वलय (कादंबरी) - प्रकरण ७

प्रकरण ६ ची लिंक: http://www.aisiakshare.com/node/6463
--

प्रकरण ७

सोनी, सुप्रिया आणी रागिणी रहात असलेले ते वर्किंग विमेन्स हॉस्टेल असल्याने तेथे जायला यायला वेळेची बंधने नव्हती कारण मुंबई सारख्या शहरात आजकाल कामानिमित्त लोक दूर प्रवास करतात आणि आजकाल स्त्रीयासुद्धा पुरूषांच्या बरोबरीने दिवस रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात. पण हॉस्टेलवर कुणाला भेटायला बोलवायचं असेल तर मात्र नियम होते.

त्या दिवशी सुप्रिया पुण्याला गेलेली होती आणि रागिणी गेले दोन दिवस सूरजच्या फ्लॅटवर होती.

सोनी बनकर आज रूमवर एकटी होती. पुढचे चार दिवस तिचे कोणतेच शूटींग नव्हते. मग त्यानंतर तिने भाग घेतलेल्या डान्स शोचे (“हिंमत है तो नाच जरा!”) फायनल एपिसोड्सचे शूटिंग असणार होते. त्यात तिला अर्थातच विनर बनायचे होते.

आज ती रिलॅक्स होती. तिने हात डोक्यावर ताणून एक मस्त आणि मोठा आळस दिला. जांभई दिली. मग मस्त चहा बनवला आणि पिला.

मनाशी गाणे गुणगुणत आणि नाचण्याच्या आविर्भावात हातपाय हलवत तिने तिचा शॉर्ट स्कर्ट काढून बेडवर टाकला. मग ती तिच्या बाथरूममध्ये गेली. सोबत असलेला मोबाईल बाजूला काचेवर साबणाच्या बाजूला ठेवला. मग टी शर्ट काढून टाकला. आता तिच्या अंगावर फक्त काळ्या रंगाची जाळीदार ब्रा होती. बाथरूम मधल्या आरशात तिने ब्राच्या आतमधले स्वतःचे दोन भरीव गोल न्याहाळले आणि स्वतःलाच आरशात एक शीळ मारली. थोडा शॉवर चालू केला आणि बंद केला. आता ती बरीच ओली झाली होती. पाण्याचे थेंब तिच्या अर्धनग्न शरीरावर, छातीवर जमा झाले होते.

“सोनी मॅडम, वा! झकास सेक्सी दिसताय तुम्ही आज!” असे म्हणून तिने मोबाईल उचलला आणि एक कमरेवरचा पूर्ण सेल्फी काढला. मग तो तिने फ्रेन्डबुक आणि फोटोग्राम या सोशल साईट्सवर अपलोड केला.

त्या फोटोखाली लिहिले - “गेटिंग रेडी फॉर द फायनल शो! यो !!” मोबाईल ठेवून दिला आणि ब्रा काढून फेकली. मग शॉवर चालू करून गाणे म्हणत ती मनसोक्त आंघोळ करू लागली.

“आता बघाच सोनी मॅडम, सोशल मेडियावरचे तुमचे फॅन किती वाढतील बघा फटाफट!”

तिला सोशल मेडियावर काहीही करून तिच्या फॅन्सची संख्या वाढवायची होती. खूप प्रसिद्धी मिळवायची होती. तिला नृत्यासोबतच प्रसिद्धीच्या वलयाची खूप इच्छा होती.

“पूर्ण जगाने मला ओळखले पाहिजे. पूर्ण जगाने माझा डान्स बघितला पाहिजे. जगाला माझ्या तालावर मला डोलवायचं आणि नाचवायचं आहे. डान्स म्हटलं की पहिल्यांदा सोनीच आठवली पाहिजे लोकांना! माझा डान्स शो शेवटच्या टप्प्यात आहे. कसेही करून मला माझा फॅन बेस वाढवायचा आणि जास्त प्रेक्षकांची वोट्स (मतं) मलाच मिळाली पाहिजेत! आता ज्यांना डान्स मधलं ओ की ठो कळत नाही ते प्रेक्षक काय पाहून मत देणार, हे मला माहीत आहे. कमॉन सोनी! कमॉन!” शॉवर घेता घेता ती स्वत:शी बोलत होती.

आंघोळ संपल्यावर गुणगुणतच ती बाथरूमच्या बाहेर आली. हात पुसल्यानंतर लगेच फ्रेंडबुक, फोटोग्राम चेक केले. फक्त वीस मिनिटांतच तिला चारशे लाईक्स आणि शंभरच्या वर कमेंट्स आल्या होत्या. तिच्या पेजला लाईक करणाऱ्यांची संख्या पाच हजारावरून साडेपाच हजार झाली होती.

“जुग जुग जियो मेरे फ्रेंडबुक भैय्या और फोटोग्राम जिजाजी!”, असे म्हणून तिने आनंदाने मोबाईलच्या स्क्रीनची पप्पी घेतली.

