भाग 1 पावनखिंड लढ्यातील साथी वाटाडे

भाग 1 पावनखिंड लढ्यातील साथी वाटाडे
1

पन्हाळ्यामधून सुटका करून घेण्याच्या महाराजांच्या मोहिमेत सर्वात महत्त्वाचे होते ते म्हणजे त्यांचे वाटाडे.

हे वाटाडे कोण असावेत? त्यांची निवड महाराजांनी कशी केली असावी? या वाटाड्यांना योग्य तो रस्ता खरोखरच दाखवता आला का? त्यांच्या हातून काही गफलत तर झाली नसेल? आणि झाली असेल तर त्यावर मात महाराजांनी कशी केली असावी या सर्व बाबी मिलिटर कमांड़रांच्या आखणीच्या कारवाईत फार महत्वाच्या ठरतात. या अंगाने प्रस्तूती करायचा प्रयत्न.
जेंव्हा सुटकेची रात्र ठरवली गेली असावी त्याआधी महाराजांनी गडावरील अनेक जणांची विचारपूस करून ज्यांना गडावरून खाली उतरण्याच्या विविध लहान मोठ्या वाटा आणि गजापूर पर्यंत जाण्याच्या मार्गाची माहिती असावी. उपस्थितांपैकी अनेक जणांनी आपल्याला वाटांची माहिती असल्याचा दावा केला असावा. या सर्वांना वेगवेगळ्या गटात वाटून महाराजांच्या विविध सरदारांनी त्यांच्या वाटांची खात्री करून घेण्यासाठी वेगवेगळ्या बैठका घेतल्या असाव्यात. शेवटी त्यामधील तीस-चाळीस जणांचा विचार करून त्यांना वेगळे बोलावून घेऊन कसे जायचे याबाबत चर्चा केली असावी.
अगदी पुढे दोन जणांची एक जोडी वाटेच्या डाव्या अंगावरील आणि दुसरी जोडी उजव्या अंगावरील खुणाखाणा शोधत जाताना ओहोळ, खाचखळगे, निसरड्या जागा, वाटेत आडव्या येणाऱ्या झाडी, फांद्या यातून वाटेत चुकामूक न होता. अगदी शेवटच्या मावळ्यांना यायला जमेल असे वाट काढत जायचे ठरले असेल. त्यांच्या मागे मागे वाटाड्यांच्यातील 'पक्के' म्हणून बरोबर घेतलेले काही वाटाडे त्यांच्या मागाऊन येणाऱ्या महाराजांच्या बुट्टी डोलीशी संपर्कात राहून आपण बरोबर दिशेने आणि खुणेच्या ठरलेल्या वाटेवरून निघाल्याची खात्री करून देत असावेत.
एकूण ६०० जणांच्या पायदळाची विभागणी सध्याच्या* परंपरेने ३ ते ४ कंपनींमध्ये केली असे मानले तर प्रत्येक कंपनी कमांडर, आपल्या बरोबरचे सैनिक मागोमाग येत आहेत का? कोणीतरी मागे राहिले तर का व किती? मागच्या कंपनी कमांडरच्या बरोबर यायची व्यवस्था आधीच ठरली असावी.
रात्रीच्या वेळी, वाट सोडून भर पावसात, नाले, ओढे भरभरून त्यातून जाणाऱ्या सैनिकांवर लक्ष ठेवून कंपनी कमांडरच्या हाताखालच्या प्रत्येक प्लाटून कमांडरचे काम असावे. पाण्यातील खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज चुकल्याने पाय मुरगाळणे, खरचटणे या सारख्या किरकोळ पण चालायच्या गतीला बाधा आणणाऱ्या घटनातून व रक्त पिणाऱ्या **जळवांच्या तडाख्याने अनेक जणांचा वेग मंदावला असावा. हातातील काठीचा आधार घेऊन तोंड बंद ठेवून चुपचाप कमीतकमी आवाज करत जायचा प्रयत्न असावा. एका मागे एक येणाऱ्या ३ ते ४ कंपनींच्या बरोबर पुन्हा दोन वाटाड्याची जोडी ठेवून चालताना पडणाऱ्या अंतरामुळे आधीच्या कंपनीचा मागच्या कंपनीशी सतत संपर्कात राहायला व नेमक्या वाटेने जायला मार्गावर लक्ष ठेवून असतील. वेळोवेळी तोंडात बोटे घालून शिट्ट्यांच्या संकेतातून सर्व सैनिक आणि वाटाडे यांच्यात मेळ बसवला जात असावा. पावसांच्या सरी अती तीव्र झाल्यातर महाराजांच्या डोलीशी संपर्कात राहून थांबण्याचा आदेश सर्वांना पोचवायला संकेत केले जात असावेत.
2

सध्याचे इरल्याचे रूप...

