तू माझ्या आयुष्यात

तू माझ्या आयुष्यात
ठेविले पाऊल पहिले
तूच माझी दुनिया आता
मागे सारे जग राहिले

शांत रानातली
वाऱ्याची सळसळ
कि आषाढातली
तू धोधो कोसळ

जरी असे अजाणता
आयुष्य तुजसी वाहिले
तू माझ्या आयुष्यात
ठेविले पाऊल पहिले

असो सहवास हा
तुझिया विभ्रमांचा
मीपणा जावो अंता
फुगा फुटो भ्रमांचा

येवो अर्थ सहजीवना
आधी एकांत किती साहिले
तू माझ्या आयुष्यात
ठेविले पाऊल पहिले
-------------------------
बिपीन सांगळे

field_vote: 
0
No votes yet