कव्हर स्टोरी

तुम्ही स्वतःचा एखादा व्यक्तिगत प्रॉब्लेम इतका लपवला आहे की त्याचा विपरीत परिणाम तुमच्या कामावर झालाय? तुम्ही जेव्हा लैंगिकतेवर आधारित भेदभाव बघता तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते का? एखाद्या सहकाऱ्यावर इतरांकडून सततच्या असभ्य कॉमेंट्स ऐकून तुम्हाला किळस येते का? जेव्हा तुमचा बॉस तुमच्या नवीन कल्पना किंवा प्रोजेक्ट्स केवळ त्याच्या प्रतिगामी, जुनाट मानसिकतेमुळे नाकारतो तेव्हा तुम्हाला राग येतो का? एखाद्याने तुम्हाला बिहारी किंवा घाटी म्हणून हिणवले तर तुम्ही त्याला काय प्रत्युत्तर द्याल?

जर एकाच फिल्ममध्ये इतके सगळे प्रॉब्लेम्स दर्शवायचे असतील तर ती फिल्म नक्कीच नकारात्मक किंवा डिप्रेसिंग असेल, नाही? पण नाही.. सुहैल अब्बासी दिग्दर्शित आणि क्वीअर इंक निर्मित 'कव्हर स्टोरी' फिल्म या दैनंदिन समस्या सादर करते तरीही प्रेक्षकांना हसवून आशावादी बनवते. एक समलैंगिक तरुण आपल्या ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या टोमण्यांपासून वाचण्यासाठी व स्वतःचा मान राखण्यासाठी आपली लैंगिकता दडवण्याचा सतत प्रयत्न करतो; पण जेव्हा त्याला परिस्थिती अगतिक बनवते तेव्हा मात्र तो ठामपणे उभं राहून तिला प्रत्युत्तर देतो. मोठ्या कंपन्यांतील अतिशय पॉश ऑफिसेसमध्येही सातत्याने घडणारे भेदभाव कव्हर स्टोरी प्रभावीरीत्या दाखवते. माझी खात्री आहे की अनेक गे, लेस्बियन कर्मचाऱ्यांना असे अनेक अनुभव नक्कीच आले असतील. काही नवीन चेहऱ्यांनी यात भूमिका समर्थरीत्या वठवल्यात. फिल्म तांत्रिक बाबतीत उत्कृष्ट असून प्रेक्षकांना एका ऑफिसची सफर घडवून अपेक्षित अंतरावर सहजरीत्या आणून सोडते.

'कव्हर स्टोरी' भारताच्या कॉर्पोरेट सेक्टरमधील अनेक कार्यालयांपर्यंत पोहोचेल अशी मला आशा आहे. आज आंतर्राष्ट्रीय व मोठ्या प्रमुख कंपन्यांमध्ये भेदभावविरोधी नीती-नियम बनवले गेले आहेत पण ते बहुतांशी कागदावरच आढळतात. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जनजागृतीची खूप मोठी गरज आहे आणि त्यादिशेने ही फिल्म एक पुढचे पाऊल आहे.

अवधी : १२ मिनिटे ३० सेकंद
ट्रेलर
फिल्मविषयी अधिक माहिती

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet