे. फक्त त्याबाबत एकच गोष्ट खटकली की त्याचं प्रमोशन हाॅरर म्हणून केलंय. जे पूर्णतः चुकीचे आहे. तो सायकाॅलाॅजिकल थ्रिलर फिल्म आहे. असो. कमीत कमी एक चांगला चित्रपट तर पाहिला त्या निमित्ताने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हरिणाच्या अपघाताचा कथेशी काय सम्बन्ध आहे ते नीट समजले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसं ते बऱ्याच लोकांना समजलं नाही. सुरूवातीला मलाही समजायला जड गेलं होतं. पण मला लागलेला अर्थ खालीलप्रमाणे :-
सुरूवातीला मारल्या गेलेलं किंवा त्याच्यासारखंच एक हरीण शेवटी जेव्हा 'वाॅशिंग्टन'ला बांधून ठेवलेलं असतं, तेव्हा दिसतं. आणि त्या हरीणाच्याच डोळ्यांमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यातून त्याच्यावर नजर ठेवलेली असते.
शिवाय, त्याच्या शरीराचाही वापर त्या म्युझियम वगैरेच्या मालकाला दृष्टी नसल्याने, त्याला दृष्टी देता यावी यासाठी केला जाणार असतो.
म्हणजेच ते हरीण आपल्या हिरो, वाॅशिंग्टनला रिप्रेझेंट करते. आणि अखेर दोघांचीही परिस्थिती सारखीच होते, असं दिग्दर्शकाला दाखवायचं असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्र‌प‌ट‌ कुठुन डाऊन‌लोड‌ क‌रता येईल ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टॉरेंट वाप‌र‌त असाल त‌र yts.ag इथे किंवा rarbg.to इथे. ऑन‌लाईन (चित्र‌प‌ट/मालिका) प‌हाण्यासाठी fmovies ही साईट किंवा Terrarium हे अॅप.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

ध‌न्य‌वाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेलार‌, एक चांग‌ल्या सिनेमाची ओळख क‌रुन दिल्याब‌द्द‌ल ध‌न्य‌वाद. सिनेमा अतिश‌य‌ आव‌ड‌ला (शेव‌ट‌च्या काहि गोष्टी ज‌रा ख‌ट‌क‌ल्या आणि बाकि सिनेमाच्या मानाने उगाच रंग‌व‌लेल्या वाट‌ल्या, प‌ण ते स‌ह‌ज न‌ज‌रेआड‌ क‌र‌ण्यासार‌खं आहे). खुप दिव‌सांनी एक चांग‌ला सिनेमा पाहिल्याचा आनंद‌ मिळाला, ध‌न्यावाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभारी आहे. शेवटी असे सिनेमे तुमच्यापर्यंत पोहचावेत यासाठीच तर लिहित असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0