वलय (कादंबरी) - प्रकरण १३

---
प्रकरण 13

आठ दिवसांनी कारने रागिणी हॉस्टेलवर गेली.

सोनी बाहेरच कट्ट्यावर सिगारेट पित बसली होती.

“ओह माय गॉड सोनी. तू सिगारेट प्यायला लागलीस? सो बॅड!”

सोनी उठून उभी राहिली पण तीने सिगारेट पिणे चालूच ठेवले आणि निराशेने ती म्हणाली, “केव्हा आलीस? खूप वेळ लावलास या वेळेस रागिणी?”

“हो. मी आता सूरज सोबत त्याच्या फ्लॅटवर शिफ्ट होणार आहे. लिव्ह इन रिलेशनशिप! त्याने मला एक कारसुद्धा भेट दिली आहे! बाहेर उभी आहे.” सोनी जवळ कट्ट्यावर बसत रागिणी म्हणाली.

“वाव! ग्रेट. अभिनंदन!” कोरडेपणाने धूर उंच हवेत उडवत सोनी म्हणाली.

“कमऑन सोनी. काय झालं तुला? अशी कोरडी का वागते आहेस? एनिथिंग राँग? सुप्रिया आली का परत की अजून पुण्यालाच आहे?”

“सुप्रिया अजून पुण्याहून परत आलेली नाही. जाण्याआधी ती खूप उदास दिसली. तिचा राजेश सोबत ब्रेकप झालाय! रात्रभर तिच्या रूम मधून हुंदक्यांचा आवाज येत होता त्या दिवशी! मी तिला विचारले पण जास्त काही न सांगता तिने राजेश सोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले आणि मग म्हणाली मला एकटे सोड! ती बहुतेक आता तिचा सामान घेऊन जाईल असं तिच्या बोलण्यावरून वाटलं. ती पुण्यालाच राहील असं दिसतंय."

“व्हाट? त्या दोघांकडे पाहून वाटत होतं की ती लवकरच लग्न करतील!”

“हो ना. मी तिला कॉल केला पण उचलत नाहीए ती. मेसेजचा रिप्लाय पण करत नाही. एनिवे जे असेल ते असेल. तिच्याकडे फक्त एकच सिरीयल आहे!”

“मग हे तुझ्या नाराजीचं कारण आहे की काय?”

“अगं नाही गं! आणि मी डान्स फिनाले हरले गं! अगदी शेवटचा नंबर आला!”

“अरे हो! तू तर ती सेक्सी सेल्फी अपलोड करुन धमाल उडवून दिली होतीस. मग पुढे काय झाले? तुला अशा चीप पब्लिसिटीची खरं तर गरज नव्हती, तू चांगला नाच करतेस. मग तरीही का फिनाले हरलीस?”

“हां यार! मोठी स्टोरी झाली ती!” सिगरेटचा धूर खालच्या बाजूला सोडत निराशेच्या स्वरात ती म्हणाली.

“अगं सोनी, हरलीस म्हणून सिगार प्यायला लागलीस? सोड ते! फेकून दे! मीही एके काळी ड्रग अॅडिक्ट झाले होते पण मी स्वतःवर नियंत्रण मिळवले! तूही सोड! या सगळ्या नाशेबाजीतून कोणतेच डिप्रेशन, कोणतीच निराशा दूर होऊ शकत नाही! मी स्वत: ते अनुभवलं आहे. आपले दु:ख शेअर करायला कुणी हक्काचं माणूस असलं की आपोआप आपला ताण हलका होतो. नशा हा त्यावर उपाय नाही!”

“हट! फुकटचा सल्ला नको आपल्याला! सौ चुहे खाकर बिल्ली मुझे व्हेजिटेरियन खाने का एडव्हाईस दे राही है? नो वे! साला, त्या सेल्फीमुळे सगळं उलटं झालं! त्या मॅडम अकॅडमी कडून पण मला वार्निंग मिळाली. हे बरं की सस्पेंड नाही झाले!!” असे म्हणून जळून संपलेली सिगार तीने डस्टबिन मध्ये टाकली.

"ओह, आणि फिनाले कशी हरलीस?”

“सांगते ऐक! ....

... फिनालेच्या शूटींगच्या आदल्या रात्री आम्ही डान्स शो मधील सगळे कंटेस्टंट, डायरेक्टर, असिस्टंट प्रोड्युसर आणि जज अशी सगळी टीम डिनरला गेलो होतो.

....त्यातला एक जज जेवतांना सारखा माझ्यावर नजर ठेऊन होता. माझ्यावर म्हणण्यापेक्षा सरळ सरळ माझ्या छातीवर नजर ठेऊन होता असे म्हटले तर जास्त योग्य होईल. बहुतेक माझी सेल्फी बघून त्याचं डोकं फिरलं असावं. कारण त्या दिवशी त्याने मला डान्स करतांना माझ्या अगदी तिन्ही डान्स परफॉरमन्सला डोळे झाकून (की उघडे ठेऊन?) पैकीच्या पैकी मार्क दिले होते....

... माझा पूर्ण परफॉरमन्स होईपर्यंत तो अगदी माझ्या प्रत्येक हालचालीकडे निरखून बघत होता. शरीराच्या प्रत्येक अंगाकडे अगदी लाळघोटेपणाने बघत होता. हे लक्षात यायला लागल्यावर मी खूप नर्व्हस होवून माझ्या डान्सच्या स्पेप्स चुकल्या. पण तरीही त्याने मला पूर्ण मार्क दिले.”

“मग? चांगलं झालं की? काय इश्यू झाला पुढे?”

“मी सहजपणे सेक्ससाठी उपलब्ध आहे असं सेल्फी बघून त्याचं मत झालं असावं, कारण आजकाल या क्षेत्रात काही नव्या मुली पहिला ब्रेक मिळण्यासाठी काहीही करायला तयार होतात. तसं तो सेल्फी अपलोड मी करायला नकोच होता असे आता वाटते! ...

....त्या रात्री डिनर नंतर आम्ही सगळेजण हॉटेलच्या स्विमिंग पुलजवळ सहज फिरत असतांना त्याने कुणाला न कळू देता मला चालता चालता एकटं गाठलं!

....बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या. नंतर हळू आवाजात माझ्या कानाजवळ येऊन त्याने विचारलं की, आजच्या दिवसासारखं फेवर आणि फुल मार्क उद्या फायनलमध्ये सुद्धा हवे असल्यास आजची पूर्ण रात्र मी त्याच्यासोबत घालवायची! एकच रात्र! पुन्हा परत कधीही तो मला बोलावणार नव्हता!

... त्याला मी फक्त एकदाच हवी होते, पूर्ण आणि रात्रभर! आणि रात्री जे होईल ते बाकी कुणालाही कळू न देण्याची पूर्ण व्यवस्था आणि काळजी तो घेणार होता....

बुल शिट! ऑल मेन आर सेम!”

“मग? तू काय केलेस?”

“थोबाडीत मारली असती गं ... पण सगळी टीम थोड्या अंतरावरच होती! इश्यू झाला असता आणि आमच्या सगळ्या ग्रुपला कळले असते. उगाच नाही नाही ते आरोप, बदनामी झाली असती. मग मला दिसले की त्याने शॉर्ट बर्मुडा पँट घातलेली होती. मग मी कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने वेगाने त्याच्या जांघेजवळ नखं टोचून एक जोरदार सडकून चिमटा घेतला आणि त्याच्या कानात पटकन एकच सांगितलं की मी विकाऊ नाही, काय करायचं ते कर साल्या! तो वेदनेने कळवळला पण अगदी हळूच ओरडला आणि हळूहळू कुणाला न समजेल असा त्याने हसत हसत तेथून काढता पाय घेतला. पण आतून तो वेदनेने कळवळत होता.”

आता मात्र शांत असलेली रागिणी खळाळून हसायला लागली, “ओह गॉड! सोनी, यु आर अन युनिक आयटम! हॅट्स ऑफ टू यू! हा हा हा! तू एक बहुत बडा नमुना है!”

“हसतेस काय? आणि मग मी फायनल हरले. सेल्फीमुळे मला माझ्या गावातले तर वोट मिळाले नाहीतच पण अनेक शहरांतल्या लोकांचे भरपूर वोट मिळाले होते. फिनालेमध्ये मी अगदी चांगला डान्स केला त्यादिवशी! वाटले की शेवटी माझ्या डान्सची दखल घावीच लागेल सगळ्यांना आणि मी जिंकेनच!

...ऑडियन्स पण चीयर करत होती पण त्या जजने माझ्या डान्समध्ये अशा काही ओढून ताणून चुका शोधल्या की कुणालाच काही बोलता आले नाही. त्याच्या चेहऱ्यावर कालच्या घेतलेल्या जोरकस चिमट्याच्या वेदना जाणवत होत्या आणि ते पाहून खरेतर मला हसू आवारात नव्हते. पण त्याचा बदला त्याने चांगलाच घेतला...

...इतर जज सुद्धा सुरुवातीला संभ्रमात पडले पण त्यांनाही त्याने पटवून सांगितले की माझा डान्स कसा चुकला आणि कुठे चुकला! मला त्याच्या रात्रीच्या वागण्याबद्दल लगेच कंम्प्लेंट करणे शक्य नव्हते कारण माझी ती सेल्फी बघता माझ्यावर कुणी विश्वास ठेवला नसता आणि मला आणखी वाद वाढवून माझे नुकसान मला करून घ्यायचे नव्हते!”

“ओह! बडा चालाक निकला ये जज! चल जाने दे अभी! जो हुआ सो हुआ! और वो तेरा टाईमपास लव्हर साकेत, वो क्या कहता है सेल्फी के बारे में? तू फिनाले हार गयी ये पता है भी या नही उसे?”

“पता है! लेकीन वो मुझे कुछ नही बोलता. वो डरता है मुझसे, और प्यार भी करता है. मै उसे ज्यादा बोलने नही देती. उसे मुझपर पुरा विश्वास है! एक तोच तर आहे जो माझा सच्चा बॉयफ्रेंड आहे! तो मला समजून घेतो! तो मला पूर्णपणे समर्पित आहे. छोट्या मोठ्या नोकऱ्या करतो तो. माझ्या पैशांवर अवलंबून आहे, त्यावर चैन करतो तो!”

“बहोत ग्रेट है तू सोनी! तू और तेरा लव्हर साकेत, जोडी नंबर वन! और तेरी माँ क्या बोली? तुझी गावाकडची ती नौटंकी आई? काय म्हणाली ती? तिने पाहिला का तुझा सेल्फीवाला फोटो?”

“अगं तिने तर मला त्या सेल्फीमुळे कायमचे घराबाहेर आणि गावाबाहेर काढले. माझी सुटकेस घरून भरूनच आणली होती तिने! मात्र तिला महिन्याला माझ्याकडून पैसे पाहीजेत! सब लाईफ उलटपलट हो गया मेरा!”

“अरे डोन्ट वरी! पब्लिक की मेमरी शॉर्ट होती है! कुछ समय बाद लोग भूल जायेंगे. तुम भी भूल जाओगी. नया कुछ करो और आगे बढो! ये इंडस्ट्री बहोत बडी है मॅडम! अगर तुममें टॅलेंट है तो काम जरूर मिलेगा. चल समान बांधने में मदद कर मेरी! आज शाम को निकल रही हूँ मै!”

सूरजच्या फ्लॅटवर शिफ्ट झाल्यानंतर आपली कॅनडातील मैत्रीण गौरीला कॉल करून सूरजसोबतचे लिव्ह इन सांगायला रागिणी विसरली नाही.

गौरीला हे ऐकून हायसे वाटले....

(क्रमश:)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet