ओतप्रोत

अजून दारी पारिजात आरक्तफुलांनी कसा डवरतो
पहाटवारा मूक स्पर्शता सडा शिंपुनी का गहिवरतो?

अभिसाराच्या अधीर गात्री अभिचारी का हिरवे गोंदण
धगधगत्या का इंगळांवरी थरथरते पांढुरके लिंपण?

नतभावाचे गाणे झरता रतरात्रींचे आठव अलगुज
जाता जंगलवाटांवरुनी पंचम नादे मनात अविचल

गणगोतांच्या उदार मेळीं स्वर माझा जरि करितो गुंजन
निर्झर मायेचा ओलांडुन आत वाजतो अलख निरंजन

डंख मधाचे नाजुक झेलत, उधळत ऋतुहृदयीची तळमळ
ओंजळीतल्या कळ्या उमलता गाभाऱ्याच्या भाळी परिमळ

सरत्या रात्री शिशिरऋतूच्या दंव कर्दळिचे टिपूर स्मरते
भरल्या पात्री ओतप्रोत या जळ निर्मळ हे अजूनी पडते

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली. नादमधुर आणि लयबद्ध. एक तृप्तता आणि भरलेपणा आहे.

एक प्रश्न - पारिजाताची फुलं आरक्त का?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त देठात आरक्त आणि पाकळ्या शुभ्र. हा पारिजात दारचाच नाही, मनातलाही आहे.

"अभिसाराच्या अधीर गात्री" येथे मात्र तृप्तता नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असला पारिजातक मी आजवर तरी पाहिला नाही. किंवा केशरी रक्तही पाहिले नाही.
(अभिसाराच्या अधीर गात्री, हे चुकून अतिसाराच्या अधीर गात्री वाचले )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

अतिसाराची गात्रं अधीर हे ठीक, पण तिथलं हिरवं गोंदण?!?

असलं **ण पाहण्याचा योग अजून आला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

:-)))))))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....