काॅपी,शाळा,पोलिस अाणि सुंदर मुली वगैरे

दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.आता एका मागून एक परीक्षा सुरू होणार.हे एक दोन महीने परीक्षाचे दिवसच …. पूर्वी परीक्षा ही एक शैक्षणीक प्रक्रीया होती.अध्यनं अध्यापना सारखीच साधी आणि निंरतर चालणारी प्रक्रीया. आता मात्र या परीक्षानां फार महत्व आलयं कारण या परीक्षाचे अधारे मुलांचे वर्गीकरण करण्यात येऊ लागले.त्या प्रमाणे गुणवत्ता यादया तयार करण्यात येऊ लागल्या. अती हुशार, हूशार, मध्यमं,साधारण आणि` ढ`असे मुलांचे प्रकार करण्यात येऊ लागले.मेरीट नावाची एक फुलपटटी तयार करण्यात आली. त्याने त्यांच्या बुदधीची मापे घेण्यात येऊ लागले.एकाच तराजूत सा-याना मोजले जाऊ लागले. परीक्षा साधन नाही तर साध्यं झाली.
‍मुलांच्या वर्गीकरणानंतर या व्यवस्थेने पालकाचं वर्गीकरण करायला सुरू केले. मुलं हुशार ठरली की त्यांचे पालक ही हुशार,जागरूक पालक, सभ्य पालक असे मानले जाऊ लागले. ढ मुलांच्या पालकाना समाज ढ म्हणूनच ओळखू लागला. हुशार मुलांचे पालक छाती ताणून चालू लागले .यातूनच भंयकर चढा ओढी सुरू झाल्या.मुलांमूलांत, पालका पालकांत कमालीच्या तुलना सुरू झाल्या. परीक्षा या परीक्षा नाहीतर त्या शर्यती झाल्या. मुलं शर्यतीचं घोडे झाले.शर्यत आली की सा-यानाचं पळण्याची सक्ती झाली.आता शर्यत म्हणलं की जिंकण आलं. शर्यत कोणती ही असो.त्यात जिंकण्यासाठीच्या सा-या मार्गचा अवलंब केला जातो.गैरमाग्‍ व योग्यं मार्ग. त्यातनचंचिंटग सुरू झाली. तश्याचं चीटींग या परीक्षा नावच्या शर्यतीत सुरू झाल्या. त्यातूनचं कॉपीकरणं, पेपर फुटणं,मार्कस वाढवीणं व अनेक प्रकारचे घोटाळे होऊ लागले.त्यात अनेक प्रकारची विविधता आली. कॉपी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. अनेक नवनवीन कल्पांना आल्या.
परीक्षा केंद्रावर नुसती पळापळी सुरू झाली.परीक्षा सेंटरला बाजारचे स्वरूप आले.प्रशासनावर ताण आला.कॉपी बहाद्रदर मौत का खेल करू लागले.चीप ,उपचीप, प्रचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक,सिपाई,पोलीस (अर्थात परीक्षा सेंटरवर डीयुटी असणारे ) यांना अनन्यसाधारण महत्व् आलं.या काळात काही शिक्षक हीरो झालेले आपण सारे पहातच असतो. कॉपीला सपोर्ट करणारे शिक्षक विदयार्थी प्रिय शिक्षक,लोकप्रिय शिक्षक झालेले आपण पहातचं अहोत.त्यातले अनेकजण आदर्श पुरस्कार पटाकावून बसले आहेत.अशी सेंटर असणारी शाळानां एक वगेळचं वैभव प्राप्त झालेले याच देही याच डोळी पाहीले आहे.तुम्ही म्हणालं त्यात एवढं काय हे तर आम्ही सारख्चं पहात अहोत. नवीन काय.? कॉप्या तर सारेच करतात.
एका परीक्षा केंद्रावर चक्कर टाकण्याचं योग आला. आमचा एक परम मीत्र त्या सेंटरवर गारडींग साठी नेमला होता.त्याच्याकडं एक महत्त्वाचं काम होतं.त्या प्रागंणात मी शिरताचं आमच्या गल्लीतलं शामराव काका तिथ भेटले. त्या परिक्षा केंद्रावर लांब एका झूडूपा खाली स्वारी जरा खराब मूडमध्ये उभी होती.त्यांच्या बाजूला काकू पण होत्या. मला पाहयलं की ते पळतचं आले.मी जागयवरच उभा राहीलो. आता हे दोघ पण इथं आहेत म्हणलयावर माझ्या लक्षात आलं.त्यांच्या स्वीटीचा पेपर दिसतोय. तीचं खरं नावं तृप्ती.लाडाचं नाव स्वीटी. सारी गल्ली तिला स्वीटीचं म्हणते. ती काका आणि काकूची एकुलती एक लाडाची लेक. ते जवळ आले. उन्हं कीर्रं पडलं होतं. मीच आपलं झाडं जवळ करण्याचा प्रयत्न केला.चालत चालत आम्ही या झुडूपाखाली गेलोत.तिथं ही अनेक पालक होते.त्यात माता पालकांची ही संख्या लक्षणीय होती.आता माता पालकांना ही आपली जबबादारीची जाणीव झाली आहे. मुलांच्या यशात आई आणि वडीलांचा वाटा मोठा असतो. हे आपण अनेक यशवंताच्या तोंडून ऐकतचं आसतो.मी आपलं त्यांना सहज विचारलं,”कसं काय गेलेत स्वीटी दिदीला पेपर.”
