ती राणी माझ्या मनातली.....भाग १

ती राणी माझ्या मनातली.....भाग १
राणी म्हणायचो तुला, आठवतंय ना? आणि कधी सखे हि म्हणायचो.
पण राणी म्हंटलेले जास्त आवडायचे तुला....
मी तुला राणी म्हणता म्हणता आयुष्याने अशी काही कलाटणी घेतली कि मला तुला कोणा दुसर्याचीच राणी म्हणून बघावे लागले. हे जे काही झाले ते इतके वेगात झाले कि त्या काही दिवसात तर मला काही कळेनासेच झाले होते. ह्या पुढे मी असेन कि नाही, नसेन तर प्रश्नच नाही पण असेन तर कसा जगेन.
मला माहिती आहे, अगदी खात्रीच आहे म्हण ना, कि तू अजूनही माझाच विचार करत असशील अगदी सदैव, कारण, तुझ्या लग्न नंतरच्या एकमेव भेटीत मला म्हणाली होतीस कि “राजा मला तू माझ्या बरोबर सदैव आहेस असे वाटून घेऊनच माझा संसार करावा लागेल”. खूप रडली होतीस ग, माझे काळीज चर्र झाले होते, मीही खूप ओक्सा बोक्षी रडलो होतो. तुला परत जायची घाई होती आणि मला तुला सोडवतच नव्हते. तू गेल्यानंतर त्या संध्याकाळी फार भकास अंतकरणाने बसलो होतो. उद्यापासून मला कशी उमेद मिळणार होती ह्याचाच विचार होता, तुला परत कधी बघता येईल, तुझ्याशी कधी बोलता येईल, येईल का येणारच नाही. काही काही उलगडत नव्हते.
त्या नंतरचे खूप दिवस अखंड, अविरत, अशांततेत घालवले, मनाला समजवायचो कि तुला परत वळणे शक्य नाही आहे, पण बघ ना मन किती भाबडे असते, सतत चांगले होईल ह्याचा विचार करत असायचे.
अर्थात जे चांगले मी विचार करत होतो हे कदाचित खूप जणांसाठी अतिशय वाईट विचार असतील. पण मन हे नेहमी आपल्या चांगल्याचा च प्रथम विचार करते.
त्या घटनेनी तर माझे जीवनच बदलून गेले, कधी हि चिडचिड न करणारा मी हल्ली सतत चिडचिड करत असतो, कारण एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नाही झाली तर किती दिवस त्याचे दुक्ख भोगावे लागते हे फार जवळून जाणलंय.
परवा सुहास भेटला होता,संध्याकाळी आम्ही प्यायला बसलो , पिणे तर काय आता रोजचेच झाले आहे.
पण त्या दिवशी सुहास बरोबर बसलो होतो ते एवढ्याच साठी कि तुझा विषय निघेल, आणि तसा तो निघाला पण, सुहास म्हणाला कि तो गेला होता आत्ताच भाऊबीजेला तुझ्याकडे, आनंदात आहे म्हणाला.
एकीकडे माझे मन शांत होते तू आनंदात आहेस हे ऐकून पण एकीकडे मनात खूप खळबळ होती, विचारांची, मी का बरे अजून अशांत राहिलो ? तिने जीवनाला स्वीकारले का? का ती हि परतता येत नाही म्हणून पुढे चालली आहे? का ती सगळे विसरली आहे?
खूप वेळ तुझ्या बद्दलच बोलत होतो आम्ही....मनात खूप साठलय, लवकरच भेटायचे आहे तुला, दोन वर्ष झाली अग आता तुला शेवटचे भेटून, कसे भेटशील नाही माहित, केव्हा भेटशील नाही माहित, भेटशील कि नाही हे हि नाही माहित,पण एकदा भेटच, मनातल्या सगळ्या गोष्टी बोलु न दे एकदा, होऊ दे मन रिकामे जरा.....

field_vote: 
0
No votes yet