साम्राज्याचे येणे

१. पटेल लोक "स" च्या जागी "ह" म्हणतात.
हव्वापाचला कंपनीत जर्सीचा पेपर टेबलावर पसरून
गुजराथी भुसू खायचो: चुरमुरे , फरसाण , शेंगदाणे .
गुजराथी गप्पा कळायच्या.
पिवळट्ट भिंतीवर स्वामीनारायण असायचा .

2. अचूक गोळ्या पाडणे तसे सोपे,
मी भारतातच शिकलो होतो. पण
त्या विकणे महाकर्मकठीण (म्हणतात).
महाग सूट घातलेल्या पटेलांच्या
डोळ्याभोवतालची वर्तुळे वाढत होती.

3. डोके मुंडलेल्या जी इ कॅपिटलच्या लोकांना
मुतारीच सापडत नव्हती. अनेकांना
दाखविली . नवे कॉफी मशिनही.
ते कसलेतरी विचित्र सँडविच खात .
(पांढऱ्या माशाचे स्लाइस).

४. "विकली जाणार", "विकली जाणार " सर्वत्र
खुसपूस होती . गोऱ्यांचे डोळे काळवंडायचे ,
भारतीय म्हणायचे "हार्दिक आपला माणूस
आहे, काय , तो असं करणारच नाही
".

५. (त्याने केले! शुद्ध वैष्णव लोक
दोन अब्ज डॉलर्सचे
काय करणार आहेत?)

६. भडक गोऱ्या ललना सर्वत्र
फिरत आहेत. त्यांच्या तोंडावरचे
हसू कोणासाठीच नाही.
xxx

field_vote: 
0
No votes yet