“पेपर चांगले गेलेत. कायम ती वर्गात टॉपवरच राहती पण.”
“आता काय पण.”
“सरळ ,सभ्य माणसाची काम नाही राहील आता?"
“कसं काय ? तिला तर पेपर चांगले गेलेत ना?”
“पेपर चांगले गेलेत पण सारं वशील्याचा खेळ.गरीबाचं कोण वाली.”(गरीब म्हणून त्यांची काही ख्याती नव्हती पण ते तस समजत असावेत.स्वत:ला काय समजावं हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न असतो.)
“आता यात काय वशीला ? गरीब श्रींमतीचा काय प्रश्नं ?” माझा एक भाबडा प्रश्नं.
“असं कसं? तुम्ही सारं जणता.कमून गरीबाची थटटा करता ?”
“आज इंग्रजीचा पेपर. नेमकं आजच झाडून काढले पोरं.”
“रोज नाही.आजच का तपासलं?”
“ नेमकं तेवढया वेळातचं कसला तरी जिल्हयाचा मोठा सायेब आला.लयचं कडक जणू.”
“मग गेला आसेल ना लगीच ?”
“ ते थांबत आसतेत व्हयं? जायला काय लगीच गेला पण आता स्वीटी कडं काहीच राहीलं नाही. अपेक्षीत घेतलं.मायक्रो झेराॅक्स ही घेतल्या. गेसच गाईड व्हतं ते भी घेतलं.”
“असं इतकं कसून नाही तपासयाला पाहीजे. सा-याच पोराची पंच्यात झाली आता. ते तपासायाला ते सर नी मॅडम होत्यानं त्यांनी काय लयंच अभ्यास करून परीक्षा दिली आसलं काय?” शेजारी एक नव तरूण उभा होता. त्यांन डायरेक्ट आक्षेप घेतला.मी त्याच्याकडं पाहीलं.त्याचा कॉन्फीडन्स जबरदस्तं होता.तो नेटका होता.
“खरं काय राहीलयं ? पैसं घेतले आसतेल त्यांनी. तोंड पाहून तोंड पाहून तपासतीत होते.” तिथचं एक पौढ बसले होते त्यांनी डायरेक्टं त्या दोघावर अरोपचं केले.
“काका, त्याचं काय एवढं टॅन्शान घेता. आत सर लोक मदत करतच आसतेत मुलांना. आपल्या सारखचं त्यांना पण मुलांचं टेन्शनं आसतचं.” सामुहीक कॉपीचा महायज्ञ मी माझ्या डोळयानी पाहीलं होता. त्यामुळे मला अंदाज होता. मला आमच्या काकाचं टेन्शनं कमी करायचं होतं.
“कसलं काय? सारं वशील्यानं चालतं आतां.आपल्या साळा असल्या. सा-या पैसं घेऊनचं ॲडमीशन देतात. पासींग सह गुत्तचं घेतेत.त्याचं सारं लक्ष त्याचं पोरायांकडं आसतंं. आपली पोरं तशीचं राहणारं.”
“पासींग पुरत ते सा-यालाच सांगणारेत असं आमचं शेळके सर म्हणत होते. तिथचं एक सभ्यं व शांत पालकांनी त्यांच तोंड उचकटलं.
“ते तर करतेलचं पण दयायची थोडं मटरेल बाहेरून भी.”
“कसं दया?”
“खिडकीतून दयायचं नाय.. तर सरळ आत जाऊन दयायचं.”
“आत…? आम्हला कोण जाऊन देते?त्याला भी वशीला पायजे.तेव्हं परदश्या गेला की सरळ आत मोठया सायबावाणी. डुलत डुलत…. सारं देउन आला पोराला.त्या तिकडं बसलाय आता आईस्क्रीम खात.”
“असं नाय करायला पायजे. जाऊ दयायचं तर सा-यालाच जाऊ दयालया पायजे. हयो अन्याय झाला.” मी आपलं सहज हळहळ व्यक्तं केली.
“आता त्याचं दारूचं दुकानं… हप्तेबिप्ते चालू आसतेत. ओळखी आसत्यात. तुम्ही काय दोन नंबर करता का?"इतका वेळ शांत बसलेल्या काकू बोलल्या.माझ्या समोरचं एका खिडकीवर झुंबड उडली होती.माकडासारखी माणसं गजाला लोंबकळत होती.
“जाऊ दया.आपलं असं खिडकीतून दयायाचं.”
“कसं ? अहो आमच्या स्वीटीचा नंबर वरच्या मजल्यावर आलाय. नेमका मधल्या रांगेत.”
“त्या प्राचार्याची नात परीक्षा देतीयं. त्यामुळे खालीवरून नंबर दयायला सूरू केलं.सारं त्यांचाच हातात.” एक खरमरीत चेह-याचा पालक आपल्या टकलवरला घाम पुसतं म्हणाला.
