तीराकाठी

तीराकाठी लांब सावल्या
झुकलेल्या वृक्षांच्या प्राचिन
आणि झुळुकतो सुरेल वारा
फुलारलेल्या वेळुबनातुन!

वृक्षांच्या राईत हरवले
जुनेपुराणे, अंतरलेले,
कथा मंडपी चितारलेले
धूरकोंडले दगडी राऊळ!

प्राचिन ज्याच्या तटबंदीच्या
चिरेबंद दगडांची वाकळ
चिवट, अनावर उन्मेषाने
उसवत आहे आतुर पिंपळ!

गाभाऱ्यातुन त्याच पुरातन
गंध नवा हा कसा परिमळे?
नाद नवा हा येतो कोठुन
कसे अगोचर भासे शाश्वत?

कुण्या काळचा श्वास भरूनी
निनादते सृजनाची सनई,
तीराकाठी मोहर पिवळा
वसंतातली अधीर धांदल!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्राचिन ज्याच्या तटबंदीच्या
चिरेबंद दगडांची वाकळ
चिवट, अनावर उन्मेषाने
उसवत आहे आतुर पिंपळ!

क्या बात है! अनावर हा शब्द आवडला नाही पण बाकी कल्पना/उपमा सुंदर.

अजुन एक धूरकोंडल्या शब्दाच्या जागी मला धूपकोंडल्या आवडला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर कविता. तुमच्या कविता नेहमीच आवडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर कविता. तुमच्या कविता नेहमीच आवडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद ..शुचि आणि अतिशहाणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0