डोक्यावरच्या इरल्यांतून टपकणाऱ्या पाण्याच्या धारा, पाठीला बांधलेल्या ढाल-तलवारी, काही खायला बरोबर आणलेले, हातात लाकडी लाठी व भाल्याचे पातळ बांबू असा साधारण वेश असलेल्या प्रत्येक मावळ्यांनी पायात काय घातले असावे किंवा नसावे यावर विचार केला जावा. या शिवाय महाराजांच्या बुट्टी कावडीला उचलून नेताना त्यांच्या बरोबरच्या राखीव दलासाठी दोर-शिड्या, जादाचे भाले, तीर कमानी, तलवारी, दरवाजे फोडायला घण, पहारी या सारख्या अत्यंत जरूरच्या सामानाची वजनदार 4-5 बुट्ट्यांची ओझी बरोबर असावीत. अशाच विविध शस्त्रांच्या 4-5 बुट्टीडोल्या बुट्या प्रत्येक कंपनी किंवा प्लाटून बरोबर असाव्यात. बाजींच्या बरोबरच्या सैनिकांत दांडपट्टे प्रवीण पथकाच्यासोबत अनेक दांडपट्ट्यांचे जोड बरोबर असावेत. पौर्णिमेच्या रात्रीच्या काळोख्या अंधुक प्रकाशात खांदे बदल करत करत एकदम चढ आणि उतार असलेल्या ठिकाणी काळजीपुर्वक जाताना त्यांची गती तासाला 2 किमी किंवा त्याही पेक्षा कमी असावी.
महाराजांचा मार्ग आणि तोतया शिवाजी यांच्या गडावरून खाली उतरण्याच्या वाटा, दरवाजे वेगळे असावेत? ते एकाच वेळी बरोबर निघाले असावेत आणि विशिष्ट भागात सुखरूप पोचल्यावर मग वाटांची दिशा बदलून पुढे गेले असावेत यावर विचार केला जाऊ शकतो. या अभ्यासात मिलिटरी कमांडर दोन्ही शिवाजी आपापल्या ठरवलेल्या वेगवेगळ्या एकदम चढ-उतार असलेल्या दरवाजातून गराडा पडलेल्या सैनिकांना चुकवण्यासाठी लागणाऱ्या वेळेची संधी पाहून निसटले असावेत असे मानतात. म्हणून तोतया शिवाजी मसाईपठारावरून कोकणात जाणाऱ्या रुळलेल्या मार्गाने जात असावेत. पकडले नाही गेले तर अंबा घाटातून उतरून कोकणतळ गाठायचा आणि खऱ्या शिवाजींच्या किंवा नेताजी पालकरांशी पन्हाळ्यातील बातमी सांगायची. पकडले गेले तर विशाळगडाचे अजिबात नाव देखील काढायचे नाही असे ठरवले असावे.
....भाग १ समाप्त
* मिलिट्री फॉर्मेशन्स
3

**##जळवांचा जलवा!
4
[**वाटेत एका गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे, त्या म्हणजे "जळवा". पावसाळ्यात सह्याद्रीच्या अनेक परिसरात या दिसतात. पण या ट्रेकमधे त्यांचा उपद्रव जास्तीच जाणवतो. मला तरी या जळवांचा त्रास झाला नाही, पण काही सोबत्यांना त्यांनी प्रसाद दिलाच. (सौजन्य - दुर्गविहारींचा धाग्यातून जमवलेली माहिती)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रोचक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मजकुराबद्दल आपला प्रतिसाद अपेक्षित

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

या लेखात 'असावं' हे क्रियापद वारंवार येतं. 'असंअसं असावं' या आडाख्याला (तुमच्या अनुभवाव्यतिरिक्त) काही ऐतिहासिक आधार आहे का?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

उदाहरणार्थ...सूरत लुटली. मालवाहक जनावरांच्या पाठीवरून माल नेत मुव्हेरकिल्यापाशी लुट केली.कांचनबारीत व नंतर वणी ते दिंडोरी मार्गात मुघल सैन्याने आवडायचा प्रयत्न केला. शिवाजींच्या सैन्याने त्यांना पिटाळून कुंजीर गडावर महाराज गेले. थोडक्यात तिथे तो माल नेला गेला. इतपत माहिती इतिहास अभ्यासक सांगताना दिसतात.
समजा, आपल्याला जर कोणी सांगितले की मी रेल्वे स्टेशन वरून घरी आलो. वाटेत पेट्रोल भरले. हॉटेलात जेवण केले. आता त्या व्यक्तीने केेलेला प्रवास कसा कसा केला गेला असेल याचा शोध घ्यायचा असे ठरले तर त्या दोन्ही ठिकाणच्या मधील वाटांचा, त्यात सांगितल्या गेलेल्या खुणांचा शोध घेत आपण प्रत्यक्ष देत भेट गेलो तर न सांगितलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा व्हायला मदत होईल. हा लढा कसा लढला गेला असेल हे समजून घ्यायला मिलिटरी कमांडरांच्या नजरने पाहून हे काम केले तर ते असे असेल. हे सादर केले आहे. पण मी म्हणतो असेच ते घ़डले असेल असे म्हणणे साहसाचे होईल. म्हणून असे असावे असा शब्द प्रयोग मला शोभनीय वाटतो.
मी डिसक्लेमर दिले आहेत ते पुढील लेखात सादर करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0