कादर खान: कलाकार नंबरी, लेखक दस नंबरी!

हा माणूस गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या रूपांत आपल्याला भेटत होता. "बाप नंबरी बेटा दस नंबरी" तर आम्ही केवळ याच्या आणि शक्ती कपूरच्या केमिस्ट्रीकरता पाहिला होता. त्यातले ते फ्रॉड वाले २-३ सीन्स अत्यंत धमाल आहेत. माझे ऑल टाइम स्ट्रेसबस्टर्स!

गोट्या पोट्या मॅनपॉवर एजन्सी

नट बोल्ट सोडा बॉटल ओपनरवाला

जाली नोट छापनेकी मशीन

हे तिन्ही सीन्स मी असंख्य वेळा पाहिले आहेत. यातला विनोद काही फार ब्रिलियंट वगैरे नव्हे. पण सगळी मजा सादरीकरणात आहे. वेगवेगळे वेष, बेअरिंग आणि भाषेचा लहेजा घेउन कादर खान आणि शक्ती कपूर ने जी धमाल उडवली आहे त्याला तोड नाही. हे सीन्स पाहताना जाणवते की प्रत्येक वेळेस दोघेही त्या त्या भूमिकांमधे पूर्ण शिरले आहेत. ते बोलत नसतानाही त्यांचे हावभाव पाहा, त्या कॅरेक्टर्स च्या व्यक्तिमत्त्वात त्यांनी घातलेली भर पाहा - सगळेच खतरनाक आहे. विशेषतः कादर ने एकदा पारशी बावा, एकदा गुज्जू आणि एकदा मराठी हवालदार म्हणून धमाल उडवली आहे. हा गुज्जू अवतारात बोलत असताना मधेच शक्ती कपूर फोनची वायर कानात घालतो आणि त्यामुळे यांचा फ्रॉड उघडकीस येइल याची भीती वाटल्याने हळूच त्याला जेव्हा सांगतो, तेव्हा नॉर्मल हिंदीत सांगतो. ही अशी 'मेथड इन मॅडनेस' अनेकदा दिसते त्याच्या सीन्स मधे. ज्या प्रेक्षकवर्गाकरता हे सीन्स लिहीले जातात त्यांना पांचट कॉमेडी आवडते असे गृहीत धरल्याने असे न्युआन्सेस लक्षात ठेवले जात नाहीत असे आपण अनेक हिंदी व विशेषतः मराठी चित्रपटात पाहतो. त्यामानाने कादर खान च्या सीन्स मधे ते पाळलेले लगेच जाणवतात.

कादर खानचे गेल्या दोन दशकांत असे अनेक सीन्स/स्किट्स आहेत. चालबाज मधे शक्ती कपूरला लुटतानाचा एक सीन असो, नाहीतर हीरो नं १ मधला तो सासरा, किंवा कोणत्यातरी चित्रपटात कायम फोटोतून आपल्या मुलाशी बोलणारा - असे अनेक अचाट आणि अतर्क्य कॉमेडी रोल्स त्याने केले. आधी ८०ज मधे जितेंद्रच्या चित्रपटांमधून कॉमेडी व्हिलन नावाचा प्रकार जबरी होता त्याचा, आणि नंतर गोविंदाच्या "नं १" टाइप चित्रपटांतील सासरा किंवा इतर तसेच रोल्सही.

पण एकूणच लहानपणीपासून जे पिक्चर पाहिलेत त्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कादर खान सतत असेच. कधी स्वतः केलेले काम तर अनेकदा चित्रपटाचे संवाद.

८० च्या दशकातील सुरूवातीच्या चित्रपटात व्हिलन म्हणून तो तसा सरधोपट होता, नंतर कॉमिक व्हिलन झाला. पण मला सर्वात आवडला तो थोडा नंतर आलेल्या 'अंगार' मधला जहाँगीर खानचा रोल. कदाचित त्याचे मूळ अफगाण व्यक्तिमत्त्व हा रोल साकारताना नैसर्गिकरीत्या पुढे आले असावे. बाकीही रोल्स इतके आहेत की आता पटकन आठवतही नाहीत. ८० आणि ९० च्या दशकात त्याने इतके विविध रोल्स केले आहेत की कादर खान चित्रपटात नाही अशीच उदाहरणे कमी असतील.

पण बच्चन फॅन्स करता त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे बच्चन च्या इमेजला त्याने सर्वसामान्यांना आपला वाटेल असे 'पॅकेज' केले. १९७७ सालची सिच्युएशन पाहा. अमिताभ प्रचंड लोकप्रिय झाला होता, अँग्री यंग मॅन म्हणून. तोपर्यंत दीवार आणि शोले रिलीज होउन दोन वर्षे झाली होती. हे दोन चित्रपट, आणि त्याचबरोबर आनंद, नमक हराम, अभिमान आणि कभी कभी अशा चित्रपटांमधून अमिताभची एक सतत धुमसणारा, कमी बोलणारा, रागीट अशी प्रतिमा निर्माण झालेली होती. अपवाद दोनच - बॉम्बे टू गोवा आणि चुपके चुपके. या दोन्हीत त्याने विनोदी रोल्स केले असले तरी ते ट्रेण्डसेटर्स झाले नाहीत. बॉम्बे टू गोवा मधला अमिताभ त्याचे मॅनरिजम्स नंतर ओळखीचे झाल्याने थोडा उशीराच गाजला असावा, तो चित्रपट लागला तेव्हा मेहमूदच जास्त छाप पाडून गेला असेल असा माझा अंदाज आहे. तसेच चुपके चुपके मधला अमिताभ धमाल असला, तरी ती हृषिकेश मुखर्जींच्या चित्रपटातील व्हाइट कॉलर कॉमेडी. अमिताभच्या 'मास इमेज' मधे पुढे फारशी दिसली नाही.

अशा वेळेस मनमोहन देसाईं आणि कादर खान यांनी ती अँग्री प्रतिमा पूर्ण बदलवणारा "अँथनी" निर्माण केला, आणि त्यानंतर लगेच कादर खानने प्रकाश मेहरा करता "सिकंदर" लिहीला. या दोन्ही रोल्स नी अमिताभ आम जनतेत पोहोचला. दीवार, जंजीर, त्रिशूल, शोले हे त्याला सुपरस्टार करायला पुरेसे होते, पण अ‍ॅंथनी आणि सिकंदर ची मजा वेगळीच होती. तुम्हाला सलीम जावेदचा "विजय" भेटला तर तो काहीतरी शार्प डॉयलॉग रागाने मारून तेथून निघून जाईल, पण अँथनी किंवा सिकंदर तुमच्याशी गपा मारतील, ते ही बम्बैय्या हिंदीत. अमिताभला सर्वसामान्य पब्लिककरता अ‍ॅप्रोचेबल करण्याचे काम कादर खानच्या कॅरेक्टर्सनी केले. ती त्याची माझ्या दृष्टीने सर्वात मोठी कामगिरी आहे.

कादर खानची एक मुलाखत बघितली होती. अमर अकबर अँथनी च्या वेळेस हे तिन्ही लोक कसे काम करत वगैरे बद्दल. मजेदार आहे एकदम. तसेच नंतर अजून एका मुलाखतीत त्याच्यात आणि अमिताभमधे कसा दुरावा आला ते ही त्याने सांगितले आहे. अमिताभचे त्याबाबतीत मत काय आहे कल्पना नाही, पण कादर खान ने जे सांगितले ते तसेही विश्वासार्ह वाटते. या दोन्ही क्लिप्स यू ट्यूबवर आहेत.

अमिताभचे अनेक लोकप्रिय संवाद त्याने लिहीले आहेत. गेल्या एक दोन दिवसांत त्यातले बरेचसे चुकीचेच (म्हणजे विशेष खास नसलेले) पेपर्स मधे आलेत. मला सर्वात आवडणारा सीन म्हणजे मुकद्दर का सिकंदर मधला कब्रस्तानातील संवाद - जेव्हा तेथील "फकीर" कादर खान ज्यु अमिताभ व त्याच्या बहिणीला समजावतो. ज्यांनी मुकद्दर का सिकंदर थिएटर मधे पाहिलेला आहे त्यांना हा सीन पुढे सरकतो तसे थिएटर मधे कल्ला वाढू लागतो, शिट्ट्या आणि अनेकदा नाण्यांचे आवाजही - ते सगळे लक्षात असेल. मी पुण्यात "मंगला" मधे अनेकदा अनुभवले आहे. अमिताभच्या असंख्य "एण्ट्रीज" पैकी ही माझी सर्वात आवडती आहेच पण एण्ट्रीच्या आधी ज्यु अमिताभला कादर खान ने जे सांगितले आहे त्याचे सादरीकरणही भन्नाट आहे. आधी ती दोन लहान मुले रडत असताना तो येतो आणि शांत गंभीर आवाजात त्यांची समजूत काढायला सुरूवात करतो. "मौत पे किसकी रस्तगारी है, आज इनकी तो कल हमारी बारी है". तेथून पुढे संगीतामधे "क्रेसेण्डो" म्हणतात तसा त्या डॉयलॉग्ज मधला जोर वाढत जातो आणि मग मोठ्या अमिताभची मोटरसायकलवरून एण्ट्री होते. हा "लीड अप" कादर खाने ने सुंदर लिहीला आहे आणि तितकाच जोरदार सादरही केला आहे. त्याची इथली संवादफेक जबरदस्त जमली आहे.

अँथनी आणि सिकंदर हे अमिताभचे माझ्यातरी टॉप ५ मधले रोल्स आहेत. सलीम जावेद च्या कॅरेक्टर्स मधे सहसा न दिसणारी एक "warmth" कादर खान ने लिहीलेल्या अमिताभच्या कॅरेक्टर्स मधे दिसते. "मकान ऊंचा बनाने से इन्सान ऊंचा थोडे ही ना हो जाता है" हा वरकरणी (तेव्हाही) चीजी वाटेल असा संवाद, पण त्यानंतर पुढे अमिताभ बोलतो ते ऐकले तर लक्षात येते की ते सिकंदर च्या कॅरेक्टरशी कन्सिस्टंट आहे. अ‍ॅंथनीला ही मिश्किल्/गमत्या करून कादर खान ने अमिताभच्या कॅरेक्टर्स मधे विनोद आणला - पुढे जवळजवळ सर्व चित्रपटांत इतर लेखक/दिग्दर्शकांनीही त्याचे अनुकरण केले. सलीम जावेद चा "विजय" बहुतांश विनोद ड्राय ह्यूमर टाइपचे करतो - चेहरा गंभीर ठेवून "मारलेले" पंचेस असत ते. पण कादर खानचा अमिताभ मुळातच कॉमिक होता. हा कॉमिक अँगल इतका झाला की नंतर अमिताभने कॉमिक साइड किक च्या पात्राची गरजच ठेवली नाही असे लोक म्हणत. पुढे परवरिश, सुहाग, देशप्रेमी, सत्ते पे सत्ता, याराना सारख्या अनेक चित्रपटांतून त्याच फॉर्मचे कॅरेक्टर त्याने अमिताभकरता लिहीले.

चित्रपटाच्या दर्जाप्रमाणे चांगले किंवा टुकार लेखन त्याला सहज जमत असे. "शराबी" मधे अमिताभचे शेर फेमस झाले होते. काही चांगले शेर आहेत पण अनेक टुकार असल्याने जास्त फेमस आहेत. "शराबी को शराबी नही, तो क्या जुआरी कहोगे? गेहूँ को गेहूँ नही, तो क्या जवारी कहोगे", किंवा "जिगर का दर्द ऊपर से कहीं मालूम होता है, के जिगर का दर्द ऊपर से नही मालूम होता" सारखे. पण कादर खान ने ते तसे लिहीण्याचे कारण चित्रपटात आहे. अमिताभ प्रेमात पडायच्या आधी तो दर्द त्याने अनुभवलेला नसतो त्यामुळे त्याला शेर मारायची अफाट हौस हसूनही ते जमत नसतात. त्यामुळे पहिल्या भागात त्याचे सगळे शेर टुकार आहेत. ओमप्रकाश त्याला त्याबद्दल सतत सांगत असतो, तुझे शेर "घटिया" आहेत म्हणून. मात्र नंतर जयाप्रदाला भेटल्यावर पुढे तो बोलतो ते संवाद कादर खान ने बदलले आहेत.

वरकरणी साधे किरकोळ व अनेकदा टुकार वाटणार्‍या त्याच्या अनेक कॅरेक्टर्सच्या मागे बराच विचार असे, तो ते बरेच सीन पुन्हा पहिल्यावर लक्षात येत असे. बम्बैय्या संवाद ही त्याची खासियत होती. हिंदी चित्रपटातले टॉप ४-५ बम्बैय्या कॅरेक्टर्स बघितली तर आमिरच्या रंगीलामधल्या मुन्ना आणि मनोज वाजपेयीच्या भिकू म्हात्रे च्या बरेच आधी अमिताभचा "अँथनी" आणि अमजद खानचा "दिलावर" ही दोन जबरदस्त उदाहरणे. ही दोन्ही कादर खानने लिहीलेली आहेत.

"ते गेले नाहीत. ते त्यांच्या विचारांच्या/कलाकृतींच्या माध्यमातून आपल्यामधे आहेत" वगैरे वाक्ये आपण अनेक लोक थोरामोठ्यांबद्दल वापरताना आपण वाचतो. पण कादर खानच्या बाबतीत ते शब्दशः खरे आहे. आनंद मधे शेवटी अमिताभ रडत असताना बाजूला सुरू असलेल्या टेप मधून पुन्हा "बाबूमोशाय" ऐकू येते तसेच टीव्हीवर चॅनेल सर्फिंग करताना सुद्धा कोठेतरी नक्कीच कादर खान ने लिहीलेले किंवा स्वतःच सादर केलेले एखादे टाइमपास विनोदी वाक्य आपल्या कानावर आत्ता सुध्दा लगेच पडेल, आणि पुढेही येत राहील.

नाहीतर मग शक्ती कपूर/गोविंदा बरोबरच्या त्याच्या क्लिप्स पाहा, मनोरंजनाची गॅरण्टी!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

एक नंबर लेख!

त्या गोट्या-पोट्या एजन्सीच्या सीनमध्ये दुबई म्हणून मढ आयलंडला सोडणाऱ्या बोटीचं नाव 'हरिश्चंद्र' आहे! आता हा योगायोग आहे की दिग्दर्शनाचा मास्टरस्ट्रोक नकळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेख आवडला.
'अंगार'मधला जहाँगीरखानची भूमिका पाहूनच मला ह्या माणसात खरा रस निर्माण झाला.
तोवर एखाद्या MLAला उद्देशून 'ऐ मैले साहब' म्हणाणारा कादरखान माहीत होता, नि तसे संवाद नि प्रसंग कुणासाठी लिहिले नि सादर केले गेलेत हे माहीत असल्याने नि असूनही त्याकडे नीट पाहिलं नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम लेख!
कादरखान की कदर करनेवाला लेख जरूरी था. लिहिल्याबद्दल धन्यवाद!
त्यांच्या विनोदी भूमिकेतला मिश्किलपणा कायम लक्षात राहील - बरेचदा बाष्कळपणा आणि का-ही-ही टाईप विनोद असला तरी (दुल्हेराजा: ये कौनसा मेरी तरफ है?)
------
पुढे सविस्तर लिहीन म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. कादर खान चित्रपटांचं लेखन करत असे, हे उडतउडत माहीत होतं, एवढंच. 'शराबी'मधले घटिया शेर मुख्य पात्राच्या तोंडून फारच मजा येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्कृष्ट लेख.

एकदा एका हिमालयीन आणि खूपच दुर्गम ठिकाणच्या हॉटेल / रिसॉर्टमध्ये काही दिवस अतिखराब हवामान आणि आजारपण यांमुळे खोलीतच अडकून पडण्याची वेळ आली होती. तिथे कसे कोण जाणे पण मोजून फक्त चार चॅनेल टिव्हीवर दिसायचे. एक बातम्यावाला, दोन खरखरीत रिजनल आणि चौथा एक अतिशय अनपॉप्युलर, नावही न ऐकलेला असा हिंदी सिनेमे दाखवणारा चॅनेल.

