भयभीत

"भयभीत"

बेडवर पडल्यानंतर तिच्या नाजूक कपाळावर हलकेच ओठ टेकवून मी तिचा पापा घेतला आणि झोपेच्या स्वाधीन झालो !

मोबाईलच्या स्क्रिनवर नेहेमीप्रमाणे सराईतपणे स्क्रोलींग करणारी माझ्या हाताची बोटं आज थरथरत होती, काहीशी जडही पडली होती. निरागसपणे माझ्याकडे एकटक बघणारे ते हरिणीसारखे सुंदर डोळे मला काहीतरी प्रश्न विचारत होते.. तिच्या त्या भेदक नजरेनं माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं.. तिच्याशी नजरानजर होऊ नये यासाठी मी प्रयत्न करत होतो पण तेही मला जमत नव्हतं. विषण्ण आणि अगतिक झालेला मी.. शेवटी मोबाईल बंद करून समोर बघितलं.

नजरेसमोर दिसत होती माझ्या बेडरूमची खिडकी ! खिडकीतलं दृश्य बघून मी अस्वस्थ झालो.. तेथे कोणीतरी उभं होतं, काळोख असल्यानं चेहरा मात्र दिसत नव्हता. अचानक एकाऐवजी तिथं अनेकजणांची डोकी दिसू लागली आणि ती गर्दी एकसारखी वाढतच चालली. असंख्यजण होते ते ! एवढ्यात गडगडाटी आवाज होऊन विज चमकल्याचा लखलखाट झाला. क्षणमात्र पसरलेल्या त्या उजेडातही मी अनेकजणांना पाहू शकलो !

काय दिसलं मला त्या गर्दीत ?
कोणकोण होतं त्या ठिकाणी ?

कपाळाला गंध लावलेले होते तेथे, डोक्यावर जाळीदार टोपी घातलेले होते आणि गळ्यात क्रॉस अडकवलेलेही होते. दाढीमिशा राखलेले होते तसेच मुंडण केलेलेही होते. भगवे वस्त्र नेसलेलेही असंख्यजण दिसत होते. त्या गर्दीत वृद्ध होते आणि अजून मिसरूढही न फुटलेले किशोरवयीन मुलंही होते.. हायफाय सूटवाले उच्चविद्याविभूषीत दिसणारे होते तसेच खेडेगावातील गावंढळ वाटणारे अडाणी, अशिक्षितही होते.. कायदा करणारे आणि कायद्याचे राखणदार असणारेही त्या गर्दीत होते..

मी विचारच करत होतो आणि अचानक मला जाणवलं, ते सगळेजण माझ्याच दिशेनं येत आहेत ! कशासाठी बरं ? मला आधी उत्सुकता वाटली पण लक्षपूर्वक त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला दिसलं, त्यांचं लक्ष माझ्याकडे नाहीच. त्यांची सगळ्यांची नजर एकवटलेल्या ठिकाणी मी माझ्या डाव्या बाजूला बघितलं आणि मी उडालोच...

ते सगळेजण ईश्वरीकडे निघाले होते, वखवखलेल्या नजरा घेऊन ! क्षणार्धात संतापानं मी बेभान झालो. चपळाईने जागेवरून उठलो, बाजूला असलेला लाकडी टेबल तोडला आणि येणाऱ्या गर्दीवर तुटून पडलो..
एक.. दोन.. तिन.. मी एकामागोमाग एकसारखे वार करतच होतो पण ती गर्दी मला काही केल्या आवरत नव्हती. एवढ्यात कोणीतरी मला गच्च धरून ठेवलं. मी सुटण्यासाठी व्यर्थ धडपड करायला लागलो. पण इतक्यात एकाजणानं हाताचा एक जोरदार ठोसा माझ्या तोंडावर मारला.. रक्ताची चिळकांडी उडाली.. नाका तोंडावाटे रक्ताची धार वाहू लागली. ते ठोसे एकामागून एक बसत राहीले.. मी पुरता घायाळ होत चाललो.

मा..माझ्या डोळ्यांदेखत त्या गर्दीतल्या नराधमांनी माझ्या प्राणप्रिय ईश्वरीला उचललं आणि ते जाऊ लागले.. मी फक्त आक्रोश करत राहीलो.. हळूहळू त्या गर्दीसमवेत माझी ईशू दिसेनाशी झाली आणि मी जिव तोडून ओरडलो,
"नाssही... नाही, मी असं होऊ देणार नाही.."

माझ्या कपाळावर कुणीतरी हात ठेवलेला जाणवला म्हणून मी डोळे उघडून बघितलं. बाजूला झोपलेली आरती माझ्या अचानक ओरडण्यामुळे जागी होऊन काळजीयुक्त स्वरांत मला विचारत होती,
'राहुल, काय झालं रे ?'

मी तिच्या बोलण्याकडं साफ दुर्लक्ष करून आमच्या दोघांच्या मध्ये सुरक्षित आणि शांतपणे झोपलेल्या ईश्वरीला जवळ ओढून छातीशी घट्ट कवटाळलं.. डोळ्यांतून घळघळा आसवं वाहू लागले. कितीतरी वेळ तिला छातीशी धरून मी रडतच होतो..

काल आसिफा, आज दुसरं कोणी आणि उद्या...? उद्या कदाचित् माझी ईश्वरी- माझी मुलगी....

नाही.. हे असं व्हायला नको..आम्ही हे होऊ देणार नाही.. प..पण मग नेमकं काय करणार आहोत ?

विचार कर करून मी सैरभैर झालोय.. या सामाजिक विकृतीवर कायमस्वरूपी इलाज व्हायला हवा... पण कसा ते कळत नाहीये.. तूर्तास फक्त एखादी मेणबत्ती पेटवू शकतो..

प्लिज हेल्प मी.. मला मदत करा.. माझी मुलगी वाचवण्यासाठी, माझी आसिफा वाचवण्यासाठी.. आपली आसिफा वाचवण्यासाठी...

©र।हुल /१३.४.१८

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Sad
विदारक..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे स्री व पुरूषांना अर्थार्जनासाठी मुलांना एकटं सोडावं किंवा परक्या व्यक्ति कडे सोपवावे लागतयं. अशी वेळ कुणावर येऊ नये. माझ्या शेजारी पाच भावांचा परिवार आहे अतिशय माजुर्डे असणारे. एकाच्या मुलीने बाहेर प्रेमप्रकरण केले म्हणून सख्खा चुलत्याने तिच्यावर बलात्कार केला, पण सर्वांत आडदांड असल्याने बोभाटा केला नाही. गुपचूप लग्न करुन दिले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सत्यमेव जयते

Shok

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

आँ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0