“एवढचं नाय.तिला अर्धा तास जादा वेळ देतेत असं ऐकल मी.काही खरं नाय सारं .मॅनेज करतेय सार राव. आपल्यासाख्याचं फक्तं हालं.”
“लयचं पर्सनॅलीटी चालली मग पत्रकार लोंकाना सांगायला पायजे.”
“ते कशाचं काय करतेत. च्या पाणी दिलं की झालं. बर त्यांना कोण आडवीत. ते सरळ जातेत येतेत. जवळच्या जवळच्याला देते कॉप्या.त्यांच भी कुणी तरी आसतचं की.”
“जाउ दया. लयं कॉप्या करून तरी काय ओरीजनल ते ओरीजनलच असत.”
“असं नका म्हणून….. पोरांना मार्क कमी पडलं की त्यांच कान्फीडन्स कमी होतं.काहीचं येत नसून ही मार्क चांगली पडलं की त्यंचा उगचं पाऊर वाढतो. त्यांची नुसती शायनींगच पाहत बसावं लागत.” कोणत्याचं उत्तरांन त्याचं समाधान होत नाही हे पाहून मी आपलं समजुतीच्या स्वरात म्हणलं,”आता काय करावं. दयायचं सोडून. आपला अभ्यासावर लक्ष दयायाच.” माणूस मदत नाही करू शकला की फुकटचा उपदेश करायला सुरू करतो.
“ते तर हायचं हो.दोन दोन क्लास लावलेत मी तर.पण त्यांच भी फिक्सनचं आसतं. फालतु पोरीचा लाड करतेत ते. मोठयाच्या लेकरांच्या पुढं पुढं करतेत ते.”
“ज्याला जे जमतं ते करत. काय करावं.”
“पण अन्याय नाय करायला पायजे.समोर काय चाललं पगा. हे पोरग वर चढून दोनचं प्रश्नं घेऊन गेलं होत.खालूनच काठीन मारलं.”
“हयो वरच्या मजल्यावर कसा गेला?”
“गेला खिडकीवर चढून.लय चपळ. मरणाचे रेमाटलं.सारं अंग मऊ केल. म्हणालाय गेलो तर माझ्यावरच धावून आलं ते शेपूर्ड….” एक चुणचुणीत गोरं गोमटं पोरग माझ्या समोर उभा केलं.त्याचा चेहरा लाल झाला होता. मार खाल्यामुळे तो लाल झाला होता.
“हा कोणयं ?”
“दुसरं कोण? हीच्या भावाचं पोरग. खास परीक्षेसाठी बोलावून घेतलाय.”मी पाहीलं. अक्षरश: त्याच्या पाठीवर्‍ आणि पींड-यावर जबरदसत मार होता.वळ उठले होते.तो बिचारा सारं अंग दाखवत होता.मला त्या कूर पोलीस कर्मचा-याचा भंयकर राग आला.
“असं कसं मारता गुरावाणी त्याचं वय नव्हतं. हो एवढा मार खायचा.आत नाही नाही जाऊ दयायचं तर नका जाऊ देऊ पण सा-यानाचं नाही जाऊ दिलं पायजे. काकीनं त्याच्या डोक्यावरून हात रिवत म्हटलं.तो मासूम चेहरा ओशाळला.त्यांच्या समोर इतकं मारलं तरी आमचे काका काहीच करू शकत नव्हते. ज्याची चलायची त्याची चलती. तेवढयात टोल वाजला.
"बघा काही तरी करा. आता एकचं तास राहीलाय. तुमच्या जरा ओळखी आसत्यात."त्यांची उलाघाल वाढली होती.मी काही तरी करू शकतो असं त्यांना वाटत होतं.
"बघतो काही जमत का ?" असं म्हणून मी तिथून सटकालो. माझी मीच सुटका करून घेतली.सा-या खीडक्याला माणसं लोंबकळत होती. लिस मागे पळत होते. स.टी वात होत्या. आत अनेक आमचे सर लोकविदयार्थ्याना मदत करण्यात गर्क होते. मी दोनचं नीटं चाललो असेल. तेवढययात चार पाच पोरानी एक पोलीस कर्मचा-यावरचं आक्रमण केल. तसे सारेच धावले.असार गदीचं झाली.त्या गदीतून जागा करीत मी रोड पकडला.
आपण कॉपीमुक्तीसाठी काय करू शकतो ? अशी ही व्यथा…अशी ही कथा…!!
परशुराम सोंडगे, पाटोदा
sahitygandha.blogspot.com
prshuramsondge.wordpressblog.com

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मुलं हुशार ठरली की त्यांचे पालक ही हुशार,जागरूक पालक, सभ्य पालक असे मानले जाऊ लागले. ढ मुलांच्या पालकाना समाज ढ म्हणूनच ओळखू लागला

या वाक्याशी असहमत.
बाकी आपल्ल्या बीडातली परीक्षा परिस्थिती ऐरवीही भिषण असते.

बीडातच राहिलेला, शिकलेला अन् १० पास झालेला माइंड्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0