दोनच दिवसात सगळीकडे आणि जागोजागी तिचा सेल्फी फॉरवर्ड होऊ लागला. जो कुणी तिचा डान्स शो याआधी बघत नव्हता आणि डान्स शोबद्दल ज्यांना माहितीही नव्हते ते सगळे आता तिचा "तो" फोटो पाहून तिच्यासाठी म्हणून हा डान्स शो बघायचे ठरवू लागले. अजून सेमी फायनलचे एपिसोड्स टेलीकास्ट होत होते. त्या डान्स प्रोग्रामची टीआरपी दोन दिवसात अचानक वाढली. प्रोड्युसरच्या हे लक्षात आले. त्याने तिला अभिनंदनाचा फोनही केला. स्वत: काहीही न करता त्या शोला आपोआप आणि परस्पर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तोही सुखावला. त्याला काही संघटनांकडून विरोधाचे, कारवाईचे आणि धमकीचे फोन आले पण तो म्हणाला, “देखो, वो सेल्फी अपलोड करना उसका पर्सनल डिसीजन है, मेरा या इस प्रोग्राम का उससे कोई लेना देना नही है!”

त्याने आधी शुटींग झालेल्या प्रोग्रामच्या सुरुवातीला खाली तशी सुचना सुद्धा द्यायला सुरुवात केली.

सगळीकडे त्या फोटोवरून न्यूज चॅनेलवर अर्ध्या अर्ध्या तासांचे प्रोग्राम तयार होऊन टेलिकास्ट व्हायला लागले.

याबाबत टिव्हीवर आणि सोशल मेडियावर फोटो बघून आणि चर्चा ऎकून बरेच लोक म्हणू लागले, "बॉस, यहीच लडकी जितना मंगता. हम इसी को वोट करेंगे!"

काही म्हणत होते, “आता अश्लीलतेकडे झुकायला लागलेत डान्स प्रोग्राम. ते आता घरच्यांसोबत बघण्याच्या लायकीचे राहिले नाहीत!”

घराघरांत, नाक्या नाक्यावर, स्कूल कॉलेजांत आणि ऑफिसच्या सहकाऱ्यांमध्ये त्या सेल्फीवरून वेगवेगळ्या गप्पा रंगू लागल्या. कमेंट्स पास होऊ लागल्यात.

कॉलेजमध्ये –

“अरे यार! काय हिरोईन दिसते ती. नक्की सुभाष भट घेईल हिला त्याच्या नव्या सेक्सी चित्रपटात! त्यात त्याचा फेवरेट हिरो ‘कामरान किसमी’ असेल जो तिचे चित्रपटात असंख्य किस घेईल!”

“अरे तो स्वराज कपूर जिवंत असता ना, तर त्याने हिला घेऊन ‘गंगा का सुंदर समुंदर’ असा मस्त चित्रपटच बनवला असता नं येड्या!”

एका घरात –

“मम्मी मम्मी, मी पण मोठेपणी सोनी बनकर होणार! खूप खूप नाचणार! नाच नाच नाचणार!”

“गप बस! बंद कर तो टिव्ही आणि चल हो घरात, अभ्यास कर! मोठं होऊन सासरी जायचंय तुला! चाल्लीय मोठी सोनी बनकर व्हायला!”

दुसरीकडे एका घरात –
“या असल्या फालतू पोरींच्या फालतू सेल्फीमुळे ज्या मुलींना खरोखर डान्स मध्ये खरोखर काहितरी करून नाव कमवायचं आहे त्या पोरी पण नाहक बदनाम होतात. कसे काय यांचे आई वडील यांना असे करू देतात, देव जाणे!”

“अहो जशी पोरं, तसेच त्यांचे आई वडिल पण! काय बोलून काही फायदा नाही! त्या कलाकार पोरी सोशल मिडीयावर फोटोत स्वत:हून जे जे दाखवतात ना, ते ते आपण आपलं डोळे उघडे ठेऊन पहात राहायचं झालं!! जे ते दाखवतील, ते ते पाहो! हा हा हा हा!!”

एका उच्चभ्रू पार्टीत –

“यार, न्यूडिटी को पता नही इंडिया मे इतना क्यों गलत तरीके से देखते हैं! लडकी को अपनी खुद की बॉडी के साथ क्या क्या करना है, क्या दिखाना है और क्या नहीं, क्या पहानना है और क्या नही ये सब दुसरे लोग कैसे डिसाईड करेंगे?

आज की महिला किसीसे न डरती है न डरेगी. ये तो बस मेल डॉमिनेटेड सोसायटी है. कोई भी लडकी अपनी कपडेवाली सेल्फी अपलोड करें या फिर बिना कपडोवाली ये सिर्फ लडकी खुद डिसाईड करेगी, न की बाकी लोग! बुलशिट मेल सोसायटी!! आय हेट डॉमिनेटींग मेल्स! ऑल मेन आर सेम!!”

(क्रमश:)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet