ते लोक

१) वय ६-७
ठिकाण- सरकारी प्राथमिक शाळा, सर्वाना तांदूळ वाटण्याचा प्रसंग (तेव्हा तयार खिचडी भात नाही द्यायचे)
मी- आई त्या xyz ला आणि त्याच्या मित्रांना जास्त तांदूळ का देतात शिपाई?
आई- त्याच्यासाठी वेगळी स्कीम असते
मी- काय?
आई-आंबेडकरने त्यांना सर्व फ्री दिलंय. त्या लोकांना फी नसते. सरकारी नोकरी लगेच मिळते.
मी-कोण आहेत ते?
आई- बुद्ध लोक आहेत. पहिले xxx-xxx होते, नंतर बाटले
मी- बाटले म्हणजे.
आई- म्हणजे देव change केला, बाहेर बोलू नको xxx-xxx नायतर जेल मध्ये टाकतात पोलिसवाले. त्यांच्यात राहू नको, शिव्या देतात ते!

२) वय १३
ठिकाण- माध्यमिक शाळा
शिक्षक- शनिवार पर्यंत ऑफिस मध्ये दाखले जमा करायचे आहेत.
आता सर्वांनी रोल नंबर नुसार जात सांगायची मी सांगतो त्यांना घरून काय document आणायचे आहेत ते
.....
......
.....

२ ब) घरी जाऊन बाबांना विचार कि शिक्षक पाल्य ची शिष्यवृत्ती पाहिजे कि sc-st

२क) obc आणि ebc ना उत्पनाचा दाखला पाहिजे.

३) वय १६
ठिकाण - कॉलेज लायब्ररी( book bank ची पुस्तके वाटण्याचा प्रसंग, ठराविक रक्कम तारण ठेवून पुस्तके एका सेमिस्टर करता घेता येतात)

मी- अरे विकी ते इंजियरिंग ड्रॉइंग n d bhatt चे पुस्तके सम्पलेत नॉर्मल चे. तुज्या नावावर घे ना मी बघितलेत sc-st वाल्या बंडल मध्ये मला देत नाही तो xxxचा. हे घे पैसे
विकी - ठीक आहे अर्धेच पैसे दे आम्हाला १०% deposit आहे.

३ब कॉलेज मधूनच जात पडताळणी करायची स्कीम निघाली.
त्यासाठी १९५०कि ६० पूर्वीचे पुरावे पाहिजे होते जातीचे मी माज्या आजोबांचे ४थी leaving १९४५ घेऊन गेलो.
तो पण त्याचा नातेवाईकचा दाखला घेऊन गेला.
अरे दाखल्यावर वेगळी जात आहे तुज्या कागदावर वेगळी आहे
मित्र- दोन्ही एकच आहेत

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet