आणि दरवाजा तोंडावर बंद झाला.. किस्सा नवी दिल्लीचा...

गोष्ट हवाईदलातील ...

1

आणि दरवाजा तोंडावर बंद झाला.. किस्सा नवी दिल्लीचा...

विंग कमांडर (नि) शशिकांत ओक
असे अनेक प्रसंग येतात कि तेंव्हा काय करावे सुचत नाही. धीर धरून त्यातून मार्ग काढला तर अनपेक्षित परिणाम होतो. माझ्याबाबत असे अनेकदा घडले.
असा एक किस्सा...
हवाईदलाच्या पोलिसांची व्हॅन निघाली. त्यात वेस्टर्न एयर कमांड कँपसचा सिक्युरिटी ऑफिसर म्हणून मी पुढे
विराजमान. मागे दोन रिव्हॉल्वरधारी बळकट एयर वॉरियर साथिदार बसलेले. नवी दिल्लीतील रिंग रोड वरून डिफेंन्स
कोलोनीच्या एका कोठीपाशी आम्ही थांबलो. माझा कडक गणवेष, वर पीक कॅप, हातात व्हीआयपीची ब्रीफकेस, मागे दोन
हत्यारबंद सहकारी, असा मी ऐटीत घराची घंटी वाजवून दरवाजा उघडायची वाट पहात उभा होतो.
किलकिला दरवाजाकरुन आतल्या व्यक्तीने अंदाज घेतला. 'कोई एयरफोर्सवाले लगते है', वर्दी आतवर गेल्याचे ऐकायला
आले.
"हकाल दो...---चोदों को"; सणसणीत गालीत उर्मटपणा कुटून कुटून भरलेला होता.
तरीही दरवाजा उघडला. तो बंद करायच्या आत "आपसे कोई नही मिलना नही चाहता" बोल सुनावले गेले. दरवाज्याने
माझ्या नाकाचा वेध घेत आपले तोंड धाडकन बंद केले. मागे उभा सार्जंट, "सीयडी सिरियल मधील 'दया टाईप' आवाजात
म्हणाला, 'सर, लात मारकरे तोडता हूं.... साले की ऐसी की तैसी'
मी काही न बोलता पुन्हा बेल खणकावली. चांगली दोनदा.
आता दरवाजा झपकन उघडला. 'क्या है?' तणतणत बोलल्याचा स्वर होता. वेशावरून त्या घरमालकीण होत्या हे मी
ताडले. आताच मौका होता. अभी नही तो कभी नही. असे निर्वाणीचे मनात बोलत मी म्हणालो, 'मॅडम, मैं आपसे मिलने आया हूं.
सर से नही’.
'क्यों हमारे पीछे आप पडे है?' म्हणत त्या बाईंनी रागाचा स्वर धरला. गोऱ्यापान, सुंदर, सलवार खमीज ड्रेस, केसांचा बॉब.
कानाच्या पाळ्यांवरून लटकणारी काश्मीरी कर्णभूषणे.
'कुछ डॉक्युमेंट्स आपसे चाहिए थे. आपण आमच्या अनेक पत्रांना उत्तर देत नाही. आमच्याकडून पत्ता तर चुकीचा नाही
याची खात्री करायला आलोय. ठंडा पानी मिलेगा क्या?'
त्या आत गेल्या. थंडपाणी आले. तोवर पिंजारलेल्या केसांचा, गॉल्फच्या हाफपँटमधील झुपकेदार मिशांचा विंग कमांडर
प्रवेशला.
चेहऱ्यावर तुच्छतेचा भाव ओसंडत होता. मी पटकन उभा.
'सर, गुड आफ्टरनून, करत. मी हस्तांदोलनाला पुढाकार घेतला. ओके, ओके म्हणत नाईलाजाने पोकळ हाताने तो
स्वीकारला. तोवर पाणी आल्याने मला बसायची खुण केली.
ग्लास खाली ठेवेपर्यंत मी दिवाणखाना न्याहाळला. उदासवाणे वातावरण, मळके सोफे, जुनाट फर्निचर, जळमटे
लटकतायत.
'देख स्क्वाड्रन लीडर ओक, माझ्या छातीवरील नेमप्लेट वाचत तो म्हणाला, 'आय हेट एयर फोर्स. प्लीज गो अवे.'
दरवाज्याने आपटून जे सांगितले तेच सौम्य शब्दात मला पुन्हा सुनावले गेले.
'सर, मला आपल्याला प्रत्यक्ष भेटायला यायचे कारण असे की आपण आयडेंटिटी कार्ड, फ्लाईंग कार्ड वगैरे जमा केलेले
नाही. मला वरिष्ठांकडून तगादा होतोय की ते मिळवा. नाहीतर माझ्यावर एक्शन घेतली जाईल!
शिवाय मला उत्सुकता आहे की आपण कोण? हवाईदलावर इतके का खार खाऊन का आहात?

'तू अभी बच्चा है. मेरी बॉससे नही बनी. मला कोणाचे उगीच ऐकायची सवय नाही. चुकीचे असेल तर कधीच नाही'
म्हणून काही वर्षांपुर्वी एक दिवशी मी वेस्टर्न एयर कमांडच्या चीफशी भांडून परत त्या ठिकाणी न जाण्याच्या निश्चयाने पेपर
टाकले व डिस्चार्ज मिळवून घरी बसतोय.'
'आय केअर टू हूट्स फॉर एयर फोर्स' तणतणत ते म्हणाले.
'वेल सर, यु मे बी राईट, पण माझी काय चुक त्यामुळे मला वरिष्ठांचा दट्या बसतोय? मी आपल्याला विनंती करायला
आलोय की आपण आपल्याकडील आयडेंटिटी कार्ड तरी मला द्या. कारण ती डिसिप्लिन केस होतेय म्हणून मी सिक्युरिटी ऑफिसर
म्हणून आपल्याला प्रत्यक्ष भेटायला आलोय.
'यू कॅन अंडरस्ट्रॅंड माय पोझिशन सर'.
त्यांनी मान हलवली. ते आत गेले. कार्ड घेऊनच परतले. माझ्यापाशी पोहोचेल अशा बेताने दुरून टाकत त्यांनी नाराजी
व्यक्त केली.
'थँक्स' म्हणत मी उठलो. म्हणालो, 'सर हे काम तर झाले पण एक विचारु का?'
आपला राग हवाईदलावर नाही. त्यात असलेल्या व्यक्तिंवर आहे. पण आपण आपल्याला ती शिक्षा का करून घेता
आहात?
'मैं समझा नही?' ते म्हणाले,
'सर, माझा प्रोफेशन अकाऊंट्सचा आहे. मी आपले नाव दर महिन्याच्या आऊटस्टँडींग केसेसच्या रिव्हूमधे पहातो. आपला
प्रॉव्हिडंट फंड तसाच पडलाय. तो आपण क्लेम का करत नाही’?
ते काही बोलले नाहीत.
‘सर, ते पैसे तुमचे, स्वतः कमावलेले आहेत. त्याचा एयर फोर्सशी काही एक संबंध नाही. ती रक्कम आपण का नाकारता
आहात’?
'आय से', म्हणत त्यांच्या मिसेस पतीला संबोधून माझ्याशी बोलू लागल्या.
'एके, विल नेव्हर रिअलाईज धिस. मी आज सेंट्रल स्कूल मधे शिकवते म्हणून आम्ही कसेबसे घर चालवतोय. प्रॉव्हिडंट फंडाचे पैसै,
पेन्शन काहीच घ्यायला हा तयार नाही.'
आता मिसेस बोलत होत्या व मी ऐकत होतो.
'काय करायचे सांगा. नवऱ्याकडे पहात म्हणाल्या, 'ठीक, तू बरोबर आहेस, पण आता आपली परिस्थिती पहा. मुलांच्या कडे पहा...
कितीदा सांगून पाहिले तर ऐकायला तयार नाहीस.... आता तरी समजून घे....
'स्क्वाड्रन लीडर ओक, यु मे गो नाऊ.' असे म्हणून त्या विंग कमांडरने माझ्यासमोर पत्नीने केलेल्या कागाळ्यांमुळे परेशान
होत आपला पत्नीवरील राग आवरत मला सुनावले.
मी ही प्रसंगाची नजाकत ओळखून म्हटले, 'इफ यू डोंट माइंड, मी एक कागद आणला आहे. त्यावर आपण सही केलीत
तर मी आपल्या प्रॉव्हिडंट फंडाचे पैसै मिळवून देऊ शकतो. माझे मित्र सेंट्रल एकौंट्सला आहेत. मी त्यांच्याशी संपर्क करीन. रेव्हेन्यू
स्टँप सकट तयार ब्लँक क्लेमवर त्याने घुश्सात सही केली व तो आत निघुन गेला....
नंतर काही दिवसांनी …
माझ्या ऑफिसचे दार खटखटले म्हणून मी वर पहिले. तो एक अनोळखी व्यक्तिमत्व उभे होते.
'हाय, आय एम एके, यू हॅड कम टू माय हाऊस, म्हणत त्याने हस्तांदोलनाला हात पुढे केला. हाच तो विंग कमांडर? केस
पिंजारलेला ... दाढी वाढलेला... माझा विश्वास बसेना...
'प्लीज हॅव अ सीट' म्हणताच तो बसला. पुन्हा हातात हात घट्ट धरत म्हणाला, 'स्क्वाड्रन लीडर शशिकांत ओक तू जर त्या दिवशी
आला नसतास तर मी आज कदाचित तुला दिसलो नसतो.'
'थँक्स, माझे पैसे मला मिळाले. आता पेन्शनचे पेपर ही तयार झाले. तुझ्यामुळे मी खाल्लेली कसम मात्र मला तोडावी लागली.
'मी या वेस्टर्न एयर कमांडच्या इमारतीत कधीही पाऊल ठेवणार नाही' म्हणून शपथ घेतली होती. पण मी फक्त तुला प्रत्यक्ष
भेटायला आलोय. तू वेळीच भेटून मला लक्षात आणून दिलेस की ऑर्गनायझेशन वाईट नसते त्यातील काही व्यक्तिंमुळे रागावून
आमच्यासारखे आपल्या पायावर धोंडा पाडून घेत असतात. आज तुझ्यासारखे लोक मान-अपमानाची पर्वा न करता हवाईदलात
काम करतात. त्या दलाचा एक प्रतिनिधी म्हणून मला सहानुभूतीने भेटलास. थँक्स.'
त्याच्या हाताची मुठ माझ्यावरील निर्व्याज भावना व्यक्त करायचे काम करत होती. ..

मी ही गहिवरलो. एक दरवाजा तोंडावर बंद होतानाच्या वेदनांना काबूत करत...
....

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

हृद्य आठवण. सुंदर..

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचकांना तर ही मेजवानी मिळालेली आहे. किस्सा मूळात दमदार आहे व त्यातुन तो रंगविलाही बहारदार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अँड व्हाय नॉट? जे दुर्बोध कविता सहन करतात उनको नाडी क्या चीज है! Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाडीग्रंथांचा अनुभव न घेताच काही दुस्वास करताना दिसतात.. ज्योतिष शास्त्र आहे-नाही यात मला रस नाही. पण भाषा, लिपी, काव्य याचा अभ्यास करायला मला आवडते.
काहींना मनातून नाडीग्रंथांबद्दल तिटकारा वाटतो कारण त्यात त्यांच्या आदराच्या व्यक्तींच्या मतांचे खंडन होते म्हणून...
या लेखाला प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच छान आठवण! तुमच्यातल्या सहृदयी व्यक्तिला सलाम!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

भारी आहे! धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फार आवडला किस्सा.
नाडीशी समांतर किस्सेही चालू ठेवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किस्सा अति उत्तम. अजून येऊदे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या अशा बहारदार किश्श्यांमुळे ऐसीचे वाचक लाडावुन बसतात आणि मग 'टिनपाट' लेखकांकडे ढुंकुनही बघत नाहीत WinkROFL
'मागे उभा टिनपाट,
पुढे उभा टिनपाट'
(श्रेय अव्हेर - तिमा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टिनपाटाला तारा लावून एकतारी, वायलिन बनवायचा पर्याय आहे ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा २५ श्रेण्यांचा कोटा संपलेला दिसतोय. 'विनोदी' देता येत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त. अजून असं काही लिहा हो !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या म्हणण्याप्रमाणे...

काय होतास तू काय...! झालास तू...11 सार्जंट तांदळे...!!!


हा धागा सादर केला आहे....
हे जुने लेखन वाचताना सार्जंट तांदळेच्या व्यक्तिमत्वाची आठवणी ताज्या झाल्या...

1

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल...
इंग्रजीत 5 पार्ट्स मधे लेखन सादर केले आहे. कॉपल जीएस पांडे...
मराठीत ते पूर्ण लिहून काढायला कंटाळा येतोय.
1

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठीत लिहिलेलं वाचायला छान वाटलं. वेळ लागला तरी चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या इंग्रजीतील लेखातील पुढचे भाग वाचायला कोणी इच्छा व्यक्त केली तर सादर करेन. मराठीत भाषांतर करायला सध्या शक्य दिसत नाही. शिवाय इंग्रजीतील मजा काही और असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आठवण! तुमच्यातल्या सहृदयी व्यक्तिला सलाम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग

सैन्य म्हणजे हडेलहप्पी कारभार असे वाटत राहते... पण असे ही प्रसंग येतात...
ताठ मानेने चालणारा 'सार्जंट तांदळे' वरील लेख शोधून सादर करेन...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा मस्तच किस्सा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

वरील धाग्यातील इंग्रजीतील लेखावर काही प्रतिसाद नाही...?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0