त्यावर गुजराण करताना "नाचनेवाले गानेवाले" हा सिनेमा (हो असा आहे एक) तीन दिवस रोज एकदा असा तीन वेळा बघितला. त्या स्थितीत वेळेला केळं असं म्हणून. आणि मनोरंजन झालं चक्क. तेव्हापासून कळलं की मनोरंजन कलाकृतीत नसून आपल्या आत आहे. Smile

कादरखानशी असाही ऋणानुबंध आहे. आदरांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिशय आवडला लेख. कादरखानचा कायम लक्षात राहतील असा रोल म्हणजे दुल्हे राजा मधला हाटेल मालक.

थोडं निट -पिकिंग

नाहीतर हीरो नं १ मधला तो सासरा,

कूली नं १ मधला सासरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कादरखान: अरे,ये तो कूली निकला..

गोविंदा: ये कूली निकला कहां से? कूली तो मैं हूँ ही।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला.

मला वाटतं १९७० चं दशक जसं उलटलं तसं, ज्या अनेक बॉलीवूड व्यक्तीमत्वांना स्वतःला बदलायला लागलं त्यात कादर खान होते. जे स्वतःला फार बदलू शकले नाहीत, ते विरून गेले. ज्यांनी स्वतःला बदललं त्यांचे सर्वच बदल सर्वांना बरे वाटतील असे नव्हते. (१९७० नंतरच नव्हे, तर प्रत्येक दशकात स्वतःला बदलून टिकवून धरलेलं दुसरं फारच मोठं उदाहरण अमिताभ बच्चनचं आहे. माझ्या मुद्द्याच्या पुष्टीकरणार्थ मी ते इथे नोंदवतोय. )

कादर खान एकंदर १९८० च्या दशकात जीतेंद्र-श्रीदेवी-जयाप्रदा वगैरेंच्या बरोबर दाक्षिणात्य सिनेमांच्या लाटेवर स्वतःची नौका चालवणारे बनले. पहा : पाताल भैरवी आणि इतर अनेक. (यात शक्तीकपूर नामक घटकही येतोच Smile ) आणि मग १९९० च्या दशकात गोविंदा-जॉनी लिव्हर वगैरे कॉमेडीप्रधान सेटअपमधे त्यांनी फिट केलं. (इथेही शक्तीकपूर बरोबरच ते असायचे.) पहा : राजा बाबू आणि तत्सम.

१९७० मधे "मुकद्दर" ऊर्फ नियतीसारख्या संकल्पनांना आकार देणारे कादर खान १९८० मधे "आऊ लोलित्ता" आणि १९९० मधे "राजाबाबू राजाबाबू" करणारे ठरले. यातून ते टिकून जरूर राहिले पण एकंदर कलेबद्दलची अस्सलता हरवलेले होते. अर्थात हे अपरिहार्य होतंच. १९७० नंतर खुद्द अँग्री यंग मॅनच अँग्री आणि यंग दोन्ही नव्हता. तो कॉमेडीच्या दिशेने गेला तर हेही गेले.

असो. एकंदर या माणसाचं आयुष्य लोकविलक्षण हे खरं आहे मात्र त्याने केलेलं सगळंच काम अभिरूचीयुक्त होतं असं म्हणणं कठीण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एकंदर या माणसाचं आयुष्य लोकविलक्षण हे खरं आहे मात्र त्याने केलेलं सगळंच काम अभिरूचीयुक्त होतं असं म्हणणं कठीण.

पर्फेक्ट! हेच म्हणायचं होतं.

विशेषत: १९८०तल्या चित्रपटांचं लिखाण - ही कादरखान ह्यांच्यासाठी काही भूषणास्पद बाब नव्हे, असलाच तर थोडा ब्याड प्याच म्हणता येईल. एक से एक टेंप्लेट सिनेमा आले त्या बकवास काळात त्यांनी पाट्या टाकून लिखाण केलं असावं. चलता है.
शिवाय कुठल्यातरी फारवर्डात कादरखान ह्यांच्या बालपणाबद्दल वगैरे वाचलं - इतकी खडतर परिस्थिती असताना पटकथालेखक म्हणून नाव कमावणं हे जबरदस्त आहे.
.
कादरखान ह्यांच्या सिनेमातल्या विनोदी भूमिका मला तरी कायम लक्षात रहातील. त्यांची खलनायकाची कामं किंवा बहुसंख्य सिनेमांची पटकथा - ही भरताड म्हणून दुर्लक्ष करून टाकावी.
.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0