विनिता भट

मागे रफीवरील लेख लिहित असताना त्याची बरीच गाणी ऐकली आणि काही निवडक गाणी पाहिली. तेव्हा अनायासे मोहम्मद रफीने गायलेलं आणि जाॅनी वाॅकरवर चित्रित झालेलं एक गाणं पाहण्यात आलं. त्यातील जाॅनी वाॅकरच्या कामाला तोड नाही. पण आता इथं त्याबद्दल नाही बोलत कारण, जाॅनी वाॅकरचं काम हे स्वतंत्र लेखाचा विषय आहे. असो.

तर ते गाणं एक ड्युएट साँग आहे. जे जाॅनी वाॅकर आणि एका अभिनेत्रीवर चित्रित झालंय. तर आता त्या अभिनेत्रीविषयी बोलायचंय. या गाण्यातील तिची अदाकारी पुन्हा पुन्हा पहावी अशी आहे. यात ती जी दिसलीय त्याला तोड नाही. म्हणजे यातील तिची प्रत्येक अदा 'उफ्फ' म्हणायला मजबूर करते. ब्लॅक अँड व्हाईटमधील हे माझं सर्वांत आवडतं रोमँटिक साँग बनलंय. हो, देव आनंद आणि इतर सगळ्यांहूनही जास्त मला हे आवडायला लागलंय. शिवाय प्रत्येक वेळी ते पाहिल्यावर तर मी त्याच्या अधिकाधिक प्रेमात पडतोय.

या गाण्यातील तिचे एक्स्प्रेशन्स बाप आहेत. सुरूवातीला हातवारे करत, जाॅनीला चिडवत ती हलकेच आणि हटकेच गाणं म्हणते. लिप सिंकही चांगलं जमलंय. तिचं ते डोळे मोठे करून त्याला चिडवणं, तिचे ते 'डिंपल्स', त्याच्यापासून दूर जाणं, गिरकी घेणं, तोऱ्यात चालण्याचं नाटक करणं, हे सगळं खास पाहण्यालायक. शिवाय लहान मुलीसारखं, हवेत उडी मारल्यासारखं करणंही खासच. त्यानंतर टेबलजवळ बसून, डावी भुवई उडवत, जाॅनीला चिडवणारी 'ती' म्हणजे काही औरच. इतका नितळ हसरा आणि सुंदर चेहरा माझ्या पाहण्यात नाही. कानात ते जुन्या स्टाईलचे, मोठी रिंग असणारे कानातले, तिची ती केसांची सुंदर बट, अहाहा क्या कहने! शेवटी वरच्या अँगलमध्ये आणि तिरपा सरकरणारा कॅमेरा, या गाण्याचा योग्यरीत्या शेवट करतो.

तिच्या सौंदर्यात एक आवाहन आहे, सोबत अभिनयात एक निरागसता आणि नैसर्गिकपणा आहे. त्यामुळे तिचं सौंदर्य कुठेच फिकं वाटत नाही. भल्याभल्यांना तोंडावर पाडेल असं तिचं सौंदर्य आणि अभिनय आहे. पिक्चर रिलीज झाला तेव्हाही म्हणे हिच्या कामाचं समीक्षक आणि प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केलं होतं. पण मग ही कुठं गायब झाली? शिवाय, मी तर अजून तिचं नावही सांगितलं नाही!

तर यातील अभिनेत्रीचं नाव 'विनिता भट' ऊर्फ 'यास्मीन' आहे. हे गाणं मि. अॅण्ड मिसेस 55 या चित्रपटातील आहे. 'गुरूदत्त'ने तिला या सिनेमातून सपोर्टिंग अॅक्ट्रेस म्हणून समोर आणलं. यानंतर नोव्हेंबर 1955 मध्ये तिने त्या काळात प्रसिद्ध असलेल्या Jimmy Vining या मेक अप आर्टिस्टशी लग्न केलं. आणि त्यानंतर तिने अभिनय करणं सोडून दिलं. शिवाय तिला त्याआधी आलेल्या फिल्म्सच्या ऑफरही तिने नाकारल्या. याच वर्षी आलेल्या चंदुलाल शाहच्या 'ऊट पटांग'मध्ये तिने लहानसा रोल केल्याचे समजते. पण त्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवाय, तितिचे नाव क्रेडिट्समध्येही आढळले नाही. पण याच काळातील 'ऑथेल्लो' नाटकात तिने Desdemona ची भूमिका केल्याचा उल्लेख आहे. यानंतर तिने 'बाॅम्बे फ्लाइट 417' या फिल्मिस्तानच्या इंग्रजी चित्रपटातही तिने भूमिका केल्याचे कळते. पण ही फिल्मदेखील कुठे उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. थोडक्यात, मि. अॅण्ड मिसेस 55 हाच तिचा पहिला आणि शेवटचा चित्रपट म्हणता येईल.
कदाचित तिने लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं. पण ती तरी काय करणार, तिचं सौंदर्यच असं होतं की जिमीच काय तर गुरूदत्तही तिच्या प्रेमात पडला असता. सध्या तिचा एक इंटरव्ह्यू इंटरनेटवर उपलब्ध आहे. (इंटरनेटवरही तिचे त्यातल्या त्यात बरे असे तीनच फोटो आहेत. बाकी सगळे अगदी सुमार क्वालिटीचे आहेत.) त्यानंतर माझ्या हाती तरी तिची इतर काहीच माहिती नाही.

- अ. ब. शेलार

1. या गाण्याची लिंक खाली देत आहे :-
https://youtu.be/HPN1z5At8_o

2. मला अजूनही इथे फोटो अपलोड करता येत नाही. त्यामुळे फोटो बघायचा असल्यास माझ्या फेसबुकवरील याच पोस्टची लिंक :-
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1915441905393388&id=10000782...

3. अलीकडेच वर्डप्रेस या साइटवर ब्लॉग उघडला आहे. तिथे नवे-जुने, मराठी आणि इंग्रजी लेख टाकण्याचा प्रयत्न करतोय. त्याची लिंक :-
https://abshelar.wordpress.com

4. 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'वर समीक्षण लिहिलं होतं.पण ते इतर कुठे टाकण्यापूर्वीच 'अक्षरनामा' या साइटसाठी सिलेक्ट झालं. त्यामुळे काॅपीराइटनुसार ते इथे प्रसिद्ध करता येणार नाही. तरी ते वाचायचे असल्यास त्याची लिंक :-
http://www.aksharnama.com/client/article_detail/1063

इतक्या सगळ्या लिंका देऊन आपलंच प्रमोशन करतोय, असा गैरसमज नसावा.

(मुळात याला समीक्षा म्हणता येणार नाही, पण इतर कुठल्या विषयाअंतर्गत याचा समावेश करावा, हे लक्षात नाही आल्याने इथेच लिहितोय.)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तिचे डोळे मस्त आहेत. एकदम टप्पोरे. जॉनी वॉकर च्या मानाने ती फारच उजवी वाटते. तो अगदीच "हा" दिसतो तिच्यासमोर.

गालाला लई भारी डबरं पडत्यात तिच्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा.. डोळे काय भारी आहेत. एकदम पाणीदार, टपोरे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

हो, भुवया उंचावल्यावर तर काय दिसते.
शिवाय, गालावरील डिंपल्स तिला शोभून दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तंच आहे. आताच्या हाडक्या हडळींपेक्षा नक्कीच छान अंगकाठी आहे. आणि त्यात गालावर खळ्या...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.

अंग'काठी' हा शब्द तिच्यापेक्षा आताच्या हाडक्या हडळींनाच अंमळ जास्त शोभून दिसणार नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0