पुन्हा एकदा जोतिष शास्त्राची चाचणी घेऊ या!

(संदर्भः लेख)
2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी 4 एप्रिल 2014 रोजी पुण्यात एक पत्रकार परिषद बोलवून देशातील 'मतसंग्रामा'ची बित्तंबातमीचे (तथाकथित) भाकीतं वर्तविले होते. ही भाकित वर्तविताना श्री नंदकिशोर जकातदार यांनी देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या भारतातील सुमारे चार हजार पत्रिकांचा अभ्यास केला होता म्हणे. खालील कोष्टकात त्यांनी 2014 साली वर्तविलेली भाकितं, त्याचे प्रत्यक्ष निकाल व नेमके निष्कर्ष यांची माहिती दिली आहे. 22 भाकितापैकी फक्त पाच भाकितं बरोबर ठरली. हा अपवाद वगळता अंदाज व निकाल यांच्यात फार मोठी दरी होती हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. 2014 साली जोतिषींच्या मांडणीत वा आकडेमोड करत असताना कुठेतरी चुका झाल्या असाव्यात म्हणून कदाचित अंदाज सपशेल चुकले असतील. किंवा त्या व्यक्तिनिष्ठ असल्यामुळे संपूर्ण शास्त्राला दोष देऊ नये असेही म्हणता येईल.

अंदाज/भाकितं निकाल(2014) निष्कर्ष(2014)
नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नाही चूक
कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही भाजप 282 चूक
काँग्रेसच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही युती 334+ चूक
भाजपला 155 ते 165 जागा 282 चूक
काँग्रेसला 115 ते 126 जागा 44 चूक
राष्ट्रवादीला 8 ते 10 जागा 6 चूक
शिवसेनेला 10 ते 12 जागा 18 चूक
समाजवादी पक्षाला 18 ते 22 जागा 5 चूक
बसपाला 16 ते 18 जागा 0 चूक
महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीसारखीच परिस्थिती चूक
आम आदमी पक्षाला अपेक्षित यश मिळणार नाही बरोबर
वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी मोदींना यश मिळेल बरोबर
वाराणसीत त्यांना 'आप'च्या अरविंद केजरीवाल यांची कडवी लढत मिळेल फरक 371784 चूक
एकही सेलिब्रेटी निवडून येणार नाही बरोबर
पुण्यात विश्वजित कदम आणि अनिल शिरोळे यांच्यात अटीतटीची लढत फरक 315769 चूक
विश्वजित कदम यांची सरशी होणार चूक
मुंबईत सर्व जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. सर्व जागा युतीला चूक
मावळला लक्ष्मण जगताप निवडून येणार बारणे विजयी चूक
शिरूरला शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणार आहेत बरोबर
नितीन गडकरींना केवळ पाच ते दहा हजार मतानी विजय मिळेल फरक 284828 चूक
येणारे सरकार दोन ते तीन वर्ष टिकणार चूक
त्या निवडणुकीतून येणारे सरकार पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल बरोबर
या कोष्टकात काही किरकोळ बदल करावे लागतील. उदाः मावळला लक्ष्मण जगताप ऐवजी पार्थ पवार यांचे नाव असेल. विश्वजित कदम व अनिल शिरोळे ऐवजी अनुक्रमे मोहन जोशी व गिरीश बापट ही नावे असतील. वाराणसीतील मोदींचे विरोधी उमेदवार दुसरेच कुणी तरी असतील. किंवा राहुल गांधी दोन्ही ठिकाणी जिंकतील का, अमित शहा किती फरकाने जिंकतील असे काही बदल करून अंदाज वर्तविता येईल.
गेल्या पाच वर्षात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलेले आहे. त्यामुळे त्या चुका सुधारण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या प्रधान मंत्र्यांनी उपलब्ध करून दिली आहे. व या निमित्ताने पुन्हा एकदा जोतिष शास्त्राची चाचणी घेता येणे शक्य होत आहे.
‘ऐसी अक्षरे’च्या वाचक वर्गातसुद्धा जोतिष शास्त्राचे (की अंदाज शास्त्राचे!) अभ्यासक आहेत. त्यांनी जर 2019च्या निवडणुकीच्या निकालांची कमीत कमी 18-20 तरी भाकितंं बिनचूक वर्तवल्यास ते नक्कीच कौतुकपात्र ठरू शकतील. फक्त हा अंदाज संपूर्ण निकालापूर्वी दिल्यास (व त्यानंतरसुद्धा अंदाज चुकल्याबद्दलचे कुठलेही समर्थन न केल्यास) जोतिष शास्त्राबद्दलच्या अचूकतेबद्दलच्या माहितीत नककीच भर पडेल.
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सॉरी पण मी अभ्यासक नाही. ज्योतिष फक्त एक विरंगुळा आहे. कधी त्याचे शास्त्रोक्त शिक्षण घेतलेले नाही. राजकारणदेखील फोलो करत नाही. त्यामुळे मी काहीही टिप्पणी करु शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

हे चांगलं चॅलेंज आहे- पण ऐसीवर प्रतिसाद किती मिळेल काय माहित.
असं खुलं च्यालेंज देवून वर पैसे दिले तर येतील की ज्योतिषी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एखाद्या व्यक्तीच्या ( मूळ) कुंडलीत राजयोग असेल आणि तो प्रथमच निवडणुकीस उभा आहे तर त्याचे भाकित बघायला हवे.
२) राजयोग असून एकदा खासदार झालेला आहे,( एकदा फलीत खरे ठरले आहे) तर आता त्याचे सध्याचे गोचरी ग्रह पाहावे लागतील.
३) दोनतीनदा निवडून आलेल्यांसाठी अनपेक्षित माघार/हार हे योगही असू शकतात.
-----
दिलेल्या उदाहरणात त्या ज्योतिषाने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे हे पाहा.
-----
टाइफाइड निदान झालेल्या रोग्याला योग्य औषधे देऊनही दगावतो तरीही त्या उपचार करणाऱ्या डॅाक्टराकडे लोक जातातच.
----
लोकप्रतिनिधी बनू पाहणारे ज्योतिषाकडे जातातच. ज्योतिष खरे की खोटे किंवा देव आहे का नाही हा वाद त्यांच्यासाठी तरी निरर्थक आहे.
-----
केंद्रात चंद्रासह(लोकप्रियता) शनि,(डावपेच,राजकारण) यासाठी प्रभावी असतात. हे दोनच ग्रह राजा ( हल्लीच्या लोकशाहीत आमदार/खासदार) बनवू शकतात. रवि पुढे मंत्रीपद देण्यास उपयोगी पडतो. मंगळ हा मिलिट्री माध्यमातून अल्पकाळ शासक बनवू शकतो. गुरु काही कामाचा नाही. शिक्षक.
--------

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतुल छाजेड नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले असे सकाळ मधे छोटी बातमी आहे. ही व्यक्ति म्हणजे एक मानसशास्त्रिय नमुना आहे. राजा भिकारी माझी टोपी चोरली, राजा घाबरला माझी टोपी दिली वाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बहुतेक हिंदुस्तान टाइम्स पेपरात येतात कोणा ज्योतिषांचे आडाखे. त्यात आव्हान स्वीकारलेले वगैरे नसते पण काही नेत्यांच्या कुंडलींची परिक्षणे असतात. रागांना,सोनियाला,पवारना पंप्र योग नाही हे वाचलेले. का नाही याचीही ग्रहयोगाप्रमाणे कारणे दिलेली असतात. मलाच ज्योतिष कळते, मीच शहाणा असा आविर्भाव नसतो.
फार पुर्वी टाइम्सच्या इलस्ट्रेटिड विकलीमध्ये येत असे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा तरी भौतिकशास्त्राची चाचणी घेऊ या!

मी शाळेत असताना, पाणी १०० अंश तापमानाला उकळतं असं वाचलं होतं, तुम्हीही वाचलं असेल. कधी खरोखर, स्वत:, प्रत्यक्ष प्रयोग करुन पाहिलंय का? समुद्रसपाटी, सापेक्ष आर्द्रता, वातावरणाचा दाब, हे सगळं जमवणं फारसं अवघड नसावं.

रच्याक, ॲट् लीस्ट्, मी पाहिलेल्या समुद्रांपैकी एकही समुद्र सपाट नव्हता ही किरकोळ बाब, समुद्रसपाटी या शास्त्रद्न्यमान्य कल्पनेपुढे इन्गोरावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>एकदा तरी भौतिकशास्त्राची चाचणी घेऊ या!

घ्या की. तुम्हाला कोणी थांबवलंय? जर नविन काही सापडलं तर कळवा. तुमचे नाव प्रसिद्ध होईल.

>>पाणी १०० अंश तापमानाला उकळतं असं वाचलं होतं, तुम्हीही वाचलं असेल. कधी खरोखर, स्वत:, प्रत्यक्ष प्रयोग करुन पाहिलंय का?
हो, अनेकदा. तुम्ही या किरकोळीतून सुरवात करा. नाही, उगाच रिलेटीव्हीटी वगैरेकडे जाण्या आधी बेसिकपासून सुरू केलेलं बरं, नाही का.

>>समुद्रांपैकी एकही समुद्र सपाट नव्हता ही किरकोळ बाब
सगळ्यात पहिले, शब्दश: अर्थ आणि शास्त्रीय व्याख्या यातला फरक समजून घ्या हो. एखादा जिओडेटीस्ट सापडतो का बघा. आणि मग, ज्याप्रकारे 'सी लेव्हल' चा उहापोह भौतिकशास्त्रात करून झालेला आहे, अन त्यासमर्थनार्थ सिद्धता वगैरे आहे, तशी जोतिषाचीही असेल तर द्या. मग आपण दोन्ही पैकी कोणती चाचणी सफल झाली हे ठरवू.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भौतिकशास्त्राची चाचणी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे असे नाही. काही अपरोक्ष सिद्ध होत आहेत.
दोन याने अवकाशात अचुक जोडली जातात, रेडियो लहरींनी मंगळावरच्या यानास आदेश देण्यास लागणारा वेळ वगैरे इत्यादी काही गृहितकांस सिद्ध करत आहेत असे मी मानतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुख्य म्हणजे सायन्सची काही वैशिष्ट्ये आहेत - कालातीत असावे, व्यक्तिसापेक्ष नसावे , दर वेळेला तेच अनुमान काढता यावे वगैरे.
.
ज्योतिष हे शास्त्र नाहीच ते एक टूल (साधन) आहे तेही सेल्फ-अवेअरनेस चे. बरेच पाश्चात्य ज्योतिषी हेच सांगतात.
.
वा इन्डायरेक्टली या शब्दाला 'अपरोक्ष' हा शब्द आवडला. विसरले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

परोक्ष म्हणजे पाठीमागे, indirect

अपरोक्ष म्हणजे समोर, थेट

हे शब्द बरोबर उलट वापरले जातात अनेकदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओ ओ ओ हे माहीत नव्हते. धन्यवाद गवि.
_________________
स्त्रोत व स्रोत ही असेच. मी स्त्रोत म्हणत असे. मग एकदा धनंजय यांनी एका धाग्यात करेक्ट केले की खरा शब्द स्रोत आहे.
_________
मला वाटतं हत्तीचे तोंड याला गजवक्त्र म्हणतात पण आपण सहसा गजवक्र म्हणतो. ........................... गजवक्र चूकीचे आहे असे वाटते.
____________
सहस्र हा शब्द बरोबर आहे वाटतं सहस्त्र नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

सहस्र हा शब्द बरोबर आहे वाटतं सहस्त्र नाही.

सहस्र बरोबर. सहस्त्र नव्हे.

(बादवे, संस्कृत सहस्र आणि फारसी हजार हे कॉग्नेट आहेत, असे ऐकून आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे शब्द बरोबर उलट वापरले जातात अनेकदा.

इतके, की आता उलट अर्थ हेच ग्राह्य धरले जातात.

(सोयर आणि सुतक यांचेही असेच झाल्याबद्दल ऐकून आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोयर म्हणजे घरी नवीन मूल जन्मास येणे तर सुतक म्हणजे कोणीतरी निवर्तणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

सोयरच्या मूळ अर्थाबद्दल त्वरित दाखला मिळत नाही, परंतु, (मोरेश्वरभटाप्रमाणे)

सुतक sutaka n Corrupted from सूतक, and properly signifying Impurity arising (to the members of a family) through a birth in it, but understood popularly in the sense of Impurity arising through a death.

सुतकचा मूळ अर्थ सोयर सध्या ज्या अर्थाने वापरला जातो, तो होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह अरेच्च्या खरच उलटेच आहे की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

अप्रत्यक्ष म्हटले पाहिजे होते. हिरो विलनला मारतो, हिरविन स्माइल देते हे अप्रत्यक्ष प्रेक्शक अनुभवतो ( दोनचारदा तिकिटे फाडून माउथ पब्लिसटी करतो. मी हाणलय, तु पण हाण.)
पण एकदा तरी भौतिकशास्त्राची चाचणी घेऊ या!या वाक्याने एकदम ग्रिसमध्ये टॅालेमिशी गप्पा मारल्यासारखं वाटलं.

पण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उपाध्ये फार मिष्किल आहेत Smile अतिशय आवडते व्यक्तीमत्व.

.
हाहाहा उपाध्ये म्हणतात कर्क-तूळ-मीन यांनी राजकारणात पडु नये. दानधर्म करत रहातील आणि वाट लागेल देशाची Wink
.
वरील संभाषणात शरद पवारांचे कौतुक केलेले आहे. मेष, धडाडीची ,प्रॅक्टिकल रास म्हटलेले आहे.
.
मेष-सिंह-धनु या अग्नी तत्वाच्या राशींनी राजकारणात जावे, धडाडी असते असा काहीसा संदर्भही येउन जातो. उद्धव ठाकरे म्हणे सिंह राशीचे आहेत. चलाखीने राजकारण खेळले.
.
मिथुन, कर्क, मीन यांचे किस्से गंमतीजंमतीचा व्हिडिओ आहे. प्रचंड हसले.
.
मोदी विंचू (वृश्चिक) म्हणे, अत्यंत कष्टाळू रास, बाकी सूडी वगैरेही आहे पण येस कष्टाळू फार.
.
पप्पू यांच्याबद्दल एका प्रश्नात उपाध्ये म्हणतात, हे दिल्लीचे २ मतब्बर लोक आपलं बारसं जेवलेले आहेत. पप्पू पप्पू हिणवतो आपण पण .... त्यांच्यात आपसात काय चाललय हे बाहेर कळणारच नाही. रिझल्ट येइल तेव्हा खरं. आपण पप्पू म्हणुन हिणवतो पण हे लोक राजकारण कोळून प्यालेले लोक आहेत म्हणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

असे परीक्षापटू अनेक असतात. ते दर वेळी अशा तऱ्हेच्या आवाहनांतून आपापल्या विचारांना पुढे आणत असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0