त्या दिवशी ...!!

त्यादिवशी……!!
तुझ्या तशाचं माझ्या ही चटावलेल्या
डोळयांना एकमेंकाना भीडता आलं
नाही.
पावलांवर पावलं पडतं होती.
पण तुला अडखळता
अन
मला ही ओंलडता आलं नाही.
उरातलं सारचं ओठात आलेलं….
पण तुझ्या तशाचं माझ्या ही
शब्दांना नेहमीचं गददारपण सोडता
आलं नाही.
वारा आला.
तुझी ओढणी उडाली.
अन तुझं ते सुंदर लाजणं
तुला लपवता आणि मला पहाता
आलं नाही.
तुला तसचं मला ही माहीत होतं
पुन्हा कधीचं आपली भेट ही
होणार नाही.
तरी तू…….
जात होतीस अगदीचं निशब्द……
मी हातांनी केलेला बाय
तुला पहाता अन्र मला थांबवता
आला नाही.
आता…..
तू…….
कीती दूर….
मला तुला, तुला मला भेटता
आलं नाही.
पण
शपथ, प्रिये अजून एक क्षण
विसरता आलं नाही.
परशुराम सोंडगे,पाटोदा
prshuramsondge.blogspot.com
sahitygandha.blogspot.com

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet