बेरोजगारी - समस्या आणि उपाययोजना

भारतात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे एक तर पदवीधर युवक रोजगारक्षम नसावेत किंवा त्यांना संधी उपलब्ध होत नसाव्यात.
पहिला मुद्दा आपण बघूयात.
रोजगारक्षम युवक नसावेत म्हणजे नेमके काय तर सरळ सरळ आपली युवापिढी शैक्षणिकदृष्ट्या कालबाह्य झालीय. लाखोंच्या फीया भरून डिग्र्या घ्यायच्या नंतर अँडवान्स टेक्निकल कोर्सेस साठी पैसै मोजायचे. मात्र अँडव्हान्स काय असतं ते कधीच शैक्षणिक अभ्यासक्रमात आणाणर नाहीत. चौकाचौकात जशी हॉटेल टाकावीत तशी मोठमोठ्याल्या शैक्षणिक संस्था काढल्या. त्या संस्थांच्या शाळा कॉलेज चे मळे पिकवले. नुसतेच भव्यदिव्य कँपस! शिक्षणाच्या, सुविधांच्या नावाने बोंब. एकूण शिक्षणव्यवस्था ही एकमेव अनस्किल्ड अँड अन्एम्प्लॉयेबल तरुण तयार करायची फँक्टरी झाली आहे. कला , वाणिज्य आणि शास्त्र शाखेतून पदवीधर तरुण कायम हालापेष्टा सहन करत असतात नोकरीसाठी. इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आपली शिक्षणव्यवस्था पुरवू शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
दुसरा मुद्दा आपण बघूयात.
सरकारने जर नोकरीच्या संधी निर्माण केल्यातर बेरोजगारी कमी होऊ शकते. आता ह्या संधी सरकारी असूच शकत नाहीत कारण मिनिमम गव्हर्नमेंट अणि मँक्सिमम गव्हर्नन्स असा भाजपाचा अजेंडा पहिल्यापासूनच आहे. सरकारने स्वयंरोजगारासाठी कितीही योजना राबवल्या तरी लालफितीच्या कारभारात त्या यशस्वी होत नाहीत आणि होणारही नाहीत. कारण भारतीयांची मानसिकता. मुद्रा लोन वगैरे योजनेत कर्ज मिळवण्यासाठी काय काय हाल सोसावे लागतात हे जाणकारांना चांगलेच माहितेय. उगाचंच आकड्यांचा खेळ करुन भाजपाने कितीही आटापिटा केला तरी जनता आणि भडकलेला तरुण मतपेटीतून राग व्यक्त करायला कायमच दक्ष आहे. जे फुटकळ पक्ष वा संघटना जातीपातीत विष कालवून स्वार्थ साधू इच्छितात त्यांच्यावर जनता कधीच विश्वास ठेवणार नाही.

सरकारने जर शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल केले तरच रोजगारक्षम युवक तयार होतील. पण बदल झाला तर आपापल्या सोयीनुसारच झाला पाहिजे असं भारतातल्या सगळ्याच राजकारणी नेत्यांना वाटतं.
त्यामुळे तरुणांनी आत्मपरीक्षण करूनच शैक्षणिक विकल्प निवडले पाहिजेत. सुशिक्षित बेरोजगारांनी आपण नेमकं कुठे कमी पडतोय आणि कोणत्या बाबतीत सुधारणा करणे गरजेचे आहे यावर लक्ष केंद्रित करायची गरज आहे. आरक्षण, मोर्चे, आंदोलने, रँली वगैरे यागोष्टी कित्येक वर्षे चालू होते आणि सोकॉल्ड लोकशाहीत पुढची अनेक वर्षानुवर्षे हेच चालू राहणार आहे. अशा भानगडीत पडून कधीच कोणाचा विकास वा प्रगती होत नाही. गेल्या बहात्तर वर्षांपासून आपण केवळ शिक्षण, रस्ते, वीज, पाणी, गरीबी वगैरे यावर लढतोय आणि आपल्या साठी लढणारे (फुकटचा आव आणून) राजकारणी नेते, समाजसेवक वगैरे (काही अपवादात्मक पुढारी वगळता) धनिष्ठ, गलेलठ्ठ होतात.
युवकांनी सूज्ञ व्हावे.
©भूषण वर्धेकर
३१/०१/२०१९
हैद्राबाद

(वरील लेखावर चर्चा व्हावी. मत, मतांतरे, खंडन, मंडन स्वागतार्ह आहे)

field_vote: 
0
No votes yet

>>चौकाचौकात जशी हॉटेल टाकावीत तशी मोठमोठ्याल्या शैक्षणिक संस्था काढल्या. त्या संस्थांच्या शाळा कॉलेज चे मळे पिकवले.

जेव्हा चौकाचौकात कॉलेजे नव्हती तेव्हाही इंजिनिअरिंग शिक्षणाचा दर्जा यथातथाच होता. याचे कारण शिक्षक यथातथा असणे हे होते. आणि त्याचे कारण ज्याला दुसरं काही जमलं नाही तो शिक्षक* बनतो हे आहे.

*हे ९० टक्क्याहून शिक्षकांचं वास्तव आहे असा माझा दावा आहे.

मिसळपाव विश्रांती घेत आहे. ते सुरू झालं की माझा जुना लेख टाकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

गावाकडन शेती करता करता शाळा कॉलेजच्या नोकऱ्यांमध्ये पाट्या टाकणारे खूप आहे. काही पुर्णवेळ 'एजंट' चा व्यवसाय अर्धवेळ शिक्षकी पेशात रममाण असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा

मुक्त आणी खुली बाजारपेठ ज्यामध्ये labor skills प्रमाणे स्पर्धा होउ शकेल, हाच एकमेव मार्ग आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भूषणभौ, सगळे खरे आहे तुमचे. पण ह्या बदलाची सुरूवात कशी आणि कुणी करायची यापाशीच घोडे अडले आहे. राज्ये कि केंद्र? पैसा कुठून येणार? उद्योग- शिक्षणसंस्था युती कशी घडवून आणायची? अभ्यासक्रम आधुनिक करायचा म्हणजे नक्की काय? उच्च- शिक्षणसंस्थांना स्वायत्तता, स्टार्ट अपना प्रोत्साहन, कसल्या इनोव्हेशन लॅब, स्किल इंडिया असले बदल मोदी सरकारने घडवून आणायला सुरूवात केलेली. मग कुठे त्याचा परिणाम कसा दिसून येत नाहीये?
आज अनेक उद्योग म्हणतात आम्हाला नोकरीयोग्य, कुशल उमेदवार मिळत नाही, कौशल्ये असणारे पदवीधर संधी मिळत नसल्याची रड गातात. छोटी कॉलेजे कँपस रिक्रुटमेंटसाठी उद्योगांना आणण्यात अयशस्वी ठरतात. अश्यावेळी सर्व पदवीधरांना आपापले सिव्हीज, मार्कशिटं, स्किल्स- सर्टिफिकेट्स अपलोड करण्यासाठी सेंट्रल वेबसाईट निर्माण करावी. जेथून उद्योग स्वतःहून उमेदवारांना अप्रोच करू शकतील. नोकरी.कॉम सारख्या वेबसाइट्स फ्रेशर्ससाठी आजिबातच उपयोगाच्या नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

माझा अनुभव निव्वळ आयटीपुरता मर्यादित आहे. विप्रो (व इतर काही कंपन्यांनी) नोकरियोग्य कुशल कामगार तयार करण्यासाठी B Sc to MS असे ४ वर्षाचे (फिक्स पगाराची) नोकरी करता करता शिका स्वरूपाचे काही कार्यक्रम राबवले होते. हे दोन्ही पार्ट्यांसाठी उपयुक्त होते असे माझे मत आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे काही सध्या आजिबातच चालू नसावे.
तुमचा अनुभव कधीचा अतीशहाणाजी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अमुक एवढा पैसा कमवायला अमुक हेच शिक्षण घ्या. असा पावित्रा असणारे पालक पाल्य अंधानुकरण करून अमुक ह्याने हे शिक्षण घेतले तू पण तेच घे ह्याच्यातच वाया गेले. मुळात भारतीय युवक गोड गैरसमजुती बाळगून असतो. शिक्षण आणि नोकरीच्याबाबतीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा

मुळात शिक्षण घेऊन ते आमलात कसे आणावे यावर कोणताच अभ्यासक्रम नाही. शिका घोका परिक्षा द्या पास व्हा मार्क्स मिळवा सर्टिफिकेट मिळवा नोकरीसाठी प्रयत्न करा नाहीतर हताश व्हा हेच दुष्टचक्र चालू आहे सध्या. पाबळ येथील विज्ञान आश्रम मला ह्याबाबती आश्वासक वाटते. व्यवसायभिमुख शिक्षणावर तेथे भर दिला जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा